✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इरफान हुसैन

ए
एकलव्य यांनी
Tue, 12/09/2008 - 09:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3780 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

म
मुक्तसुनीत Tue, 12/09/2008 - 09:20 नवीन

मझदाक

"मझदाक" या नावाने ते लिहायचे तेव्हापासून , म्हणजे ९९ पासून मी वाचत आलो आहे. डॉन मधे ते लिहायचे - अजूनही लिहितात. त्यांच्या लिखाणाचा मी चाहता होतो/आहे. बहुदा पाकिस्तानमधे ते वास्तव्य करत नसल्यानेच ते अजून जिवंत आहेत आणि असे काहीतरी लिहू शकतात.
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 12/09/2008 - 13:46 नवीन

हम्म

बहुदा पाकिस्तानमधे ते वास्तव्य करत नसल्यानेच ते अजून जिवंत आहेत आणि असे काहीतरी लिहू शकतात विनोदाचा भाग सोडून द्या. पण फ्रायडे टाइम्सचे नजम सेठी हे पाकिस्तानातच वास्तव्य करून आहेत आणि इरफान हुसेन याच्याइतकेच (किंवा जरा जास्तच) रोखठोक भाषेत लिहितात. अर्थात इरफान हुसेन तसेच एजाज हैदर यांचेही लेख वाचण्यासारखे असतात, यावर दुमत नसावे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 12/09/2008 - 10:23 नवीन

मझदाक

सौदी अरेबिया मधे गेलो (आणि इंटरनेटचा सुकाळ झाला) तेव्हापासून 'डॉन' नियमित वाचत होतो. तेव्हाच इरफान हुसैन ह्यांची ओळख झाली. (कावसजी हा दुसरा... पाकिस्तानी पारशी बावाजी.) बरेच वेळा पारंपारिक भारतद्वेष्टी पाकिस्तानी भूमिका न घेता अतिशय मुद्देसूद आणि वास्तविक लेखन करणारे इरफान हुसैन. प्रस्तुत लेखही चांगलाच आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Tue, 12/09/2008 - 10:34 नवीन

धन्यवाद

चांगल्या लेखाची ओळख करुन दिल्याबद्दल एकलव्य यांचे आभार. पाकी मिडीयाची ही दुसरी आक्रस्ताळी बाजू .. http://www.youtube.com/watch?v=yvaXOLpZeMs&feature=related http://www.youtube.com/watch?v=OfYlaF5_q1Y&feature=related http://www.youtube.com/watch?v=5F4_qwtM5yY&feature=related http://www.youtube.com/watch?v=Eij5o7XizIA&feature=related http://www.youtube.com/watch?v=tQT9cgqdJ6U&feature=related
  • Log in or register to post comments
ध
धम्मकलाडू Tue, 12/09/2008 - 12:36 नवीन

परवेझ हूडभॉय

ही चर्चाही ऐका, बघा. परवेझ हूडभॉय यांच्यासारखी काही चंदनाची झाडे अजूनही पाकिस्तानात आहेत. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 12/11/2008 - 01:23 नवीन

एक चांगले, कामसू प्रामाणिक व्यक्तिमत्त्व

परवेझ हूदभाई यांच्याशी माझी भेट झालेली आहे. सौम्य पण अण्वस्त्रविरोधाबाबत प्रामाणिकपणे कामसू असे सज्जन आहेत. (डॉन वर्तमानपत्र मी पूर्वी दररोज वाचत असे. [आजकाल वेळेअभावी वाचत नाही.] तालिबानविरोध करताना अधिक माहितीपूर्ण लेखन तिथे वाचायला मिळे. भारतीय वर्तमानपत्रांत बातम्या कमी असत. १९९०-२००० काळात पाश्चिमात्त्य वर्तमानपत्रांत तालिबानबद्दल कुठलीही माहिती नसे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धम्मकलाडू
र
राघव गुरुवार, 12/11/2008 - 15:48 नवीन

या

या लेखनावरून आठवण झाली मुझफ्फर हुसैन यांची. ते भारतातलेच आहेत पण अतिशय आत्मीयतेने लिहितात. इतर मुस्लीम देशांबाबतचा त्यांचा अभ्यास चांगलाच आहे. तरूण भारत या दैनिकात त्यांचे लेख वाचलेत. मुमुक्षु
  • Log in or register to post comments
क
कलंत्री गुरुवार, 12/11/2008 - 22:07 नवीन

असे लिखाण भारतीय वर्तमानपत्रातही

असे अनुवादीत लिखाण भारतीय वर्तमानपत्रातही प्रसिद्ध व्हावेत. पूर्वी सोबत नावाचे साप्ताहिक होते. त्यात उर्दु वर्तमानपत्रातील लिखाण प्रसिद्ध होत असे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 12/11/2008 - 23:32 नवीन

आवडला लेख..

दुव्याबद्दल धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Tue, 12/16/2008 - 22:06 नवीन

दोन दुवे

दुवा १ "डॉन" वर्तमानपत्रातल्या "वाचकांच्या पत्रव्यवहारा"च्या या सदरातील पहिले पत्र विचार करण्याजोगे आहे. दुवा २ मात्र या बातमीचा अर्थ काय लावावा हे कळत नाही.
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Wed, 12/17/2008 - 08:30 नवीन

धन्यवाद

प्रतिक्रियांचे आणि वाचकांचे आभार. हुसैन यांचे चाहते पाहून मस्तच वाटले. निवडल प्रतिप्रतिसाद - बिपिनभाई - कासवजींचे वाचायला आम्हाला थोडा कंटाळा येतो. पुढेमागे रस वाढेलही कदाचित... असो! मुमुक्षु - मुझफ्फर यांचे आंतरजालावर काही लिखाण असल्यास जरूर कळवा. टगेदादा - इंटरेस्टिंग दुवे पुरविल्याबद्दल आभार. सविस्तर चाळतो आणि कळवितो. आणखी एक - असाच अजून एक कलंदर माणूस म्हणजे ए जी नूराणी. यांची सर्व मते मला पटत नसली तरी त्यांचे लिखाण म्हणजे एक पर्वणी असते... रूढिबद्ध विचारांना अभ्यासाचे एक आव्हान असते. आपण जरूर आस्वाद घ्यावा. स्नेहपूर्वक, एकलव्य
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा