Skip to main content

शिवजयंती हायजँक ????

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 21/08/2015 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र-भूषण पुरस्कारावरून आजूबाजूला एवढा गदारोळ उठलेला होता, त्यामुळे मी ठरवलं होत की एक मिपाकर म्हणून आपण त्या वादात पडायचं नाही, तर शिवरायांना सामान्य जनतेपर्यन्त कोणी पोहोचवण्याची सुरुवात केली व का ?, हा इतिहास तपासून जरा थोडफार माझ्यापरीने पडताळूया, मला अशी माहिती मिळाली की, शिवरायांची महती ओळखणारे पहिले व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा जोतिबा फुले होते. यासाठी १८६९ साली शिवाजी महाराजांची समाधी फुलेंनी समाधी प्रथम शोधली. (जी समाधी पडकी काट्याकुट्यात गडप होती.) यानंतर 27 रुपये वर्गणी गोळ करून समाधीस्थळाची देखभाल केली. म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर २०० वर्षांच्या काळात कोणालाही आठवण नसावी. अफाट कर्तृत्वाच्या समाजरक्षकाची, स्वराज्य उभे करणाऱ्याची याद नसावी, याचे आश्चर्य वाटते. त्यावेळीसुद्धा मूळनिवासी शेतकर्यांच्या जीवनाचे तीन तेरा वाजले होते, म्हणूनच ज्या राजाच्या काळात सुरक्षा, सहकार्य मिळाले होते (कर गोळा करताना शेतकऱयांच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही), शेतकऱयांच्या जमिनीची मोजदाद करून नावे करून दिली, शेतकऱ्याच्या भल्यासाठी प्रयत्न केले. शेती, शेतकरी, त्यांचा बैलबारदाना, वृक्षतोड याविषयी जागरूकतेने प्रयत्न केले, शोषणव्यवस्थेचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी वतनदारी, मिरासदारी संपवली (सैन्यदलाला पगार देणारा असा राजा). त्याची महती जनतेपर्यंत यावी म्हणूनच महात्मा फुल्यांनी प्रयत्न केले. महाराजाच्या गुणांमुळे ज्योतीराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख 'शेतकऱ्यांचा राजा' 'कुळवाडीभूषण' असा केला व महाराजांवर, जगातील पहिले मराठी चरिञ -एक हजार ओव्यांचा कुळवाडीभूषण हा पोवाडा रचला. त्यांच्यातल्या महाराजांवरील प्रेम, श्रद्धा, भक्ती पोटी महाराष्ट्राच्या राजाबद्दलची अस्मिता म्हणूनच १९ फेब्रुवारी १८६९ साली पहिली शिवजयंती पुणे येथे सुरू केली ती १८९० च्या आसपास निधन होईपर्यंत चालू होती. शिवरायांच्या प्रेरणेने महात्मा फुल्यांनी समाजकार्य सुरू केले होते. ते अस्पृश्यतेच्या रूढीवर प्रहार करू लागले होते. त्यांनी मुलांमुलींसाठी शाळा सुरू केल्या. प्रबोधनाच्या माध्यमातून समाजजागृती सुरू केली. पण सांगा बरे, आज तुम्हाला प्रश्न विचारला कोणी "शिवजयंती कोणी सुरु केली ?", तर चटकन त्याचे उत्तर काय बरे येते तुमच्या डोळ्यापुढे ? आजकाल शिवरायांच्या बद्दल आपण परस्परांत संवाद साधताना, 'शिवराय व शेतकरी/शेती' या आस्पेक्टचे मूलगामी महत्व दुर्दैवाने तुलनेने फार कमी लक्षात घेतले जाते, व जो कोणी या अंगाने मांडणी करतो, त्याचाही गंभीरपणे विचार करत नाही कोणी, असे वाटते. एकूणच सर्वच राजकीय शक्तींनी शिवाजी महाराजांना ऐक सेलेबल विषय करून, आपापसात वाटून घेतल्या सारखे दिसते, त्यामुळे महाराजांचे एकूणच सादरीकरण समाजामधे, 'तुळजाभवानीच्या कृपेने' वैगरे सारख्या दैववादी दिशेने जात आहे, असे वाटते. माझ्या वैयक्तिक मते आजपासून ६०-७० वर्षांनी, "शिवजयंती कोणी सुरु केली ?" या प्रश्नाचे उत्तर 'बाबासाहेब पुरंदरे' असे मिळाले तर त्यावेळी काहीही वावगे वाटणार नाही कदाचित…

वाचने 62721
प्रतिक्रिया 175

प्रतिक्रिया

वैयक्तिक मते
मग असू द्या ! बाकी सध्या मिपावर नमो- केजरी मागे पडून शिवाजी महाराज हा विषय सेलेबल झाला आहे हे नमूद करतो

'कुळवाडीभूषण' याचा अर्थ काय?
मूळनिवासी शेतकर्यांच्या जीवनाचे तीन तेरा वाजले होते, म्हणूनच ज्या राजाच्या काळात सुरक्षा, सहकार्य मिळाले होते (कर गोळा करताना शेतकऱयांच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही), शेतकऱयांच्या जमिनीची मोजदाद करून नावे करून दिली, शेतकऱ्याच्या भल्यासाठी प्रयत्न केले. शेती, शेतकरी, त्यांचा बैलबारदाना, वृक्षतोड याविषयी जागरूकतेने प्रयत्न केले, शोषणव्यवस्थेचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी वतनदारी, मिरासदारी संपवली (सैन्यदलाला पगार देणारा असा राजा). त्याची महती जनतेपर्यंत यावी म्हणूनच महात्मा फुल्यांनी प्रयत्न केले. महाराजाच्या गुणांमुळे ज्योतीराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख 'शेतकऱ्यांचा राजा' 'कुळवाडीभूषण' असा केला व महाराजांवर, जगातील पहिले मराठी चरिञ -एक हजार ओव्यांचा कुळवाडीभूषण हा पोवाडा रचला.>
याखेरीज इतर काही केले नाही असे म्हणायचे आहे का? चार मुघल पादशाह्यान्चा बीमोड करून औरन्गजेबाच्या हतावर तुरी देवुन हिन्दवी स्वराज्य स्थापन करणे हा छत्रपती शिवरायांच्या आअयुश्यातील महत्त्वाचा भग वाटत नाही का?

In reply to by मंदार कात्रे

'कुळवाडीभूषण' याचा अर्थ काय?
शेतकर्यांचे भुषण
याखेरीज इतर काही केले नाही असे म्हणायचे आहे का? चार मुघल पादशाह्यान्चा बीमोड करून औरन्गजेबाच्या हतावर तुरी देवुन हिन्दवी स्वराज्य स्थापन करणे हा छत्रपती शिवरायांच्या आअयुश्यातील महत्त्वाचा भग वाटत नाही का?
आहे ना जरूर महत्वाचा भाग आहे. पण ते important पार्ट आहे, Only पार्ट नाही . (म्हणजे (फक्त पातशाही नाश करणे ) तेवढंच नाही)
आजकाल शिवरायांच्या बद्दल आपण परस्परांत संवाद साधताना, 'शिवराय व शेतकरी/शेती' या आस्पेक्टचे मूलगामी महत्व दुर्दैवाने तुलनेने फार कमी लक्षात घेतले जाते, व जो कोणी या अंगाने मांडणी करतो, त्याचाही गंभीरपणे विचार करत नाही कोणी, असे वाटते. एकूणच सर्वच राजकीय शक्तींनी शिवाजी महाराजांना ऐक सेलेबल विषय करून, आपापसात वाटून घेतल्या सारखे दिसते, त्यामुळे महाराजांचे एकूणच सादरीकरण समाजामधे, 'तुळजाभवानीच्या कृपेने' वैगरे सारख्या दैववादी दिशेने जात आहे, असे वाटते.
हेही ध्यानात घ्यावे..

In reply to by पगला गजोधर

भिडस्त भारी । साबडा घरीं ॥ प्रिय मधुरी । भाषण करी ॥ मोठा विचारी । वर्चड करी ॥ झटून भारी । कल्याण करी ॥ आपासोयरीं। ठेवी पदरीं ॥ लाडावरी । रागावे भारी ॥ - महात्मा फुले!

In reply to by पगला गजोधर

१८६९ साली शिवाजी महाराजांची समाधी फुलेंनी समाधी प्रथम शोधली. (जी समाधी पडकी काट्याकुट्यात गडप होती.) यानंतर 27 रुपये वर्गणी गोळ करून समाधीस्थळाची देखभाल केली. हा उतारा संभाजी ब्रिगेडच्या लेखातून घेतलेला दिसतोय.

In reply to by हेमंत लाटकर

वेल प.ग.ंनी माहिती कुठून घेतली ते माहित नाही ते तेच सांगू शकतील. मराठी विश्वकोशात सत्यशोधक समाजातील लोखंडे, नारायण मेघाजी यांच्या दीनबंधूने (नियतकालिक) रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुर्दशा झाली असल्याचा पहिला आवाज उठविला अशी नोंद आहे असे दिसते. संदर्भ: मराठी विश्वकोशावरील लोखंडे, नारायण मेघाजी लेखाची चव्हाण, रा. ना. यांनी लिहिलेली नोंद २४ ऑगस्ट २०१५ रोजी सकाळी ११ वाजून ४५ मिनीटांनी जशी पाहिली

In reply to by माहितगार

हे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते व महात्मा ज्योतिबा फुलेंचे अनुयायी सुद्धा.

In reply to by हेमंत लाटकर

त्यांनी सत्य लिहिले आहे ,लाटकर.प्रतिवाद करता येत नाही म्हणुन ब्रिगेडी वगैरे विशेषंण लावने सोडुन द्या.

जाता जाता हे पण सांगून टाका कि गणेशोत्सव कुणी चालू केला आणी गणपती हा देव आहे हा शोध कुणी लावला? श्री लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणी गणेशोत्सव हे उत्सव "सार्वजनीक" स्वरुपात सुरुवात केले असा इतिहास आम्ही शिकलो. याचा अर्थ हे दोन्ही उत्सव अगोदर सुद्धा चालू होतेच. लोकांमध्ये जागृती व्हावी लोकांन एकत्र आणावे आणी हे काम इंग्रज सरकारच्या डोळ्यात येणार नाही अशा तर्हेने व्हावे अशा सद्हेतूने लोकमान्य टिळकांनी दोन्ही उत्सव चालू केले असा इतिहास आम्ही शिकलो. जर ब्रिगेडी लोकांना इतिहासाचे पुनर्लेखन करायचे असेल आपल्या चश्म्याने तर त्याच्या सारखी दुर्दैवाची गोष्ट दुसरी नसावी. ते लोक किती खालची पातळी गाठू शकतात याचा विक्रम रोज मोडला जात आहे. आपला हेतू तो नसावा अशी अपेक्षा करतो.

In reply to by पगला गजोधर

जयंतराव श्रीधर टिळक (टिळकांचे नातु) यानी “मी जयंत टिळक” नावाच पुस्तक लिहल व पदमगंधा प्रकाशनाने तो प्रकाशीत केला. या पुस्तकात जयंतरावनी लिहुन ठेवलय. “ माझ्या आजोबानी शिवजयंती पुढे आणली”.

In reply to by पगला गजोधर

आधी प्रश्न नक्की ठरवा ना गजोधर भैय्या. शिवजयंती कोणी सुरु केली ? सार्वजनिक शिवजयंती कोणी सुरु केली ? शिवजयंती कोणी पुढे आणली ? गोंधळ आहे... नक्की कशाचे उत्तर हवय ? अवांतर: तुमचे नाव पाहिले कि राजू श्रीवास्तव चा गजोधर आठवतो. ह घ्या.

In reply to by कहर

'शेतकऱ्यांच हित पाहणारा राजा' आणि अश्या राजाचे हे लोकहितकारी प्रतिमा साजरी करण्यासाठी केला जाणाऱ्या शिवजयंती उत्सवांच हायज्याक कधी होऊन ते , लोकांसमोर 'कट्टर हिंदू राजा' अशी प्रतिमा साजरी करण्यासाठी केला जाऊ लागला ? अवांतर: हो जवळपास तसाच आहे मी (मूर्ख, अल्पबुद्धी, येड्च्याप ( माझी मत पाहून लोकांनी मला बोल लावण्याआधी मी स्वतःला पगला म्हणून जाहीर केलंय ) ) फक्त तो गजोधर युपी बिहारी होता, मी मराठी आहे. ;)

In reply to by पगला गजोधर

म्हणजे नेमक काय? की फक्त कट्टर कट्टर करत ओरडत राहायचं? मुस्लिम राज्यकर्त्यांनी जशी पराजीतांच्या कत्तली केल्या किंवा गावे जाळली वा मंदिरे फोडली तसलं काही राजांनी केलं नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. कोणत्याही इतिहासकारांनी तस काहीही लिहील नाही. मग हा अट्टाहास का? ती जयंती छत्रपतींची, जाणत्या राजांची ओळख व्हावी म्हणून फुल्यांनी सुरु केली. त्याच जयंती उत्सवास अन्यायाविरुद्ध आणि परकीय सत्तेविरुद्ध लढणारा राजा म्हणून जागृती व्हावी म्हणून टिळकांनी सुरु केली. ह्यातून कट्टर हिंदू राजा हा शोध कोणी लावला आणि कसा लावला हे कळत नाही.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

ह्यातून कट्टर हिंदू राजा हा शोध कोणी लावला आणि कसा लावला हे कळत नाही.
किंवा शेतकऱ्यांचे हित साधणारा राजा हि प्रतिमा कोणी पद्धतशीरपणे पुसट करून ठेवली हेही कळत नाही.

In reply to by पगला गजोधर

शेतकऱ्यांचे हित साधणारा राजा हि प्रतिमा कोणी पद्धतशीरपणे पुसट करून ठेवली हेही कळत नाही. >> प्रजेचे हित जाणणारा - जाणता राजा … म्हणजे तेच नव्हे का? की तुम्हाला फक्त शेतकरीच म्हणायचे आहे?

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

(१) काही काही ब्राम्हण शेतकरी असतात (२) सगळेच शेतकरी मराठा नसतात आणि (३) ब्राम्हण शेतकर्‍यांना पाण्यात पहात नाहीत - हे गजोधर साहेबांना सांगायला हवं. प्रतिमा पुसट करण्यासाठी यातलं काही तरी खरं नसायला हवं. महाराज ब्राम्हण सोडून सगळ्यांचे राजे होते आणि ब्राम्हणांनी काहीतरी कट करून त्यांना हिंदूंचा राजा 'बनवलं' हेच जर म्हणणं असेल तर तसं करण्यासाठी इतिहासात राजांची कमी होती काय? पहिला बाजीराव चालला नसता का? बाकी २०० वर्षं शेतकरी काय करत होते म्हणे?

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

'लोकवाङमय गृह' प्रकाशनाचे आहे. त्यातील ओळी
छत्रपतींविषयी समाजात वेगवेगळय़ा प्रकारचे गैरसमज पसरवण्याचं काम सातत्यानं आणि गेली अनेक वर्षं केलं जात आहे. शिवरायांच्या हयातीतच त्यास प्रारंभ झाला होता, ही बाब तर सर्वश्रुतच आहे. पण पानसरे यांनी त्या सर्व समज-गैरसमजांना सज्जड पुराव्यानिशी छेद देत, त्यातून हा `जाणता राजा' कसा सर्व समाजाचा आणि विशेषत: `आम आदमी'चा राजा होता, ते दाखवून दिलं आहे.

In reply to by पगला गजोधर

शेतकर्यांचा राजा, छत्रपति शिवाजी महाराज की जय !

In reply to by पगला गजोधर

मग बाकी बलुतेदार किंवा इतर व्यावसायिक यांचे ते राजे नव्हते? आम्ही तर असे वाचले होते कि ते सर्व प्रजेचे राजे होते. शिवरायांना एकाच जातीचे म्हणून कुंठीत करण्याचा हा अट्टाहास कशासाठी? (वादासाठी गोब्राम्हण प्रतिपालक सोडून द्या)

In reply to by सुबोध खरे

शिवरायांना एकाच जातीचे म्हणून कुंठीत करण्याचा हा अट्टाहास कशासाठी?
'शेतकर्यांचा राजा' यामधे तुम्हाला जात कुठे दिसली.
मग बाकी बलुतेदार किंवा इतर व्यावसायिक यांचे ते राजे नव्हते?
'शेतकर्यांचा राजा' म्हणजे, 'बाकी बलुतेदार किंवा इतर व्यावसायिक यांचे ते राजे नव्हते?' असा जावईशोध आपण कशाच्या बळावर लावला ?

In reply to by पगला गजोधर

मग "रयतेचा राजा" असे का म्हणू नये? फक्त "शेतकर्यांचा राजा" म्हटले तर बाकीच्या लोकांतल्या काही हलक्या मनांच्या लोकांना का दुखवावे? उग्गीच्च?

म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर २०० वर्षांच्या काळात कोणालाही आठवण नसावी. अफाट कर्तृत्वाच्या समाजरक्षकाची, स्वराज्य उभे करणाऱ्याची याद नसावी, याचे आश्चर्य वाटते.
किती बिनबुडाचे फेकायचे याला लिमिट पाहिजे. राजाराम छत्रपती वारले १७०० साली. त्यानंतर त्यांच्या समाधीचा उत्सव सुरू असल्याचे अस्सल पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराजांच्या समाधीचाही उत्सव नक्कीच साजरा होत असला पाहिजे, किमान १८१८ पर्यंत- जेव्हा इंग्रजांच्या स्वाधीन गड करावा लागला तेव्हा. आणि रोचक गोष्ट म्हणजे रायगडाचा शेवटचा किल्लेदार होता शेख अबुद नामक मुसलमान. ते एक असो, १८६०-७० च्या सुमारास सातारच्या कुणी भोसल्याने तिथे जाऊन खजिन्याच्या आशेने कुदळ मारली असा उल्लेख गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेत आहे. ज्यांना ही सातारच्या गादीची बदनामी वाटते किंवा अजून काही, त्यांनी दुर्गभ्रमणगाथा या पुस्तकावर बंदीची मागणी करावी आणि गोनीदांबद्दल टिपिकल पातळी सोडून लेख लिहावेत अशी विनंती आहे. त्यामुळे फुल्यांपर्यंत या समाधीची कुणालाही माहिती नव्हती हे विधान अतिशय निराधार आहे. दुर्गभ्रमणगाथेतले अजूनही काही उल्लेख बघावेत. कुणी सिंक्लेअर नामक इंग्रज अधिकारी तिथे जाऊन आला आणि त्याने समाधी पाहिली आणि इतक्या महान राजाच्या समाधीकडे असे दुर्लक्ष केल्याबद्दल लै श्या घातल्या, थोडी डागडुजी वगैरे केली कदाचित. नंतर टिळक आले आणि त्यांनी सगळीकडे प्रसार करून सुळे नामक इंजिनियरकडून समाधी पुन्हा बांधून घेतली. फुल्यांचा उल्लेख मी वाचला होता पण नक्की कुठल्या पुस्तकात ते विसरून गेलो. तस्मात पगला गजोधर यांनी पुस्तकाचे नाव सांगावे अशी विनंती.

In reply to by बॅटमॅन

ओ तुम्हाला निवडणुकीत उभे रहायचे नाहीये ना म्हणुन तुम्ही असे स्पष्ट बोलु शकता पण ज्यां बिचार्‍यांन्ना निवडणुक लढवायची आहे त्यांच्या हातातुन मुद्दे असे का बरे हिसकावुन घेता ? -

In reply to by प्रसाद गोडबोले

नायतर काय ? राज्कारणात राज्कारण करायचं असतं. राज्कारणात खरं बोलायचं काम नाय वो गोथामकर ! =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅट्याचे म्हणून कुणी अपहरण करीत नाही. खंडणीपेक्षा त्याला सांभाळायचा त्रास मोठा आणि

ठेऊन घ्या तुमच्याकडेच त्याचे पैसे देतो

(पाहीजे तर) असे म्हणतात हे लोक !!! खुलासेदार नाखु

In reply to by बॅटमॅन

हा सिंक्लेअर कोणता असेल ? एक दोन गूगलात शोधणे अवघड गेले. सिंक्लेअर चे रोमन लेखन Sinclair असेल तर बहुधा ते स्कॉटीश क्लॅन आणि आडनाव दिसते आहे.

In reply to by माहितगार

स्कॉटिशच असावा. ब्रिटिश काळात अनेक स्कॉटिश लोक भारतात आले होते. पण नक्की कोण, कुठला हे माहिती नाही. बहुधा जिल्ह्याच्या गॅझेटिअरवरून गोनीदांनी ही माहिती घेतली असावी असे वाटते, ते चेकवले पाहिजे.

In reply to by बॅटमॅन

१. 'हर्मिस प्रकाशना'ने प्रकाशित केलेले 'कुळवाडीभूषण शिवराय' हे पुस्तक २. महात्मा जोतीरावांचे समग्र साहित्य : छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा (१८६९), बाकीचे दुवे शोधायाला थोड जड जातंय पण मी देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.

In reply to by पगला गजोधर

सर्वप्रथम महात्मा फुलेंनी १८६९ साली शिवजयंती साजरी केली होती व त्याची नोंद ब्रिटीशकालीन पोलिसांच्या कार्यलयात आहे.

In reply to by पगला गजोधर

धन्यवाद. बाकी २०० वर्षांत शिवरायांची कुणालाही आठवण उरलेली नव्हती हा दावा फोल आहे हे सिद्ध झालेले आहेच.

In reply to by पगला गजोधर

आपण आवळस्करांचे, "रायगडाची जीवनकथा" हे पुस्तक वाचले आहे का? यात फुल्यांचा कोठेही उल्लेख नाही.. त्यांच्या अभ्यासानुसार, १८८३ मध्ये एक ब्रिटिश महिला पहिल्यांदा तेथे गेली... १८८५ मध्ये मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल, रेव्हेन्यु कमिश्नर क्रॅाफर्ड, कॅप्टन पीट वगैरे मंडळी तेथे गेली. तेव्हा टेंपलने समाधीच्या दुरुस्तीच्या सुचना दिल्या, व कुलाब्याच्या कलेक्टर ला पत्र लिहीले असा उल्लेख आवळस्कर करतात.. १८८७ मध्ये कोणी लॅार्ड रे ने समाधिसाठी दरसाल ५ रु सरकारी मदत मिळवून दिली.. त्यानंतर एकदम १९९५ मध्ये टिळकांनी अग्रलेख, सभा वगैरेंना सुरुवात केली.. या नंतच्या घडामोडींमध्येही फुल्यांचा कोठेच उल्लेख नाही.. माझ्यामते फुले हे काही एवढे दुर्लक्षणीय नक्किच नव्हते, की त्यांच्या भेटीचा कोणत्याच प्रकारचा उल्लेख सापडणार नाही, किंवा असा उल्लेख दडवून कोणाला कोणताच लाभही नसावा...

In reply to by बॅटमॅन

बॅट्या, तू मिथबस्टर म्हणून एक सिरीज सुरु भाउ.. कारण अशा खूप सार्‍या गोष्टी आहेत की त्या पूर्वी वर्तमानपत्रात वगैरे लिहून आल्यात, पुस्तकात छापून आल्यात म्हणून लोकांनी विश्वास ठेवून, सांगून वगैरे आता प्रस्थापित झाल्यात. जर अशा गोष्टींना आताच नवीन माध्यमात तरी स्पष्ट केले नाही तर त्या तशाच प्रस्थापित म्हणून सुरु राहतील. त्यावर ज्याला जे माहित असेल ते त्यावर सांगतील आणि तुझे चूक असेल तर दुरुस्त करता येईल अथवा इतरांना त्यांचे फॅ़क्ट्स पण सुधारता येतील. (हा कळकळीचा आणि शिरेस सल्ला आहे.)

In reply to by अस्वस्थामा

सुदैवाने काहीजणांनी आलरेडी हे काम केलेले आहे. एक उत्तम ब्लॉग खालीलप्रमाणे. www.kaustubhkasture.in

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन तुम्ही सुचविलेला ब्लाॅग www.kaustubhkasture.in छान वाटला. यातील शनिवाड्यावरील माहिती छान वाटली. धन्यवाद!

In reply to by अस्वस्थामा

अस्वथामा म्हणजे महाभारतातील घृणायुक्त पात्र ज्याने पांडवाच्या 5 पुत्रांचा झोपेत वध केला. दोणाचार्याचा (ब्राम्हण गुरूचा) पुत्र असूनही हे कृत्य केले. ज्याने बाम्हणांचे नाव खराब केले. सर्व बाम्हण (मी सुद्धा) अस्वथामा पात्राचा निषेधच करतील. अशा पात्राचे नाव तुम्ही मिपा/ऐसी अक्षरे साठी सदस्य म्हणून वापरले. धन्य आहे तुमची.

In reply to by हेमंत लाटकर

हेमंत लाटकर आगे बढो, हम आपके साथ है! ह्या लोकांना चांगला धडा शिकवलाच पाहिजे. एक तर १३ व्या महिन्याचा बोनस खाल्ला ते खाल्ला आमचा आणि आता हे असं काहीही. हे असं चालणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही.

In reply to by प्यारे१

एक तर १३ व्या महिन्याचा बोनस खाल्ला ते खाल्ला आमचा आणि आता हे असं काहीही. अजून तो विषय संपलेला नाही, त्यावर विचार चालु आहे, हे असं चालणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. या वाक्याचा अर्थ काय आहे, कोणाला उद्दशूम आहे.

In reply to by पैसा

अहो दादा dusyodhankivyatha.blogspot.com/2010 ब्लाॅग वाचा आणि सांगा अस्वस्थामा व अस्वत्थामा नाव एक आहे का वेगवेगळे आहे.

In reply to by हेमंत लाटकर

हसून मेले! मी महाभारत वाचते. तुम्ही पण इकडचे तिकडे वाचण्यापेक्षा तेच वाचत जावा प्लीज! आणि तो ब्लॉग बघितला. त्याने अस्वथामा असे तिसरेच आणि तेही चुकीचे लिहिले आहे. तशाही त्या ब्लॉगवरच्या शुद्धलेखनाच्या चुका बघून जास्त काही वाचायचं धाडस झालं नाही. =))

In reply to by पैसा

ताई मी गुगलवर चेक केले अस्वस्थामा, अस्वथामा आणि अस्वत्थामा हे तिन्ही नावे महाभारतातील द्राेणाचार्य पुत्र अस्वत्थामासाठीच वापरला आहे. ज्याने द्रोपदीच्या 5 ही पुत्रांचा झोपेत वध केला. हा ब्लाॅग वाचा. indianthefriendofnation.blogspot.com/..

In reply to by हेमंत लाटकर

त्या तुम्हाला काका म्हणत आहेत, तुम्ही त्यांना दादा म्हणताय, त्या आहेत ताई, आणि दादा तर अजून भलतेच (लई फ्यॅमस माणूस). लई कंफुजन झालंय बघा :) (लई दिस झालं दादा काय दिसंनात? :) उडाले का काय भुर्रर्र )

In reply to by हेमंत लाटकर

अस्वथामा म्हणजे महाभारतातील घृणायुक्त पात्र ज्याने पांडवाच्या 5 पुत्रांचा झोपेत वध केला. दोणाचार्याचा (ब्राम्हण गुरूचा) पुत्र असूनही हे कृत्य केले. ज्याने बाम्हणांचे नाव खराब केले. सर्व बाम्हण (मी सुद्धा) अस्वथामा पात्राचा निषेधच करतील. अशा पात्राचे नाव तुम्ही मिपा/ऐसी अक्षरे साठी सदस्य म्हणून वापरले. धन्य आहे तुमची.
ओ काका.. चूक दाखवली म्हणून इतकं व्यक्तिगत व्हायची कै गरज ? मी काय पण आयडी घेईन (बादवे ते अस्वस्थ आत्मा = अस्वस्थात्मा असे अपेक्षित होते. सुरुवातीच्या दिवसात एका संस्थळावर चुकून असे लिहिले गेले म्हणून तसेच वापरतोय. पण असो), हिटलर घेईन नै तर सावरकर घेईन नै तर भीमराव नै तर अजून काही.! तुमाला काय करायचंय? घ्या तुमचा १३व्या महिन्याचा पगार राव आणि डोकं खाऊ नका.. एक चुकलेलं गणित दुरुस्त करुन दिलं तर हा आयडी "बदले की आग" मध्ये इथे पेटतोय उगी. कैच्या कै.
दोणाचार्याचा (ब्राम्हण गुरूचा) पुत्र असूनही हे कृत्य केले. ज्याने बाम्हणांचे नाव खराब केले. सर्व बाम्हण (मी सुद्धा) अस्वथामा पात्राचा निषेधच करतील.
पहिली गोष्ट म्हणजे जरी अश्वत्थाम्याच्या नावावरुन प्रेरित असलं तरी ते नाव मी घेतलेलं नाही (आणि तसंही ते अस्वथामा नाहीय!) मी ब्राह्मण (की ब्राम्हण ते तुम्ही इतर ब्रह्मवृंदास विचारुन ठरवा) असेन नसेन पण त्याचा इथे काहीही संबंध नाही. तुम्ही त्याच्यावरुन मला जज करण्याचादेखील शष्प संबंध नाही. या धाग्यावर देखील या प्रतिसादाचा काही संबंध नाही.! इथे जात काढायचा काय संबंध.. ?? असल्या पोकळ अभिमानी लोकांनी तर सगळं वातावरण दुषित करुन ठेवलंय सगळं.. :\ निषेध करायला अनेक दुराचारी, भ्रष्टाचारी सर्व जाती-जमाती,धर्मातले पुरेसे लोक आजूबाजूला आहेत. त्यांचा करा. त्यांच्या तोंडावर करा. व्यासांनी निर्मिलेल्या अथवा हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासातल्या (तुम्हाला काय हवे ते घ्या) एका पात्राबद्दल निषेध करुन काय होणारेय.
अशा पात्राचे नाव तुम्ही मिपा/ऐसी अक्षरे साठी सदस्य म्हणून वापरले. धन्य आहे तुमची.
एक तुमची चूक सांगणारा प्रतिसाद काय दिला तर तुम्ही पार इतर धाग्यांवर येऊ येऊ माझ्या आयडीबद्दल आणि त्याच्यावरुन माझ्याबद्दल लिहू पाहताय !! खरंच धन्य आहे तुमची. [हा माझा तुम्हाला पहिला आणि शेवटचा व्यक्तिगत पिंकेवरचा साध्या शब्दातला प्रतिसाद राहील, यापुढे धाग्यासंदर्भात मुद्दे मांडावेत, प्रतिवाद करावेत, जमत नसेल तर वाचन करावे. मनाजोगते प्रतिसाद नै आले तर उगी माझ्याच नव्हे कोणाच्याच बाबतीत व्यक्तिगत होऊ नये. आपले बाहेरच्या जगातले अहं इथे आणू नयेत. व्यक्तिगत उतरलात तर आधी इग्नोर मारण्यात येईल आणि नंतर (जौ दे, इग्नोरच मारेन!) याची नोंद घ्यावी.]

In reply to by अस्वस्थामा

मी हे तुम्ही माझ्या धाग्यात चुक दाखवली म्हणून लिहले नाही तर तुम्ही टिकोजीराव म्हणाले म्हणून विनोदात लिहले. आयडी घेणे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण आयडी घेताना चांगले असले तर बरे वाटते. टिळक, सावरकर, भीमराव हे चांगले वाटते जर हिटलर, दुर्याधन, हे घेतले तर वाईट वाटते. तुम्ही जो आयडी घेतला आहे ताे अस्वस्थामा (अस्वस्थ+आत्मा) हे इतके डीप मघ्ये बघेल सहज बघेल. अस्वस्थामा, अस्वथामा, अस्वत्थामा ही तीनही नावे द्रोणाचार्य पुत्र अस्वत्थामाचीच माहिती गुगल वर दाखवतात. दोणाचार्याचा (ब्राम्हण गुरूचा) पुत्र असूनही हे कृत्य केले . या वाक्याचा अर्थ मी जात काढण्यासाठी केला नाही तर एका ब्राम्हण गुरूचा मुलगा असूनही असे हीन काम केले म्हणून लिहले बाकी नाही. बी पाॅझिटिव्ह.

In reply to by हेमंत लाटकर

मी हे तुम्ही माझ्या धाग्यात चुक दाखवली म्हणून लिहले नाही तर तुम्ही टिकोजीराव म्हणाले म्हणून विनोदात लिहले.
हेच ते बदले की आग..!! आणि ते तिथेच लिहायचेत या दुसर्‍या धाग्यावर अवांतर कशाला ? तसाही तो विनोद असेल तर तुमच्या विनोदबुद्धीस _/\_.
आयडी घेणे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे.
हे तुमच्या लक्षात आल्याबद्दल धन्यवाद.
पण आयडी घेताना चांगले असले तर बरे वाटते. टिळक, सावरकर, भीमराव हे चांगले वाटते जर हिटलर, दुर्याधन, हे घेतले तर वाईट वाटते.
मला वाटतं हा ज्याच्या त्याच्या बघण्याचा दृष्टीकोन आहे. मी अमुक आयडी घेतला म्हणून अमुक होतो असे नव्हे. उद्या तुम्ही "जोकर" आयडी घेतलात म्हणून तुमच्या विनोदास लोक हसतील असेही नव्हे. तेव्हा "डोळे उघडा, बघा नीट".
अस्वस्थामा, अस्वथामा, अस्वत्थामा ही तीनही नावे द्रोणाचार्य पुत्र अस्वत्थामाचीच माहिती गुगल वर दाखवतात.
प्रथमतः माझे आयडी नाम गुगलून पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी पण ते कधी केले नव्हते. ;) खुसपट काढायला का होईना पण तुम्ही ते केल्याबद्दल आभारच मानले पाहिजेत. पण त्याचबरोबर जे गुगल सांगतो ते "बाबा वाक्यं प्रमाणं" नसतंय हो.. लई कचरा असतोय. जरा लॉजिक लावावं लागतंय काय चूक काय बरोबर ते शोधायला. तस्मात तुम्हाला आढळलेले उल्लेख बरोबर आहेत असे म्हणवत नाही. बाकी तुम्हाला इतरांनी सांगितलेच आहे आणि सूज्ञास अधिक सांगणे न लगे. :)
दोणाचार्याचा (ब्राम्हण गुरूचा) पुत्र असूनही हे कृत्य केले . या वाक्याचा अर्थ मी जात काढण्यासाठी केला नाही तर एका ब्राम्हण गुरूचा मुलगा असूनही असे हीन काम केले म्हणून लिहले बाकी नाही.
"ब्राम्हण गुरूचा मुलगा असूनही" इथे तुमचा छुपा जातीयवाद दिसत नाही काय ? दुसर्‍या कुठल्या जातीचा असता तर चालले असते काय तुम्हाला ? की "ब्राह्मण श्रेष्ठ " म्हणून त्याने जे केले ते तुम्हाला खटकतेय ? मग आईचे मुंडके उडवणार्‍या परशुरामाबद्दल तुमची मते जहालच असतील. नै का ? (इथे अवांतर नको! जस्ट उदा. आहे) कुणीही चुकीचे काम केले तर (किंवा तुम्हाला असे वाटत असेल तर) त्याचा निषेध करायला हवा, फक्त ब्राह्मण आहे म्हणून नव्हे. तुमचा जातीयवाद स्पष्ट दिसतोय आणि त्याचा निषेध केला गेला पाहिजे असे वाटते..
बी पाॅझिटिव्ह.
तो आमचा रक्तगटच आहे तेव्हा चिंता नसावी. परंतु एक सांगावेसे वाटते. कोणतेही किंतु न बाळगत वावरा ना तुम्ही. जालावर बाहेरचे तुमचे मान-अपमान, जाती, धर्म बाहेरच ठेवून या. ही चांगली संधी आहे, एक वेगळा "अवतार" म्हणून सगळ्याच गोष्टींकडे पहायची. वेगळे दृष्टीकोन आजमवायची. इथे एखाद्या तज्ञापासून ते शेंबड्या पोरांपर्यंत सगळेच आहेत. आणि कोणीही कोणाला कशाही बद्दल बेधडक विचारु शकतो, वाद घालू शकतो. एरवी लोक तोंडावर जे स्पष्ट बोलणार नाहीत ते इथे बोलतायत तर त्याबद्दल या सुविधेचे आभारच मानले पाहिजेत की त्याचा राग मनात घेऊन या संस्थळाचे संस्थळावर, या धाग्याचे त्या धाग्यावर उट्टे काढायचे? हे कशाला ? असो, तुम्हीच "मोठे व्हा" काका. (तुम्हाला काका म्हणतोय म्हणून आम्हाला शेंबडे पोर समजू नये, "काका")

In reply to by अस्वस्थामा

अस्वस्थामा साष्टांग नमस्कार. यापुढे तुमच्या सुचना जरूर पाळेल. (हे सर्व वाद निवळण्यासाठी भिऊन नव्हे) परशुरामाने आईचे मुंढके उडवले ते वडिलांची आज्ञा मोडू नये म्हणून त्याबरोबर परशुरामाला वडिलांचे (जमदग्नींचे) योगसामर्थ माहित होते ते आई रेणूकेला परत जिवंत करतील.

In reply to by अस्वस्थामा

मी पण तुम्हाला अश्वत्थामाच समजत होतो. मला वाटलं "अस्वस्थ अश्वत्थामा" अशी काही तरी फोड असेल.

In reply to by बॅटमॅन

पैल्या धा परतीसादात अशी मारामारी करून अख्या कुस्तीचा मजा घालवल्याबद्दल णीषेध. आस फुस्स करतात होय? तुमी येक्दामस हारवी द्येंत याक्ट लावून सर्वा लोकांना आत टाकून दिले ;) अवांतर: गो नि दांडेकरांचे पुस्तक वाचून महात्मा फुल्यांनी खरच शोधली का असे वाटून गेले होते.

In reply to by बॅटमॅन

गोनिदा म्हणजे "दांडेकर" ना? मग त्यांनी.. सॉरी.. त्यानी लिहिलेलं सर्वच सपशेल खोटं, आणी महाराजांविषयी बदनामीकारकच असणार. लोकमान्य टिळक हेदेखील एखादं काल्पनीक पात्र असेल कदाचित. किंवा अस्लेच खरे, तर बाळ गंगाधर टिळक लोकमान्य नक्कीच नसणार. त्यांच्या जातीच्या इतिहास संशोधकांनी ही खोटी पदवी चिकटवली असणार त्यांना.. सॉरी.. त्याला.

In reply to by बॅटमॅन

शिवचरित्रमाला मध्ये बाबासाहेबांनी डिटेल रेफरन्स दिलाय फुल्यांचा....मधल्या काळात नरकेंनी फुल्यांच्या समाधीला भेट दिल्याच्या नोंदी शोधल्या आहेत समाधीची दुरवस्था जेम्स डग्लस मुळेच खर्या अर्थाने सर्वांसमोर आली,त्यानेच शासकीय यंत्रणा हलवली असे माझे वैयक्तिक मत आहे

1 . . . 1 . . . इतिहासाचार्य राजवाडे यांच्या १९१० सालच्या एका निबंधातील हे उतारे आहेत. निवडक लेख या समन्वय प्रकाशन कोल्हापूर च्या पुस्तकात २६३ २६४ या पानांवर हे वाचता येईल. यापेक्षा जुने उल्लेख कुठे वाचले असतील तर जरूर द्या. म. जोतीराव फुले यांना त्यांचे योग्य श्रेय मिळालेच पाहिजे. राजवाड्यांनी या निबंधात कोणा सकपाळचा उल्लेख केला आहे, पण शिवजयंती उत्सव राजवाडे म्हणतात त्यापूर्वी २५ वर्षे पुण्यात सुरू असेल तर त्यांना माहीत नव्हते असे होणार नाही. अशा परिस्थितीत म. फुल्यांचा या निबंधात उल्लेख नाही हे आश्चर्यकारक वाटले. कारण राजवाडे म. फुल्यांचा उल्लेख चुकीने किंवा आकसाने टाळणे शक्य नाही.

In reply to by पैसा

ज्योतिराव फुल्यांना महात्मा पदवी कुणी दिली होती? त्यांनी ब्रिटीशांना विरोध वगैरे केला होता का? त्यांची समाज सुधारणा आणि शिक्षण (विशेषत: स्त्री) क्षेत्राताली कामगिरी असाधारण असली तरी इतर मुद्दे पटण्या सारखे आहेत का? शिक्षण क्षेत्र किंवा समाज सुधारणा सुद्धा इंग्रजांच्या पठडीत राबवण्याचा प्रयत्न होता का?

In reply to by प्यारे१

महात्मा फुलेंना महात्मा पदवी कोणी दिली असे विषय काढून धागा कृपया भरकटवु नका. (तुमच्या माहितीसाठी, मुंबईतील कामगार चळवळीचे प्रणेते लोखंडे यांनी ती दिली, आचार्य अत्रेंनी केलेला चित्रपट पहा महात्मा फुल्यांवरचा. ) अवांतर : कृपया वरील प्रतिसादाला प्रत्युतर म्हणून 'लोकमान्य', 'स्वातंत्र्यवीर' या पदव्यांचे उगमस्थानाबाबतीत नस्त्या चौकश्या सुरु करू नका.

In reply to by पैसा

राजवाडेंच्या उपरोक्त लेखनातील "शंभूमहादेवास शिवाजी, शिवाजीचे पुर्वज, शिवाजीचे वंशज यांची राउळे आहेत." या उल्लेखातील शंभूमहादेव हे ठिकाणाचे नाव आहे का ? तसे असल्यास हे ठिकाण कोठे आहे ?

In reply to by माहितगार

शिखर शिंगणापूर असावे. मी तिथे गेलेली नाही त्यामुळे नक्की सांगू शकत नाही. पण शिखर शिंगणापूरचाच उल्लेख शंभूमहादेव असा करतात.