✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मुतपीठसाठी लेख : कृपया मदत करा

ख
खटासि खट यांनी
Sat, 02/02/2013 - 17:01  ·  लेख
लेख
लिखाणाचे निमित्त : खुमखुमी उद्देश : मनोरंजन, विरंगुळा फायदे : मिसळपाववर (कु)प्रसिद्ध होणे टार्गेट ऑडियन्स : मुक्तपीठचे नियमित वाचक प्रस्तावना : नमस्कार सदस्यहो. मला पुण्यनगरी देशी प्रसिद्ध व्हावेसे वाटत असल्याने एक लेख लिहून वर्तमानपत्रास पाठवावयाचे ठरवले. मी तसा चांदोबा. चंपक, ठकठक आणि सकाळ नियमित वाचतो. सकाळ मधे इमारतीच्या शेजारच्या मुतारीचा वास हे पत्र लिहीले होते. ते छापूनही आले होते. पण प्रसिद्धी मिळाली नाही. लोक म्हणतात लेख लिही. मी आवडीने मुक्तपीठ वाचतो. त्यासाठी लेख लिहावा असे मनी आले. एक कच्चा मसुदा आपल्याला दाखवत आहे. मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. कळावे आपला नम्र खट -------------------------------------------------------------------------------------------------------- साधारण पंधरा वर्षापूवीची गोष्ट. माझे लग्न होऊन नुकतीच सौ. घरी आली होती. सौ शीच लग्न झालं होतं त्यामुळे कृपया गोंधळ वाढवू नये. ( सौ माझ्याच घरी आली होती). तिची हौसमौज पुरवण्यात दिवस चांगले चालले होते. तिचा पहिलाच नोव्हेंबर असल्याने तो साजरा करण्यासाठी आम्ही दापोलीला पिकनिकला जाण्याचे ठरवले. आम्ही नुकतेच एक विमान खरेदी केले होते. सर्वांनी ठरवले कि विमानानेच जाऊ. माझी सौ, एम ए, पीएचडी, मातोश्री, एम (ऑनर्स), पिताश्री (बालिष्टर) आणि मी स्वतः (बारावी नंतरची प्रमाणपत्रे सापडत नाहीत) असे चौघे दापोलीस विमानातून कूच करते झालो. जाताना आम्ही वरंधा घाटातून जायचे ठरवले. त्या वेळी टोल नाका असल्याने या संधीचा फायदा घ्यावा असे ठरले. रस्त्याने मीच विमान चालवत होतो. साठच्या पुढे वेग नको असे पिताश्रींनी बजावल्याने त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले. हास्यविनोद करीत आणि गाण्याच्या भेंड्या खेळत आम्ही दापोलीस पोहोचलो. जेवण वगैरे करून विमानाने कर्दे या गावी पोहोचलो. दिवसभर समुद्र्वर मजा केल्यावर अंधार पडायच्या आधी निघावे असे ठरले. कारण या आधी विमानाने कुठेच गेलेलो नसल्याने हेडलाईट आणि डीपर ( डिप्पर) चालतात किंवा नाही याबद्दल काहो कल्पना नव्हती. जाताना ताम्हणी घाटातून जायचे ठरवले होते. ताम्हणी घाटातून जात असताना ब्रेक दाबलाच जाईना. बाका प्रसंग होता. आम्ही सगळे खूपच घाबरलो होतो. तरीही एका हाताने विमानाचे स्टियरींग सौ ला पकडायला सांगून मी खाली वाकून पाहीले तर काय, ब्रेकच्या खाली फूटबॉल आलेला ! आम्ही बीच वर व्हॉलीबॉल, फूटबॉल, बॅडमिंटन हे सगळे खेळ खेळल्यानंतर ते सगळं साहीत्य मागच्या सीट्खाली टाकलेलं. हा बॉल घरंगळ येऊन कधी ब्रेकखाली आला कळलंच नाही. जेव्हां बॉल काढला तेव्हां ब्रेक लागायला सुरूवात झाली. सगळ्यांच्या जिवात जीव आला. आम्ही आता वर चढून जंगलात आलो होतो. आजूबाजूला चिटपा़खरूही नव्हते. आमचे विमान आणि आम्ही इतकेच काय ते हलत होतो. अंधार मी म्हणत होता. आणि इतक्यात रस्त्यावर काहीतरी चमकलं. पुन्हापुन्हा पाहील्यावर खात्रीच पटली. शंकाच नको. दोन डोळे होते ते. सर्वांची भीतीने गाळणच उडाली. अचानक कुठलं जनावर पुढ्यात येऊन ठाकलंय याची कल्पना नव्हती. मागच्या मागे जाणं धोक्याचं होतं. वळणं वेडीवाकडी होती आणि विमान रिर्व्हर्समधे चालवायची माहिती नव्हती. घरी गेल्यावर काशीहून तज्ञांना बोलावून शिकून घ्यायचा मनोमन निश्चय केला. पण सध्या वेळ मारून न्यावी लागणार होती. पिताश्री मनाचा हिय्या करून खाली उतरले. ( आमच्यापुढे भविष्यकाळ होता तर पिताश्रींकडे भूतकाळ ). हेडलाईटच्या प्रकाशात चमकणा-या डोळ्यांकडे ते सावकाश जाऊ लागले. मला हेडलाईट बंद करायला लावला. जवळ गेल्यावर ते डोळे इकडे तिकडे पळू लागले. पिताश्रींनी देखील त्यांचा पाठलाग केला आणि जवळचा टॉर्च काढून त्यांच्यावर प्रकाशझोत सोडला. त्याबरोबर डोळे गायब झाले. पिताश्री विजयी मुद्रेने परत आल्यावर विमानातील दोन्ही महिलांनी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहीले. पिताश्रींनी सांगितले आता घाबरायचं कारण नाही. पण कुठले जनावर होते हे विचारल्यावर पिताश्रींनी हसतच उत्तर दिले, तो एक मोठ्या आकाराचा उंदीर होता. हे ऐकताच मातोश्री आणि सौ किंचाळल्या. त्याबरोबर आम्ही हसत सुटलो. आजही तो प्रसंग आठवल्यावर आम्ही खूप हसतो. पण त्याच वेळी जर खरंच एखादं मोठं जनावर असतं तर ? या विचाराने अंगावर शहारा येतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
18154 वाचन

💬 प्रतिसाद (78)

प्रतिक्रिया

वारलो !!

परिकथेतील राजकुमार
Sat, 02/02/2013 - 17:10 नवीन
मुतपीठसाठी लेख : कृपया मदत करा
=)) =))
  • Log in or register to post comments

हा हा..

दादा कोंडके
Sat, 02/02/2013 - 18:38 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मुतपीठसाठी लेख : कृपया मदत

श्रिया
Sat, 02/02/2013 - 17:12 नवीन
मुतपीठसाठी लेख : कृपया मदत करा
ओह माय गॉड. हसून हसून खल्लास.काहीवेळा पूर्वीच इतका सिरियस मूड झाला होता नथुरामांच्या धाग्यावर, हे भारीच.
  • Log in or register to post comments

भयंकर!

पैसा
Sat, 02/02/2013 - 17:24 नवीन
सगळंच भयंकर आहे! हा लेख मुक्तपिठावर प्रसिद्ध केलात की नक्की कळवा! प्रतिक्रिया तिथेही अवश्य देऊ!
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 02/02/2013 - 17:51 नवीन
अवघड आहे. शीर्षकात बदल वगैरे करावा वाटला तर मदत तयार आहे. हाक मारा. :) बाकी, आपलं लेखन मुक्तपीठाची प्रेरणा आहे, हे नक्की माहिती आहे. मुक्तपिठात काय काय आणि कसं कसं छापून येतं हे तुम्हाला सांगायचं हे कळलं. धन्स. तर बिबट्यानं धरलंच असतं आणि आत्ताच घाटात फूटला घाम वाचून संपवला आहे. आपला लेखही उत्तम आहे, मुक्तपिठात नक्कीच छापून येईल. मन:पूर्वक शुभेच्छा. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हो आणि डोहाळे जेवणं,बारशी

श्रिया
Sat, 02/02/2013 - 18:01 नवीन
हो आणि डोहाळे जेवणं,बारशी,लग्न,वाढदिवस, कामवाल्या बाईला दिलेले सल्ले (आणि वाइस अ वर्सा) हेही फेमस विषय आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शीर्षकात बदल

खटासि खट
Sat, 02/02/2013 - 18:14 नवीन
केला काय न केला काय, जे आहे ते तसंच राहणार आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भन्नाट आहे राव...

धन्या
Sat, 02/02/2013 - 19:26 नवीन
औरंगाबादकरांनी दिलेल्या दुव्यांवरुन ताम्हीणी घाटात गेलो. काय भन्नाट लिहिलंय लेखकाने आणि प्रतिसादकर्त्यांनीही. लोकांनी ताम्हीणी घाट भलताच फेमस केलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

एवढा लेख वाचा आणि मित्र परिवाराला शेअर करा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 02/02/2013 - 19:47 नवीन
तर बिबट्यानं धरलंच असतं हा लेख आणि लेखाखालचे प्रतिसाद वाचून मरायची वेळ आली होती. :) लेखकाला मिपावर जंगलातील अनुभव लिहायला कोणी तरी आणा राव. आपल्याला जंगलातली खर्‍या अर्थाने सैर होईल. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ह्या लेखात के बी काळे ह्यांनी

श्री गावसेना प्रमुख
Sun, 02/03/2013 - 11:40 नवीन
ह्या लेखात के बी काळे ह्यांनी पन प्रतीसाद दिला आहे,तो असा
मी पुन्हा सांगतो कीं सुरेशचंद्र यांनी लिहिलेली घटना घडणे शक्य आहे व आपल्यापैकी कुणीही क्रिकेटचा ’गियर’ गाडीतून ने-आण करतांना चेंडूसारखी घरंगळनारी वस्तू ड्रायव्हरच्या अर्ध्या भागात येणार नाहीं एवढी काळजी घेऊ शकतो किंवा ’डिकी’त ठेऊ शकतो. खरे तर लेखही मला आवडला, पण या सूचनेबद्दल श्री शरदचंद्र यांचे मी आभार मानतो.
डॉ साहेब, हे तेच ना जकार्ता वाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाय हो, ते येगळे.

रेवती
Sun, 02/03/2013 - 22:19 नवीन
नाय हो, ते येगळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

के बी काळे आणि जाकार्ता वाले

बिपिन कार्यकर्ते
Fri, 02/08/2013 - 10:51 नवीन
के बी काळे आणि जाकार्ता वाले काळे सेमच आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सुधीर काळे, जकार्ता

खटासि खट
Fri, 02/08/2013 - 17:11 नवीन
सुधीर काळे, जकार्ता यांच्याबद्दल काकु चाललाय का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

काकु नाही काका आहेत ते तुमचे

श्री गावसेना प्रमुख
Fri, 02/08/2013 - 18:35 नवीन
काकु नाही काका आहेत ते तुमचे,आमचे सर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

प्रतिक्रिया लिहिणारी माणसे जास्त प्रतिभावान आहेत

मालोजीराव
Mon, 02/04/2013 - 12:41 नवीन
'त्या' प्रतिक्रियांपैकी एक प्रतिक्रिया देत आहे धनाजीराव....
१) सकाळ चा मुक्त-पीठ या सदरात कोणीही कितीही मुक्तपणे लेख लिहू शकतो ... या साठी लेखकाचा आणि लिखाणाचा दर्जा यांची काही अट नाही. सकाळ कडे काहीही पाठवले आणि मुक्तपीठ मध्ये छापा म्हटले कि लगेच छापतात २) लेख लिहिणार्यापेक्षा प्रतिक्रिया लिहिणारी माणसे जास्त प्रतिभावान आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

दोन्ही लेख वाचल्याबद्दल आभार.

खटासि खट
Sun, 02/03/2013 - 10:47 नवीन
दोन्ही लेख वाचल्याबद्दल आभार. शक्य असल्यास मुक्तपीठीय लेखाचा कळसोध्याय असलेल्या लेखाची लिंक देण्याचा मोह होत आहे. http://online2.esakal.com/esakal/20130122/4824005995910158145.htm ( प्रतिक्रिया खालून वर वाचणे हेसांनल )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अब बच्चे की जान लोगे क्या?

अधिराज
Sun, 02/03/2013 - 12:12 नवीन
आवं किती हासवाल आता लेकराला. हे त्यातल्या त्यात लैच भारी.
ब्रह्मे, कृपया त्या चांगल्या घराण्यातल्या वाटणाऱ्या मुलीचा नाव आडनाव देत का? परवाच मला एका औन्धतल्या आजी बाईंनी फसवलं .. bike वर सफाईने बसल्या तेव्हाच माझ्या लक्ष्यात आला होतं... या same असणार नक्कीच !!
त्या पेट्रोल पंपावर गर्दी का असते हे कळालं. २२ वर्षं हा किस्सा अनेकांना सांगितल्यामुळं त्याची दंतकथा झाली असेल. आशा वाईट असते हो ..
ब्रह्मे साहेब, आपने खाया नही, पिया नही, ग्लास भी नही फोडा, उपर से टेबल भी साफ किया, बर्तन भी धोया, कचरा भी उठाया, वाश बेसिन भी साफ किया फिर भी ४००० का बिल भरा..वाह तुम्हारा दिल है कि दिल्ली दरवाजा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

त्या ब्रह्मेंचा लेख सकाळ मधे

सांजसंध्या
Fri, 02/08/2013 - 00:04 नवीन
त्या ब्रह्मेंचा लेख सकाळ मधे (ई नाही) वाचला तेव्हांच थापा लक्षात आल्या होत्या. आणि तो लेखकाचा फोटो पाहून जाम हसायला येत होतं. तरीही म्हटलं असेलही त्यावेळी, पण प्रतिक्रिया वाचल्या आणि खल्लास !! अफाट प्रतिक्रिया आहेत ! हे लोक ईसकाळ वाचत नाहीत का ? वाचत असते तर बिचा-यांनी (असले) लेखच पाठवले नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

आईशप्पथ ताम्हीणी घाटाने हसुन

आनन्दिता
Mon, 02/04/2013 - 02:42 नवीन
आईशप्पथ ताम्हीणी घाटाने हसुन हसुन वेड लावलं आज... सगळ्यात भारी कमेंट ही होती...
On 7/24/2010 10:23 PM sasonkar yardena israel said: भारतीय लोकांना लाज वाटायला पाहिजे कि एक माणूस थरारक अनुभव कथन करत आहे आणि तुम्ही सर्व त्याची यथेच्छ निंदा करत आहात.... अलीकडे भारतात हे फार वाईट चालले आहे . भारतीयांनी याकडे नीट लक्ष द्यावे... शुभेच्छा..
भारतीयांना इतकं घालुन पाडून बोलुन झाल्यावर ही 'शुभेच्छा' द्यायला विसललेल्या नाहीत त्या.... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फुटबॉल

तिमा
Sat, 02/02/2013 - 18:04 नवीन
ब्रेकखाली फुटबॉल राहू शकतो या कल्पनेने हा लेख विनोदी आहे हे कळले, नाहीतर आम्ही आपले खरेच विमान धरुन चाललो होतो. बाकी मुतपीठाची भजी कशी करतात यावर एक धागा येण्यास हरकत नसावी.
  • Log in or register to post comments

ओह ! हा लेख विनोदी म्हणून

खटासि खट
Sat, 02/02/2013 - 18:12 नवीन
ओह ! हा लेख विनोदी म्हणून वाचलात ? हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

नावाला पूर्णपणे जागलात !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 02/02/2013 - 18:48 नवीन
नावाला पूर्णपणे जागलात ! ___/\___ , भेटून आनंद झाला !! :)) :)) :))
  • Log in or register to post comments

किति झटापट

अत्रुप्त आत्मा
Sat, 02/02/2013 - 19:31 नवीन
=)) किति झटापट =))
  • Log in or register to post comments

आत्माराम बुवा...

धन्या
Sat, 02/02/2013 - 19:39 नवीन
या लेखाचं सोडा... बिरुटे सरांनी वर या लेखाची प्रेरणा असलेल्या मुक्तपीठवरील लेखाचा दुवा दिला आहे. त्यावरच्या प्रतिक्रिया वाचा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

एखादे ज्ञनावर अस्ते तर फार

येता जाता....
Sat, 02/02/2013 - 19:47 नवीन
एखादे ज्ञनावर अस्ते तर फार काहि झाले नसते.. पन हाडळ् आड्वि आलि असति तर........
  • Log in or register to post comments

हडळीचं काय एव्हढं वाटणार हो

खटासि खट
Sat, 02/02/2013 - 22:24 नवीन
हडळीचं काय एव्हढं वाटणार हो विवाहीत माणसाला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: येता जाता....

(No subject)

जेनी...
Sun, 02/03/2013 - 00:22 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

आवं काय हे, तुम्ही एक स्त्री

अधिराज
Sun, 02/03/2013 - 00:35 नवीन
आवं काय हे, तुम्ही एक स्त्री आसून दुसर्या स्त्रीवर केलेल्या इनोदाला हस्ताय व्हय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

हो अधिकाका

जेनी...
Sun, 02/03/2013 - 03:50 नवीन
हो अधिकाका :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

हो अधि

अधिराज
Sun, 02/03/2013 - 12:27 नवीन
हो अधि
कसय ना, तुमच्याकडून अशी अपेक्षा न्हवती,म्हणून मनाला यातना झाल्या, बाकी कै नाय. असो, आपलेच दात आन् आपलेच होट, काय तक्रार करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

काय तक्रार करणार पेक्षा '

जेनी...
Sun, 02/03/2013 - 22:22 नवीन
काय तक्रार करणार पेक्षा ' कुणाकडे ' तक्रार करणार ?? असं असायला हवं होतं अधिकाका :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

मस्त आणि जबरदस्त

अभ्या..
Sat, 02/02/2013 - 22:51 नवीन
अप्रतिम. आवडले अगदी. विमानापुढील लेखांना शुभेच्छा. :)
  • Log in or register to post comments

)))))))))))))))))))))))))))))

बिपिन कार्यकर्ते
Sat, 02/02/2013 - 22:56 नवीन
=))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))
  • Log in or register to post comments

सकाळचे मुक्तपीठ हे खरच एक

अप्रतिम
Sat, 02/02/2013 - 23:16 नवीन
सकाळचे मुक्तपीठ हे खरच एक वाचनीय सदर आहे...त्याखालील प्रतिक्रिया तर महानच ... खास प्रतिक्रियांसाठीच वाचावेत असे आणखी काही लेख: http://72.78.249.107/esakal/20110726/4824468914429679974.htm http://www.esakal.com/esakal/20100705/5370982350262935099.htm
  • Log in or register to post comments

आयला, मला वाटत होतं मी एकटाच

अधिराज
Sat, 02/02/2013 - 23:30 नवीन
आयला, मला वाटत होतं मी एकटाच आसल इथं मुक्तपीठ वाचणारा.
  • Log in or register to post comments

+१

सुहास झेले
Sun, 02/03/2013 - 00:58 नवीन
अगदी अगदी.... ताम्हिणी घाटातला तो लेख आजन्म विसरणार नाही ;-) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

लाडू कावळा

नंदन
Sat, 02/02/2013 - 23:42 नवीन
खी: खी: खी:, मस्तच! हेडलाईटमध्ये चमकणारे डोळे बहुतेक लाडू न मिळाल्याने कावलेल्या 'लाडू कावळ्याचे' असावेत, असं आधी वाटलं होतं ;)
  • Log in or register to post comments

हा हा हा!

बाळकराम
Sun, 02/03/2013 - 01:50 नवीन
कहर आहे!!
  • Log in or register to post comments

ओ ते शीर्षक मुद्दाम ठेवलंय का

बॅटमॅन
Sun, 02/03/2013 - 01:59 नवीन
ओ ते शीर्षक मुद्दाम ठेवलंय का ट्यार्पी वाढवायला ;) बाकी लेख अगदी उत्तम जमला आहे! मुक्तपीठवर मुक्तपणे बागडणारे लेख आणि एकाचढ एक प्रतिक्रिया पाहून कळायचे बंद होते =)) =))
  • Log in or register to post comments

कहर!!

सानिकास्वप्निल
Sun, 02/03/2013 - 05:14 नवीन
Image removed. वाईट हसतेय ....आई गं Image removed.
  • Log in or register to post comments

भन्नाट आहे

श्रीरंग_जोशी
Sun, 02/03/2013 - 06:03 नवीन
असेच पैलतिरिय लेख पण येऊद्या...
  • Log in or register to post comments

मुक्तीचा मार्ग प्रशस्त झाला!

क्रान्ति
Sun, 02/03/2013 - 11:38 नवीन
'मुक्तपीठा'वरचे 'मुक्त' अनुभव आणि त्याहून मुक्त प्रतिसाद वाचून लवकरच मुक्ती मिळेल, अशी शक्यता नाकारता येत नाही :D
  • Log in or register to post comments

(No subject)

मितभाषी
Sun, 02/03/2013 - 13:48 नवीन
=))
  • Log in or register to post comments

हा एक नमुना बघा.

बोलघेवडा
Sun, 02/03/2013 - 14:31 नवीन
हा एक नमुना बघा. :)) http://www.esakal.com/esakal/20110928/4961957820117892812.htm
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/03/2013 - 20:14 नवीन
शाब्बास. बाळंतपणाची आयड्या मला वाटतं थ्री इटियट मधून आली असावी. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोलघेवडा

लेख व प्रतिसाद दोनदा

सस्नेह
Sun, 02/03/2013 - 20:11 नवीन
लेख व प्रतिसाद दोनदा काळजीपूर्वक वाचूनही कसली मदत हवी आहे हे समजले नाही. Image removed.
  • Log in or register to post comments

जाहीर निषेध!

पिवळा डांबिस
Sun, 02/03/2013 - 21:22 नवीन
सर्वप्रथम आमच्या परमप्रिय मुक्तपीठाला मुक्तपणे दात काढून हासणार्‍या अच्रत बव्लत मिपाकरांचा जाहीर निषेध!!!! ;) खटराव, तुमचं अनुभवकथन आवडलं... पण आता मदत हवी म्हणताय म्हणून सांगतो. लवकरच एकदा चांगल्या डॉक्टरला दाखवून घ्या बॉ. नाय म्हणजे वयोमानानुसार फुटबॉल होणं फार विचित्र नाही पण तो खाली घरंगळणं मात्र धोकादायक हो!!!! :)
  • Log in or register to post comments

ब्वार ! द्या पत्ता तुम्हाला

खटासि खट
Sun, 02/03/2013 - 21:51 नवीन
ब्वार ! द्या पत्ता तुम्हाला हा गुण आलेल्या डागदराचा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

खट्टु काका कै च्या कै लिवलय .

जेनी...
Sun, 02/03/2013 - 22:03 नवीन
खट्टु काका कै च्या कै लिवलय .... अहो बायकोला फिरवायला विमानाने नेलं .. नेलं ते नेलं कुठे ?? तर दापोलि ... तिथे निसर्गरम्य ठिकाण आणि बिचेस ... त्यात येड्यासारखे फुटबॉल व्हालिबॉल खेळलात ... कहर म्हणजे बायकोचा नोव्हेंबर महिना साजरा करायला आई वडिलानाहि बरोबर नेलत ??? अहो लेख थोडा रोमॅन्टिक बनवायचा केवढा चांस होता ... निदान चविने वाचता तरि आला असता ..( ते गाणं ऐकलय का " आला थंडीचा मैना झट्पट शेकोटी पेटवा ;) ). हे असलं लिहायचं ... वाचनारे काहि दिलं तरि वाचतायेत .... किती गंडवायचं लोकांना ... काहि प्रमाण .... ते उंदिर प्रकरण कसं हाताळलं तुमच्या म्हातार्बाबाने ते तर नीट कळलं पण नै ...:-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

असं म्हणताय ? आपल्याविषयीचा

खटासि खट
Sun, 02/03/2013 - 22:33 नवीन
असं म्हणताय ? आपल्याविषयीचा आदर अजूनच वाढीस लागला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा