लिखाणाचे निमित्त : खुमखुमी
उद्देश : मनोरंजन, विरंगुळा
फायदे : मिसळपाववर (कु)प्रसिद्ध होणे
टार्गेट ऑडियन्स : मुक्तपीठचे नियमित वाचक
प्रस्तावना : नमस्कार सदस्यहो. मला पुण्यनगरी देशी प्रसिद्ध व्हावेसे वाटत असल्याने एक लेख लिहून वर्तमानपत्रास पाठवावयाचे ठरवले. मी तसा चांदोबा. चंपक, ठकठक आणि सकाळ नियमित वाचतो. सकाळ मधे इमारतीच्या शेजारच्या मुतारीचा वास हे पत्र लिहीले होते. ते छापूनही आले होते. पण प्रसिद्धी मिळाली नाही. लोक म्हणतात लेख लिही. मी आवडीने मुक्तपीठ वाचतो. त्यासाठी लेख लिहावा असे मनी आले. एक कच्चा मसुदा आपल्याला दाखवत आहे. मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.
कळावे
आपला नम्र
खट
--------------------------------------------------------------------------------------------------------
साधारण पंधरा वर्षापूवीची गोष्ट. माझे लग्न होऊन नुकतीच सौ. घरी आली होती. सौ शीच लग्न झालं होतं त्यामुळे कृपया गोंधळ वाढवू नये. ( सौ माझ्याच घरी आली होती). तिची हौसमौज पुरवण्यात दिवस चांगले चालले होते. तिचा पहिलाच नोव्हेंबर असल्याने तो साजरा करण्यासाठी आम्ही दापोलीला पिकनिकला जाण्याचे ठरवले. आम्ही नुकतेच एक विमान खरेदी केले होते. सर्वांनी ठरवले कि विमानानेच जाऊ. माझी सौ, एम ए, पीएचडी, मातोश्री, एम (ऑनर्स), पिताश्री (बालिष्टर) आणि मी स्वतः (बारावी नंतरची प्रमाणपत्रे सापडत नाहीत) असे चौघे दापोलीस विमानातून कूच करते झालो. जाताना आम्ही वरंधा घाटातून जायचे ठरवले. त्या वेळी टोल नाका असल्याने या संधीचा फायदा घ्यावा असे ठरले. रस्त्याने मीच विमान चालवत होतो. साठच्या पुढे वेग नको असे पिताश्रींनी बजावल्याने त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले. हास्यविनोद करीत आणि गाण्याच्या भेंड्या खेळत आम्ही दापोलीस पोहोचलो. जेवण वगैरे करून विमानाने कर्दे या गावी पोहोचलो. दिवसभर समुद्र्वर मजा केल्यावर अंधार पडायच्या आधी निघावे असे ठरले. कारण या आधी विमानाने कुठेच गेलेलो नसल्याने हेडलाईट आणि डीपर ( डिप्पर) चालतात किंवा नाही याबद्दल काहो कल्पना नव्हती.
जाताना ताम्हणी घाटातून जायचे ठरवले होते. ताम्हणी घाटातून जात असताना ब्रेक दाबलाच जाईना. बाका प्रसंग होता. आम्ही सगळे खूपच घाबरलो होतो. तरीही एका हाताने विमानाचे स्टियरींग सौ ला पकडायला सांगून मी खाली वाकून पाहीले तर काय, ब्रेकच्या खाली फूटबॉल आलेला ! आम्ही बीच वर व्हॉलीबॉल, फूटबॉल, बॅडमिंटन हे सगळे खेळ खेळल्यानंतर ते सगळं साहीत्य मागच्या सीट्खाली टाकलेलं. हा बॉल घरंगळ येऊन कधी ब्रेकखाली आला कळलंच नाही. जेव्हां बॉल काढला तेव्हां ब्रेक लागायला सुरूवात झाली. सगळ्यांच्या जिवात जीव आला.
आम्ही आता वर चढून जंगलात आलो होतो. आजूबाजूला चिटपा़खरूही नव्हते. आमचे विमान आणि आम्ही इतकेच काय ते हलत होतो. अंधार मी म्हणत होता. आणि इतक्यात रस्त्यावर काहीतरी चमकलं. पुन्हापुन्हा पाहील्यावर खात्रीच पटली. शंकाच नको. दोन डोळे होते ते. सर्वांची भीतीने गाळणच उडाली. अचानक कुठलं जनावर पुढ्यात येऊन ठाकलंय याची कल्पना नव्हती. मागच्या मागे जाणं धोक्याचं होतं. वळणं वेडीवाकडी होती आणि विमान रिर्व्हर्समधे चालवायची माहिती नव्हती. घरी गेल्यावर काशीहून तज्ञांना बोलावून शिकून घ्यायचा मनोमन निश्चय केला. पण सध्या वेळ मारून न्यावी लागणार होती.
पिताश्री मनाचा हिय्या करून खाली उतरले. ( आमच्यापुढे भविष्यकाळ होता तर पिताश्रींकडे भूतकाळ ). हेडलाईटच्या प्रकाशात चमकणा-या डोळ्यांकडे ते सावकाश जाऊ लागले. मला हेडलाईट बंद करायला लावला. जवळ गेल्यावर ते डोळे इकडे तिकडे पळू लागले. पिताश्रींनी देखील त्यांचा पाठलाग केला आणि जवळचा टॉर्च काढून त्यांच्यावर प्रकाशझोत सोडला. त्याबरोबर डोळे गायब झाले.
पिताश्री विजयी मुद्रेने परत आल्यावर विमानातील दोन्ही महिलांनी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहीले. पिताश्रींनी सांगितले आता घाबरायचं कारण नाही. पण कुठले जनावर होते हे विचारल्यावर पिताश्रींनी हसतच उत्तर दिले, तो एक मोठ्या आकाराचा उंदीर होता. हे ऐकताच मातोश्री आणि सौ किंचाळल्या. त्याबरोबर आम्ही हसत सुटलो.
आजही तो प्रसंग आठवल्यावर आम्ही खूप हसतो. पण त्याच वेळी जर खरंच एखादं मोठं जनावर असतं तर ? या विचाराने अंगावर शहारा येतो.
मिसळपाव
प्रतिक्रिया
वारलो !!
=)) =))
हा हा..
In reply to वारलो !! by परिकथेतील राजकुमार
:))
मुतपीठसाठी लेख : कृपया मदत
मुतपीठसाठी लेख : कृपया मदत करा
ओह माय गॉड.
हसून हसून खल्लास.काहीवेळा पूर्वीच इतका सिरियस मूड झाला होता नथुरामांच्या धाग्यावर, हे भारीच.
भयंकर!
सगळंच भयंकर आहे! हा लेख मुक्तपिठावर प्रसिद्ध केलात की नक्की कळवा! प्रतिक्रिया तिथेही अवश्य देऊ!
:)
अवघड आहे. शीर्षकात बदल वगैरे करावा वाटला तर मदत तयार आहे. हाक मारा. :)
बाकी, आपलं लेखन मुक्तपीठाची प्रेरणा आहे, हे नक्की माहिती आहे.
मुक्तपिठात काय काय आणि कसं कसं छापून येतं हे तुम्हाला सांगायचं हे कळलं. धन्स.
तर बिबट्यानं धरलंच असतं आणि आत्ताच घाटात फूटला घाम वाचून संपवला आहे. आपला लेखही उत्तम आहे, मुक्तपिठात नक्कीच छापून येईल. मन:पूर्वक शुभेच्छा. :)
-दिलीप बिरुटे
हो आणि डोहाळे जेवणं,बारशी
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो आणि डोहाळे जेवणं,बारशी,लग्न,वाढदिवस, कामवाल्या बाईला दिलेले सल्ले (आणि वाइस अ वर्सा) हेही फेमस विषय आहेत.
शीर्षकात बदल
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
केला काय न केला काय, जे आहे ते तसंच राहणार आहे. धन्यवाद.
भन्नाट आहे राव...
In reply to शीर्षकात बदल by खटासि खट
औरंगाबादकरांनी दिलेल्या दुव्यांवरुन ताम्हीणी घाटात गेलो. काय भन्नाट लिहिलंय लेखकाने आणि प्रतिसादकर्त्यांनीही.
लोकांनी ताम्हीणी घाट भलताच फेमस केलाय.
एवढा लेख वाचा आणि मित्र परिवाराला शेअर करा.
In reply to भन्नाट आहे राव... by धन्या
तर बिबट्यानं धरलंच असतं हा लेख आणि लेखाखालचे प्रतिसाद वाचून मरायची वेळ आली होती. :)
लेखकाला मिपावर जंगलातील अनुभव लिहायला कोणी तरी आणा राव. आपल्याला जंगलातली खर्या अर्थाने सैर होईल. ;)
-दिलीप बिरुटे
ह्या लेखात के बी काळे ह्यांनी
In reply to एवढा लेख वाचा आणि मित्र परिवाराला शेअर करा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ह्या लेखात के बी काळे ह्यांनी पन प्रतीसाद दिला आहे,तो असा
डॉ साहेब, हे तेच ना जकार्ता वाले
नाय हो, ते येगळे.
In reply to ह्या लेखात के बी काळे ह्यांनी by श्री गावसेना प्रमुख
नाय हो, ते येगळे.
के बी काळे आणि जाकार्ता वाले
In reply to नाय हो, ते येगळे. by रेवती
के बी काळे आणि जाकार्ता वाले काळे सेमच आहेत!
सुधीर काळे, जकार्ता
In reply to के बी काळे आणि जाकार्ता वाले by बिपिन कार्यकर्ते
सुधीर काळे, जकार्ता यांच्याबद्दल काकु चाललाय का ?
काकु नाही काका आहेत ते तुमचे
In reply to सुधीर काळे, जकार्ता by खटासि खट
काकु नाही काका आहेत ते तुमचे,आमचे सर
प्रतिक्रिया लिहिणारी माणसे जास्त प्रतिभावान आहेत
In reply to भन्नाट आहे राव... by धन्या
'त्या' प्रतिक्रियांपैकी एक प्रतिक्रिया देत आहे धनाजीराव....
दोन्ही लेख वाचल्याबद्दल आभार.
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोन्ही लेख वाचल्याबद्दल आभार. शक्य असल्यास मुक्तपीठीय लेखाचा कळसोध्याय असलेल्या लेखाची लिंक देण्याचा मोह होत आहे.
https://online2.esakal.com/esakal/20130122/4824005995910158145.htm
( प्रतिक्रिया खालून वर वाचणे हेसांनल )
अब बच्चे की जान लोगे क्या?
In reply to दोन्ही लेख वाचल्याबद्दल आभार. by खटासि खट
आवं किती हासवाल आता लेकराला.
हे त्यातल्या त्यात लैच भारी.
त्या ब्रह्मेंचा लेख सकाळ मधे
In reply to अब बच्चे की जान लोगे क्या? by अधिराज
त्या ब्रह्मेंचा लेख सकाळ मधे (ई नाही) वाचला तेव्हांच थापा लक्षात आल्या होत्या. आणि तो लेखकाचा फोटो पाहून जाम हसायला येत होतं. तरीही म्हटलं असेलही त्यावेळी, पण प्रतिक्रिया वाचल्या आणि खल्लास !! अफाट प्रतिक्रिया आहेत ! हे लोक ईसकाळ वाचत नाहीत का ? वाचत असते तर बिचा-यांनी (असले) लेखच पाठवले नसते.
आईशप्पथ ताम्हीणी घाटाने हसुन
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आईशप्पथ ताम्हीणी घाटाने हसुन हसुन वेड लावलं आज...
सगळ्यात भारी कमेंट ही होती...
भारतीयांना इतकं घालुन पाडून बोलुन झाल्यावर ही 'शुभेच्छा' द्यायला विसललेल्या नाहीत त्या.... =))
फुटबॉल
ब्रेकखाली फुटबॉल राहू शकतो या कल्पनेने हा लेख विनोदी आहे हे कळले, नाहीतर आम्ही आपले खरेच विमान धरुन चाललो होतो.
बाकी मुतपीठाची भजी कशी करतात यावर एक धागा येण्यास हरकत नसावी.
ओह ! हा लेख विनोदी म्हणून
In reply to फुटबॉल by तिमा
ओह ! हा लेख विनोदी म्हणून वाचलात ? हरकत नाही.
नावाला पूर्णपणे जागलात !
नावाला पूर्णपणे जागलात !
___/\___ , भेटून आनंद झाला !! :)) :)) :))
किति झटापट
=)) किति झटापट =))
आत्माराम बुवा...
In reply to किति झटापट by अत्रुप्त आत्मा
या लेखाचं सोडा... बिरुटे सरांनी वर या लेखाची प्रेरणा असलेल्या मुक्तपीठवरील लेखाचा दुवा दिला आहे. त्यावरच्या प्रतिक्रिया वाचा. :)
एखादे ज्ञनावर अस्ते तर फार
एखादे ज्ञनावर अस्ते तर फार काहि झाले नसते.. पन हाडळ् आड्वि आलि असति तर........
हडळीचं काय एव्हढं वाटणार हो
In reply to एखादे ज्ञनावर अस्ते तर फार by येता जाता....
हडळीचं काय एव्हढं वाटणार हो विवाहीत माणसाला...
(No subject)
In reply to हडळीचं काय एव्हढं वाटणार हो by खटासि खट
=))
आवं काय हे, तुम्ही एक स्त्री
In reply to (No subject) by जेनी...
आवं काय हे, तुम्ही एक स्त्री आसून दुसर्या स्त्रीवर केलेल्या इनोदाला हस्ताय व्हय.
हो अधिकाका
In reply to आवं काय हे, तुम्ही एक स्त्री by अधिराज
हो अधिकाका :)
हो अधि
In reply to हो अधिकाका by जेनी...
कसय ना, तुमच्याकडून अशी अपेक्षा न्हवती,म्हणून मनाला यातना झाल्या, बाकी कै नाय. असो, आपलेच दात आन् आपलेच होट, काय तक्रार करणार?
काय तक्रार करणार पेक्षा '
In reply to हो अधि by अधिराज
काय तक्रार करणार पेक्षा ' कुणाकडे ' तक्रार करणार ?? असं असायला हवं होतं
अधिकाका :)
मस्त आणि जबरदस्त
अप्रतिम. आवडले अगदी.
विमानापुढील लेखांना शुभेच्छा. :)
)))))))))))))))))))))))))))))
=))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))))
सकाळचे मुक्तपीठ हे खरच एक
सकाळचे मुक्तपीठ हे खरच एक वाचनीय सदर आहे...त्याखालील प्रतिक्रिया तर महानच ...
खास प्रतिक्रियांसाठीच वाचावेत असे आणखी काही लेख:
https://72.78.249.107/esakal/20110726/4824468914429679974.htm
https://www.esakal.com/esakal/20100705/5370982350262935099.htm
आयला, मला वाटत होतं मी एकटाच
आयला, मला वाटत होतं मी एकटाच आसल इथं मुक्तपीठ वाचणारा.
+१
In reply to आयला, मला वाटत होतं मी एकटाच by अधिराज
अगदी अगदी.... ताम्हिणी घाटातला तो लेख आजन्म विसरणार नाही ;-) =))
लाडू कावळा
खी: खी: खी:, मस्तच!
हेडलाईटमध्ये चमकणारे डोळे बहुतेक लाडू न मिळाल्याने कावलेल्या 'लाडू कावळ्याचे' असावेत, असं आधी वाटलं होतं ;)
हा हा हा!
कहर आहे!!
ओ ते शीर्षक मुद्दाम ठेवलंय का
ओ ते शीर्षक मुद्दाम ठेवलंय का ट्यार्पी वाढवायला ;)
बाकी लेख अगदी उत्तम जमला आहे! मुक्तपीठवर मुक्तपणे बागडणारे लेख आणि एकाचढ एक प्रतिक्रिया पाहून कळायचे बंद होते =)) =))
कहर!!
वाईट हसतेय ....आई गं
भन्नाट आहे
असेच पैलतिरिय लेख पण येऊद्या...
मुक्तीचा मार्ग प्रशस्त झाला!
'मुक्तपीठा'वरचे 'मुक्त' अनुभव आणि त्याहून मुक्त प्रतिसाद वाचून लवकरच मुक्ती मिळेल, अशी शक्यता नाकारता येत नाही :D
(No subject)
=))
हा एक नमुना बघा.
हा एक नमुना बघा. :))
https://www.esakal.com/esakal/20110928/4961957820117892812.htm
:)
In reply to हा एक नमुना बघा. by बोलघेवडा
शाब्बास. बाळंतपणाची आयड्या मला वाटतं थ्री इटियट मधून आली असावी. :)
-दिलीप बिरुटे
लेख व प्रतिसाद दोनदा
लेख व प्रतिसाद दोनदा काळजीपूर्वक वाचूनही कसली मदत हवी आहे हे समजले नाही. चित्र उपलब्ध नाही
जाहीर निषेध!
सर्वप्रथम आमच्या परमप्रिय मुक्तपीठाला मुक्तपणे दात काढून हासणार्या अच्रत बव्लत मिपाकरांचा जाहीर निषेध!!!!
;)
खटराव, तुमचं अनुभवकथन आवडलं...
पण आता मदत हवी म्हणताय म्हणून सांगतो. लवकरच एकदा चांगल्या डॉक्टरला दाखवून घ्या बॉ. नाय म्हणजे वयोमानानुसार फुटबॉल होणं फार विचित्र नाही पण तो खाली घरंगळणं मात्र धोकादायक हो!!!!
:)
ब्वार ! द्या पत्ता तुम्हाला
In reply to जाहीर निषेध! by पिवळा डांबिस
ब्वार ! द्या पत्ता तुम्हाला हा गुण आलेल्या डागदराचा...
खट्टु काका कै च्या कै लिवलय .
In reply to ब्वार ! द्या पत्ता तुम्हाला by खटासि खट
खट्टु काका कै च्या कै लिवलय .... अहो बायकोला फिरवायला विमानाने नेलं ..
नेलं ते नेलं कुठे ?? तर दापोलि ... तिथे निसर्गरम्य ठिकाण आणि बिचेस ... त्यात
येड्यासारखे फुटबॉल व्हालिबॉल खेळलात ... कहर म्हणजे बायकोचा नोव्हेंबर महिना
साजरा करायला आई वडिलानाहि बरोबर नेलत ???
अहो लेख थोडा रोमॅन्टिक बनवायचा केवढा चांस होता ... निदान चविने वाचता तरि
आला असता ..( ते गाणं ऐकलय का " आला थंडीचा मैना झट्पट शेकोटी पेटवा ;) ). हे
असलं लिहायचं ... वाचनारे काहि दिलं तरि वाचतायेत ....
किती गंडवायचं लोकांना ... काहि प्रमाण ....
ते उंदिर प्रकरण कसं हाताळलं तुमच्या म्हातार्बाबाने ते तर नीट कळलं पण नै ...:-/
असं म्हणताय ? आपल्याविषयीचा
In reply to खट्टु काका कै च्या कै लिवलय . by जेनी...
असं म्हणताय ? आपल्याविषयीचा आदर अजूनच वाढीस लागला आहे.
आदराची शेती करता का काय तुमी
In reply to असं म्हणताय ? आपल्याविषयीचा by खटासि खट
आदराची शेती करता का काय तुमी ???
वाढ व्यवस्थित होत असेल तर वाढवा नै त काय कामाची :-/
आमच्या मनात निखळ आदरभाव !
In reply to आदराची शेती करता का काय तुमी by जेनी...
आमच्या मनात निखळ आदरभाव !
बाकि शेती म्हटलं कि नाही नाही ते आठवतं , नकोच ते
पुजाबाई
In reply to खट्टु काका कै च्या कै लिवलय . by जेनी...
पुजाबाई
फोटो ?
In reply to पुजाबाई by टवाळ कार्टा
"टनाटन आभास" वरुन उचललात काय?
हे ते काय?
In reply to फोटो ? by धन्या
"टनाटन आभास" ?
धना हे काय असते रे? फुकाट फोटो आन इमेजा वाटायची साईट है का? मग माझे कामच वाचले की ;)
अजून एक विडंबन.
पण मुळ लेख आणि लेखकाला थोडे क्रेडीट द्यायला हरकत नव्हती.
(अवांतर- मुळ लेखावरील प्रतिक्रीया जास्त वाचनीय आहेत)
ह्या न्यायाने
मिपावरील बरेच लेख मुक्तपीठात सहज चालावेत.
सकाळवाल्यांना मिपाकडे "उकडा" लावायला हरकत नाय. आणी प्रतिसाद म्हणाल तर एकाहुन एक जबरी असतीलच.
अमेरीका
किंवा तत्सम परदेशांतून परतल्याची फोडणी लावल्यास व आपली मुलगी, मुलगा तिकडे स्थायिक असतात याची फोडणी दिल्यास लेख चटकदार होतो व नक्की छापून येतो
मु(क्)तपिठीय प्रतिसाद
१.ही पुण्यातल्या उच्च्भ्रू लोकांना नावे ठेवण्याची लोकांची पद्धत आहे, हे कळते हो आम्हाला.
२.पंधरा वर्षांपूर्वी ताम्हिणी घाटात विमान चालवण्याजोगा रस्ता नव्हता इतकेही लेखकाला माहित नसावे?
३.मुक्तपीठच्या लोकप्रियतेची पोटदुखी! दुसरे काय?
४.शंभर वर्षांपूर्वी मी घोड्यावर बसून माऊंट टिट्लिस वरून (होय, मी स्विट्झर्लंडमध्ये रहात होतो त्यावेळी) उतरत असता घोड्याचा लगाम तुटला त्याची आठवण झाली.
अवांतरः
लेख वाचून हहपुवा झाली.
माऊंट आणि टिटिलस द्विरुक्ती
In reply to मु(क्)तपिठीय प्रतिसाद by विसुनाना
माऊंट आणि टिटिलस द्विरुक्ती होतेय काय? =))
_/\_
_/\_
=))
_/\_
=))
महान आहे हे !!
पुन्हा एकदा खपलोय....
बादवे, सकाळ च्या सायटीवरील सर्वात भयंकर वाटलेल्या तीन कमेंटा इथे पेष्टवतोयः-
On 7/19/2010 2:49 PM शुमाकर said:
आम्ही दिवेआगार वरून येताना तर ब्रेक खाली बॅट आली होती .......... पण मी कधी ब्रेक दाबत नाही म्हणून कळलेच नाही ......... दुसऱ्या दिवशी क्रिकेट खेळताना लक्षात आलं आपली बॅट नाहीये ते !!!
On 7/19/2010 2:43 PM ghaberlela said:
माझ्या गाडीच्या खाली एकदा असाच मांजर अडकला होता , मी पडता पडता वाचलो , माझी two wheeler आहे ना
On 7/19/2010 1:48 PM baap re.. said:
खरच भीतीदायक प्रसंग आहे.. मी दिवेआगरला जाताना आमचा गाडीच्या ब्रेकखाली फुटबाल अडकला होता.. पण आमची ट्रक होती.. त्यामुळे वाचलो
मजा आली....
मजा आली....
तुमचे सदस्यनाम पाहूनही क्षणभर
In reply to मजा आली.... by जव्हेरगंज
तुमचे सदस्यनाम पाहूनही क्षणभर हसूच फुटले. =))
('पानिपत' मधील सुजाउद्दौल्याच्या राजधानीतील टपर्यांवरच्या खाद्यपदार्थवर्णनाचा आणि जव्हेरगंजचा फ्यान) बॅटमॅन.
आमच्या सदस्य नामाचे जानकार
In reply to तुमचे सदस्यनाम पाहूनही क्षणभर by बॅटमॅन
आमच्या सदस्य नामाचे जानकार मुळातच कमी आहेत. आपणास पाहून आनंद झाला . :-) :-)
एक सामान्य प्रयत्न!!!
मुक्तपीठबद्दल बोलताना सप्तर्षीबाईंच्या मांजराचा उल्लेख वगळणे म्हणजे पु. लं. वर लिहिताना बटाट्याची चाळ गाळून टाकणे होय. णिशेद!!
प्रकाशन तारखा
In reply to एक सामान्य प्रयत्न!!! by चलत मुसाफिर
कृपया प्रकाशन तारखा बघाव्या.
सदर लेख २ फेब्रुवारी २०१३ रोजी मिपावर प्रकाशित झाला आहे. तेव्हाची शेवटची प्रतिक्रिया ८ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रकाशित झाली होती. त्यानंतर आज काही तासांपूर्वी नवी प्रतिक्रिया आल्याने हा लेख वर आलाय.
प्राची सप्तर्षी यांचा प्रसिद्ध लेख करमणूक मांजराची (मुक्तपीठ) सकाळमध्ये ११ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रकाशित झाला आहे.
हो चुकलं
In reply to प्रकाशन तारखा by श्रीरंग_जोशी
मुक्तपीठीय परंपरेनुसार चुकीकडे दुर्लक्ष करण्यात यावे ही विनंती. :-)
हे काय पाहतोय आम्ही ? आम्ही आम्ही आम्ही …(एको इफेक्ट)
In reply to प्रकाशन तारखा by श्रीरंग_जोशी
उभ्या मुपीचे हृदयसम्राट … अनेक पटकथाकार लेखक वाचक अबला चे अखंड स्फूर्तीस्थान
असलेल्या अवताराचा इथे असा एकेरी उल्लेख …केल्याबद्दल तीव्र णीषेध
(अखिल भारतीय पुणे विद्यापीठ लुनाब्रिगेड आणि सुंदरअबलालिफ्ट सेवासंघा)
भयानक सुंदर
भयानक सुंदर, तेजस्वी हलकट, निष्कलंक खडूस लेख!
हो चुकलं
मुक्तपीठीय परंपरेनुसार चुकीकडे दुर्लक्ष करण्यात यावे ही विनंती. :-)
तसं नाही हो
In reply to हो चुकलं by चलत मुसाफिर
मुक्तपीठीय लेख वाचताना मलाही काळवेळाचे भान राहत नाही.
एक्याण्णव साली लुनावरून फिरणारा माणुस रोख ₹ चार हजार सोबत बाळगतो ही एक आश्चर्याची बाब आहे हे मला आता कुठे लक्षात आले. ब्रह्मेंच्या कथेत मी इतका रमून जातो की काय सांगू.
आम्ही एकदा यानाने गेलो होतो .
आम्ही एकदा यानाने गेलो होतो . तेव्हा आमच्या यानाच्या ब्रेकखाली चंद्र आला होता
एक नंबर
In reply to आम्ही एकदा यानाने गेलो होतो . by तुडतुडी
प्रतिक्रिया आवडली.
अहो मग दिवसा जायचे ,दिवसा
In reply to आम्ही एकदा यानाने गेलो होतो . by तुडतुडी
अहो मग दिवसा जायचे ,दिवसा चंद्र नसतो
हि प्रतिक्रीया मला फार आवडलि.
हि प्रतिक्रीया मला फार आवडलि..
मी पण परवाच पृथ्वीवरून प्लूटो वर फिरायला निघालो होतो. ज्यूपीटर च्या घाटात बघतो तर काय ... यानाच्या ब्रेक खाली चंद्र ... मी लगेच यान कडेला घेतला आणि मंगळावर गाडीत चढलेल्या अलीएन फमिली ला विचारला कोणी आणला चंद्र .. कोणी सांगायला तर नाही.. असो,तर मग चंद्र यानातून काढला आणि परत त्याच्या कक्षेत ठेवला..
अति उत्तम .
अति उत्तम .