मसाण
कहानी शुरू होती है एक पोर्न से।
देवी. एका कॉम्प्युटर क्लास मधली ट्यूटर. तिच्या एका मित्राकडे, पियुषकडे आकृष्ट होते. लैंगिक संबंधांचे कोडे उलगडण्यासाठी ती पोर्न पाहून पियुषसोबत एका स्वस्तातल्या लॉज मध्ये जाते. तिथे अचानक पडलेल्या पोलिसांच्या धाडीला घाबरून पियुष आत्महत्या करतो. पोलिसांनी या धाडीचा विडिओ बनवलेला असतो. त्यांपैकी एक इन्स्पेक्टर मिश्रा, देवी आणि तिच्या वडीलांपुढे एक मार्ग ठेवतो;
रिचा चड्डाने देवी च्या भुमिकेला न्याय दिला आहे. संजय मिश्रांनी हुशार प्रोफेसर तरी हताश बाप विद्याधर हुबेहूब उभारला आहे. श्वेता त्रिपाठी आणि विकी कौशल या दोघांनी शालू आणि दीपकचे प्रेम छान साकारले आहे. नीरज घायवान याचं दिग्दर्शनातले पदार्पण मसाण सारख्या जबरदस्त कथेने झाले आहे. प्रेक्षकाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य कथेत, दिग्दर्शनात आणि कॅमेऱ्यात नक्कीच आहे. प्रचंड भावनिक असूनही चित्रपट कधीच रडवणारा नाही वाटत. त्या भावनांची, वास्तविकतेची खोली मनात घर करून जाते. नीरजने याआधी 'ग्यांग्ज ऑफ वासेपूर'च्या सहाय्यक दिग्दर्शकाचे काम अनुराग कश्यप साठी केले होते. मसाण मध्ये त्याने वाराणसीच्या भाषेचा लहेजा, अंत्यसंस्कार आणि मुख्य म्हणजे गंगाघाट याच्या डिटेलिंगवर उत्तम काम केले आहे. वरुण ग्रोवर यांची कथा आणि 'तू किसी रेल सी ', 'मन कस्तुरी रे, जग दस्तुरी रे' ही गाणी एक छाप नक्कीच सोडून जातात. 'Fly away solo' या नावाने कान्स/कान महोत्सवात उतरून या चित्रपटाने क्रिटिक आणि 'Promising Future' असे दोन पुरस्कार मिळवले आहेत. आता तुम्हीही पाहून सांगा तुम्हांला मसाण चित्रपट कसा वाटतो ते
३ लाख रुपये द्या, कोर्ट-कचेरी आम्ही पाहून घेऊ नाहीतर तिचा विडिओ इंटरनेट वर टाकू.विद्याधर पाठक; देवीचे वडील हे संस्कृत प्रोफेसर असतात आणि गंगाघाट वर धार्मिक साहित्य पण विकत असतात. मग सुरु होतो देवी आणि विद्याधर यांचा पैसे उभे करायचा लढा. त्याच वेळी वाराणसी मधेच अजून एक प्रेमकहाणी सुरु होते. पॉलीटेक्निक मध्ये सिविल शिकणारा दीपक आणि कविता, शायरी यांची खूप आवड असणारी चुणचुणीत मुलगी शालू.
तू किसी रेल सी गुजरती है, मै किसी पूल सा थरथरता हुं। तू भले रत्ती भर ना सुनती है, मै तेरा नाम बुड्बुडता हुं ।दीपक अत्यंत हुशार पण गंगेच्या काठावर अंत्यसंस्कार करणाऱ्या घरातला खालच्या जातीतला असतो तर शालू उच्च जातीतली गुप्ता घरातली असते. दीपक शालूला प्रेमाची कबुली देत मागणी घालतो आणि शालू पण स्वीकारते. दीपक त्यांच्या कुळातल्या अंतरांबद्दल पण सांगतो, शालूला याने फरक नाही पडत,
'तुम कहीं अच्छी नौकरी पकडलो, फिर भागना भी पडा तो भाग जायेंगे'.तिच्या या पाठबळाने दीपक जोमाने कॅम्पस इंटरव्युव्जच्या तयारीला लागतो. तिकडे विद्याधर पैशांची जुळवाजुळव करतांना स्वतः बनवलेल्या तत्वांना बगल देऊन एक प्रकारच्या सट्ट्यात उतरतो. गंगेच्या किनारी पोरेसोरे एक खेळ नेहमीच खेळतांना दिसतात, पाण्यात उड्या मारून नदीतले पैसे गोळा करण्याचा. अशाच पोरांवर मोठी माणसे सट्टा खेळतात; कोण किती पैसे गोळा करून आणेल याची बोली लागते. विद्याधरकडे कामाला असलेला अनाथ 'झूटा' या खेळात तरबेज असतो आणि खेळ खेळू द्यावा म्हणून कायम विद्याधरची मनधरणी करत असतो, विद्याधर कायम या खेळाला 'जुआं' म्हणून टाळत असतो. पण पैशांची चणचण विद्याधरला इकडे खेचून आणते. एकावेळेस विद्याधर खूप मोठी बाजी झूटावर लावतो. पण पैसे आणायला पाण्यात उडी मारलेला झूटा वर येत नाही. बेशुद्ध झूटाला बाकी पोर बाहेर काढतात. बेशुद्ध पोर, बुडालेले पैसे आणि गांजलेला विद्याधर. हॉस्पिटल मध्ये झूटाला शुद्ध येते,
मेरे वजह से आपके पैसे डूब गये ना. ये देखिये मुझे क्या मिला. अब ये आपका.तो विद्याधरला नदीत सापडलेली सोन्याची अंगठी देतो. देवीला कॉम्प्युटर क्लास मधली नोकरी सोडावी लागते आणि एका खाजगी ऑफिसमधली रिसेप्श्निस्टची नोकरी 'देगी क्या' अशा थेट प्रश्नांना वैतागून ती सोडते. शेवटी रेल्वेमध्ये तिकीट काउंटरवर तात्पुरती नोकरी मिळते आणि पाठक कुटुंब पैशाचा प्रश्न सोडवतात. एका रात्री दीपक चे वडील त्याला घाटावर बोलावतात,
प्रेतांची रांग आहे मदतीला ये.प्रेताची कवटी फोडण्यासाठी मदत करत असतांना तो ऐकतो,
तीर्थयात्रेला जाणाऱ्या कुटुंबाची बस नदीत पडली, कोणीच नाही वाचलं.नविन मांडलेल्या चितेवर कोणीतरी शालूला आणून ठेवत. विद्याधर ३ लाख मधला शेवटचा हफ्ता इन्स्पेक्टर मिश्राला देतो. गंगेकाठी दीपक आपल्या मित्राच्या कुशीत धायमोकलून रडतो. देवी पियुषच्या कॉलेज मधून त्याच्या घरचा पत्ता मिळवते. काही दिवसांनी दीपकला अलाहबादमध्ये नोकरी मिळते. देवी रेल्वेमधली नोकरी सोडून अलाहबादला पुढच्या शिक्षणासाठी जाते. देवी पियुषने दिलेलं गिफ्ट गंगेत सोडायला संगमावर येते आणि पहिल्यांदाच पियुषसाठी मनमोकळं रडून घेते. तिथेच आलेला दीपक तिला पाणी देतो. दोन नद्यांच्या एक होण्याच्या ठिकाणी जायला ते दोघे मिळून एका होडीत बसतात.
रिचा चड्डाने देवी च्या भुमिकेला न्याय दिला आहे. संजय मिश्रांनी हुशार प्रोफेसर तरी हताश बाप विद्याधर हुबेहूब उभारला आहे. श्वेता त्रिपाठी आणि विकी कौशल या दोघांनी शालू आणि दीपकचे प्रेम छान साकारले आहे. नीरज घायवान याचं दिग्दर्शनातले पदार्पण मसाण सारख्या जबरदस्त कथेने झाले आहे. प्रेक्षकाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य कथेत, दिग्दर्शनात आणि कॅमेऱ्यात नक्कीच आहे. प्रचंड भावनिक असूनही चित्रपट कधीच रडवणारा नाही वाटत. त्या भावनांची, वास्तविकतेची खोली मनात घर करून जाते. नीरजने याआधी 'ग्यांग्ज ऑफ वासेपूर'च्या सहाय्यक दिग्दर्शकाचे काम अनुराग कश्यप साठी केले होते. मसाण मध्ये त्याने वाराणसीच्या भाषेचा लहेजा, अंत्यसंस्कार आणि मुख्य म्हणजे गंगाघाट याच्या डिटेलिंगवर उत्तम काम केले आहे. वरुण ग्रोवर यांची कथा आणि 'तू किसी रेल सी ', 'मन कस्तुरी रे, जग दस्तुरी रे' ही गाणी एक छाप नक्कीच सोडून जातात. 'Fly away solo' या नावाने कान्स/कान महोत्सवात उतरून या चित्रपटाने क्रिटिक आणि 'Promising Future' असे दोन पुरस्कार मिळवले आहेत. आता तुम्हीही पाहून सांगा तुम्हांला मसाण चित्रपट कसा वाटतो ते
वर्गीकरण
प्रतिक्रिया
क्या बात
खुप जणांकडून ऐकलं आहे. त्यात
एकदम छान परिचय दिलात!
छान परिक्षण.
कोण कोण?
आयला किसना तू पण.
आयला अभ्या तू पण????
उत्तम परिचय.
छान लिहिलंय. मसाण हा एक
परीक्षण आवडले.पिक्चर बघावासा
लिहिलंय छान (अर्धेच वाचले).
कथेमध्ये सस्पेंस असा नाहिये
हा हिंदी सिनेमा आहे का?
उत्तम परिक्षण!
परिक्षण???
बरंच झाल तुम्हाला परिक्षण
व्हय!
नकाच वाचू ओ. पण याच चित्रपटाच
कोमलताई लिहीत रहा. कोण जाणे
आभार. पण मसाण बाबत कथा सांगणे
तुम्ही बरोबरच आहात! कथा ऐकणे
पहिला प्रयत्न म्हणून परीक्षण चांगले आहे
मटातले परिक्षण
छान ओळख
मसान
हसरे........,
छान परीक्षण.
__/\__ सगळ्यांचे आभार.
मस्त लिहिलं आहेस परीक्षण. खूप
परीक्षण आवडलं