मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शतशब्दकथा स्पर्धा] रात्र आरंभ (भाग-१)

कॅप्टन जॅक स्पॅरो · · स्पर्धा
खिडकीबाहेर पडणारा मुसळधार पाउस, अंधारलेलं आकाश,घोंगावणारा वारा, ढगांचा गडगडाट आणि कडाडणार्‍या वीजा ह्याचं गोष्टी दोन दिवस तिच्या सोबतीला होत्या. दिवाणखाण्यामधल्या घड्याळाने रात्रीच्या अकराचे टोल दिले तशी ती एकदम दचकुन जागी झाली. तो अजुनही घरी परतलेला नव्हता. तिनी त्याला परत एकदा भ्रमणध्वनीवर संपर्क करायचा विफल प्रयत्न करुन पाहिला. तिने सहज बंगल्याचा पुढचा दरवाजा उघडुन बाहेर एक नजर टाकली, कोणीचं नं दिसल्याने ती उलटी फिरणार एवढ्यात लखकन वीज चमकली, तिची नजर बंगल्याच्या फाटकाकडे गेली. तो फाटकामधे उभा होता. त्याला ओळखुन पावसाची फिकिर नं करता ती त्याच्याकडे धावली. क्षणार्धात फाटक उघडुन त्याच्या मिठीमधे शिरली. परत कडाडलेल्या वीजेचा उजेड क्षणभर त्याच्या हिरव्याकंच डोळ्यांमधे चमकला.

वाचने 8700 वाचनखूण प्रतिक्रिया 44

प्रतिक्रिया

सटक 07/08/2015 - 23:09
जय कलगुटकर (100 days-villain) ची आठवण झाली!

नाखु 08/08/2015 - 10:11
बुवा भेटीके साईड इफेक्ट नावाचे पुस्तक लिहावे काय??? साशंक नाखुस पत्रेवाला

बबन ताम्बे 10/08/2015 - 11:12
सुरुवात भारी झालीये. सिक्वेलची अपेक्षा .

In reply to by तुडतुडी

कथा मला तिथेचं संपवताही आली असती. पण दुसरी कथा ही पहिल्या कथेचा उत्तरार्ध असायची अपेक्षा असल्याने अश्या पद्धतीने लिहिली आहे. १०० शब्दामधे दोन्ही कथांचा आशय नंतर लिहिनचं. :)

gogglya 10/08/2015 - 15:13
बादवे : भयकथा / गूढ कथा म्हणले की डोळे हिरवेच असले पाहीजे अशी अट आहे का? [ कृ ह घ्या]