[शतशब्दकथा स्पर्धा] रात्र आरंभ (भाग-१)
खिडकीबाहेर पडणारा मुसळधार पाउस, अंधारलेलं आकाश,घोंगावणारा वारा, ढगांचा गडगडाट आणि कडाडणार्या वीजा ह्याचं गोष्टी दोन दिवस तिच्या सोबतीला होत्या. दिवाणखाण्यामधल्या घड्याळाने रात्रीच्या अकराचे टोल दिले तशी ती एकदम दचकुन जागी झाली. तो अजुनही घरी परतलेला नव्हता. तिनी त्याला परत एकदा भ्रमणध्वनीवर संपर्क करायचा विफल प्रयत्न करुन पाहिला. तिने सहज बंगल्याचा पुढचा दरवाजा उघडुन बाहेर एक नजर टाकली, कोणीचं नं दिसल्याने ती उलटी फिरणार एवढ्यात लखकन वीज चमकली, तिची नजर बंगल्याच्या फाटकाकडे गेली. तो फाटकामधे उभा होता. त्याला ओळखुन पावसाची फिकिर नं करता ती त्याच्याकडे धावली. क्षणार्धात फाटक उघडुन त्याच्या मिठीमधे शिरली. परत कडाडलेल्या वीजेचा उजेड क्षणभर त्याच्या हिरव्याकंच डोळ्यांमधे चमकला.
वाचने
8700
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
अईईईईई!!!
चिमणराव तुम्हीपण!!!
+१११११११
In reply to अईईईईई!!! by जडभरत
तिनी त्याला परत एकदा भ्रमणध्वनीवर संपर्क करायचा विफल प्रयत्न करुन पाहिला
इथं फक्त तिने असं करा.
In reply to तिनी त्याला परत एकदा by जडभरत
नियमाप्रमाणे धागा पोस्टवल्यानंतर त्यामधे कोणताही बदल करायचा नाहिये. :) राहु दे. स्पर्धा संपली की बदलेन.
आयला तुमी पन लिवा की भयकथा!!!
In reply to आयला तुमी पन लिवा की भयकथा!!! by जडभरत
माझा प्रांत नाही तो. तो प्रांत गाजवणारे लेखक सद्ध्या मिपावर रुसलेत असं ऐकुन आहे.
In reply to माझा प्रांत नाही तो. तो by कॅप्टन जॅक स्पॅरो
अर्र!!! ते म्हैत नै!!! पण तुमी बी काय कमी नै भयकथा लिवण्यात!!! मस्त लिवलंत!!!
In reply to अर्र!!! ते म्हैत नै!!! पण by जडभरत
+१
गूढ कथेच्या प्रांगणात स्वागत
कथेपेक्षा एक प्रसंग वाटला.
In reply to कथेपेक्षा एक प्रसंग वाटला. by एस
सहमत
जय कलगुटकर (100 days-villain) ची आठवण झाली!
+१
+१
zakkas
+१.
+१
तुलापण ते चावले?
+1
बुवा भेटीके साईड इफेक्ट नावाचे पुस्तक लिहावे काय???
साशंक नाखुस पत्रेवाला
+१
आता सिक वेळेसाठी बोलावावेच लागेल, नाहीतर पुढे काय झाले ते कळणार कसे?
+१ सिक्वेल च्या प्रतीक्षेत
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
पुढे?
In reply to पुढे? by यशोधरा
सिक्वेलात लिहिन =)) अर्थात पहिली फेरी पार केली तर.
सुरुवात भारी झालीये.
सिक्वेलची अपेक्षा .
पुन्हा . कथा न वाटता पुढच्या भागाची पेरणी वाटली
In reply to पुन्हा . कथा न वाटता पुढच्या by तुडतुडी
कथा मला तिथेचं संपवताही आली असती. पण दुसरी कथा ही पहिल्या कथेचा उत्तरार्ध असायची अपेक्षा असल्याने अश्या पद्धतीने लिहिली आहे. १०० शब्दामधे दोन्ही कथांचा आशय नंतर लिहिनचं. :)
+१
पुभाप्र
बादवे : भयकथा / गूढ कथा म्हणले की डोळे हिरवेच असले पाहीजे अशी अट आहे का? [ कृ ह घ्या]
In reply to +१ by gogglya
हया ह्या ह्या!! हो.
ह्म्म
+१ मायला डोचक्यात भुंगा नाचाय लागला
+१
+१
+१
अईईईईई!!!