Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] रात्र आरंभ (भाग-१)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 07/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकीबाहेर पडणारा मुसळधार पाउस, अंधारलेलं आकाश,घोंगावणारा वारा, ढगांचा गडगडाट आणि कडाडणार्‍या वीजा ह्याचं गोष्टी दोन दिवस तिच्या सोबतीला होत्या. दिवाणखाण्यामधल्या घड्याळाने रात्रीच्या अकराचे टोल दिले तशी ती एकदम दचकुन जागी झाली. तो अजुनही घरी परतलेला नव्हता. तिनी त्याला परत एकदा भ्रमणध्वनीवर संपर्क करायचा विफल प्रयत्न करुन पाहिला. तिने सहज बंगल्याचा पुढचा दरवाजा उघडुन बाहेर एक नजर टाकली, कोणीचं नं दिसल्याने ती उलटी फिरणार एवढ्यात लखकन वीज चमकली, तिची नजर बंगल्याच्या फाटकाकडे गेली. तो फाटकामधे उभा होता. त्याला ओळखुन पावसाची फिकिर नं करता ती त्याच्याकडे धावली. क्षणार्धात फाटक उघडुन त्याच्या मिठीमधे शिरली. परत कडाडलेल्या वीजेचा उजेड क्षणभर त्याच्या हिरव्याकंच डोळ्यांमधे चमकला.

वाचने 8700
प्रतिक्रिया 44

प्रतिक्रिया

अईईईईई!!! चिमणराव तुम्हीपण!!! +१११११११

In reply to by जडभरत

तिनी त्याला परत एकदा भ्रमणध्वनीवर संपर्क करायचा विफल प्रयत्न करुन पाहिला इथं फक्त तिने असं करा.

गूढ कथेच्या प्रांगणात स्वागत

जय कलगुटकर (100 days-villain) ची आठवण झाली!

+१

+१

zakkas

+१.

+1

बुवा भेटीके साईड इफेक्ट नावाचे पुस्तक लिहावे काय??? साशंक नाखुस पत्रेवाला

+१

+१ सिक्वेल च्या प्रतीक्षेत

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

पुढे?

http://www.sherv.net/cm/emoticons/horror/scary-skull-smiley-emoticon.gif

सुरुवात भारी झालीये. सिक्वेलची अपेक्षा .

In reply to by तुडतुडी

कथा मला तिथेचं संपवताही आली असती. पण दुसरी कथा ही पहिल्या कथेचा उत्तरार्ध असायची अपेक्षा असल्याने अश्या पद्धतीने लिहिली आहे. १०० शब्दामधे दोन्ही कथांचा आशय नंतर लिहिनचं. :)

बादवे : भयकथा / गूढ कथा म्हणले की डोळे हिरवेच असले पाहीजे अशी अट आहे का? [ कृ ह घ्या]

ह्म्म

+१

+१

+१