स्वतंत्र
अणु-रेणूंपासून ग्रह-ताऱ्यांपर्यंत
मुंगीपासून-देव माश्यापर्यंत
सगळेच बद्ध -
कुणी भौतिक
तर कुणी
निसर्गदत्त सहज-प्रेरणेच्या
आपापल्या कक्षेत.
एकटा माणूसच
या सगळ्याला अपवाद -
आपल्या अंतरीच्या अंधार-उजेडातून
ऊन-सावल्यांतून
भ्रमांच्या, दुविधांच्या, वंचनांच्या, चुकांच्या
नागमोडी वाटांनी भटकायला मोकळा
हेच आहे त्याचं ओझं
हीच आहे त्याची व्यथा
हाच आहे त्याचा गौरव
हीच आहे त्याची महत्ता
चपखल मांडणि आशयघन काव्य!
अर्थ खूप गहन आहे. माणसाची
सगळेच बद्ध आणि माणूस अपवाद
खरंच? तसं असेल तर गुंतागुंत
आवडली!
सर्वांचे आभार !
आवडली . मस्त . गहन अर्थ आहे