Skip to main content

स्वतंत्र

लेखक पथिक यांनी सोमवार, 27/07/2015 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
अणु-रेणूंपासून ग्रह-ताऱ्यांपर्यंत मुंगीपासून-देव माश्यापर्यंत सगळेच बद्ध - कुणी भौतिक तर कुणी निसर्गदत्त सहज-प्रेरणेच्या आपापल्या कक्षेत. एकटा माणूसच या सगळ्याला अपवाद - आपल्या अंतरीच्या अंधार-उजेडातून ऊन-सावल्यांतून भ्रमांच्या, दुविधांच्या, वंचनांच्या, चुकांच्या नागमोडी वाटांनी भटकायला मोकळा हेच आहे त्याचं ओझं हीच आहे त्याची व्यथा हाच आहे त्याचा गौरव हीच आहे त्याची महत्ता
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2297
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

सगळेच बद्ध आणि माणूस अपवाद ह्या गृहितकास छेद देणारी संशोधने समोर येत आहेत. तरी एक काव्य म्हणून छान आहे.