✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भारतरत्न अब्दुल कलाम

व
विकास यांनी
Mon, 07/27/2015 - 22:01  ·  लेख
लेख
APJ Kalam
भारतरत्न अब्दुल कलाम हे अधुनिक भारतातले एक विरळ आणि सुखद उदाहरण आहे. एक संशोधक जो नंतर राष्ट्रपती झाल्याने राजकारणी म्हणता येईल अशी ही व्यक्ती जी तरी देखील जनसामान्यात लोकप्रिय झाली. कलामांची वाक्ये सुविचार म्हणून आजही जालावर फिरत असतात. आणि ती त्यांची आहेत म्हणून लोकांना प्रेरणा घ्यावीशी वाटते, यात बरेच काही आले. आज भारतात विशेषतः महाराष्ट्रात तमाम जनता आषाढी पाळत आहे आणि विठ्ठलाचे दर्शन घेत आहे. त्यामुळे आज परत एकदा "विठ्ठलाच्या पायी थरारली वीट" ह्या ओळी आठवल्या शिवाय राहवत नाहीत... कलामांना विनम्र श्रद्धांजली!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिक्रिया
बातमी

प्रतिक्रिया द्या
16608 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

श्रद्धांजली

_मनश्री_
Mon, 07/27/2015 - 22:03 नवीन
वाईट बातमी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली !!
  • Log in or register to post comments

डॉ.अब्दुल कलाम आणि नाडीग्रंथ

शशिकांत ओक
Mon, 07/27/2015 - 23:51 नवीन
डॉ. कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सन 2007साली ते पुण्यात हवाईदलातील SU 30 विमानात बसून चालवायला आले असताना त्याच्या उत्साही स्वभावाला उद्धेशून मी एक पत्र पाठवले होते. मला त्याची पोच जरूर मिळाली. परंतु त्यानंतर त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटायची संधी मिळाली नाही. मी त्यांना नाडीग्रंथांवर भाषेच्या अंगाने शोधकार्य करायला आपण विश्वविद्यालयांना सुचवावे अशी ती विनंती होती. त्यांच्या मूकसंमती मुळे ते नंतर प्रत्यक्षात घडलेही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

कवी जगदीश ओहोळांची काव्यमय श्रद्धांजली.

शशिकांत ओक
Tue, 07/28/2015 - 23:56 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

कवी जगदीश ओहोळांची काव्यमय श्रद्धांजली.

शशिकांत ओक
Tue, 07/28/2015 - 23:56 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

कवी जगदीश ओहोळांची काव्यमय श्रद्धांजली.

शशिकांत ओक
Tue, 07/28/2015 - 23:57 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

कवी जगदीश ओहोळांची काव्यमय श्रद्धांजली.

शशिकांत ओक
Wed, 07/29/2015 - 00:11 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

श्रद्धांजली.

शशिकांत ओक
Wed, 07/29/2015 - 00:13 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

विनम्र श्रद्धांजली.

पद्मावति
Mon, 07/27/2015 - 22:04 नवीन
आत्ताच न्यूज़ वाचली.
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली

श्रीरंग_जोशी
Mon, 07/27/2015 - 22:06 नवीन
अत्यंत दु:खद बातमी. डॉ. कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली. डॉ. कलाम आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे आवडते कार्य करत होते. शिलाँग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये व्याख्यान देत असताना ते अचानक कोसळले. त्यांचे विचार अन कार्य नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहतील.
  • Log in or register to post comments

विनम्र श्रद्धांजली

पैसा
Mon, 07/27/2015 - 22:13 नवीन
विद्यार्थ्यांच्यामधे असताना, भावी पिढीला काही अमूल्य मार्गदर्शन करत असताना हे घडले. या अजातशत्रु व्यक्तिमत्वाने मृत्यूलाही जिंकले असे म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments

विठ्ठलाच्या पायी थरारली वीट

अर्धवटराव
Mon, 07/27/2015 - 22:22 नवीन
:( कलाम सरांना विनम्र श्रद्धांजली. अतीव आदराने नतमस्तक असं व्यक्तीमत्व.
  • Log in or register to post comments

एक आठवण

आतिवास
Mon, 07/27/2015 - 22:24 नवीन
२००४-२००५ मध्ये कधीतरी 'इंडिया २०२०' वाचून एपीजेंना एक पत्र लिहिलं. वेबसाईटवरून पत्ता शोधून ते पोस्ट केलं. राष्ट्रपतींनी दखल घेणं सोडा; ते त्यांच्यापर्यंत पोचणारही नाही याची मला खात्री होती. महिनाभराने दिल्लीतून एक पत्र आलं. खुद्द एपीजेंनी उत्तर दिलं होतं. ती फक्त पोच नव्हती, तर मी नोंदवलेल्या आक्षेपांना त्यांनी सौम्य भाषेत, भिन्न मताचा आदर राखत उत्तर दिलं होतं. माझ्यासारख्या एका सर्वसामान्य नागरिकाला त्यांनी दिलेली वागणूक माझ्यासाठी 'बेंचमार्क' आहे - नेहमीच राहील.
  • Log in or register to post comments

___/\___

प्यारे१
Mon, 07/27/2015 - 22:30 नवीन
___/\___ भावपूर्ण श्रद्धांजलि. अशा प्रसंगी घरातलं कुणीतरी गेल्याची भावना क्वचितच असते ती आज आहे.
  • Log in or register to post comments

सहमत

अमृत
Tue, 07/28/2015 - 08:47 नवीन
घरातील कुणीतरी गेल्याची भावना. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

विनम्र श्रद्धांजली.

जुइ
Mon, 07/27/2015 - 22:39 नवीन
त्यांचा शेवट देखिल मार्गदर्शन करताना झाला. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.
  • Log in or register to post comments

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.

भीमराव
Mon, 07/27/2015 - 23:04 नवीन
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. कलाम सरांना भावपुर्ण श्रद्धांजली. प्यारे खरच कोणतरी जवळचे आज आपल्यामधे नाही हिच भावना सर्वांच्या मनात आहे.
  • Log in or register to post comments

कलामसाहेबांना विनम्र

जडभरत
Mon, 07/27/2015 - 23:10 नवीन
कलामसाहेबांना विनम्र श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

मनातून खूप रूखरूख लागलेय.

किसन शिंदे
Mon, 07/27/2015 - 23:15 नवीन
मनातून खूप रूखरूख लागलेय. माझ्या आवडत्या व्यक्तींपैकी एक! कलाम साहेबांना श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

अतुलनीय शास्त्रज्ञ,

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/27/2015 - 23:20 नवीन
अतुलनीय शास्त्रज्ञ, राष्ट्रपती, शिक्षक आणि माणूस यांचे मिश्रण असलेले अनन्य व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही. :( एका आदर्श शिक्षकाने त्याचा शेवटचा श्वास विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच घेतला. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ अब्दुल कलाम यांना विनम्र श्रद्धांजली.

Image removed.

  • Log in or register to post comments

विनम्र श्रद्धांजली.

रातराणी
Mon, 07/27/2015 - 23:23 नवीन
विनम्र श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

माजी राष्ट्रपती,अब्दुल कलम

भिंगरी
Mon, 07/27/2015 - 23:24 नवीन
माजी राष्ट्रपती,अब्दुल कलम यांना भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली.

स्रुजा
Mon, 07/27/2015 - 23:26 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली. शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहीले.
  • Log in or register to post comments

'मरावे परी किर्तीरुपी उरावे' ह्या उक्तिचे मुर्तीमंत उदाहरण..

विनोद१८
Mon, 07/27/2015 - 23:26 नवीन
असलेले व आयुष्याच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यन्त कार्यरत असलेल्या......
'डॉ. अब्दुल जे. कलाम यांना विनम्र व भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळो व चिरशांती लाभो.'
  • Log in or register to post comments

फार वाईट झाले.

रेवती
Mon, 07/27/2015 - 23:30 नवीन
फार वाईट झाले. मा. कलामांना विनम्र श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

__/\__

राघव
Mon, 07/27/2015 - 23:40 नवीन
अत्यंत दु:खद बातमी. :-( विनम्र श्रद्धांजली..
  • Log in or register to post comments

_/\_

एस
Mon, 07/27/2015 - 23:40 नवीन
श्रद्धांजलीला शब्दही अपुरे पडावेत अशी मोजकीच माणसे जगात होऊन जातात... कलामसर त्यांपैकी एक.
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजलि!ईश्वर

मन्या सज्जना
Mon, 07/27/2015 - 23:45 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजलि!ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो!
  • Log in or register to post comments

:(

काळा पहाड
Mon, 07/27/2015 - 23:56 नवीन
:(
  • Log in or register to post comments

भारताचे मिसाईल मॅन ए पी जे

संदीप डांगे
Tue, 07/28/2015 - 00:19 नवीन
भारताचे मिसाईल मॅन ए पी जे अब्दुल कलाम यांना मनापासून एक कडक सॅल्यूट आणि अश्रुपूर्ण श्रद्धांजली. सामर्थ्यशाली भारताचे स्वप्न पाहणारे आणि प्रत्यक्षात आणण्यासाठी आपले आयुष्य झोकून देणारे फार कमीच. त्यात अग्रक्रमाने अब्दुल कलाम यांचे नाव आहे. आज जगात भारतीयांना मानाने नजर वर करून बोलता येते यामागे या माणसाचे कठोर श्रम कारणीभूत आहेत. माणूस गेला तरी त्याने केलेले काम मागे राहते याचे साक्षात उदाहरण अब्दुल कलाम यांनी घालून दिले आहे. फक्त क्षेपणास्त्रच नाही तर जीवनाच्या इतर अंगांमधेही संशोधक वृत्ती दाखवून यांनी तिथेही काही शोध लावलेत. त्यांच्या दूरदृष्टी आणि समर्पणाचे उदाहरण म्हणून भारत २०२० या प्रकल्पाचे देता येईल. जेवढी मेहनत त्यांनी या प्रकल्पासाठी घेतली त्याच्या १ टक्का तरी भारतातल्या सगळ्या तरूणांनी ते पुस्तक अभ्यासण्यासाठी घेतली असती तर त्यांच्या हयातीतच त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान त्यांना मिळाले असते. भारतीयांकडून फक्त याच एका भेटीची अपेक्षा प्राण सोडतांना त्यांना राहीली असावी.
  • Log in or register to post comments

अतिशय दु:खद बातमी!

चतुरंग
Tue, 07/28/2015 - 00:27 नवीन
एका अतिशय गरीब आणि सर्वसामान्य घरातून आलेला माणूस किती मोठी पदे भूषवू शकतो, इतकेच नव्हे तर त्या पदांना स्वतःच्या अनन्य व्यक्तिमत्त्वाने वेगळी झळाळी प्रदान करतो आणि तरीदेखील सर्वसामान्य नागरिकाला ती व्यक्ती आपल्यातली वाटत राहते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे एपीजे अब्दुल कलाम. त्यांचे संपूर्ण आयुष्य, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत, मार्गदर्शक म्हणावे लागेल. मा. कलामांना विनम्र श्रद्धांजली. (या प्रसंगाने मला माझ्या मामाची आठवण झाली ज्याला कलामांचा भरपूर सहवास मिळाला होता, त्यांनी एकत्र कामही केलेले होते. त्याच्या प्रथम स्मृतिदिनी एक लेख लिहिला होता त्याचा दुवा - http://www.misalpav.com/node/7972 आज दोघेही या जगात नाहीत. :( ) -(साश्रु)चतुरंग
  • Log in or register to post comments

भावपुर्ण श्रद्धांजली!

मधुरा देशपांडे
Tue, 07/28/2015 - 01:36 नवीन
भावपुर्ण श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments

विनम्र श्रद्धांजली .

अरुण मनोहर
Tue, 07/28/2015 - 04:46 नवीन
देशाला अभिमान असावा असा एक थोर भारतीय आज आपल्याला सोडून गेला. त्यांच्या महान कार्याचा दिपस्तंभ सतत आपल्याला मार्गदर्शन करीत राहो !
  • Log in or register to post comments

विनम्र श्रद्धांजली..

चिगो
Tue, 07/28/2015 - 05:42 नवीन
डॉ. कलामांना विनम्र श्रद्धांजली..
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली !

उगा काहितरीच
Tue, 07/28/2015 - 05:52 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली !
  • Log in or register to post comments

एका उत्तुंग व्यक्तिमत्वाला

प्रचेतस
Tue, 07/28/2015 - 06:32 नवीन
एका उत्तुंग व्यक्तिमत्वाला भावपूर्ण आदरांजली.
  • Log in or register to post comments

आदरांजली!

बोका-ए-आझम
Tue, 07/28/2015 - 07:00 नवीन
जो गेला तो एपीजे अब्दुल कलाम नावाचा देह. त्यांचे विचार अजरामर आहेत आणि राहतील. डाॅ.कलाम यांना आदरांजली!
  • Log in or register to post comments

हाडाचा शिक्षक विद्यादान

अजया
Tue, 07/28/2015 - 07:04 नवीन
हाडाचा शिक्षक विद्यादान करतानाच गेला. ऋषितुल्य आदरणीय डाॅ कलामांना भावपूर्ण श्रध्दांजली. Image removed.
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली.

यशोधरा
Tue, 07/28/2015 - 08:04 नवीन
:(
  • Log in or register to post comments

.

dadadarekar
Tue, 07/28/2015 - 08:12 नवीन
श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

डाॅ.कलाम यांना भावपूर्ण

अमित मुंबईचा
Tue, 07/28/2015 - 08:55 नवीन
डाॅ.कलाम यांना भावपूर्ण आदरांजली
  • Log in or register to post comments

..

ब़जरबट्टू
Tue, 07/28/2015 - 08:59 नवीन
श्रद्धांजली !
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली !

नाखु
Tue, 07/28/2015 - 09:08 नवीन
अधुनिक विज्ञान ऋषी ही संज्ञा सार्थ करणारा एक सच्चा देशसेवक !!! नतमस्तक नाखु
  • Log in or register to post comments

डाॅ.कलाम यांना भावपूर्ण

कविता१९७८
Tue, 07/28/2015 - 09:21 नवीन
डाॅ.कलाम यांना भावपूर्ण आदरांजली
  • Log in or register to post comments

निस्वार्थी मनाने देशसेवेच्या

सनईचौघडा
Tue, 07/28/2015 - 09:23 नवीन
निस्वार्थी मनाने देशसेवेच्या कार्यास वाहुन घेणारे थोर व्यक्तिमत्व आदरणीय श्री. कलाम साहेब यांना विनम्र श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

मनातील आवडत्या व्यक्तींपैकी एक!

प्रदीप@१२३
Tue, 07/28/2015 - 09:24 नवीन
डाॅ.कलाम यांना भावपूर्ण आदरांजली
  • Log in or register to post comments

ऋषीतुल्य व्यक्तीमत्वास

चिनार
Tue, 07/28/2015 - 09:36 नवीन
ऋषीतुल्य व्यक्तीमत्वास भावपूर्ण आदरांजली
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 07/28/2015 - 09:36 नवीन
आकाशाला गवसणी घालणार आभाळाएवढा माणूस. डाॅ. अब्दुल कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली पैजारबुवा
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

विवेक्पूजा
Tue, 07/28/2015 - 10:11 नवीन
श्रद्धांजली :(
  • Log in or register to post comments

भावपुर्ण श्रद्धांजली. आदर

मृत्युन्जय
Tue, 07/28/2015 - 10:57 नवीन
भावपुर्ण श्रद्धांजली. आदर वाटावीत अशी व्यक्तिमत्वे देशातुन कमी होत चालली आहेत.
  • Log in or register to post comments

विनम्र श्रद्धांजली

मित्रहो
Tue, 07/28/2015 - 11:04 नवीन
जेथे कर माझे जुळती म्हणावे असे एक व्यक्तीमत्व आज हरवले.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा