Skip to main content

फिल्म इन्स्टिट्यूटचा पेच

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 07/07/2015 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पुण्यातली संस्था सध्या गाजते आहे ती तिथल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे. नवे अध्यक्ष आल्यानंतर त्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरु आहे. या अध्यक्षांनी अजून कामाला सुरुवातही केलेली नाही. तोवर या आंदोलनाला सुरुवात झाली. का तर अमुक तमुक प्रकारचा अध्यक्ष आम्हाला नको. प्रश्न हा आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की आपला वर्ग(शिक्षणाचे ठिकाण) सोडून वर्गाबाहेर आंदोलने करायची ? वास्तविक या विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती कुठल्यातरी धरणे, आंदोलने यामधून नव्हे तर त्यांच्या कलाकृतीमधून दिसून यावी ही देशाची अपेक्षा आहे. आजच्या अध्यक्षांबाबत काही मुद्दे पुढे केले जात असले तरी यापूर्वी अत्यंत नामवंत चित्रकर्मींनाही विद्यार्थ्यांनी काम करणे अशक्य करून सोडले होते. त्यामुळे त्यांना आपला कार्यकाल पूर्ण करता आला नव्हता. सध्या एक मुद्दा चर्चेत आहे राजकीय पार्श्वभूमी. पण इथे अध्यापक म्हणून काम केलेल्या सईद मिर्झा यांनी तर मोदी पंतप्रधान बनू नयेत यासाठी सह्यांची मोहीम घेतली होती. हे सारे पाहता असे दिसते की अलिकडच्या सत्ताबदलामुळे अनेक छावण्यांमधे अस्वस्थता दाटून आलेली आहे. त्यामुळे आजही आपली उपद्रव क्षमता कमी झालेली नाही हे दाखवण्याचाही या छावण्यांचा प्रयत्न असावा, असा एक अंदाज आहे. सुरुवातीला येथील आंदोलकांनी आमच्या मागे कोणताही पक्ष, कोणताही गट नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना जे एन यू मधून पाठिंबा मिळाल्यावर मात्र हे आंदोलन कुठल्या गटाचे आहे हे स्पष्ट व्हायला लागले आहे. .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 30097
प्रतिक्रिया 214

प्रतिक्रिया

फिल्म इन्स्टिट्यूट यापूर्वीही गाजत होते ते कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या वावरामुळे. कबीर कला मंच

२००८ सालच्या अभ्यासक्रमांमधील विद्यार्थी होस्टेल मध्ये जागा बळकावून बसले आहेत कारण त्यांचे प्रोजेक्ट अपुरे आहेत ह्याचे खापर संस्थेच्या गलथान कारभारावर फोडून ते मोकळे झाले , म्हणजे आधीच्या कर्तुत्ववान अध्यक्षांच्या राज्यात संस्थेची ही दशा ह्या संस्थेची माजी विद्यार्थिनी जया ह्या प्रकरणी सूचक मौन बाळगून आहे

‘एफटीआयआय’मधून गजेंद्र चौहानांना नारळ! भाजप व संघ परिवाराशी असलेल्या संबंधांमुळे त्यांना एफटीआयआयमध्ये बसविल्याचा विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने आरोप होता. चौहान यांच्याव्यतिरिक्त संघ परिवाराशी संबंधित असलेल्या अनघा घैसास, नरेंद्र पाठक, राहुल सोलापूरकर, शैलेश गुप्ता आदींच्याही नियुक्त्यांना आक्षेप घेतला गेला. त्याची परिणती प्रदीर्घ; पण िहसक आंदोलनात झाली. दिल्लीतही त्याचे पडसाद उमटले. संसदेमध्ये गदारोळ झाला. आक्रमक विद्यार्थ्यांनी संस्थेला वेठीस धरले. संस्थेचे तत्कालीन संचालक प्रशांत पाठराबे यांना रात्रभर खोलीत कोंडले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीचा मुद्दा गाजला.