डोकं ज्याम भणाणून गेलंय . काहीच सुचत नाहीय . पेट्रोलपण संपत आलंय . येताना भरु . सिग्नलपाशी ८० ccवर लोवेस्ट पुढे जायचं ट्राय करतेय . इतर वेळी ऐश वाटली असती पण आज राग येतोय ,च्यायला बुलेटशी स्पर्धा करते? जी झुम्मकन काढली . तिने घाबरून ब्रेकच मारला . आज ऑफिसात पण काय खरं नाय . पीएल उलटसुलट बोलला तर आपलं नक्की वाजणार . दुसरा सिग्नल . पण काहीतरी सुचायलाच हवं . १०० च टार्गेट आहे . १०, ९, यावेळी ५० तरी रिप्लाय हवेत . ६, ५, चला. सुटुया …. झू …… क्रीश्श आई ………………………
..
..
..
..
..
जाग आली ती हॉस्पिटलात . सर्व अंगच प्लास्टरमध्ये गुंडाळलेलं . एकदम ट्यूब पेटली . कसाबसा एका हाताने बाजूचा मोबाइल घेतला नि टंकू लागलो , "डोकं ज्याम भणाणून गेलंय …"
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2280
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
मजेशीर कथा आहे!!!
या शतशब्दकथेची प्रेरणा तो
+१
In reply to या शतशब्दकथेची प्रेरणा तो by खटपट्या
कथा छान आहे !
सहमत
In reply to कथा छान आहे ! by डॉ सुहास म्हात्रे
हं हे मात्र खरे डाॅक!!!
In reply to कथा छान आहे ! by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to हं हे मात्र खरे डाॅक!!! by जडभरत
आवडली कथा.
छान आहे की !
हा हा: मोबाईल प्लास्टर मध्ये
धन्यवाद!
हा हा! सुपारी द्यायची ना 50ची
झकास . च्या मारी . हास्पिटलात