Skip to main content

शतशब्दकथा

लेखक चुकलामाकला यांनी रविवार, 26/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
डोकं ज्याम भणाणून गेलंय . काहीच सुचत नाहीय . पेट्रोलपण संपत आलंय . येताना भरु . सिग्नलपाशी ८० ccवर लोवेस्ट पुढे जायचं ट्राय करतेय . इतर वेळी ऐश वाटली असती पण आज राग येतोय ,च्यायला बुलेटशी स्पर्धा करते? जी झुम्मकन काढली . तिने घाबरून ब्रेकच मारला . आज ऑफिसात पण काय खरं नाय . पीएल उलटसुलट बोलला तर आपलं नक्की वाजणार . दुसरा सिग्नल . पण काहीतरी सुचायलाच हवं . १०० च टार्गेट आहे . १०, ९, यावेळी ५० तरी रिप्लाय हवेत . ६, ५, चला. सुटुया …. झू …… क्रीश्श आई ……………………… .. .. .. .. .. जाग आली ती हॉस्पिटलात . सर्व अंगच प्लास्टरमध्ये गुंडाळलेलं . एकदम ट्यूब पेटली . कसाबसा एका हाताने बाजूचा मोबाइल घेतला नि टंकू लागलो , "डोकं ज्याम भणाणून गेलंय …"
लेखनविषय:

वाचने 2280
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

मस्त आवडली. ही सत्यकथा नसल्यास ......"उत्तम"

कथा छान आहे ! कुणी त्यापासून बोध घेतला तर बरे... अन्यथा बोधपर कथा, विनोद, हसण्यावर नेण्याची प्रथा पडली आहे :( स्वतःचा हात-पाय हॉस्पीटलमध्ये टांगला गेल्याशिवाय सुबुद्धी सुचू शकत नाही इतक्या स्तरावर बुद्धी का पोचली हा प्रश्न पडावा असेच वाहतूकीकडे पाहून वाटत राहते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बोधकथा म्हणून आवडली. डॉ सुहास यांच्या मताशी सहमत.

In reply to by जडभरत

फास्ट "फॉरवर्डच्या" जमान्यात कसल्या अपेक्षा करता डॉक तुम्ही सुद्धा !!!!! टिंबक टू नाखु