Skip to main content

शतशब्दकथा

लेखक चुकलामाकला यांनी रविवार, 26/07/2015 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
डोकं ज्याम भणाणून गेलंय . काहीच सुचत नाहीय . पेट्रोलपण संपत आलंय . येताना भरु . सिग्नलपाशी ८० ccवर लोवेस्ट पुढे जायचं ट्राय करतेय . इतर वेळी ऐश वाटली असती पण आज राग येतोय ,च्यायला बुलेटशी स्पर्धा करते? जी झुम्मकन काढली . तिने घाबरून ब्रेकच मारला . आज ऑफिसात पण काय खरं नाय . पीएल उलटसुलट बोलला तर आपलं नक्की वाजणार . दुसरा सिग्नल . पण काहीतरी सुचायलाच हवं . १०० च टार्गेट आहे . १०, ९, यावेळी ५० तरी रिप्लाय हवेत . ६, ५, चला. सुटुया …. झू …… क्रीश्श आई ……………………… .. .. .. .. .. जाग आली ती हॉस्पिटलात . सर्व अंगच प्लास्टरमध्ये गुंडाळलेलं . एकदम ट्यूब पेटली . कसाबसा एका हाताने बाजूचा मोबाइल घेतला नि टंकू लागलो , "डोकं ज्याम भणाणून गेलंय …"
लेखनविषय:

वाचने 2302
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

कथा छान आहे ! कुणी त्यापासून बोध घेतला तर बरे... अन्यथा बोधपर कथा, विनोद, हसण्यावर नेण्याची प्रथा पडली आहे :( स्वतःचा हात-पाय हॉस्पीटलमध्ये टांगला गेल्याशिवाय सुबुद्धी सुचू शकत नाही इतक्या स्तरावर बुद्धी का पोचली हा प्रश्न पडावा असेच वाहतूकीकडे पाहून वाटत राहते.