✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शुष्क

व — विशाल कुलकर्णी, Sun, 07/26/2015 - 20:32
आयुष्य ना सुखांचे अंधार दाट होता बुद्धयाच वेदनांशी श्रृंगार थाटलेला झाली उजाड़ स्वप्ने, सत्यास दंभ होता चातुर्य प्राक्तनाचे कळलेच ना कदापी रक्तास चटक ओल्या लागून आज गेली जखमाच त्या, तयांशी, संसार थाटलेला अस्तित्व जाणिवांचे उधळून रात्र गेली त्यां टाळणे मलाही जमलेच ना कदापी होता तसाच आहे ओसाड माळ तिथला पान्हा वसुंधरेचा वक्षात गोठलेला मी रान शुष्क होतो पाऊस स्तब्ध तिथला गोंजारणे फुलांना रुचलेच ना कदापी झाडांस कोरडेपण जेव्हा असह्य झाले तो कोंब पालवीचा बुंध्यात आटलेला तो बहर जून होता फसवेच गंध झाले ते श्वास पाळणेही पटलेच ना कदापी विशाल कुलकर्णी

प्रतिक्रिया द्या
4336 वाचन

💬 प्रतिसाद (20)

Classssssss

एक एकटा एकटाच
Sun, 07/26/2015 - 20:40 नवीन
Classssssss
  • Log in or register to post comments

वाह! फक्त

दमामि
Sun, 07/26/2015 - 20:49 नवीन
वाह! फक्त तो बहर बेगडी होता फसवेच गंध झाले यातील होता काढून अन् केले तर? चुभूद्याघ्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद दमामि ! आधी तिथे 'अन्

विशाल कुलकर्णी
Mon, 07/27/2015 - 10:33 नवीन
धन्यवाद दमामि ! आधी तिथे 'अन्' हाच शब्द वापरला होता मी, पण एकतर त्यामुळे वृत्तभंग होतोय. आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे त्या ओळीतून जो परिणाम साधला जायला हवाय तो धुसर होतोय. "बेगडी अन् फसवे" असे म्हणताना बेगडी आणि फसव्या या दोन्ही शब्दांचा परिणाम, (इन्टेसिटी म्हणू हवे तर) कमी होतेय. विभागली जातेय. मला त्या दोन्ही भावना ठळकपणे यायला हव्या आहेत पण वाक्यही तोडायचे नाहीये. म्हणून मग 'होता'. 'होता' हे क्रियापद असल्याने या ओळीतले पहिले वाक्य, पहिले विधान तिथे संपते आणि त्याचबरोबर दुसरे विधानही अधोरेखीत होते. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

हि कविता आनंदकंद वृत्तातली

विशाल कुलकर्णी
Mon, 07/27/2015 - 10:37 नवीन
हि कविता आनंदकंद वृत्तातली आहे. लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

सॉरी दमामि शेठ, तुम्हीच बरोबर

विशाल कुलकर्णी
Mon, 07/27/2015 - 19:36 नवीन
सॉरी दमामि शेठ, तुम्हीच बरोबर होता.माझीच रचना चुकीची होती. या ओळीतच वृत्तभंग होतोय. तुम्ही म्हणाल्या प्रमाणे "तो बहर बेगडी अन् ,फसवेच गंध झाले" हेच योग्य होईल. प्रतिवाद केल्याबद्दल क्षमस्व आणि चूक लक्षात आणून दिल्याबद्दल खुप खुप आभार _/!\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

किंवा अन च्या ऐवजी "तो बहर

विशाल कुलकर्णी
Mon, 07/27/2015 - 20:01 नवीन
किंवा अन च्या ऐवजी "तो बहर जून होता, फसवेच गंध झाले" हे जास्त सुट होइल असे वाटतेय. 'अन्'तांत्रिक दृष्टया जरी योग्य असला तरी त्याने सौंदर्याला बाधा येतेय. संपादक मंडळी, कृपया मुळ कवितेत हां बदल करणार का? "तो बहर जून होता, फसवेच गंध झाले" . धन्यवाद .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

खूप सुंदर! अंतरास छळणार्या

जडभरत
Sun, 07/26/2015 - 22:38 नवीन
खूप सुंदर! अंतरास छळणार्या दुःखांनाच शब्दरूप दिलेत. मानवी दुःखांचं बायबलच!!! तुम्हाला माहिते तीव्र दुःखांची सुद्धा एक वेगळीच मादक नशा असते. तसाच अनुभव आला वाचताना! मस्त!!!
  • Log in or register to post comments

A1

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/26/2015 - 23:27 नवीन
A1
  • Log in or register to post comments

वाह! विशालभो मस्त. थोडं

प्यारे१
Sun, 07/26/2015 - 23:27 नवीन
वाह! विशालभो मस्त. थोडं अडखळायला झालं फ़क्त
  • Log in or register to post comments

अप्रतिम कविता.

प्रचेतस
Mon, 07/27/2015 - 09:11 नवीन
अप्रतिम कविता.
  • Log in or register to post comments

मस्त कविता!!!

प्रीत-मोहर
Mon, 07/27/2015 - 09:47 नवीन
मस्त कविता!!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद मंडळी !

विशाल कुलकर्णी
Mon, 07/27/2015 - 10:33 नवीन
धन्यवाद मंडळी !
  • Log in or register to post comments

व्वा! हे अशक्य सुंदर लिहलयस

रातराणी
Mon, 07/27/2015 - 11:47 नवीन
व्वा! हे अशक्य सुंदर लिहलयस विशालदा. _/\_
  • Log in or register to post comments

धन्यवाद रातराणी :)

विशाल कुलकर्णी
Mon, 07/27/2015 - 12:57 नवीन
धन्यवाद रातराणी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

सुंदर कविता आवडली.

विवेकपटाईत
Mon, 07/27/2015 - 19:37 नवीन
सुंदर कविता आवडली.
  • Log in or register to post comments

खूप दिवसांनी वाचली तुझी रचना.

राघव
Tue, 08/11/2015 - 17:59 नवीन
खूप दिवसांनी वाचली तुझी रचना. अर्थातच आवडली! अवांतरः हक्कानं काही सांगू का? ते वृत्त वगैरे बघून रचना करू नकोस रे. तुझ्या कल्पना खरंच छान असतात. पण उगाच वृत्त/छंद/अलंकार यांच्या भानगडीत न पडता, त्या कल्पनांना सहज सोप्या भाषेत उकलत जाणं हे जास्त महत्त्वाचं, असं मला वाटतं. As someone has said it, Simplicity is the most Complicated thing to achieve. जे रचनाकाराला अभिप्रेत ते तसंच आणि सहजपणे वाचक/श्रोत्यांना समजणं हे रचनेचं साध्य असायला हवं. एकदा ते साधलं की बाकी सर्व गौण ठरतं. अर्थात् वृत्त/छंद/अलंकार कधी वापरूच नयेत असं मी म्हणत नाही. पण ते सहजगत्या यावं.. कळी उमलते तितकं सहज आणि स्वाभाविक असावं इतकंच म्हणायचं आहे. चु.भू.द्या.घ्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद राघव !

विशाल कुलकर्णी
Wed, 08/12/2015 - 15:21 नवीन
धन्यवाद राघव ! नक्कीच प्रयत्न करेन. तसेही मलातरी कुठे आवडते कुठल्या बंधनात बांधून घ्यायला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

अप्रतिम कविता!

पैसा
Tue, 08/11/2015 - 20:38 नवीन
अप्रतिम कविता!
  • Log in or register to post comments

दर्जेदार

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 08/11/2015 - 21:35 नवीन
दर्जेदार रचना
  • Log in or register to post comments

जबरी रे!!!

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 08/12/2015 - 20:02 नवीन
जबरी रे!!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा