नमस्कार मिपाकर. इथल्या शतशतशब्द कथा वाचून मला पण काही लिहावसं वाटलं.
त्यात त्रिशतशब्दकथा असा प्रयोग केलाय. व्याकरणाच्या चुकाबद्दल क्षमस्व.
पहिल्या लेखनाचे स्वागत कराल अशी अपेक्षा.
________________________________________________________________________
ह्यालो
बोल ग हिरॉईन
आयक की रव्या. मला कनाय राव्हल्या भेटला होता.
तूच बोंबलत गेली आसचील. आता म्या नाहीना गावात. काय भरोसा नाय तुझा.
हा. तू लै शिटीत सवळाच राह्यलास जनू. मी हाय म्हनून नायतर छप्पन्न फिरतेत माझ्यमागं.
हा म्हैते लै फेरनलवलीची औलाद.
ते जौ दे. पह्यले मला सांग किती मरतोस माझ्यावर?
म्या व्हय? समज बत्तीस जीबी तर आसंन. राव्हल्या काय केला ते सांग ऊंडगे आदी.
तेचाकडं कनाय तसला आंडराड मोबाईल हाय. फोटो पाटिवता येतेत मन.
मग?
मग काय. म्या नीट्ट सांगितलं. जेचं माज्यावर सच्चं प्रेम तोच घिऊन दील मला आसला फोन.
लै नीच हायस ग टवळे. नेक्स्ट टैम आनतो.
________________________________________________________________________
ह्यालो ह्यालो
बोल की आये. एकतर मिस्कॉल करतीस आन कॉल केल्यावर बोलाया काय हुतय.
आरं रव्या आयक की.
आता म्होरं बोलतीस का ठिवू फोन. मला हापिसाला जायचय.
जाशील रं बाळा पण आयक की. ह्ये तुझा बाप काय सुदरंना बग.
आता काय केलं? आन ह्यो नंबर कुनाचाय?
तेच रं. काल पिऊन कुठं उलथला की दारुपायी इकून आला मोबाईल देव जाणं.
मग?
तसं नव्हं र बाळा. आता म्होरल्या टायमाला येतुयास न तवा एखांदा आण की डबडा. सादा का आसना पण आण.
आये हितं शेहरात लै खर्च आसतेत ग. पुरत नाह्यती माझं मला आन तुम्चं आसलं कायतर. बगू बगू करतो कायतर.
________________________________________________________________________
ह्यलो रव्या
बोलो ना सेठ
रव्या भाडखाव कामाचं बग आधी. कुठं खपलास तीन दिवस?
नाय ना सेठ. हितच हाय ना मंडईत.
फुकन्या तितं काय बी मिलनार नाय. स्टेसनवर जा सीधा.
पण सेठ दोन पीस तर काढलेत की हितं.
अब्बे मी काय बोलतो सुन. तस्ले पीस कोन बी घेत नैत आता. कस्टमरको अँड्रोईड मंगता.
पण सेठ पोलीसमामूचं बी भ्या वाटतं.
तो पैले माझे उचल परत कर. तेरेसे ज्यादा रिस्क मै ऊठाता इदर.
नाय नाय सेठ. जातो स्टेशनवर.
हा. और सुन. कमसेकम चार पीस होना मेरेको नये बडेवाले. नई तो सीधा रास्ता मालूम है तेरेको.
हा सेठ. आनतो अँड्रोईडच. करतो कायतर आता.
________________________________________________________________________
वाचने
8861
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरी कथा. वेगळ्याच धर्तीची.
आयला काय है काय है? फुल टू
हा म्हैते लै फेरनलवलीची औलाद.
आंडराड मोबाईल
कथा आणि त्यापेक्षा दणदणीत
+१
In reply to कथा आणि त्यापेक्षा दणदणीत by सस्नेह
ज ह ब ह रा ह ट
हाहाहा!
मस्त !
हाइ ट्येकच !
खुप आवडली. जबरदस्त कॉन्सेप्ट
खुप आवडली.
मजा आली वाचायला.
जबराट....
जबरीही!
क्या बात है ! आवडली वेगळी कथा
मस्त आहे
लेखन आवडले .
छान जमलय. अजुन येउ देत
लै भारी लिवलंय !
मस्त!
मस्त लिहिल्यात तीनही कथा
खूप आवडली
+१
In reply to खूप आवडली by श्रीरंग_जोशी
मस्तच!
मस्त !
वाह! मस्तच!
अगागागा !! ज ब री ही !! काय
मस्तच!
आवडलं
मस्त जमलीय. अजुन येऊ द्यात.
लय भारी . लिवा अजून
वा!!
वा वा!
अगदी अगदी.
In reply to वा वा! by तिमा
कथा आवडली.
१ नंबर
आवडलीच. दम हाय भौ! बत्तीस
त्रैराशीकाचा प्रयोग चांगला
बेस्ट! १०/१०
आणि हो. १राहिलं. नागेश
In reply to बेस्ट! १०/१० by अत्रुप्त आत्मा
१ नंबर
प्रयोग आवडला. जमलाय. शशक
मस्त जमलंय त्रिराशिक..
असं काय्तरी पायजेल... तीनच
धन्यवाद
तुमची त्रैराशीक मांडण्याची
त्रैराशीक कथा
नावासकट सगळ कंटेट आवडल्यालं
मस्त!
जबराट कथा! लिहीत रहा बे
वा वा......
मस्त!
जबरी...
भारी
खूप आवडलं हे! __/\__ लिहीत
जबऱ्या कथा
लोकांनी सिक्वेल मागितला तर
.