नमस्कार मिपाकर. इथल्या शतशतशब्द कथा वाचून मला पण काही लिहावसं वाटलं.
त्यात त्रिशतशब्दकथा असा प्रयोग केलाय. व्याकरणाच्या चुकाबद्दल क्षमस्व.
पहिल्या लेखनाचे स्वागत कराल अशी अपेक्षा.
________________________________________________________________________
ह्यालो
बोल ग हिरॉईन
आयक की रव्या. मला कनाय राव्हल्या भेटला होता.
तूच बोंबलत गेली आसचील. आता म्या नाहीना गावात. काय भरोसा नाय तुझा.
हा. तू लै शिटीत सवळाच राह्यलास जनू. मी हाय म्हनून नायतर छप्पन्न फिरतेत माझ्यमागं.
हा म्हैते लै फेरनलवलीची औलाद.
ते जौ दे. पह्यले मला सांग किती मरतोस माझ्यावर?
म्या व्हय? समज बत्तीस जीबी तर आसंन. राव्हल्या काय केला ते सांग ऊंडगे आदी.
तेचाकडं कनाय तसला आंडराड मोबाईल हाय. फोटो पाटिवता येतेत मन.
मग?
मग काय. म्या नीट्ट सांगितलं. जेचं माज्यावर सच्चं प्रेम तोच घिऊन दील मला आसला फोन.
लै नीच हायस ग टवळे. नेक्स्ट टैम आनतो.
________________________________________________________________________
ह्यालो ह्यालो
बोल की आये. एकतर मिस्कॉल करतीस आन कॉल केल्यावर बोलाया काय हुतय.
आरं रव्या आयक की.
आता म्होरं बोलतीस का ठिवू फोन. मला हापिसाला जायचय.
जाशील रं बाळा पण आयक की. ह्ये तुझा बाप काय सुदरंना बग.
आता काय केलं? आन ह्यो नंबर कुनाचाय?
तेच रं. काल पिऊन कुठं उलथला की दारुपायी इकून आला मोबाईल देव जाणं.
मग?
तसं नव्हं र बाळा. आता म्होरल्या टायमाला येतुयास न तवा एखांदा आण की डबडा. सादा का आसना पण आण.
आये हितं शेहरात लै खर्च आसतेत ग. पुरत नाह्यती माझं मला आन तुम्चं आसलं कायतर. बगू बगू करतो कायतर.
________________________________________________________________________
ह्यलो रव्या
बोलो ना सेठ
रव्या भाडखाव कामाचं बग आधी. कुठं खपलास तीन दिवस?
नाय ना सेठ. हितच हाय ना मंडईत.
फुकन्या तितं काय बी मिलनार नाय. स्टेसनवर जा सीधा.
पण सेठ दोन पीस तर काढलेत की हितं.
अब्बे मी काय बोलतो सुन. तस्ले पीस कोन बी घेत नैत आता. कस्टमरको अँड्रोईड मंगता.
पण सेठ पोलीसमामूचं बी भ्या वाटतं.
तो पैले माझे उचल परत कर. तेरेसे ज्यादा रिस्क मै ऊठाता इदर.
नाय नाय सेठ. जातो स्टेशनवर.
हा. और सुन. कमसेकम चार पीस होना मेरेको नये बडेवाले. नई तो सीधा रास्ता मालूम है तेरेको.
हा सेठ. आनतो अँड्रोईडच. करतो कायतर आता.
________________________________________________________________________
त्रैराशिक
वाचने
9005
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरी कथा. वेगळ्याच धर्तीची.
जबरी कथा. वेगळ्याच धर्तीची. भाषा लय लय आवडली.
तिन्ही कथा वेगवेगळ्या असुनही सांधा एकच आहे. हा प्रयोग आवडला.
आणि हो. मिपावर स्वागत.
आयला काय है काय है? फुल टू
आयला काय है काय है? फुल टू टैमपास. महापाचकळ. म्हातारीचं वर्णन पन सही अन आयटमचं पण. लिखो और हसाओ. आवडलं रे भावा.
हा म्हैते लै फेरनलवलीची औलाद.
लोल.
आंडराड मोबाईल
आंडराड मोबाईल
अग्गाग्गाग्गा!!!
कथा आणि त्यापेक्षा दणदणीत
कथा आणि त्यापेक्षा दणदणीत भाषा आवडली !
लिहीत रहा, फक्त शब्द मोजू नका !
+१
In reply to कथा आणि त्यापेक्षा दणदणीत by सस्नेह
लिहीत रहा, फक्त शब्द मोजू नका !
कंटेंट महत्वाचा!
ज ह ब ह रा ह ट
म्या व्हय? समज बत्तीस जीबी तर आसंन.
हाहाहा!
लै भारी!
मस्त !
मस्त !
हाइ ट्येकच !
हाइ ट्येकच !
खुप आवडली. जबरदस्त कॉन्सेप्ट
खुप आवडली. जबरदस्त कॉन्सेप्ट आहे. लिहीत रहा..
खुप आवडली.
खुप आवडली...आंडराड मोबाईल आवडला....!!!
मजा आली वाचायला.
मजा आली वाचायला.
जबराट....
१. नमभर...
जबरीही!
जबरीही!
क्या बात है ! आवडली वेगळी कथा
क्या बात है ! आवडली वेगळी कथा.
मस्त आहे
आवडली
लेखन आवडले .
लेखन आवडले .
छान जमलय. अजुन येउ देत
छान जमलय. अजुन येउ देत
लै भारी लिवलंय !
लै भारी लिवलंय !
मस्त!
तीन कथांची वीण सुरेख जमलीय.
तिस-या कथेतला धक्का एकदम जाणवला.
मस्त लिहिल्यात तीनही कथा
मस्त लिहिल्यात तीनही कथा
खूप आवडली
ही कथा खूप आवडली.
त्रिशतशब्दकथेची संकल्पना तर खासंच वाटत आहे.
+१
In reply to खूप आवडली by श्रीरंग_जोशी
नवीन प्रकार आणि कलाटणी पूर्ण !!!!
मस्तच!
मस्तच!
मस्त !
मस्त !
वाह! मस्तच!
वाह! मस्तच!
अगागागा !! ज ब री ही !! काय
अगागागा !! ज ब री ही !! काय मस्त बोली हाय राव.
पहील्याच कथेत आपन एकद्म तुमचे फॅन झालो बगा !!
अजुन येउदे.. आंडराड, फेरेनलवली आवडले हायेत,,,
मस्तच!
ही कथा खूप आवडली.
आवडलं
मस्त, जबराट x ३००
मस्त जमलीय. अजुन येऊ द्यात.
मस्त जमलीय. अजुन येऊ द्यात.
लय भारी . लिवा अजून
लय भारी . लिवा अजून
वा!!
उत्तम लेखन. येऊद्या अजून!!
वा वा!
पहिल्याच पदार्पणाला तीन सिक्सर्स!
बगा मेल्यांनो, चांगलं लिवलं तर मिपावाले कवतिकच करत्यात. जिलब्या पाडल्या तरच पाक डोक्यावर ओततात.
अगदी अगदी.
In reply to वा वा! by तिमा
अगदी अगदी.
कथा आवडली.
अजुन नविन कथा येउ द्या.
१ नंबर
लिहा लिहा... भरपूर लिहा :)
आवडलीच. दम हाय भौ! बत्तीस
आवडलीच. दम हाय भौ! बत्तीस जीबी तरी आसंन.
त्रैराशीकाचा प्रयोग चांगला
त्रैराशीकाचा प्रयोग चांगला जमलाय.
बेस्ट! १०/१०
बेस्ट!
१०/१०
आणि हो. १राहिलं. नागेश
In reply to बेस्ट! १०/१० by अत्रुप्त आत्मा
आणि हो. १राहिलं. नागेश कुकनुरचा तीन दीवारे आठवला.
१ नंबर
मस्त कथा. आवडली!
प्रयोग आवडला. जमलाय. शशक
प्रयोग आवडला. जमलाय. शशक सोबतच लघुकथा छान लिहु शकाल असं वाटतय. शैली छान आहे तुमची.
मस्त जमलंय त्रिराशिक..
मस्त जमलंय त्रैराशिक.. भन्नाट प्रयोग. बेरकीपणा आणि गावरान भाषेचा लहेजापण भारी जमलाय. मिपावर स्वागत.. लिहीते रहा..
असं काय्तरी पायजेल... तीनच
असं काय्तरी पायजेल... तीनच गोळ्या, पण तीनही अगदी अचूक निशाण्यावर. स्नायपर हाय का तुमी?
धन्यवाद
सर्व प्रतिसादकांचे अन वाचकांचे आभार. नगरीनिरंजन, आदूबाळ, चिगो, तिमा, अतिवास, पैसाताई, स्नेहांकिताताई, प्रचेतस, एक्काकाका, नुलकरसाहेब, बुवा, आदि अन डांगेसाहेबांसारख्या सर्वच साक्षेपी वाचकांचे प्रतिसाद म्हणजे स्पर्धेआधीच बक्षीस मिळाल्यासारखे आहे. ;)
सर्वांनाच खूप खूप धन्यवाद.
अवांतरः यापुढे शतशब्दकथा लिहिणार नाही. प्रयोग जमलाय असे वाटते पण आता पिलियन रायडर यांच्या मताप्रमाणे नेक्ष्ट मिशन.... लघुकथा. :)
स्टे ट्यून्न्न्न्न्न्न्न्ड.
तुमची त्रैराशीक मांडण्याची
तुमची त्रैराशीक मांडण्याची शैली तूफानच आहे. खूपच आवडली.
.....हिरॉईन चा कॉनफीड्न्स जबरदस्त आहे....
त्रैराशीक कथा
या निमित्ताने मिपा वर त्रैराशीक कथांची साथ यावी :)
नावासकट सगळ कंटेट आवडल्यालं
नावासकट सगळ कंटेट आवडल्यालं हायं.
हितन पुड बी आसलाच माल आणायचा काय?
जहबहरी!!
मस्त!
मस्त कथा. त्रैराशिक नाव वाचून गणितावर काही आहे का असं वाटलं होतं. पण ही तर गणित चुकलेल्या माणसाची कथा निघाली. निव्वळ संवादांतून, तेही फोनवरच्या, सगळी पात्रं डोळ्यांसमोर उभी केली. क्या बात है! मस्तच.
जबराट कथा! लिहीत रहा बे
जबराट कथा! लिहीत रहा बे भावड्या.
वा वा......
चुकून कायतरीच वाचलं गेलं.....पण एकूण प्रकार भारीये....
मस्त!
अप्रतिम.............तिन्हिई कथा
जबरी...
हसता हसता हळूच डोळ्यात पाणी आणणारी तीन तुकड्यांची कथा.
भारी
मस्त...मजा आली. पुलेशु
खूप आवडलं हे! __/\__ लिहीत
खूप आवडलं हे! __/\__ लिहीत रहा!
जबऱ्या कथा
जबऱ्या कथा
लोकांनी सिक्वेल मागितला तर
लोकांनी सिक्वेल मागितला तर तुम्ही डायरेक्ट ट्रिओलॉजीच घेऊन आले राव... :)
मस्त जमलंय. हे पात्र डेव्हलप केलंत तर मस्त सिरीज होऊन जाईल एक.
.
मस्त..