Skip to main content

बाहुबलीच्या निमित्ताने …

लेखक अभिदेश यांनी मंगळवार, 21/07/2015 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
कालच आंतरजालावर बाहुबली (हिंदी) बघितला आणि ज्या scale वर तो चित्रपट बनवला आहे ते पाहून आवक झालो. नकळत मराठी चित्रपटाची तुलना करायचा मोह अनावर झाला. मराठीमध्ये एवढ्या मोठ्या scale चा चित्रपट कधी बनणार ? आपण फक्त story आणि containt वरचा किती दिवस तरणार ? आपली मराठी मानसिकता कधी बदलणार? TP2 च्या वेळेस त्याच्या promotion वर टीका झाली . हीच आपली कोती मनोवृत्ती आपल्याला घातक आहे . बाहुबली हा regional फिल्म असूनही तो एवढ्या मोठ्या scale वर बनवला गेला आणि जगभर प्रदर्शित झाला . आता कोणी त्यावर टीकाही करतील कि हा बाजारू आहे , असू दे बाजारु … त्यांनी केवढा मोठ्या प्रमाणावर तो बनवला आणि promot केला , हे निशित्तच कौतुकास्पद आहे आणि मराठी Film Industry आणि प्रेक्षकांनी ह्यातून बोध घ्यायला हवा. तुम्हाला काय वाटते ?

वाचने 27506
प्रतिक्रिया 132

प्रतिक्रिया

In reply to by पिशी अबोली

बाहुबली सोडा राव मी बाजी पाहिला आहे मराठी मधील पहिला सुपर हिरो तो पाहिल्यावर मला सुद्धा वाटले मी बाजी आहे

मराठीत 'भुजबळ द आर्मस्ट्राँग" या नावाने येतोय एक सिनेमा. त्यातल्या प्रॉपर्टीची भव्यता डोळ्यात भरणार नाही या साऊथवाल्यांच्या..

बाकी बाहुबलीमुळे तेलगु चित्रपट फार महान वगेरे असतात असा गैरसमज होउ नये. - दर वीस मिनिटाला जर रक्त सांडले नाही तर फाउल समजतात. (पुलंचे वाक्य बदलून वापरतोय) - अर्ध्या चित्रपटातला अर्धा भाग ब्रह्मानंदम् आपल्या खांद्यावर उचलतो. बऱ्याचदा चित्रपट टुकार असला तरी त्यामुळे सुसह्य होतो. पुढचा चित्रपट पण बघितला जातो. - काही कुटुंबाची मक्तेदारी आहे. - मराठी प्रेक्षकाला तरी तेलगु चित्रपट काही अपवाद सोडले तर फार आवडनार नाही. ह्या गोष्टी इतरत्र नाही असे नाही. बाहुबली ही एक मोजून मापून घेतलेली जोखीम होती. परत ती काही जणांनी मिळून शेअर केली. काही बाबी जमेच्या होत्या. - राजमौलीचा हा काही पहीला ऐतिहासिक चित्रपट नव्हता या आधी मगधीरा येउन गेला होता. तसेच मख्खीला हिंदीत सुद्धा बरेच यश मिळाले होते. मुळात या माणसावर जोखीम घ्यावी अशी त्याची पत होती. - अनुष्काच्या नावाने चित्रपट चालतात. इथे तर प्रभास, राणा, सत्यराज, रम्या क्रिष्णन सारे होते. - धर्मावाल्यांनाही साथ दिली. सुरवातीपासूनच काहीतरी भव्य करायचे आहे या हेतूनेच ते केले गेले. कुणीतरी अशी जोखीम घ्यायला हवी होती आणि ती घेतली गेली. एक जबरदस्त चित्रपट तयार झाला. मराठी तर जाउ द्या आजवर बॉलीवुडमधेही असा चित्रपट बनला नाही. तेंव्हा तेलगु आणि मराठी चित्रपटांची तुलना करीत इथे खल करीत बसण्यापेक्षा परत एकदा थेटरात जाउन चित्रपट बघावा.

लक्ष्या, मकरंद अनारसपुरे, भारत जाधव, इत्यादी इत्यादी कोमेडीअन आपण हिरो म्हणून आवडीनी बघू तो पर्यंत तरी साउथ सारखे ग्ल्यामर मराठी सिनिमा ना कसे मिळणार?

In reply to by इरसाल

दादा, लिव्हा ना तुम्हि. मला लै भारि वतेल भघा.

काल बाहुबली बघण्याचा योग आला...दोन तीन दिवस कुठेच तिकिट्स मिळत नव्हते. रात्री ११ चा शो असून हाउसफुल्ल होता. सिनेमाबद्दल बोलायचे तर अतिशय भव्य आणि रम्य चित्रकथा आहे. टेक्निकल आस्पेक्ट्स निव्वळ उच्च दर्जाचे आहे. ज्युरासिक वर्ल्डच्या व्हिज्युअल इफेक्ट्स टीमने यासाठी काम केले आहे असे ऐकून आहे. मराठी चित्रपट सोडाच, बॉलीवूडला ही अजून काही वर्ष जातील त्यांच्यासारखे टेक्निकली परफेक्ट काम करायला.. :) :)

In reply to by सुहास झेले

विज्युअल इफेक्ट्स टेक्निकली परफेक्ट नाहीत: बर्‍याच दृश्यांमधे ज्याप्रकारे कॅमेरा फिरणे अपेक्षीत होते तसा तो फिरला नाहीये. धबधब्याचं चित्रिकरण त्यामुळे परफेक्ट लेवलला पोचलं नाही. धबधब्याचं भव्यता दाखवणारं मनोहारी चित्रीकरण मी जुरासिक पार्क पहिल्या भागात बघितलंय. विशिष्ट अँगलने कॅमेरा टॉप-टू-बॉटम सगळा धबधबा एकदा तरी फ्रेम मधे घेऊन वरून खाली आला पाहिजे होता. इथे कॅमेरा दर्शकाच्या आयलेवलवर वरून खाली पॅन केला आहे. त्यामुळे इतका सुंदर धबधबा करून तो वाया गेला असं वाटलं. फ्लॅट वाटतं. कलर टिन्ट नॉट परफेक्ट. बरेच सीन्स असे आहेत जिथे टिन्ट अपेक्षित होते. ग्लॅडियेटर आणि ट्रॉय बघतांना फिल्म-टिन्ट मुळे वातावरण तयार होतं. युद्धाच्या सीन्समधे टिन्टचा वापर अपेक्षित होता. या चित्रपटात बराच दिवाळी-इफेक्ट आहे. (दिवाळी-इफेक्ट ही आमच्या काही कलाकार वीएफएक्स मित्रांची संज्ञा, दिवाळीच्या काळात जशा जाहिराती येतात, फ्रेश, कलरफूल, वैगेरे. इतर संज्ञा आहेत त्या नंतर कधीतरी.) आयुधे, शस्त्रे, वाहन, अ‍ॅक्सेसरीज यांच्यातलं डीटेलींग पर्फेक्ट लेवलला नाहीये. भल्लालदेवाचं मुकूट याचं उत्तम उदाहरण आहे. जर हा चित्रपट काल्पनिक आहे तर तेवढं स्वातंत्र्य घेता आलं असतं. इतिहासकाळाप्रमाणे वस्तूंमधलं डीटेलींग ऐतिहासिक चित्रपटात लागतं. इथे तो प्रश्न नव्हता. इतरः कुठेतरी संकलनात गडबड झालीये. पार्श्वसंगीत अप-टू-द-मार्क नाहीये. ओवरऑल टेक्निकली मी या चित्रपटाला १० पैकी ८.५ गुण देइन. भारतीय चित्रपटांनी बाहुबलीच्या निमित्त फार मोठी झेप घेतली आहे. पण परफेक्शनसाठी नेमकं जिथे अजून थोडा जोर लावायचा पॉइंट येतो तिथूनच ही टीम परतली आहे असं वाटत होतं. भारतीय तंत्रज्ञ आणि कलाकार त्याबाबतीत थोडे कमी पडतात. यातले जे तंत्रज्ञ अभारतीय आहेत, त्यांच्या कामातलं परफेक्शन आणि भारतीयंच्या कामातलं परफेक्शन कळून येतं. (इथे कोणालाही कमी-जास्त लेखायचा उद्देश नाही याची नोंद घ्यावी.)

In reply to by संदीप डांगे

जुरासिक वर्ल्ड या सिनेमाचे स्पेशल इफेक्ट्स ज्या कंपनीने बनवले त्यांच्याचकडे यातल्याही काही भागाचं काम झालेलं आहे अस त्या कंपनीतल्या अनधिकृत सूत्रांकडून कळते. धबधबा केरळमधला असून (एबीपी माझा) त्याचं चित्रीकरण महत्वाचं नाही. कारण पुढचे सर्व सीन्स हे व्हीएफएक्स वापरून दाखवलेले आहेत ( रविवार सकाळ, पुरवणी) - . धबधब्याचे काहीच सीन्स खरे आहेत.

In reply to by संदीप डांगे

उत्तम प्रतिसाद, बह्वंशी सहमत. पिसं काढायची तर अजून नक्कीच काढता यावीत, पण ये तो शुरुआत है, आता लक्षात येईल अशी अपेक्षा करावयास हरकत नसावीसे वाटते.

In reply to by संदीप डांगे

मी 'बाहुबली' दोनदा बघितला थेटरात. (माझ्याकडून हा बहुमान मिळालेला हा एकमेव हिंदी चित्रपट आहे.. ;-) ) स्पेशल इफेक्ट्सच्या बाबतीत ही लक्षवेधी झेप असली तरी काही तॄटी आणि कमतरता जाणवल्या.. १. हीरोला तमन्ना पहील्यांदा जेव्हा प्रत्यक्षात दिसते, त्या तिच्या जंगलात पाठलाग होण्याच्या सीनमध्ये दाखवलेले जंगल बर्फाच्छादीत उंचीवर नसते.. चक्क 'मॅनग्रोव्ह्स' ते ' रेनफॉरेस्ट' टाइपातले जंगल दाखवले आहे.. ही चुक नंतरच्या दृष्यांत (avlanche) मध्ये सुधारलीय.. २. दिवाळी इफेक्टशी सहमत.. ३. अ‍ॅनीमेशन काही दृष्यांमध्ये अभिनयाशी जुळत नाही.. तो हीरो जंगलात पळतांनाच्या अ‍ॅक्शन्स जरी 'अवतार' सारख्या असल्या तरी तृटी जाणवतात. ४. माहीष्मती महालात बाहुबलीचा पाठलाग करतांना त्याच्या ज्या उड्या दाखवल्यात, तेव्हा 'मारीयो' काळातले ग्राफीक्स आठवले.. ;-) मात्र एकंदरीत हा चित्रपट भव्यदिव्य आहे, आणि नक्कीच बघण्यासारखा आहे.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.. ;-)

माझा मूळ मुद्दा जो होता कि मराठी चित्रपट एवढ्या मोठ्या scale वर का बनत नाहीत , तो वरच्या चर्चेत मागे पडला असे वाटले . खूप लोकांनी मी हा चित्रपट आंतर्जालावर पहिला हा मुद्दा उपस्थित केला . पहिल्या प्रथम म्हणजे हा चित्रपट मी पाहणारच नव्हतो पण माझ्या office मधल्या तेलेगु , तमिळ जनतेने त्याची बरीच माहिती गायली आणि पाहण्याचा आग्रह केला , इथे परदेशात जवळच्या चित्रपटगृहात हिंदी version लागला नसल्यामुळे मी तो आंतरजालावर पहिला . असो …. काही मिपा सदस्यांनी असा अनाहूत सल्ला दिला आहे कि चित्रपट हा चित्रपटगृहा मधेच पाहावा किंवा original CD वर पाहावा . एकदम मान्य …. पण त्यासाठी मराठी चित्रपट परदेशात release तर व्हायला हव ना … परदेशाचे सोडा , मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात तरी प्रदर्शित होतात का ? काही अपवाद वगळता … फारच थोडे महाराष्ट्रा बाहेर प्रदर्शित होतात . अरे का नाही आपण मोठी स्वप्न बघत ? का नाही एखादी Fantasy निवडून त्याचा चित्रपट बनवत ? अशी कथा जिला universal appeal असेल . हिंदी मधली यशस्वी मराठी तगडी starcast घ्या , रजनी तर आपला मराठीच माणूस आहे. त्याला घ्या , चित्रपट dub करा हिंदी , दक्षिणात्य भाषेत . करा release जगभरात नाही निदान भारतभरात तरी . मुळात चित्रपट मोठा असेल तर, चालणारा असेल तर तुम्हाला रडावं लागणार नाही आम्हाला multiplex वाले prime time देत नाहीत म्हणून .

In reply to by अभिदेश

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतले स्टार्स तीन राज्यात ब-यापैकी स्विकारले जातात. बाहुबली तीनही राज्यात डब झालेला आहे. (एरव्ही तीन स्वतंत्र सिनेमे बनले असते, पण खर्चाचे आकडे पाहून एकच सिनेमा रिलीज झाला. यापूर्वी रोबोटला हा मान मिळाला होता. आणखीही असू शकतील. मनोरंजन उद्योगात त्या त्या राज्यातले भाषिक सिनेमे ही पहिली पसंती आहे. हिंदी सिनेमाचं अस्तित्त्व नगण्य आहे. पहिल्या आठवड्यात हजार दीड हजार रुपये तिकीटाला घालवण्याची तयारी आहे. जितके पैसे लावले जातील त्याचे रिटर्न्स मिळू शकतात. आपल्याकडे बाहुबली सारखा खर्चिक सिनेमा चितळे किंवा अविनाश भोसलेंनी बनवलाच तर प्रभासच्या जागी तरणाबांड नायक म्हणून सचिन खेडेकर असेल. तमन्नाच्या जागी सई ताम्हणकर (आठवा तमन्नाचं कुपोषित पोट वि. सईचं बाळसेदार पोट ), राणाच्या जागी अशोक सराफ किंवा दया आलीच तर सिद्धार्थ जाधव वगैरे आणि कटप्पाच्या भूमिकेत मिलिंद शिंदे/ अरूण नलावडे अशी स्टारकास्ट असू शकेल. जर टाटाने पायनान्स केलाच तर सिनेमाचं शूटींग होण्याआधीच तिकीटाचं बुकींग घेतलं जाईल. त्यासाठी बॅंकांकडून कर्जही उपलब्ध केलं जाईल. जर रीलीज झाल्यानंतर एका आठवड्यात तिकीटाचा नंबर आला नाही तर व्याज अशी योजनाही जाहीर होईल. सिनेमाचं शूटींग कोकणात होईल हे सांगायला नकोच. सचिन खेडेकर (चष्म्यासहीत) बोरघाट चढून येतो तेव्हां लोणावळ्याचे नयनरम्य धबधबे दिसतील. शूटींग साठी ५० एमपीचा ओप्पो मोबाईल वापरण्यात येऊ शकतो. युद्धाचे प्रसंग शूट करताना पन्नास - पन्नास कलाकार वापरले जातील. मोदींच्या गर्दीचे फोटो रिलीज करणा-या संस्थेकडून त्याचं रुपांतर पाच पाच लाखात केलं जाईल. सेट्सवर पैसे वाया घालवण्यापेक्षा भोरच्या राजवाड्यात शूटींग केलं जाईल. अशा अनेक वैशिष्ट्यांसह पहिला मराठी महामूव्ही तयार होईल आणि झी टॉकीजच्या साथीने त्याचं प्रमोशन देखील होईल. चला हवा येऊं द्या मधे विशेष एपिसोड होईल. आणि ज्या दर्शकांच्या तिकीटाचे नंबर पहिल्या शो साठी लागलेत त्यांची नावे जाहीर केली जातील. त्यांना स्टेजवर बोलावून त्यांना सिनेमा हॉलचे पासेस चितळे किंवा अभोंच्या हस्ते सुपूर्द करण्यात येतील.

In reply to by अभिदेश

आमच्या राज्यात अ पेईंग घोस्ट शिनेमागृहात येईल अशी आशा होती, निदान एक अठवड्यासाठी! पण आला नाही. आता जालावर बघण्याशिवाय इलाज नाही. बाहुबली हा तेलुगु भाषेत थेट्रात चालू आहे व आताचे माहित नाही पण पहिला अठवडा तरी हाऊसफुल चालू होता असे समजले. रजनीकांतला घेऊन मराठी चित्रपट काढणे सर्व निर्मात्यांना मिळून तरी परवडेल का हा हिशोब मनात चालू आहे. ;)

In reply to by रेवती

रेवती ताई, एक अनाहूत सल्ला की ज्या भाषेत असेल त्या भाषेत हा चित्रपट मोठ्या पडद्यावर बघून याच. भाषेची फारशी अडचण नाही कारण फार महान कथा नाहीये आणि डायलॉग्स पण यथातथाच आहेत. अ‍ॅक्शनवरून सगळं समजतं काय चाललंय ते. मुख्यतः बघण्याचाच चित्रपट असल्याने तेवढं महत्त्वाचं. पण मोठा पडदा मिसू नका... :-)

In reply to by रेवती

आमच्याकडे मामाच्या गावाला जाऊ या व पीजी येउन गेला आता स्पृहा व कामत तुमच्याकडे येणार आहेत त्यातील अनिमेशन हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे अवांतर दिवाळी इफेक्ट्स चे लोण म्हटले तर प्रस्थ आता वाढत चालले आहे त्यामुळे यात करियर करण्यासाठी काही माहिती मिळू शकेल का भारतात आलो की अनेक पालक आमच्या मुलांना सल्ले द्या किंवा काय करावे असा प्रश्न विचारतात , मग नेहमी नेहमी तेचतेच सांगून कंटाळा येतो

मराठी चित्रपट एवढ्या मोठ्या scale वर का बनत नाहीत ? १. कमी प्रेक्षकवर्ग २. चित्रपटगृहांची अनुपलब्धता ३. मराठी प्रेक्षकांची हिंदी चित्रपटाला असणारी पसंती आणि स्पर्धा ( हिंदीचा कलेक्शन फक्त ६० कोटी आहे आणि बजरंगी आल्यावर ९०% चित्रपटगृहामधून बाहुबली काढला ) ४. मराठी निर्मात्यांचे बजेट ५. तिथे बाहुबली पहिलाच बिग बजेट चित्रपट नाही , पूर्वी तिथे असे चित्रपट आले आहेत आणि चालले आहेत . त्यामुळे बाहुबली ही केलक्युलेटेड रिस्क होती.

मराठीत नाथमाधवांची वीरधवल कादंबरी बाहुबलीला तोडीस तोड आहे.

मराठी प्रेक्षक हा मराठी चित्रपटांच्या बाबतीत खुप चुझी / चोखंदळ आहे . त्यामुळे जे मराठी चित्रपट त्याला काळजाला भिडले नाहीत व क्रुत्रिम वाटले ते मराठी प्रेक्षकांनी नाकारले आहेत . म्हणुन त्याला ग्रुहित धरुन कसे पण मराठी चित्रपट बनवू नयेत . उदाहरणादाखल - सतिश राजवाडे यांचा 'मुम्बई पुणे मुम्बई' जेवढा चालला , तेवढे त्यांचे नंतरचे चित्रपट चालले नाहीत . स्वप्निल जोशीचे 'मुम्बई पुणे मुम्बई' , दुनियादारी जेवढे स्विकारले गेले , तेवढे इतर चित्रपट स्विकारले गेले नाहीत . सचिन खेडेकर यांचे 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ', काकस्पर्श हे जेवढे गाजले तेवढे इतर चित्रपट गाजले नाहीत.

बाहुबली, एस.एस.राजमौळी, प्रभास, राणा, तमन्ना यातलं एकही नाव मला माहीत नव्हतं. मुळात मला चित्रपट सृष्टीचा गंधच नाही तेवढा. “बावर्ची सिनेमात हिरोचा डबल रोल आहे का??” असले प्रश्न विचारणारा मी. पण आज खास लिहायला बसलोय म्हणजे तसं काहीसं मी पाहिलेलं असणार, असा तर्क लढवायला आजिबात हरकत नाही. परवा सहज मनात आलं, पाहूया हा सिनेमा. पण इतर अनेकांच्या मनात आलं न ते. शो झालेला हाउसफुल. मग पुन्हा प्रयत्न केला दुसर्या दिवशी. तुटकी सीट मिळाली. कारण तिचं तिकीट विकलंच जात नाही ऑनलाईन. त्यामुळे तिकीट खिडकीवर मिळालं तरी. असो खूप झालं. मुद्दा हा आहे की, वरील सर्व नावं मला काल परिचीत झालेली आहेत. खूप कौतुक कराव्या अशा खूप गोष्टी आहेत या सिनेमात. आता सिनेमासाठी बॉडी वगैरे करणं जुनं झालं, सगळेच करतात. पण त्याचंही कौतुक आहेच. राणा आणि प्रभास. दोघेही वीर असे काही दिसलेत सिनेमात, की चुकून नायिकेला दिग्दर्शकाच्या मताच्या/अन कथेच्या विरोधात नायकाशिवाय दुसरा कुणी आवडला तरी आश्चर्य वाटायला नको. अर्थात मी इथे स्टोरी बिरी सांगायला बसलोच नाहीये, आपल्या लोकांच फक्त कौतुक (जे मी फार कमी वेळा करतो ते) करायला बसलोय. ह्या चित्रपटात एक 'कालकेय ' नावाची जमात आहे. त्यांची वेगळी भाषा ठसवण्यासाठी मदन कार्की ह्याने एवढ्या एकाच आवश्यकतेसाठी चक्क एक नवीन भाषा निर्माण केल्याचं मला विक्रम एडके यांच्या परीक्षणातून कळालं. अरे काय माणसं आहेत की काय. एवढे कष्ट फक्त हॉलीवूड मध्ये केल्याच्या बातम्या येतात कानावर. आपण म्हणजे “वाहवा, याला, याला म्हणतात डेडिकेशन वगैरे उद्गार काढतो. पण आपली माणसं काय करतात हे पाहूया ना एकदा डोळे उघडून. एक नवी भाषा. ७५० शब्द आणि ४० व्याकरणाच्या नियमांसह. अर्थात हिंदी मध्ये नाही जाणवायचं ते. कारण भाषांतरीत सिनेमे कसे अन कुणाकरवी भाषांतरीत होतात हे मी चांगलंच अनुभवलंय. आता जरा जिव्हाळ्याचा विषय, सेट्स. साबू सिरील या माणसाने ज्या काही detailing सकट सेट केलाय, त्यासाठी विशेष टाळ्या आहेत. भव्यता...मनभर व्यापून राहिलेली भव्यता. झोपल्यावरही डोळ्यात राहणारी. पहावीच एकदा. त्याला visual effects ची जोड पण आहेच; मान्य. पण मुळात असं काही करावं हे सुचणाऱ्या कलादिग्दर्शकाला सलाम. या सगळ्यात मला महत्व वाटलं ते स्टोरी टेलिंगचं. इतकी अप्रतिम कथा सांगण्याची पद्धत. त्याला तोड नाही. अर्थात मुळात त्या कथेतच तेवढा दम आहे. पण मांडणी ...प्रेक्षकांना कथेचा एकेक पदर उलगडून दाखवण्याची हातोटी सुन्दर आहे. दोन अभिनेत्यांना हेतुपुरस्सर उच्च/नीच दाखवून हा घ्या तुमचा हिरो वगैरे प्रकार नाहीत. कथेला गरज वाटेल एवढीच प्रेमाची फोडणी, भावनांच्या कल्लोळांचा अभाव, भक्ती, स्वाभिमान अशा संकल्पनांचा भडीमार नसल्यामुळे कथा track सोडत नाही. (नाहीतर कृष्णचा क्रिश होईपर्यंत ६०% सिनेमा संपलेला असतो एरवी) २५० कोटी मिळाल्यावर तुम्ही काय करू शकता?? उच्च तंत्रज्ञान वापरून उच्च सिनेमा बनेलच असं नाही. इथे सेट्स पाहताना विशेष आभास पाहताना जाणवतं...की किती उत्तम पद्धतीने पैसा खर्च केलाय. महिष्मती नगरीतील व्यवस्था, ८-८ माजली वाडे, इमारतीचं बांधकाम निव्वळ अप्रतिम. मोठ्ठ्ठठ्ठा धबधबा पाहून तर पैसे पाण्यात घालवलेत वगैरे म्हणावसं वाटतं. छायाचित्रकारांनी पण कमाल केलीय. ही भव्यता, सौंदर्य आपल्यापर्यंत पोहोचवण्यात ते आजिबात कमी पडलेले नाहीत. रात्रीचे प्रसंग चितारण्यासाठी निळा फिल्टर न लावून त्यांनी जे काही मन जिंकलय. वा वा!! वैदिक काळातील व्यूह रचना, त्यांचा अभ्यास वगैरे पण कथेला हातभार लावायला आहेच. मुद्दा काय, तर चला सिनेमा बनवूया म्हणून कुणीही ह्याला हात घातलेला नाही. त्यामागे खूप अभ्यास अन कष्ट आहेत. थोड्या अतार्किक गोष्टी पण आहेत. सावळी नायिका एका गाण्यात गोरी, अन गाणं संपल्यावर पुन्हा सावळी वगैरे. पण स्वप्नात असं होऊ शकत म्हणून सोडून दिलय मी ते. ईतर आहे अजून...पण माफ!!! नार्निया पाहतो आपण, सुपरम्यान, kripton ग्रह वगैरे. पण अरे बॉलीवूडच्या सर्व व्यावसायिक गणितांना छेद देत एक टॉलीवूड सिनेमा आलाय जो सलग २ दिवस हाउसफुल आहे. प्रेम कथा, थिल्लरपणा नसलेला हा सिनेमा प्रचंड यशस्वी होणारे आणि त्याला यशस्वी करण्यात आपला हात असावा असा मला वाटतं. त्याशिवाय असे धाडसी प्रयोग करायला कुणी तयार होणार नाही. आपल्या फिल्म इंडस्ट्रीचं सारं गणित पैशापाशी अडत. प्रेक्षकांना काय आवडतं ते दाखवा. अरे पण आम्हाला हे देखील आवडत हे कळू द्या न त्यांना. २५० कोटीला २५० कोटीचा परतावा आहे म्हणावं. धार्मिक सणांना सिनेमा रिलीज न करताही यश पदरात पडत हे कळेल म्हणजे त्यांना. आता गम्मत म्हणजे हा सिनेमा एका उच्च बिंदुला येऊन क्रमश: राहतो आणि २०१६ मध्ये पुढील भाग येणार असल्याची घोषणा करतो. जे काही असेल ते. मी ज्या आतुरतेने MI सिरीजची वाट पाहतो, तेवढीच याचीही पाहतोय हे नक्की. वेळ काढून पहा. (सिनेमा विशेष आवडला असल्यामुळे माझं कौतुकाचं लिखाण क्रमश:च राहील, पुन्हा काही लिहावसं वाटेल असं दिसतंय.)

भाषा समजत नसली तरी सिनेमा समजला आणि बेहद्द आवडला. एवढी तांत्रिक करमत करून सुद्धा चान्दोबातल्या गोष्टींमध्ये जी निरागसता असायची ती जपण्यात यश मिळाले आहे. ही अतिशय कठिण आणि कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे.

१०० , २०० कोटी खर्च करुन बनवलेले हे तेलुगु , तामिळ सिनेमे बघताना भव्य दिव्य वाटत असेलही , पण त्याच बरोबर वाईटही वाटते . यातील काही कोटी हे जर तेथिल रस्ते डागडुजी, स्वच्छता ,वाहतुक नियमन ,निसर्ग संवर्धन,पाणी व्यवस्थापन , प्रदेश सुधारणा यांवर खर्च करता आले ते जास्त महत्वाचे आहे . त्यामुळे या बाबतीत मराठी सिनेमांचे विशेष कौतुक वाटते . कारण कोणत्याही गाजलेल्या मराठी सिनेमाने मराठी प्रेक्षकांना खोटी स्वप्ने दाखविली नाहीत .

In reply to by सिरुसेरि

मराठी चित्रपट विषय आणि सामाजिक जाणिवेच्या बाबतीत पुढे आहेतच. आगामी देउळबंद चित्रपटातून येणारे सारे उत्पन्न विधायक कामासाठी वापरले जाणार आहे.

In reply to by सिरुसेरि

१०० , २०० कोटी खर्च करुन बनवलेले हे तेलुगु , तामिळ सिनेमे बघताना भव्य दिव्य वाटत असेलही , पण त्याच बरोबर वाईटही वाटते . यातील काही कोटी हे जर तेथिल रस्ते डागडुजी, स्वच्छता ,वाहतुक नियमन ,निसर्ग संवर्धन,पाणी व्यवस्थापन , प्रदेश सुधारणा यांवर खर्च करता आले ते जास्त महत्वाचे आहे . त्यामुळे या बाबतीत मराठी सिनेमांचे विशेष कौतुक वाटते . कारण कोणत्याही गाजलेल्या मराठी सिनेमाने मराठी प्रेक्षकांना खोटी स्वप्ने दाखविली नाहीत .
तरी वाटलंच होतं हे कोणी कसं म्हटलं नाही !! अहो, आपल्या पुणे अथवा मुंबई नगरपालिकांमध्ये अथवा इतर पुरेसे उत्पन्न असलेल्या शहरामध्ये "रस्ते डागडुजी, स्वच्छता ,वाहतुक नियमन ,निसर्ग संवर्धन,पाणी व्यवस्थापन , प्रदेश सुधारणा" यातल्या किमान महत्वाच्या गोष्टींवर किती बजेट असते पाहिलेत का हो ? मुंबई मनपाच्या या वर्षीच्या बजेटमध्ये ३००० कोटी आहेत फक्त road repair and development या कामासाठी (संदर्भ). तरी काय अवस्था आहे हो ?? मुद्दा पैशाचा नसून ज्या कामासाठी दिला आहे त्या कामावर ते काम चांगले होण्याकरता खर्च होण्याचा/करण्याचा आहे. जर या चित्रपटाच्या कला दिग्दर्शकाला मिळालेला पैसा घेऊन तो त्याने शक्य तितके चांगले काम करण्यात लावला नसता तर तुम्हाला खड्डे पडलेल्या रस्त्यांसारखा चित्रपट दिसला असता. isro ने ४०० कोटीचे यान पाठवले तेव्हाही हाच सूर ऐकला होता. त्यांनी त्यांना दिलेले काम यशस्वी केले हे महत्वाचे. ज्याला जे पैसे अ‍ॅलोकेट झालेत त्याने ते नीट वापरावे (यात प्रशासन मुख्यत्वे आले) तरी खूप काम होईल. हे असले साम्यवादी विचार आता या काळात सध्यातरी तितकेसे लागू होत नाहीत हे ध्यानात घावे.

In reply to by सिरुसेरि

असा प्रतिसाद अजून कसा आला नाही याचेच आश्चर्य वाटत होते. असो. शेवटी आलाच. १००-२०० कोटी खर्च म्हणजे लेडीजबार मधे जाउन धनदांडगे जसे पैसे उडवतात तसे हे २५० करोड उडवले असे वाटणे असेल तर त्या वाटण्याला काय करू शकत नाही. ज्यांना हे उधळणे वाटते त्यांनी एकदा चित्रपट सुरू व्हायच्या आधी आणि नंतर येणारी नामावली व त्यात येणारी नावे मोजली तरी थोडा प्रकाश पडेल की हे पैसे कुठे जातात. त्या नावांशिवाय अप्रत्यक्ष हजारो लोकांना ह्या तथाकथित उधळण्याचा फायदा झालेला असतो. एक प्रचंड मोठी अर्थव्यवस्था उभी आहे, लोकांना त्यांच्या योग्यतेनुसार, क्षमतेनुसार, कलेनुसार कमवायची संधी मिळत आहे. सिनेमा इंडस्ट्री नसती तर ह्या हजारो लोकांना कुठे व काय काम मिळाले असते? जसे दुसर्‍या एका धाग्यावर आयटी क्षेत्राने नोकर्‍या देऊन अभियंत्यांचे भलेच केले असे म्हटले जात आहे. तसेच इथेही म्हटले जाऊ शकते. जर कोणाला उपदेश द्यायची गरज असेल तर ती दर्शकांना आहे. कारण खिशातले ८० ते २००० हजार रुपये हा दर्शकच उधळत असतो. निर्माता तर आपले काम करत असतो. तो त्याचा व्यवसाय आहे. त्यात त्याने किती पैसे लावावे हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. व्यवसायात लावल्या जाणार्‍या पैशाला उधळणे म्हणणे हा एक फारच मध्यमवर्गीय, मनोरंजक पण अनुत्पादक, क्षुद्र विचार झाला. चित्रपट बनवणे हे म्हणजे पुस्तक वाचण्याएवढे सोपे काम नाही हे एकदाचे समजून घेतले पाहिजे. एक दहा सेकंदाचा शॉट बघायला आपल्याला दहाच सेकंद जरी लागत असले तरी तो शॉट आपल्यापर्यंत पोचवायला हजारो तंत्रज्ञ, कलाकार आणि व्यावसायिक झटलेले असतात. तो शॉट पर्फेक्ट येण्यासाठी कदाचित त्यांनी शेकडो तास घालवले असतात. एक उडी नीट मारली गेलेली अचूक पद्धतीने येण्यासाठी कदाचित नायकाला अक्षरशः दिवसभर तेच करत राहायला लागलेले असते. पडद्यावर दिसते तेवढे सोपे ते खचितच नसते. तेच काम न थकता, न चिडता, अचूक येण्यासाठी कमालीची सहनशिलता आणि कामामधे अढळ श्रद्धा लागते. तुम्ही आम्ही ज्या सहज भावनेने आणि क्षुल्लक महत्त्व देऊन एखादा चित्रपट बघत असतो त्याच सहजतेने तो तयार झालेला आहे असे आपल्याला वाटत असते. पण तसे नसते. एखादी कथावस्तू पडद्यावर चितारण्यासाठी त्याप्रकारचे वातावरण उभे करावे लागते. तेवढा प्रचंड अनुभव येण्यासाठी प्रचंड खर्च करावाच लागतो. हा अनुभव घेण्यासाठी दर्शक पैसे मोजतात. जिथे दोन पार्टींमधला हा सरळ सरळ व्यावसायिक व्यवहार आहे तिथे सामाजिक जाणीवेचे, गरज नसलेले कढ काढण्यात कोणती महान मानसिकता आहे हे खरंच कळत नाही. असा विचार येत असेल तर आपले सगळे जीवनच आपण तपासून पाह्यला पाहिजे. आपण एक व्यक्ती म्हणून जो काही खर्च करतो तो नक्की आवश्यकता आहे की उधळपट्टी हेही तपासून घ्यायला पाहिजे. त्यादृष्टीने पाहिले तर माणसाचे ९५ टक्के खर्च हे उधळपट्टी म्हणून मोजता येतील. झोपायला जमीनीवर चटई टाकली तरी झोप येतेच, तिथे कशाला डबलबेड, किंगसाईझची गरज? तेवढे पैसे किमान शंभर लोकांना चटई विकत घ्यायला उपयोगी पडतील की. तेच लाखो रुपयांची घरे कशाला? झोपायला जागा मिळाली तरी पुरे. कित्येक हजार लोक रस्त्यांवर झोपतात. त्यांतल्या किमान दहा लोकांना चाळवजा घर बांधता येईलकी. टूथपेस्ट तरी का वापरावी. तीही उधळपट्टीच आहे. अव्यावसायिक उधळपट्टी आणि व्यावसायिक गुंतवणूक यातला फरक समजेल तेव्हाच याबाबतीत चित्रपटांवर केली जाणारी अस्थानी टिका कदाचित थांबेल. लोक निर्मितीला लागलेला पैसाच बघतात. जमवलेला गल्ला बघत नाहीत. खरी टिका त्यावर झाली पाहिजे. पण तिथे अशी सोयिस्कर भूमिका घेता येत नाही.

लोकांना स्वप्नं विकायचं आपलं काम तो सिनेमा चोख करतो आहे. अजून एक गोष्ट कोणाच्या लक्षात आलेली दिसली नाही, दिग्दर्शकाचे काम. अगदी एक्स्ट्रा नटांकडून त्यांनी उत्तम मुद्राभिनय करून घेतला आहे. कोणत्याही फ्रेममधे एक्स्ट्राज चे वागणे विसंगत वाटत नाही. मारियोच्या उड्यांबाबत चिगोशी सहमत! पण बाकी उत्तम दृश्य अनुभवासाठी ते माफ करून टाकले आहे!

आगाऊ म्हाद्या यांचा प्रतिसाद सुंदर आहे. 'बाहुबली' मला खूप आवडला. काय सुंदर आणि प्रभावी चित्रपट बनवला आहे!! वाह! सोपी कथा, जबरदस्त कलादिग्दर्शन, डोळ्यांचे पारणे फिटावे अशी अफलातून आणि भव्य दृश्ये, सगळ्यांचा खणखणीत अभिनय आणि उत्सुकता ताणून धरायला लावणारे दिग्दर्शन! प्रभास आणि राणा तर उत्तम आहेतच पण कटाप्पाच्या भूमिकेत सत्यराजने जान ओतली आहे. नासीरचा कुटील बाप जबरदस्त. अनुष्का, रम्या, आणि नाजूक तमन्ना यांनीदेखील जीव तोडून अभिनय केला आहे. स्पेशल इफ़ेक्ट्स जाणवतात पण एकंदरीत चित्रपटाचा आवाका प्रचंड मोठा आहे; त्यामुळे उणीवांकडे फारसे लक्ष जात नाही. चित्रपट बघतांना आपण काहीतरी भव्य-दिव्य, श्वास रोखून धरायला लावणारे बघतोय असे वाटत राहते. डिटेलिंग इतके मस्त की मोठ्या मोठ्या महालांच्या ग्राफिक्समध्ये दुरून छोटी छोटी हालचाल करणारी माणसे, उडणारे पक्षी, फडकणारे झेंडे, बुरुजांच्या सावल्या, इत्यादी सगळे कुशलतेने टिपले आहे. धबधबा आणि पर्वतराजी तर निव्वळ अप्रतिम! एकदा मोठ्या पडद्यावर पहायलाच हवा असा चित्रपट.

"मुद्दा पैशाचा नसून ज्या कामासाठी दिला आहे त्या कामावर ते काम चांगले होण्याकरता खर्च होण्याचा/करण्याचा आहे. जर या चित्रपटाच्या कला दिग्दर्शकाला मिळालेला पैसा घेऊन तो त्याने शक्य तितके चांगले काम करण्यात लावला नसता तर तुम्हाला खड्डे पडलेल्या रस्त्यांसारखा चित्रपट दिसला असता." -- बाहुबली बाबत आतापर्यंत प्रतिक्रिया या संमिश्र , परस्पर विरोधी अशा वाचायल्या मिळाल्या आहेत . काही जण त्यांतील तांत्रिक करामतींनी भारावून गेले आहेत , तर काहींना या तांत्रिक करामतींमध्ये त्रुटी आहेत असे दिसते . "जर कोणाला उपदेश द्यायची गरज असेल तर ती दर्शकांना आहे. कारण खिशातले ८० ते २००० हजार रुपये हा दर्शकच उधळत असतो" -- सर्वात वाईट तर तेथिल दर्शकांबद्दलच वाटते . कारण रणरणते उन , वादळ , पाउस , पाणी / वीज टंचाई , प्रदुषण , ट्रॅफिक हा सर्व त्रास सहन करीत लोक येतात व २ , ३ तास स्वताला गंडवून घेतात . यातूनच वास्तवापासून पलायनवादाची भावना वाढीस लागते .

In reply to by सिरुसेरि

"मुद्दा पैशाचा नसून ज्या कामासाठी दिला आहे त्या कामावर ते काम चांगले होण्याकरता खर्च होण्याचा/करण्याचा आहे. जर या चित्रपटाच्या कला दिग्दर्शकाला मिळालेला पैसा घेऊन तो त्याने शक्य तितके चांगले काम करण्यात लावला नसता तर तुम्हाला खड्डे पडलेल्या रस्त्यांसारखा चित्रपट दिसला असता." -- बाहुबली बाबत आतापर्यंत प्रतिक्रिया या संमिश्र , परस्पर विरोधी अशा वाचायल्या मिळाल्या आहेत . काही जण त्यांतील तांत्रिक करामतींनी भारावून गेले आहेत , तर काहींना या तांत्रिक करामतींमध्ये त्रुटी आहेत असे दिसते .
अहो.. बाकीच्या मुद्द्यांबद्दल काहीच बोलत नाही आहात तुम्ही. असो. इथे "काहींना या तांत्रिक करामतींमध्ये त्रुटी आहेत असे दिसते" बर मग ? निर्मात्याने जमेल तितका पैसा घातला तसा त्याला परतावा मिळाला असे समजा हवे तर. अगदी विहिर/बंधारा गायब होते तसे झालेय का हो ? मुद्दा समजून घ्या आणि बोला की.
कारण रणरणते उन , वादळ , पाउस , पाणी / वीज टंचाई , प्रदुषण , ट्रॅफिक हा सर्व त्रास सहन करीत लोक येतात व २ , ३ तास स्वताला गंडवून घेतात . यातूनच वास्तवापासून पलायनवादाची भावना वाढीस लागते .
परत तेच. त्यास २५० कोटी घालणारा निर्माता कसा जबाबदार ? हे म्हणजे इतके लोक उपाशी असताना मिठाई बनवायला चितळे इ. हलवायांना लाज नाही का वाटत ? असे म्हटल्यासारखे वाटतेय. तुम्ही भलतीच निराशावादी मांडणी करत आहात आणि तिही सदोष.

भारी आए... पन लय भारी नाय. ट्रॉय बीय च्या तर आसपास बी येत नाय. दुसरा पारट पन फानार... अन असाच काइसा परतिसाद देनार :)

"येथील दर्शकांबद्दल काय वाटते ? " --- मराठी दर्शक / प्रेक्षक हा केवळ १०० , २०० कोटींना व तांत्रिक करामतींना भुलून जाणारयांमधला नाही .तसेच तो चित्रपट / चित्रपट कलाकार / निर्माते / दिग्दर्शक यांना डोक्यावरही चढवणारयां मधला नाही . मराठी प्रेक्षक हा मराठी चित्रपटांच्या बाबतीत खुप चुझी / चोखंदळ आहे . त्यामुळे जे मराठी चित्रपट त्याला काळजाला भिडले नाहीत व क्रुत्रिम वाटले ते मराठी प्रेक्षकांनी नाकारले आहेत . म्हणुन त्याला ग्रुहित धरुन कसे पण मराठी चित्रपट बनवू नयेत . उदाहरणादाखल - सतिश राजवाडे यांचा 'मुम्बई पुणे मुम्बई' जेवढा चालला , तेवढे त्यांचे नंतरचे चित्रपट चालले नाहीत . स्वप्निल जोशीचे 'मुम्बई पुणे मुम्बई' , दुनियादारी जेवढे स्विकारले गेले , तेवढे इतर चित्रपट स्विकारले गेले नाहीत . सचिन खेडेकर यांचे 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ', काकस्पर्श हे जेवढे गाजले तेवढे इतर चित्रपट गाजले नाहीत. -- येथील -->(महाराष्ट्रातील ). तेथिल --> (तामिळनाडू , आंध्रा / दक्षिण भारतीय प्रदेश)--- "त्यास २५० कोटी घालणारा निर्माता कसा जबाबदार ? हे म्हणजे इतके लोक उपाशी असताना मिठाई बनवायला चितळे इ. हलवायांना लाज नाही का वाटत " --- २५० कोटी घालणारा निर्माता हा काही सर्व साधारण नसतो . त्यांची सर्व क्षेत्रांत सर्वांपर्यंत पोहोच असते . हे जे २५० कोटी त्याच्याकडे जास्तीचे असतात ते कोठुन आलेले असतात .यांतील थोडे फार कोटी त्याने हवेत ऊडविले काय किंवा सामाजिक विकासासाठी खर्च केले काय , त्याचे फारसे काहीच बिघडणार नसते .

In reply to by सिरुसेरि

२५० कोटी घालणारा निर्माता हा काही सर्व साधारण नसतो . त्यांची सर्व क्षेत्रांत सर्वांपर्यंत पोहोच असते . हे जे २५० कोटी त्याच्याकडे जास्तीचे असतात ते कोठुन आलेले असतात .यांतील थोडे फार कोटी त्याने हवेत ऊडविले काय किंवा सामाजिक विकासासाठी खर्च केले काय , त्याचे फारसे काहीच बिघडणार नसते .
असले बालिश प्रश्न/विचार पाहून आमचा __/\__ .

In reply to by सिरुसेरि

मराठी दर्शक / प्रेक्षक हा केवळ १०० , २०० कोटींना व तांत्रिक करामतींना भुलून जाणारयांमधला नाही .तसेच तो चित्रपट / चित्रपट कलाकार / निर्माते / दिग्दर्शक यांना डोक्यावरही चढवणारयां मधला नाही . मराठी प्रेक्षक हा मराठी चित्रपटांच्या बाबतीत खुप चुझी / चोखंदळ आहे .
हाच मराठी प्रेक्षक सगळ्या खानावळीच्या बिनडोक चित्रपटांना कसा काय हजार असतो बॉ ?

In reply to by सिरुसेरि

चित्रपट ह्या विषयासंबंधी तुमचे आकलन बघुन धन्य जाहलो या जन्मी. मराठी प्रेक्षकांच्या वतीने त्यांना गृहीत धरून तुम्ही जी विधानं केली आहेत ती वादग्रस्त आहेत हे सांगू इच्छितो. कारण 'मी शिवाजीराजे..' 'दुनियादारी' 'टाइमपास', 'लयभारी' हे तद्दन बाजारू चित्रपट होते. सुरवातीच्या दिवसांत दादा कोंडके व सचिन प्रभृतींचे चित्रपटांनी सिल्वर जुबिल्या दाखवल्यात महाराजा. 'नॉट ओन्ली मिसेस राउत', 'विहिर', 'किल्ला', 'हजाराची नोट' ने नाही. त्यामुळे तुमचे ते चोखंदळ, चुजी मराठी प्रेक्षक कुठे आहेत त्यांचा जरा शोध घेऊन पहा आधी. आणि कपिलमुनि यांनी म्हटल्याप्रमाणे हेच चुजी, चोखंदळ मराठी प्रेक्षक ज्यांना भुलवल्या जाऊ शकत नाही ते खाणावळींच्या चित्रपटांना डोक्यावर घेत आहेत त्याचं काय? तुम्ही म्हणताय अमूक गाजले, तमूक नाही गाजले, गृहीत धरून कसेही चित्रपट बनवू नये वैगेरे. जर यशाचा अचूक फॉर्मुला तुम्हाला कळला आहे तर जे इंडस्ट्रीत आहेत त्यांनाही तो तुमच्या आधीच कळला असेल. पण असे काही होतांना दिसत तर नाही. मुळात चित्रपट बनवणेच जर तुमच्या दॄष्टीने उधळपट्टी आहे तर तुम्ही चित्रपट बनवा असे तरी का सांगताय? की कायम झोपड्यांमधे चित्रीकरण करत गरीबांचे गचाळ आयुष्य दाखवणारेच चित्रपट बनवावे असे तुमचे मत आहे? तिथेही भरपूर लाईट्स लागतात. त्यापेक्षा उघड्या माळरानावर दुपारी बनवावे, महागडे कॅमेरे नको मोबाईल कॅमेरा चालेल. साउंड इंजिनीअरची गरज नाही. मूक चित्रपट बनवू. चांगले कलाकारही नकोत. खूप पैसे घेतात. गाणीपण नकोत, कथा चांगली असली म्हणजे झाले. पण चांगल्या कथेला चांगले पैसे मिळत नाहीत म्हणून कथाकार देणार नाही. प्रसिद्धीला खूप पैसे जातात. कशाला करायची प्रसिद्धी? एवढे कॉस्ट कटींग पुरे की अजून काही करायचे? नाही चित्रपट कसे बनवायचे सांगताय म्हणून विचारले. मग मराठी चित्रपट चालले नाही की बोंब मारायलाही आपण मोकळेच आहोत. हा कसा चांगला, तो कसा जमला नाही अशी चर्चा चघळायला तयार. नाही का? तुमच्या माहितीसाठी सांगतो कुठल्याच मराठी चित्रपटाचा बजेट २ कोटीपेक्षा जास्त जात नाही. (अपवादः लय भारी- ८ कोटी, प्रकाश आमटे- २.५, हरिश्चंद्राची फॅक्टरी- ६ कोटी, इत्यादी. बोटांवर मोजण्याइतके). हे ही टॉपलाईन निर्माते/दिग्दर्शकांबद्दल आहे. ९० टक्के तर २५ लाखाचाही टप्पा पार करत नाहीत. उद्या शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवायचा झालाच तर त्याचे बजेट २०० कोटीच्या आसपासच असेल कारण कथेची गरज आहे म्हणून. निर्मात्याला उधळायचे आहेत म्हणून नाही. तुम्ही म्हणाल एवढा भव्य कशाला बनवायचा? ठिक आहे, शिवाजींची भूमिका करणार्‍याला घरच्या कपड्यात शूट करू. महाल, राजवाडे नकोत. जे भग्न किल्ले आहेत तिथेच मोबाइलने शूट करू. तिथे जायचा खर्च तरी कशाला. एखादं खेळाचं मैदान (असेल तर) घेऊ. ओके? त्या काळाची, पेहरावाची, हत्यारांची, वास्तुंची कल्पना ज्याने त्याने मनातल्या मनात करून घ्या म्हणा कारण आम्हाला पैसे 'उधळायचे' नाहीत. २५० कोटी घालणारा निर्माता हा काही सर्व साधारण नसतो. त्यांची सर्व क्षेत्रांत सर्वांपर्यंत पोहोच असते . हे जे २५० कोटी त्याच्याकडे जास्तीचे असतात ते कोठुन आलेले असतात एक कलाकार व व्यावसायिक म्हणून माझा वरिल विधानांवर जोरदार आक्षेप आहे. चित्रपट व्यवसायाविषयीचे पुर्वदूषित आकस असल्यामुळे कदाचित असे अज्ञानमूलक विचार प्रसवत असावेत. कुठल्याही निर्मात्याकडे स्वतःचे पैसे शिल्लक झालेत म्हणून किंवा चैन करावी म्हणून चित्रपट काढत नसतो. कारण कुणीही पैसे जास्त झाले म्हणून करूया धंदा असे म्हणून व्यवसायात उतरत नसतो. कुणाकडे १००० कोटी आहेत म्हणून बाहुबलीपेक्षा चांगला सिनेमा निघणार नसतो. परताव्यावर डोळा ठेवून केलेली ही एक व्यावसायिक गुंतवणूक आहे. शिल्लक पडलेली रक्कम नाही. मध्यमवर्गीय विचारसरणीच्या लोकांना इथे फक्त खर्च होणारा पैसा दिसतोय. त्याच्यापेक्षा लाखपटीने मौल्यवान अशी हजारो लोकांची मेहनत दिसत नाही. निर्मात्यांनी पैशातून पैसा निर्माण करायचा, रोजगार निर्माण करायचा धवल राजमार्ग (खरे देशकार्य/समाजकार्य) सोडून ज्या लोकांना आपल्या भविष्याची चिंता नाही, नागरी कर्तव्याची फिकर नाही, त्यांच्या परिस्थितीस सर्वस्वी तेच जबाबदार असलेल्या त्यांना हे पैसे पुरवून काय फरक पडणार आहे? मुळात ह्या दोन वेगळ्या क्षेत्रांचा तसा काय संबंध? वरीलप्रमाणे विचार असणार्‍यांना कलाकारांच्या, तंत्रज्ञांच्या कामाची कदर नाही, किंमत नाही. कलाकार्/तंत्रज्ञांनी फुकट राबावे, चांगली गाणी, चित्रपट बनवावे, ते फुकट इंटरनेटवरून डाउनलोड करून ऐकावे, पाहावे अशी काही फुकट्या लोकांची इच्छा असते. स्वतः ज्या व्यवसायात/नोकरीत आहोत ते क्षेत्र सोडून इतर सर्व क्षेत्रातले लोक बसून खातात अशी भावना असते बर्‍याच जणांची. असे बरेच लोक मलाही माझ्या व्यवसायत भेटत असतात. ज्यांना फुकट काम करून हवे असते किंवा लाख रुपये किमतीचे काम दोन-पाच हजारात हवे असते. तेही ते उपकार करून देतोय अशी भावना असते. ही भावना इथूनच येते. उत्तम कलाकारांच्या मौल्यवान कलाकृती ह्या फुकटात, सहज मिळाल्या की असे विचार उपजायला सुरुवात होते. ह्या विचारांना वेळीच विरोध करणे माझ्यादॄष्टीने आवश्यक आहे. मागे डॉक्टरांना मिळणार्‍या फीबद्दल आक्षेप घेणार्‍यांना मी हेच म्हणत होतो की कुणी कमावतंय त्याच्या कमाईवर डोळा ठेवू नये. सिनेमा निर्मिती ही गुंतवणूक नसून उधळपट्टी आहे हे सिद्ध करा. जर जमत नसेल तर इतकंच म्हणतो- गल्ली चुकलं की तुमचं वो.

In reply to by संदीप डांगे

कुठल्याच मराठी चित्रपटाचा बजेट २ कोटीपेक्षा जास्त जात नाही. असे असेल तर त्या हिरो हिरविनीच्या हातात काय पडत असेल? बिचार्‍यांचा खर्च तरी निघत असेल का? २ कोटी म्हणजे काहीच नाहीत. नाही, मी कोणाच्या कमाईवर डोळा ठेवून नाहीये पण त्या मराठी पोरापोरींचा मेंटेन्सचा खर्च तरी निघायला हवा ना! जिम, सत्राशेसाठ कपडे, केस, चेहर्‍याची निगा, चपला, ब्यागा, पर्सा यांचे खर्च, शिवाय हे काही पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करत नसणार. मान्य आहे की शिनेमाचे शूटींग, प्रमोशन्सवेळी खर्च निर्माता करत असेल पण इतरवेळी काय? तळटिप- माझे प्रश्न हे उत्सुकतेपोटी विचारलेत. त्यांचा आणि सिरुसेरी यांच्या प्रतिसादाचा संबंध नाही.

In reply to by रेवती

म्हणच तर ह्या सई आणि राधिका हिंदी मध्ये hunter सारखे चित्रपट करतात ================================================ आजची स्वाक्षरी बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका

In reply to by रेवती

कमाईच्या मानाने जो खर्च ज्या प्रमाणात करणे शक्य आहे तेवढाच केला जाणार. कत्रिना कैफ/प्रियंका येता जाता सहज मर्सिडीज ऑडी घेणार तर सोनाली/सई होंडा सिटी वैगेरे घेणार. त्या गुची/वित्तों वापरणार ह्या आपल्या काहीतरी सॅम्सोनाईट वापरणार. त्यांच्या घरीच दोन-तीन करोडची जीम असणार वर ट्रेनर असणार. ह्या कॉलनीतल्या जीममधे जाणार. त्यांची ब्युटीशियन लाखात फिया घेणार यांची हजारात. शेवटी ज्या प्रमाणात पैसा कमवायचा तसं स्टेटस मेंटन करावं लागतं. जसं स्टेटस मेंटेन केलं तसा पैसा मिळतो. म्हणून कलाकाराला आधीच कुठल्या वर्तुळात काम करायचंय हे नक्की करायला लागतं नाही तर एकदा शिक्का बसला की सुटका होत नाही सहज. म्हणून माधुरी/उर्मिला मराठी चित्रपट करत नाही. राधिका आपटे आता कुठल्या भंगार मराठी सिरियल मधे दिसणार नाही. सई ताम्हणकर तर नाहीच नाही. नवाजुद्दीन सिद्दिकी/इरफान खान आता आता खालच्या वर्तुळात येणारच नाहीत.

In reply to by रेवती

नाना पाटेकर दिलीप प्रभावळकर ह्यांना ढिगाने हिंदी च्या ऑफर्स आहेत म्हणून मराठीची कास नाहे सोडली

In reply to by पाटीलअमित

होय की! पण हिरो आणि हिरविनीचा प्रश्न वेगळा असतो असे वाटते. मी काही या क्षेत्रातील माहितगार नव्हे. भारतातही आजकाल सामान्य मनुष्यासाठी सगळे खर्च भरपूर वाढलेत असे लक्षात आल्याने शेलिब्रिटींबद्दल विचारले होते इतकेच! जास्त माहिती घेऊन काय करणार? जाऊ द्या!

वीज टंचाई , प्रदुषण , ट्रॅफिक हे सर्व त्रास जर लोकांना होत असतील तर त्यांनि सरकार ला जाब विचारावा, सिनेमाच्या दिग्दरशकाला कस काय जबाबदार धरु शकता?

"आणि कपिलमुनि यांनी म्हटल्याप्रमाणे हेच चुजी, चोखंदळ मराठी प्रेक्षक ज्यांना भुलवल्या जाऊ शकत नाही ते खाणावळींच्या चित्रपटांना डोक्यावर घेत आहेत त्याचं काय" -- खान मंडळींचे चित्रपट डोक्यावर घेण्यात तर इतर राज्यांतील प्रेक्षकांचाही मोठा वाटा आहे , मग तो गुन्हा केवळ मराठी प्रेक्षकांवर लादता येणार नाही . "सुरवातीच्या दिवसांत दादा कोंडके व सचिन प्रभृतींचे चित्रपटांनी सिल्वर जुबिल्या दाखवल्यात महाराजा."" -- निखळ विनोदाला मराठी प्रेक्षक नेहमीच दाद देतो . --'मी शिवाजीराजे..' 'दुनियादारी' 'टाइमपास', 'लयभारी' या चित्रपटांना कथा , संगीत , चित्रीकरण ,अभिनय अशा घटकांचा योग्य समन्वय साधता आला . तसेच हे चित्रपट आवडलेले आणी न आवडलेले असे दोन्ही लोक मोठ्या संख्येने आहेत . बाहूबलीच्या बाबतीतही नेमके हेच झालेले आहे . हा चित्रपट आवडलेले आणी न आवडलेले असे दोन्ही लोक मोठ्या संख्येने आहेत . आवडण्याची आणी न आवडण्याची प्रत्येकाची मते , कारणे वेगवेगळी आहेत . आणी प्रत्येक जण हा त्याच्या त्याच्या जागी योग्य आहे . "आम्हाला डिडिएलजे , हम आपके है कौन , कुछ कुछ होता है हे असले हाय फाय चित्रपट आवडले नाहीत . त्यापेक्षा थोडा हळूवार थोडा रफ टफ असा अजय देवगण - काजोल यांचा 'प्यार तो होनाही था' हाच आवडला " असे सांगणारे बरेच जण आहेत . ते त्यांच्या जागी बरोबरही आहेत . -- तर 'नॉट ओन्ली मिसेस राउत', 'विहिर', 'किल्ला', 'हजाराची नोट' हे चित्रपट यामधील काही घटकांमध्ये कुठेतरी कमी पडले . हिंदीमध्ये सूद्धा असे प्रकार झाले आहेत ( गाईड , कागज के फूल ) . जसे की गाईड हा चित्रपट सुरुवातीला लोकांना उमगलाच नाही . २ ,३ वेळा पाहिल्यावर मग प्रेक्षकांना त्यातील अर्थ / आशय समजू लागला . अजुनही समजुन घेत आहेत .

In reply to by सिरुसेरि

मुद्द्यापासून कोलांट्याउड्या? भव्य चित्रपट हे उधळपट्टी आहेत, ते पैसे समाजसेवेसाठी खर्च करावे हा तुमचा मुद्दा होता. सोयिस्कर स्मृतिभ्रंश? कोणते चित्रपट चाललेत आणि त्यामागची कारणे , ते आवडणे, न आवडणे हा सर्वस्वी वेगळा विषय आता घुसडता आहात.

चित्रपट हा भव्य आहे म्हणुन तो सर्वांना आवडलाच पाहिजे हा हट्ट धरण्यात काहीही अर्थ नाही . तसेच एकाला एखादा चित्रपट आवडला म्हणुन तो दुसरयालाही आवडलाच पाहिजे हा अट्टाहास धरून उपयोग नाही . हा चित्रपट आवडलेले आणी न आवडलेले असे दोन्ही लोक मोठ्या संख्येने आहेत . आवडण्याची आणी न आवडण्याची प्रत्येकाची मते , कारणे वेगवेगळी आहेत . आणी प्रत्येक जण हा त्याच्या त्याच्या जागी योग्य आहे . भव्य चित्रपट हे उधळपट्टी आहेत, ते पैसे समाजसेवेसाठी खर्च करावे - हे एखाद्याचे वैयक्तीक मत असू शकते . मग ती दुसरयाला पटोत वा ना पटो . १."चित्रपट बनवणे हे म्हणजे पुस्तक वाचण्याएवढे सोपे काम नाही हे एकदाचे समजून घेतले पाहिजे. एक दहा सेकंदाचा शॉट बघायला आपल्याला दहाच सेकंद जरी लागत असले तरी तो शॉट आपल्यापर्यंत पोचवायला हजारो तंत्रज्ञ, कलाकार आणि व्यावसायिक झटलेले असतात. तो शॉट पर्फेक्ट येण्यासाठी कदाचित त्यांनी शेकडो तास घालवले असतात. एक उडी नीट मारली गेलेली अचूक पद्धतीने येण्यासाठी कदाचित नायकाला अक्षरशः दिवसभर तेच करत राहायला लागलेले असते. पडद्यावर दिसते तेवढे सोपे ते खचितच नसते. तेच काम न थकता, न चिडता, अचूक येण्यासाठी कमालीची सहनशिलता आणि कामामधे अढळ श्रद्धा लागते. तुम्ही आम्ही ज्या सहज भावनेने आणि क्षुल्लक महत्त्व देऊन एखादा चित्रपट बघत असतो त्याच सहजतेने तो तयार झालेला आहे असे आपल्याला वाटत असते. पण तसे नसते."" २."कारण 'मी शिवाजीराजे..' 'दुनियादारी' 'टाइमपास', 'लयभारी' हे तद्दन बाजारू चित्रपट होते." --- जेव्हा तुम्ही वरिल चित्रपटांवर बाजारूपणाचा आरोप करता , तेव्हा या चित्रपटांतील कलाकार , तंत्रज्ञ , सर्व टीम या सर्वांचाच , व त्यांच्या कष्टांचा अपमान करता . मग तेव्हा स्वताच्या सोयीने मारलेल्या दुतोंडीपणाच्या कोलांट्याउड्या चालतात का ?

In reply to by सिरुसेरि

१. तुम्ही परत तेच ते गोंधळ घालताय. चित्रपटाच्या भव्यतेचा आणि व्यक्तिगत आवडीचा काय संबंध? तुमचा पहिला मुद्दा होता की असे भव्य चित्रपट ही पैशाची उधळपट्टी आहे. ते पैसे समाजकार्यावर खर्च करावे. आता तुम्ही व्यक्तिगत आवडीचा, जो कायमच वादातीत आहे असा, अगदी गैरलागू मुद्दा घेताय जो या चर्चेत मांडलाच नव्हता. दोन वेगवेगळ्या मुद्द्यांची केविलवाणी घुसळण करून तुमच्या प्रतिसादांची अवस्था अधिकाधिक वाईट होत जात आहे. तुम्ही आधी म्हणता की मराठी प्रेक्षक असे भव्य चित्रपट स्विकारणार नाहीत. तुम्हाला उदाहरण दिले तर म्हणता की काही लोकांना आवडतं, काहिंना नाही आवडत. अरे काय चाल्लंय तरी काय? चित्रपटाच्या भव्यतेचा, गरिबीचा, हिट/फ्लॉप जाण्याचा, आवडीचा, नावडीचा, अभिरुचीचा, त्या पैशातून समाजकार्य करण्याचा एकमेकांशी मस्त बादरायण संबंध लावून ह्या सगळे मुद्द्यांची खिचडी करून तुम्ही नक्की काय सुचित करू इच्छित आहात? २. बाजारू म्हणजे कमर्शियल/व्यावसायिक ही व्याख्या आहे. तुमची काही वेगळी आहे का? जे बाजारात खपू शकतं असं प्रॉडक्ट बाजारूच असणार. त्यात लागणार्‍या मेहनतीचा अपमान कुठे होतोय? तीन प्रकारचे चित्रपट असतात. एक कलात्मक - आर्ट फिल्म आणि दुसरे बाजारू - कमर्शियल - व्यावसायिक. तीसरे समांतर. आर्ट्फिल्म मधे सर्व निर्णय दिग्दर्शकाच्या हाती असतात. त्याला काय आवडेल तेच तो बनवतो, पब्लिकला काय आवडेल त्याचा विचार होत नसतो. बाजारू-व्यावसायिक चित्रपटात दिग्दर्शकासह इतर टीम आपले उच्च कौशल्य/ज्ञान वापरून पब्लिकला काय पाहायला आवडेल याचा अंदाज घेऊन अभ्यास करून चित्रपट बनवत असतो. चित्रपट उद्योग हा व्यवसाय आहे. तो बाजारू असणारच. बाजारू म्हटला म्हणजे त्यात मेहनत लागत नाही असं काही आहे का? उलट त्यातच जास्त मेहनत लागते. मी तो शब्द त्या मराठी प्रेक्षकांना उद्देशून वापरला आहे ज्या (तुमच्या मते) चुजी, चोखंदळ, अभिरूची संपन्न वैगेरे प्रेक्षकांनी हे चित्रपट डोक्यावर घेतले. कोर्ट सारखा चित्रपट डोक्यावरून जाणारे टाइमपास ला भरभरून प्रतिसाद देतात. म्हणजे बाजारात टाइमपास सारख्या चित्रपटांची मागणी आहे. जो चित्रपट 'मास'ला आवडतो त्याला बाजारू म्हटले तर कुणाचा अपमान झाला? असो. शब्दांचे खेळ करून तुमचा मूळ मुद्दा तुम्ही विसरून जाऊ नका. लक्षात आहे ना "भव्य चित्रपट नको, समाजकार्य हवे"? आधी आपले प्रतिसाद नीट करा मग दुसर्‍यांची पिसं काढा.

In reply to by सिरुसेरि

भव्य चित्रपट हे उधळपट्टी आहेत, ते पैसे समाजसेवेसाठी खर्च करावे
हे तुमचे वैयक्तीक मत आहे . गुड ! पण हे तुम्ही सार्वजनिक पटलावर मांडला आणि त्याचा समर्थन केलात की की प्रतिवाद होणार

"हे तुमचे वैयक्तीक मत आहे . गुड ! पण हे तुम्ही सार्वजनिक पटलावर मांडला आणि त्याचा समर्थन केलात की की प्रतिवाद होणार" "आता तुम्ही व्यक्तिगत आवडीचा, जो कायमच वादातीत आहे असा, अगदी गैरलागू मुद्दा घेताय जो या चर्चेत मांडलाच नव्हता. " --- सार्वजनिक पटलावर बहुतेकजण आपापले व्यक्तिगत / वैयक्तीक मत / द्रुष्टीकोणच मांडत असतो. त्या प्रमाणे मी आपले वैयक्तीक मत मांडले . व पुढील प्रतिसादांतून त्याबद्दल उपस्थित झालेल्या शंकांना उत्तरे देताना या मताबद्दलचे विचार मांडले . "असो. शब्दांचे खेळ करून तुमचा मूळ मुद्दा तुम्ही विसरून जाऊ नका. लक्षात आहे ना "भव्य चित्रपट नको, समाजकार्य हवे" -- या बद्दल मी लिहिलेच आहे . भव्य चित्रपट हे उधळपट्टी आहेत, ते पैसे समाजसेवेसाठी खर्च करावे - हे एखाद्याचे वैयक्तीक मत असू शकते . मग ती दुसरयाला पटोत वा ना पटो . "बाजारू म्हणजे कमर्शियल/व्यावसायिक ही व्याख्या आहे. तुमची काही वेगळी आहे का " --इथे शब्दांचे खेळ कोण खेळत आहे ? आधी नको ते शब्द वापरायचे आणि नंतर सारवासारव करून त्याचे केविलवाणे समर्थन करायचे हा प्रकार जूना झाला . स्वताच्या आवडत्या चित्रपटांच्या तंत्रज्ञांची भलावण करायची आणी नावडत्या चित्रपटांना बाजारू संबोधून त्यातील तंत्रज्ञांची , त्यांच्या कष्टांची हेटाळणी करायची . आणी हा दुटप्पीपणा ढोंगीपणा उघडकीस आला की शब्दांची फिरवाफिरव करून पळवाट काढायची आणी वारा येईल तशी पाठ फिरवायची . अशा दुतोंडीपणाला काय बोलणार

In reply to by सिरुसेरि

सार्वजनिक पटलावर बहुतेकजण आपापले व्यक्तिगत / वैयक्तीक मत / द्रुष्टीकोणच मांडत असतो. त्या प्रमाणे मी आपले वैयक्तीक मत मांडले . व पुढील प्रतिसादांतून त्याबद्दल उपस्थित झालेल्या शंकांना उत्तरे देताना या मताबद्दलचे विचार मांडले . >> वैयक्तिक मताचे स्वागतच आहे. फक्त ते मराठी प्रेक्षकांचे सार्वजनिक मत आहे असे म्हणून खपवणे योग्य नाही. व्यक्तिगत दृष्टीकोण सार्वजनिक पटलावर मांडल्यावर त्याबद्दल अधिक विचारणा होणारच. त्यातून एखाद्याचा दॄष्टीकोण कितपत अभ्यासावर, निरिक्षणावर आधारित आहे की बस दिले ठोकून टाईप आहे हे उघडकीस येते. आपल्या दृष्टीकोणास साजेसे स्पष्टीकरण विचार मांडणार्‍याकडून अपेक्षित असते. टाळाटाळ नाही. भव्य चित्रपट हे उधळपट्टी आहेत, ते पैसे समाजसेवेसाठी खर्च करावे - हे एखाद्याचे वैयक्तीक मत असू शकते . मग ती दुसरयाला पटोत वा ना पटो . >> हे तुमचे वैयक्तिक मत आहे. ओके. मग त्याचे बील तमाम मराठी प्रेक्षकांवर का फाडले? आपले वैयक्तिक मत सार्वजनिक मत आहे असे कुठल्या निकषांवर आपणास वाटले? स्वताच्या आवडत्या चित्रपटांच्या तंत्रज्ञांची भलावण करायची आणी नावडत्या चित्रपटांना बाजारू संबोधून त्यातील तंत्रज्ञांची , त्यांच्या कष्टांची हेटाळणी करायची . आणी हा दुटप्पीपणा ढोंगीपणा उघडकीस आला की शब्दांची फिरवाफिरव करून पळवाट काढायची आणी वारा येईल तशी पाठ फिरवायची. अशा दुतोंडीपणाला काय बोलणार >> मला कुठले चित्रपट आवडतात आणि कुठले आवडत नाहीत हे तर मी बोललोच नाही. ज्यांची उदाहरणे दिली त्यातले कित्येक तर मी पाहिले सुद्धा नाही. माझी विधाने त्या चित्रपटांना मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादांवर आधारित आहेत. व्यक्तिगत मत नव्हे. उलट तुमची व्यक्तिगत मते समाजावर लादून आपण फार समाजाभिमुख व थोर विचारवंत आहोत हा जो आव आणता आहात तो हास्यास्पद आहे. 'भव्य चित्रपट हे उधळपट्टी आहेत' हे विधान अतिशय बालिश आणि अभ्यासहिन तर आहेच त्यातून गरिबांचा खोटा कळवळा दाखवण्याचा प्रयत्नही केविलवाणा आहे. शिवाय ते बुद्धीभ्रम निर्माण करून सकारात्मक घटनांना नकारात्मक लेपन करणारे आहे. २५० कोटींतून ज्यांना रोजगार मिळाला त्यांना तुमची ही मते कशी वाटतील याबद्दल थोडा विचार करून बघा. तुमच्या कुठल्याच मुद्द्याबद्दल तुमच्याकडे कसलेही समर्थन नाही. कोण ढोंगी, कोण दुटप्पी हे ठरवण्याचा तुमचा वैयक्तिक अधिकार मान्य आहे. पण त्याने सिद्ध काहीच होत नाही हे सत्य आहे. चर्चेबद्दल धन्यवाद!

माझे वैयक्तीक मत हे माझ्या वैयक्तीक विचार / अनुभव / निरिक्षण यांवर आधारीत आहे . कुणा दूतोंडी इसमाने टुकार दमबाजी , भंपक दमदाटी व पुचाट अरेरावी केली म्हणून मी ते बदलणार नाही. माझ्या प्रतिसादातून मी मराठी प्रेक्षकांचे , मराठी सिनेमांचे , मराठी तंत्रज्ञांचे कौतूक केले आहे . तुमचा मात्र मराठी सिनेमांवर , मराठी तंत्रज्ञांवर त्यांच्या यशाबद्दल असणारा राग , जळफळाट , दूटप्पीपणा बाहेर पडला आहे . एकिकडे सिनेमा बनविण्यामागील तंत्रज्ञांचे कष्ट यांवर गळा काढायचा व दुसरीकडे वरील सिनेमांना हिणवून त्यातील तंत्रज्ञांच्या कष्टांचा अपमान करायचा , व परत त्याचेच रेटून समर्थन करायचे यांतून तुमच्या दूतोंडीपणाबरोबरच तुमचा निर्ढावलेपणा ही उघडकीस आला आहे . दूसरयाला दांभिकपणे अक्कल शिकवण्यापेक्षा स्वताचा फालतू दूटप्पीपणा कमी करा . कुणा दूतोंडी इसमाकडून बिनकामाची अक्कल शिकण्याइतके बूरे दिन सुदैवाने आलेले नाहीत .