✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जेनेसिस (शतशब्दकथा)

स
सटक यांनी
गुरुवार, 07/16/2015 - 02:01  ·  लेख
लेख
तो अगदी दमून गेला होता!! त्याने सस्तन, कीट, सरिस्रुप, मत्स्य, उभयचर, पक्षी ह्या सगळ्यांचे जीन्स वापरून काहीतरी बनवले होते. उत्सुकता म्हणून त्याने बायो-इलेक्ट्रिसिटि चालू केली. अत्यंत बेंगरुळ असा तो जीव तसा बरा दिसत होता. त्यांच्या नियमांनुसार प्रत्येक संरचनेला एक "किल स्विच" लावणे आवश्यक होते. त्याच्या जवळच काम करणार्या त्याच्या मित्राला त्याने विचारले की त्याच्याकडे काही आहे का ज्याने ही रचना "फेल शुअर" होईल.... तू बनवले आहेस ना ते...मग का चिंता करतोस...मरेलच ते आपल्या कर्माने....माझा उद्या "शो" आहे...तू बिंधास पहिली बॅच लाव बरे.....डान्स "प्रॅक्टिस" करणारा शंकर शांतपणे उत्तरला...नाचावरून आपले लक्ष किंचितही ढळू न देता!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
कथा
विडंबन
विनोद

प्रतिक्रिया द्या
2917 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

बापरे... मस्तं इण्टरेस्टिंग

पद्मावति
गुरुवार, 07/16/2015 - 02:33 नवीन
बापरे... मस्तं इण्टरेस्टिंग कॉन्सेप्ट. शंकर..डान्स शो म्हणजे..... तांडव नृत्य....जगाचा अंत?
  • Log in or register to post comments

चान्गली कथा.

अरुण मनोहर
गुरुवार, 07/16/2015 - 07:38 नवीन
चान्गली कथा.
  • Log in or register to post comments

मस्त! हटके काॅन्सेप्ट!देवाची

जडभरत
गुरुवार, 07/16/2015 - 08:28 नवीन
मस्त! हटके काॅन्सेप्ट!देवाची सुद्धा आज पहिल्यांदाच भीति वाटली.बाद्वे तो क्रीएचर म्हणजे मनुष्यच का? कारण कर्म सिद्धांत फक्त मनुष्यालाच लागू होतो. सक्काळ सक्काळी चांगलाच घाम फोडलात!
  • Log in or register to post comments

!!

खेडूत
गुरुवार, 07/16/2015 - 08:59 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मस्त कल्पना!

अजया
गुरुवार, 07/16/2015 - 09:10 नवीन
मस्त कल्पना!
  • Log in or register to post comments

आपल्या

ऋतुराज चित्रे
गुरुवार, 07/16/2015 - 10:26 नवीन
कल्पकतेला दाद देतो
  • Log in or register to post comments

जिनेसीस ही स्कायनेट है...

द-बाहुबली
गुरुवार, 07/16/2015 - 11:44 नवीन
जिनेसीस ही स्कायनेट है...
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!

सटक
गुरुवार, 07/16/2015 - 18:51 नवीन
मला जरा भितीच होती! विनोद स्वीकारला जातोय की नाही...
  • Log in or register to post comments

हाहा!

पैसा
गुरुवार, 07/16/2015 - 21:30 नवीन
मस्त आहे कल्पना!
  • Log in or register to post comments

एकदम हटके कल्पना. आवडली!

रातराणी
गुरुवार, 07/16/2015 - 23:50 नवीन
एकदम हटके कल्पना. आवडली!
  • Log in or register to post comments

+१

अमृत
Fri, 07/17/2015 - 10:06 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

जमली

नाखु
Fri, 07/17/2015 - 10:31 नवीन
ज्याम जमलीय ही कल्पना !!!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा