तो अगदी दमून गेला होता!!
त्याने सस्तन, कीट, सरिस्रुप, मत्स्य, उभयचर, पक्षी ह्या सगळ्यांचे जीन्स वापरून काहीतरी बनवले होते. उत्सुकता म्हणून त्याने बायो-इलेक्ट्रिसिटि चालू केली. अत्यंत बेंगरुळ असा तो जीव तसा बरा दिसत होता. त्यांच्या नियमांनुसार प्रत्येक संरचनेला एक "किल स्विच" लावणे आवश्यक होते. त्याच्या जवळच काम करणार्या त्याच्या मित्राला त्याने विचारले की त्याच्याकडे काही आहे का ज्याने ही रचना "फेल शुअर" होईल....
तू बनवले आहेस ना ते...मग का चिंता करतोस...मरेलच ते आपल्या कर्माने....माझा उद्या "शो" आहे...तू बिंधास पहिली बॅच लाव बरे.....डान्स "प्रॅक्टिस" करणारा शंकर शांतपणे उत्तरला...नाचावरून आपले लक्ष किंचितही ढळू न देता!
वाचने
2930
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
बापरे... मस्तं इण्टरेस्टिंग
चान्गली कथा.
मस्त! हटके काॅन्सेप्ट!देवाची
!!
मस्त कल्पना!
आपल्या
जिनेसीस ही स्कायनेट है...
सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
हाहा!
एकदम हटके कल्पना. आवडली!
+१
In reply to एकदम हटके कल्पना. आवडली! by रातराणी
जमली