Skip to main content

शतशब्द कथा - सुट्टी

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 16/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
“अगं, मांढरे बाई आजपासून एक आठवड्याच्या सुट्टीवर आहेत. तुही येणार नाही असे चक्क फोनवर सांगतेस. प्ले स्कूलमध्ये लहान मुले आहेत. त्याना कोण सांभाळणार?” “बाई, आई आजारी आहे, तिचे मलाच बघावे लागते. तिला अंथरुणातून बाहेर तर पडूदे. तीन चार दिवस तर मी हलुच शकणार नाही. कर्मचाऱ्यांच्या रोजच्या नाटकांनी इरावती वैतागली होती. तिने नुकतेच काढलेले प्ले स्कूल. कशीबशी मुले यायला लागलेली. त्यांच्याकडे निट लक्ष पुरविले नाही तर मोठा घोळ! काय करायचे? आठवडा तरी ढकलायला हवा. इरावतीने भराभरा पालकांना फोन केले. “आय एम सॉरी, पण उद्यापासून आठ दिवस मुलांना शाळेत पाठवू नका प्लीज. एका मुलाला चिकुन गुन्या झालेला आहे. काळजी म्हणून हे आवश्यक आहे.” --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4489
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

कल्पक शेवट असलेली कथा आवडली. बादवे माझ्या माहितीप्रमाणे या रोगाचे नाव चिकुन गुन्या असे आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

सम्पादन साठी विनन्ती पाठविली आहे. सन्पादकान्ची यादी कोठे मिळेल?

In reply to by अरुण मनोहर

आता या कामासाठी सासमं सदस्यांचे साहाय्य घेऊ शकता. प्रतिसादात बदल करून हवे असल्यास संमंला संपर्क करावा.

In reply to by अमृत

मी २००६ साली वाचलेल्या एका वृत्त्पत्रीय लेखामध्ये चिकुन गुन्याचा आपल्याकडील अपभ्रंश म्हणजे चिकन गुनिया असे वाचले होते. मिपावरील डॉक्टर्स याबाबत अधिक खात्रीने सांगू शकतील.

In reply to by श्रीरंग_जोशी

स्पेलिंग Chikungunya असल्याने चिकुनगुन्या असे देवनागरीकरण केले जात असावे. विकिपीडिया त्याचा उच्चार chi-kən-guun-yə चि-कन-गून्-य(या) असा दाखवते. आपल्या जिभेला जे सोयिस्कर वाटेल, ते म्हणावे. :)

कल्पक शेवट. कथा आवडली. (असल्या कथा वाचल्या की कोणकोणत्या संस्थांवर विश्वास ठेवणं बंद करायचं ते कळत नाही :-( )

: )

आणि सूचकही !!! पुलेशु

बाई लईच इन्नोवेटीव हाईत. (आमच्या पंकनीत कष्टंबरला थुका लावायचं काम येकदम झ्याक जमंल त्यांला)

भारिच दिसतायत बाइ....

गोष्ट आवडली, (खूप दिवसांनी आलात हरुन भाई..) स्वाती

..एका मुलाला चिकुनगुनिया झाला तर त्या मुलाला पाठवू नका हे पटू शकेल.. पालक त्याला तसेही पाठवणार नाहीत..इतर सर्वांना का "पाठवू नका" हे पटावे? ..की मी नीट वाचलं नाहीये? ..किंवा जर एरियात/वर्गात डास आणि वाईट कंडिशन असल्याने इतरांनाही आजार होईल अशी शक्यता खुद्द चालक बोलत असतील तर मोठाच रेप्युटेशन लॉस आहे..

In reply to by गवि

असे पाहण्यात आले आहे की एका भागात साठीचा रोग झाल्याचे कळले की लोक जास्तच काळजी घ्तेतात. विशेषत: लहान मुलांविषयी. प्ले स्कूल मध्ये येणार्या एखाद्याला काही साठीचा आजार झाला तर पालक आपणहूनच मुलांन्ना पाठवित नाहीत. ह्याच भीती वर ही कथा आधारित आहे.

कथा आवडली. तुमचे पूर्वीचे लिखाण देखिल आवर्जून वाचायचो.