Skip to main content

मिड-ब्रेन अ‍ॅक्टीवेशनः सत्य की फसवणूक?

लेखक संदीप डांगे यांनी बुधवार, 08/07/2015 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिड-ब्रेन अ‍ॅक्टीवेशनचा सांप्रत काळात देशभर धुमाकूळ सुरु आहे. दुवा १ दुवा २ दुवा ३ वय वर्ष पाच ते पंधराच्या मुलांना दोन दिवसीय शिबीरामधे ध्वनी व ब्रेन-जिम द्वारे खास प्रशिक्षण देऊन त्यांच्या मध्य-मेंदूला अ‍ॅक्टीवेट करण्यात येते. ही मुले चमत्कार झाल्यासारखी अचानक डोळे बांधून रंग, आकडे, अक्षरं, वस्तू, आकार ओळखायला लागतात. ह्यामुळे मुलांच्या संवेदनाक्षमता वाढतात, कल्पनाशक्ती वाढते असं म्हटलं जातं. पाकिटात ठेवलेल्या नोटेचा नंबर अचूक सांगतात, अगदी पलिकडल्या खोलीत काय चाललंय तेही (हे जरा विचित्र आहे, नाही का?) दरवाजावर बेल कोण मारतंय तेही. मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढते. मुलं मार्क्स अधिक मिळवायला लागतात असा ह्या लोकांचा दावा आहे. याचे शुल्क सुमारे १५००० ते २५००० रुपये आहे. धमाल म्हणजे हे प्रात्यक्षिक मी स्वतः उपस्थित राहून बघितलंय. नाशिकमधे माझं जिथे ऑफीस होतं, त्याच्या मालकाने स्वतःच ह्याची फ्रँचायजी घेतली आहे. स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असल्या हरकती ही छोटी छोटी पोरं करतात. हे सगळं थोतांड आहे की काय असं कदाचित वाटूही शकेल. प्रात्यक्षिक दाखवणारे सगळं नाटक वठवत असतील असंही तुम्हाला वाटेल. पण... एका चुकार क्षणी मी अगदी बुचकळ्यात पडलो. प्रात्य़क्षिकासाठी उभ्या असलेल्या ४ मुलांना त्यांचे 'ते' सर काय काय सूचना करत होते. चेंडूचा रंग ओळख, माझ्या हातात काय वस्तू आहे ओळख, एखाद्या माणसाचा पाठलाग करून दाखव. आणि हे सर्व डोळे गच्च बंद करून. अशाच घाईघाईत चाललेल्या सूचनांमधे एका १३ वर्षांच्या मुलीला काहीतरी वस्तू द्यायला कुणा प्रेक्षकाला सांगितले, तो प्रेक्षक मी नव्हतो. पण मी पुढच्याच रांगेत असल्याने पुढच्या प्रात्यक्षिकासाठी मी सहज नोट काढायला माझे पाकिट बाहेर काढले. पुढच्या सेकंदाला ती पोरगी बोलली - ब्राऊन कलरचं वॅलेट. आणि मी धक्का बसून ते वॅलेट तसंच धरून बसलो. च्यायला ह्या पोरीला हे ५ फुटांवरचं वॅलेट कसं दिसलं? तीच्या डोळ्यांचा अँगल आणि माझ्या पाकीटाचा अँगल यात कितीही चोरून पाहिलं तरी ते दिसेल अशी काहीच शक्यता नव्हती. परत ते वॅलेट सोकॉल्ड अ‍ॅक्टमधे अजिबात समाविष्ट नव्हतं. मी ते काढणार आहे हे फक्त मलाच माहिती होते. आणि तीने ते शब्द उच्चारले ते फक्त मीच ऐकले कारण खूप आवाज आणि गोंधळ सूरू होता वेगवेगळ्या सूचनांचा. त्याच अ‍ॅक्टीवेशन फ्रँचायजीवाल्याने एका शाळेत या मुलांचं प्रात्यक्षिक दिले. त्यात शाळेच्या मुख्याध्यापकाने त्यांना आव्हान दिले की आमच्या खेळाच्या मैदानात काय चाललंय हे ही मुलगी सांगू शकेल का. तर म्हणे त्या मुलीने मैदानात काय चाल्लंय ते तर सांगितलंच वर मैदानाच्या बाहेरून जाणार्‍या रस्त्यावरच्या एका माणसाचा पेहरावही अचूक सांगितला. (अंतर ५०० मिटर्स) हे सगळं डोळे बांधून. झालंना, मुख्याध्यापक फ्लॅट आणि त्याला त्या विंटरनॅशनल शाळेची अधिकॄत एजंसी म्हणून मान्यता मिळाली. नंतर नेटवर वाचलं तर हे सगळं थोतांड आहे, ती मुलं लपून पाहतात, तिरके डोळे करून पाहतात असं काहीसं विरोधी मत आढळलं. अजुन बरंच काय काय. कुणाला याची योग्य वैज्ञानिक बाजू माहिती आहे का? अंनिस व बालमानसशास्त्रज्ञांचं काय मत आहे? कुणाच्या मुलांना याचा प्रत्यक्ष अनुभव आहे का? (ढिस्क्लेमरः ही कुठल्याही तर्‍हेने मिड-ब्रेनवाल्यांची जाहिरात नसून माझ्या अनुभवापरांतही या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही. वाचकांनी आपआपल्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करावा. या विषयावर सर्व बाजूने उचित चर्चा व्हावी. )

वाचने 42780
प्रतिक्रिया 160

प्रतिक्रिया

In reply to by जडभरत

टकासाहेब म्हणतायत तशा ह्या गूढ शक्ती अस्तित्वात असायला हव्या ना? नाही का? त्यामुळे जे दावा करतायत त्यांचा तपासून पाहायला काय हरकत आहे? गूढ शक्ती वैगेरे काही नसते हो. जे सर्वसामान्यांच्या बुद्धीच्या आवाक्यात नसते पण घडतांना दिसते ते गूढ. जे आवाक्यात आहे आणि समजू शकते ते का गूढ म्हणायचं?

काही शंका. हे कोर्स चालवणार्‍या व्यक्तिंचे वय किती असते? ते वयाच्या कितव्या वर्षी ही विद्या शिकले? हा कोर्स केल्यावर एखाद्या मुलाची अभ्यासातील प्रगती प्लॅसिबो नसेल कशावरुन ?

In reply to by ऋतुराज चित्रे

अगदी रास्त शंका चित्रेसाहेब, मलाही हेच प्रश्न पडलेत. हे शिकवणारे कुठून येतात, ते कोण आहेत, त्यांना हे कोणी शिकवले आणि एवढे पैसे घेण्यासारखे त्यात काय मोठे आहे इत्यादी. ही सकारात्मक शिकवण देणारी विद्या आहे त्यामुळे प्लॅसिबो म्हणणं जरा गुंतागुंतीचं आहे. मनाला उभारी यावी, एकाग्रता वाढावी, कसलेही भय राहू नये म्हणुन काही क्रिया (जसे स्वसंमोहन वैगेरे) हे लोक करत असतील तर ते नेमकं प्लॅसिबो आहे हे कसं समजायचं? कारण प्लॅसिबो म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे खोट्या साधनांद्वारे मिळणारे मानसिक समाधान. इथे थेट मानसिक समाधानच उत्पादन आहे या कोर्सचं. तुमचे प्रश्न मी अंतर्भूत केलेत. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

डांगे साहेब जमल्यास अजून एक करा. साधारण पणे २००५ ला अ‍ॅबॅकसचे असेच फॅड आलेले. सध्या काय चालूय त्यांचे माहीत नाही पण जवळपास अशाच अशक्य गणिती क्रिया क्षणार्धात करणे. तोंडी मोठ्या आकडेमोडी करणे वगैरे. त्या कोर्सेस चा किती फायदा दहावी बारावी च्या परिक्षेला झाला. अथवा त्या अ‍ॅबॅकस ट्रेनिंग मुळे एखादे करीअर अचिव्ह केले (नवीन अ‍ॅबॅकस ट्रेनिंग सेंटर ऊघड्ण्याखेरीज) याचा शोध घेतला तर बरीच उत्तरे मिळतील.

काही हजार रुपये देऊन करण्याचे जे कोर्सेस असतात, त्यात एक सोय(?) दिलेली असते, ती म्हणजे तुम्ही तो कोर्स केल्यावर जेवढे नवीन गिर्‍हाईक आणून द्याल, तेवढे कमिशन तुम्हाला मिळत जाते, म्हणजे समजा वीस हजाराचा कोर्स केल्यावर नंतर दर गिर्‍हाइकामागे एक हजार परत मिळत गेले, की वीस गिर्‍हाइके आणल्यावर तुमचे पैसे वसूल झाले. ओळखीच्या लोकांनी केलेली घरगुती शिफारस विश्वसनीय वाटते, आणि जास्त जास्त गिर्‍हाईक मिळत जातात. या प्रकारे केले जाणारे अनेक धंदे असतात, त्यात तथाकथित अद्भुत शक्ती वगैरेंपासून लाख रुपयात गादी विकणे (तिला गादी न म्हणता 'कंप्लीट स्लीपिंग सिस्टम' म्हणायचे), अमूक एक मंत्र म्हणून जागृत होणार्‍या अध्यात्मिक शक्ती, असे कित्येक प्रकार असतात. दिल्ली भागात एक प्रकार खूप बोकाळलेला आहे, तो म्हणजे अपेक्षित फायदा झाला की त्यातले अमूक टक्के द्यायचे (किंवा उदाहरणार्थ मुलीचे लग्न ठरणे, नोकरी लागणे, कोर्ट केस जिंकणे वगैरे एका महिन्यात झाले, तर अमूक रक्कम देऊ) ठरावीक मुदतीत फायदा झाला नाही, तर टक्केवारी/रक्कम वाढवत जायची, वगैरे. पैसे शेवटी कुणाला पोहोचतात, हे कडेकोट रहस्य असते. धागाकर्त्याने त्या मुलांच्या पालकांना भेटताना हा मुद्दाही ध्यानात ठेवावा.

तुम्ही तो कोर्स केल्यावर जेवढे नवीन गिर्‍हाईक आणून द्याल, तेवढे कमिशन तुम्हाला मिळत जाते, म्हणजे समजा वीस हजाराचा कोर्स केल्यावर नंतर दर गिर्‍हाइकामागे एक हजार परत मिळत गेले, की वीस गिर्‍हाइके आणल्यावर तुमचे पैसे वसूल झाले. ही पद्धत गटविलेल्या गिर्‍हाईकाचे (आपल्या धंद्याचा फुकट जाहिरातदार होण्यासाठी) ब्रेन अ‍ॅक्टिवेशन करायला फार उपयुक्त आहे हे मल्टि-लेवल-मार्केटिंगने पुरेपूर सिद्ध केलेले आहे ! ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

किडन्या बर्‍या झाल्या की चालायला येते. छान... ड्न्यानात भर प्डलि

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

समूह उन्मादाचे वातावरण तयार करुन पेशंटला त्या अवस्थेत नेण्यात येते. तो त्या उन्मादाच्या प्रभावात आला की तो आपल्या वेदना, दु:ख विसरतो. काही काळ त्याला बरे वाटते. आधुनिक उपचाराचा खर्च, त्याच्या मर्यादा पहाता फेथ हीलिंग कडे माणुस न वळला तरच नवल. रोगमुक्ती झाली नाही पण मेंदुला व पर्यायाने शरीराला बर वाटत असेल तर ती रोगमुक्ती का मानू नये असा पेशंट विचार करतो. माणसाला अमर थोडेच व्हायचे आहे? यातच त्या फेथहीलिंग वाल्यांच यश आहे. असो!

डांगे साहेब, हा विषय या ठिकाणी चर्चे साठी निवडल्या बद्दल धन्यवाद. मी मिसळपाव चा नियमित वाचक आहे आणि मला असे आढळून आले आहे कि मिसळपाव वर शक्यतो आपले विचार सडेतोड आणि आपल्या प्रतिक्रिया सारासार विचार करून दिलेल्या असतात. असो..., मध्य मेंदू सक्रियिकरन या प्रकाराबद्दल या लेख पूर्वी मला अजिबात काही माहिती नव्हते, या लेखाच्या निमित्ताने या गोष्टी मला समजल्या आणि अंतर्जालावर या बद्दल माहिती चाळली आणि या प्रकाराबद्दल बरेच कुतूहल जागृत झाले. माज्या आसपास शोध घेतला असता अश्या कुठल्याच सौस्थेची इथे शाखा नाही असे समजले. आपल्याला जर खरोखर अश्या विद्यार्थ्यांना अभ्यासायला मिळाले तर कृपया खालील मुद्दे जरूर विचारात घ्यावेत … १. चौकशी निपक्षपाती पद्धतीने करावी, म्हणजे चौकशी साठी जाताना पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन बाजूला ठेवावा. २. या गोष्टीमध्ये नक्की कुठले विज्ञान आहे हे समजावून घ्यायला हवे. (या सौन्स्था विद्यार्थ्यांच्या पाच ज्ञानेंद्रियांना जागृत करण्याचा दावा करतात (दृष्टी, गंध, स्पर्श, चव, ध्वनी) गंधाने विद्यार्थी रंग ओळखतात तर स्पर्शाने त्या वस्तूचा आकार वगरे वगरे.) ३. एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याकडील एखाद्या वस्तूचा (एखादी वस्तू जी फक्त तुम्हालाच माहिती असेल प्रेक्षकांना नाही आणि आयोजकांना तर आजीबात नाही) फक्त रंग ओळखण्यास सांगावे (उदाहरणार्थ खेळाच्या ५२ पत्त्यांमधील एखादा पत्ता), आणि दुसर्यास त्याच वस्तूच्या केवळ स्पर्शाने त्या वरील मजकूर ओळखण्यास सांगावे (या वेळी त्या विद्यार्थ्याने आपल्याकडील वस्तू नाकाजवळ नेता कामा नये) ४. केवळ विशिष्ट वयोगटातील विद्यार्थीच या प्रशिक्षणासाठी पात्र का आहेत यामागचे विज्ञान काय आहे? ५. खरोखर अश्या प्रशिक्षनांमध्ये तथ्य असेल तर जी मुले बौद्धिक दृष्ट्या दुर्बल आहेत (गतिमंद किवा मतीमंद) अश्या मुलांना हे प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणता येईल का? ६. अश्या पद्धतीने कार्यक्षम केलेला मध्य मेंदू भविष्यात किती वर्षे कार्यक्षम राहील. आपण नक्कीच यातील तथ्य लवकरात लवकर आमच्या समोर मांडाल अशी अपेक्षा करतो, आपल्याला शुभेच्छा धन्यवाद, पुणेकर

In reply to by पुणेकर भामटा

Thank you. Intention of this thread is awareness only. If we are aware and discussed these kind of things before accidental encounter of such demos - practices, we can be well prepared to counter attack such frauds. And help weak mentality people to stay away from this Who have habit of falling for crooks

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र फेब्रुवारी २०१५ च्या अंकात फसवे मिडब्रेन अशी डॉ प्रदीप पाटील सांगली यांची एक कव्हर स्टोरी आहे.सांगलीत ही असे एक सेंटर चालू झाले होते. त्यात नाशिक येथेही या एम्बीए वाल्यांना आव्हान देण्यात आले होते असे म्हटल आहे. अंनिस कशा पद्धतीने चाचणी घेउ इच्छिते हे लेखात नमूद आहे. तसेच या एमबीए वाल्याना आव्हान पण आहे. संदीपजी हा लेख तुम्हाला अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे.

एक छोटीशी चाचणी करता येईल. जर हि मुले डोळ्यावर पट्टी बांधून नोटेवरचा क्रमांक ओळखतात तर त्यांना मिट्ट काळोखात सुद्धा हे करता यायला हवे. जर पाहायचेच नाही तर प्रकाशाची काय गरज? आणि या नियमामुळे चोरून पाहणे, रुमालाखालून पाहणे, इतर कोणीतरी संकेताने सांगणे या बाबी वजा करता येतील.

संदीप डांगे साहेब .माझ्या ३ शंका आहेत १. लहान मुलेच का ? मोठ्या माणसांच शिबीर का नाही ? २. ह्यात तिसरा नेत्र activate करतात का ते ? भारतीय योगशास्त्रामध्ये गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तिसरा नेत्र activate करता येतो . स्वताच्या मनाने उद्योग केला तर त्याचे होणारे परीणाम dangerous असतात . काही दिवसांनंतर असे dangerous परिणाम मुलांमध्ये दिसू लागले तर हे लोक त्याची जबाबदारी घेतात का ? ३. अंधळ्या मुलांना ह्याचा फायदा होऊ शकतो का ? ध्वनी व ब्रेन-जिम द्वारे खास प्रशिक्षण देऊन त्यांच्या मध्य-मेंदूला अ‍ॅक्टीवेट करण्यात येते>>> मग हा ध्वनी आपण रेकॉर्ड करून आणि ब्रेन-जिम चा व्यायाम शिकून घेवून आपल्या मुलांचा ब्रेन activate केला तर ? त्यासाठी २०-२५ हजार कशाला घालवायचे ? कोणाला असं काही उदाहरण माहिती आहे का जिथे एखाद्या कट्टर बुद्धीवाद्याने एखाद्या दाव्याला आव्हान दिलं पण नंतर तो दावा खरा आहे असं मान्य केलंय?>>> नक्की कुठला काळ अपेक्षित आहे ? कारण अगदी प्राचीन काळापासून ची अनेक उदाहरण आहेत .सध्याचं अनिस चंच उदाहरण घ्या कि . त्यांना अध्यात्मिक दृष्ट्या develop असणार्या २ जणांनी आव्हान दिले होते . परंतु अनिस ने ते स्वीकारले नाही. त्यातले १ बहुदा नरेंद्राचार्य महाराज होते . दुसर्याचं नाव आठवत नाही . मी पा वरच कुणीतरी ते सांगितलं होतं मेंदू अ‍ॅक्टिवेशन वगैरे प्रकार असता आणि एखाद्या माणसाला त्यामुळे सिद्धी प्राप्त झाल्या असत्या तर त्याने ते कौशल्य आल्या-गेल्या माणसाला १०-१५ हजार टिकल्यांसाठी विकले असते>>> खरं आहे. कारण ह्या सिद्धींच्या जोरावर तो काहीही करू शकतो . तसेच ह्या सिद्धी दुसर्यांना दिल्या तर त्याला प्रतिस्पर्धी नाही का निर्माण होणार ?

In reply to by तुडतुडी

१. लहान मुलेच का ? मोठ्या माणसांच शिबीर का नाही ? >> याबद्दल अधिक माहिती इथे मिळेलः http://www.shichidamethod.com/faq.html २. ह्यात तिसरा नेत्र activate करतात का ते ? भारतीय योगशास्त्रामध्ये गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तिसरा नेत्र activate करता येतो . स्वताच्या मनाने उद्योग केला तर त्याचे होणारे परीणाम dangerous असतात . काही दिवसांनंतर असे dangerous परिणाम मुलांमध्ये दिसू लागले तर हे लोक त्याची जबाबदारी घेतात का ? >> थर्ड आय, इएसपी, सिक्स्थ सेन्स, ब्लाईंडफोल्ड विजन हे सगळे शब्द त्यांच्या शास्त्रिय संज्ञेच्या योग्य अर्थाशिवाय सर्रास वापरले जातात. त्यात शब्दांच्या भुलभुलैय्यात फसण्यापेक्षा माझा भर रिझल्ट्स वर आहे. ३. अंधळ्या मुलांना ह्याचा फायदा होऊ शकतो का ? >>आत्ता तरी माहिती उपलब्ध नाही. चौकशी करून कळवतो. आव्हानः 'मंत्रांद्वारे जीव घेतल्या जाऊ शकत नाही' हा दाव्याला आव्हान देणारा एक कथित तांत्रीक टीवीवर लाइव शोमधे 'मृत्यूंजय मंत्र' वापरून जीव घ्यायचा प्रयत्न करत होता. ह्या पेक्षा हास्यास्पद प्रकार मी अजून तरी पाहीला नाही. आणि जो कोणी रॅशनलिस्ट हा स्टंट करत होता त्याला कोणी खरा तांत्रीक मिळाला नसेल. किंवा खरा तांत्रीक आणण्याची हिंमत झाली नसेल. खरेखोटे देव जाणे!

In reply to by तुडतुडी

२. ह्यात तिसरा नेत्र activate करतात का ते ? भारतीय योगशास्त्रामध्ये गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तिसरा नेत्र activate करता येतो . स्वताच्या मनाने उद्योग केला तर त्याचे होणारे परीणाम dangerous असतात . काही दिवसांनंतर असे dangerous परिणाम मुलांमध्ये दिसू लागले तर हे लोक त्याची जबाबदारी घेतात का ?
तुम्ही खरंच एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. मध्यंतरी मी नेटवर काही व्हीडीओ पाहिले होते तूनळीवर. त्यांचा दावा कुंडलिनी शक्ती जाग्रित करण्याचा होता. मी सदर व्हीडीओ उत्सुकता म्हणून पाहिले व ऐकले थोडाच वेळ. काहीतरी विचित्र प्रकाश व ध्वनींचा खेळ होता. नंतर कंटाळा येऊन बंद केले. दोन दिवस माझं डोकं दुखत होतं. रक्तदाब पण वाढल्यागत झाला. लहान मुलांच्या बाबतीत जर काही वाईट घडले तर कोण जबाबदार?

मजा आला । धाग्यावारील प्रतिसाद पाहून खुप मजा आला :)))) बाकी अशाप्रकारे मार्केटिंग करायची आयडीया भारी आहे ।

In reply to by संदीप डांगे

ते डोळे बांधुन करायचं का डोळे उघडे ठेउन??? =)) (हघ्या. गंमतीमधे लिहिलय)-कॅजॅस्पॅ-

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आपले डोळे फारच उघडे आहेत यावर ज्यांचा प्रचंड विश्वास आहे त्यांना मी पामर काय सांगणार... :-)

In reply to by संदीप डांगे

आपले डोळे फारच उघडे आहेत यावर ज्यांचा प्रचंड विश्वास आहे त्यांना मी पामर काय सांगणार...
असं प्रत्येक बाबतीत म्हणता येईल. बहुतांश गोष्टींबाबत प्रथमदर्शनावरुन आणि सारासार विचारांवरुन निष्कर्ष काढता येतो. एखाद्या गोष्टीचं पाहताक्षणी आश्चर्य वाटलं याचा अर्थ ती गोष्ट शास्त्रशुद्धरित्या तपासत बसण्यायोग्य असतेच असं नव्हे. सदर प्रकाराबाबत वर्णन केलेल्या सर्व घटना या सरळसरळ हातचलाखी आणि साध्यासुध्या तर्काने एक्सप्लेन होत असताना त्या जेन्युईन आहेत की नाहीत यावर अधिक खोलात जाऊन विशेष अभ्यास करण्याची गरज अजिबात वाटत नसल्याचं अनेकांचं मत असल्याने मार्केटिंगची शंका येऊ शकते. तसं अर्थात नसेलही. पुढे कधी समजा, समजा...तुम्ही खुद्द या गोष्टीची एजन्सी घेतलीत तर मात्र या सद्य शंकाकर्त्यांना वेगळं मत मांडता येईल. या गोष्टीमागे "सायन्स" किंवा अन्य काही रास्त तार्किक कारणमीमांसा नसण्याचा एक साधारण पुरावा म्हणजे असा की जर या गोष्टीचा १५-२० हजारात गावोगावी उपलब्ध होण्याइतका प्रचार झाला असेल तर या टप्प्याच्या कितीतरी आगोदर मुख्यप्रवाहातल्या शास्त्रज्ञांनी / वैज्ञानिकांनी याची भरपूर दखल घेऊन त्याला काहीतरी प्रत्यक्ष रुप दिलं असतं. ब्रेकथ्रू ठरु शकणारी कोणतीही थियरी मॉडर्न सायन्समधे स्वतःहून दखल घेऊन पुढे संशोधित केली जाते. गॅलिलिओ, एडिसन, न्यूटन यांचा एकांड्या शिलेदारीचा आणि समाजाला ओरडून ओरडून सत्य पटवून देण्याचा जमाना आता राहिला नाही. आता असे काही मिड ब्रेन अ‍ॅक्टिवेशन असण्याची थोडी जरी शक्यता दिसली तर त्यावर वेगवेगळ्या कंपन्यांच्या, (संरक्षणक्षेत्रातल्या, वैद्यकशास्त्राच्या) उड्या पडतील आणि संशोधन लवकरात लवकर पूर्णत्वाला नेऊन त्याचं स्वामित्व स्वतःकडे ठेवण्यासाठी चढाओढ लागेल. ज्या प्रयोगात असं काही न होता केवळ फ्रँचाईसी तत्वावर गल्लोगल्ली रीटेल केंद्रं उघडली जातात त्यात शास्त्रीय तथ्य असण्याची शक्यता शून्यवत आहे.

In reply to by सतिश गावडे

असले प्रतिसाद टंकायला काय लागते? तुम्ही फारच स्केप्टिक आहात बुवा. धागाकर्ते करणार आहेत ते "शास्त्रीय" विश्लेषण येऊ द्या जरा या एम्बीए चे. मग गवि अन त्यांचे तत्वनिष्ठ तर्क कसे तोंडावर आपटतात ते पहाच तुम्ही.

बाकी सर्वात टॉपच्या व्हीडीयोत तो चष्मेवाला तरुण मुलगा आणि मुलगी चांगले सुशिक्षीत दिसताहेत.एम. बी.ए. आहेत का काय माहीत नाही.पण आजकाल काही टुकार एम.बी.ए. कॉलेजांमधे लोकांना **त्या बनवायचेच शिक्षण देतात की काय? मागे मला एका चांगली नोकरी असलेल्या आणि इंजिनीअर असलेल्या मित्राने आग्रह करून करून एका पॉश ठिकाणी प्रेजेंटेशनला नेले. एक तरुण एम.बी.ए. एक्झीक्युटीव्ह आकडेवाडी मोडून बिझिनेस मॉडेल समजावत होता. तासभर त्याची बडबड चालू होती. दुसरे काही नाही, ते मल्टी चैन मार्केटींग स्कीम होती. पण ज्यांचे त्यात पैसे अडकले होते, ते उगाचाच त्याच्या हो ला हो आणि टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते (माझ्यासारख्या ब-याच नवीन बक-यांना इम्प्रेस करण्यासाठी). मिड ब्रेन अ‍ॅक्टीव्हेशन हे सरळ सरळ थोतांड दिसते आहे. लोकांना मामा बनवून पैसे कमवायचे धंदे. यात वाईट एव्ह्ढेच वाटते की लहान मुलांना यात सामील करून घेऊन त्यांना खोटे बोलायला, दाखवायला भाग पाडले जाते. वरील व्हीडिओत ती लहान मुलगी कार्ड ओळखण्यासाठी हाताला, डोक्याला कार्ड चोळतेय हे चक्क नाटक करतेय हे स्पष्ट दिसतेय.

मिड-ब्रेन अ‍ॅक्टीवेशनचा सांप्रत काळात देशभर धुमाकूळ सुरु आहे
१०० पार! या धाग्याचा मात्र मिपावर धुमाकूळ चालू आहे.

पुणे तिथे काय उणे.... या धाग्याच्या निमित्ताने अजुन एक माहिती शेअर करु इच्छितो. परवा माझी पत्नी मुलीच्या शाळेत गेली होती. तिथे एक पालक म्हणाली की त्यांनी त्यांच्या मुलीला सुंदर हस्ताक्षराचा क्लास लावला आहे. तीन महिन्याचा कोर्स आणि फी ₹ १५ हजार फक्त !! ३ च महिन्यात ते वळणदार अक्षर आणि तेही वेगाने काढायला शिकवतात अशी माहिती त्यांनी दिली. खरतर एखाद्याचं अक्षर सुंदर आणि वळणदार असणे ही त्या व्यक्तीला मिळालेली नैसर्गिक देणगी असते असे मी मानतो. थोड्याफार सरवाने खराब अक्षर असणारे त्यात थोडी वरची पातळी गाठु शकतात. पण कोर्स वगैरे हे अती झालं. बर त्या बाईसुद्धा कोर्स सुरु केल्यापासुन आमच्या मुलीचं अक्षर सुधारायला लागलयं असा दावा करत होत्या. मला तर यामधे वरील काही सदस्यांच्या प्रतिसादाप्रमाणे मार्केटींगच वाटतय.

In reply to by 'पिंक' पॅंथर्न

मला बरेचजण हस्ताक्षर सुधारण्याचे क्लास घे म्हणून गळ घालतायत पण निव्व्ळ याच कारणाने मी ते टाळतोय. वर सांगीतल्याप्रमाणे हस्ताक्षर सुधारणे खूप कठीण वाटतंय. सुलेखन वेगळे आणि हस्ताक्षर वेगळे. चांगल्या सुलेखनकाराचे हस्ताक्षर चांगले असेलच असे नाही. ज्यांचे हस्ताक्षर चांगले असते ते लहानपणापासूनच असते. कोणत्याही क्लास कींवा कोर्स केल्यामुळे ते सुधारलेले नसते. नववी दहावीतल्या मुलांना तर हस्ताक्षर सुधारणेच्या क्लासमधे अजीबात पाठवू नये. कारण हस्ताक्षर सुधारायच्या नादात ते सद्या असलेला वेग हरवून बसतील आणि दहावीच्या परीक्षेत भरपूर लीहावे लागते.

In reply to by खटपट्या

ज्यांचे हस्ताक्षर चांगले असते ते लहानपणापासूनच असते
माझ्या बाबतीत तरी असे नव्हते. मी सातवीत असताना रोजनिशी लिहिणे सुरू केले, तेंव्हाचे अक्षर अगदी वाईट आहे, नंतर दासबोधात 'ब्राम्हणी बाळबोध अक्षर, घडसून करावे सुंदर' वगैरे वाचून स्वतःच प्रयत्न करून ते सुधरवून सुंदर केले. अर्थात चित्रकलेमुळे मला ते फार सोपे गेले, फक्त अक्षर सुंदर करण्याचा निश्चय करण्याचाच अवकाश होता. केल्याने होत आहे रे, आधि केलेचि पाहिजे. ज्याला अक्षर सुधरवायचे आहे, त्याने अक्षरांमधे गोलाई आणण्याचा, अक्षरे सुटी-सुटी लिहिण्याचा, आणि अक्षरांची उंची, रुंदी, तिरपेपणा वगैरे एकसारखा राखण्याचा सराव केला, तरी पुरेसे होते. बॉलपेन पेक्षा अर्थातच जुन्या पद्धतीचे फौंटन पेन चांगले.

In reply to by आनंदी गोपाळ

डॉक्टरांच्या संपाचे व्यंगचित्र आठवले. त्यांच्या हातांतील फलकांवर काय लिहिलेय हे वाचता न आल्याने कुणी लक्षच दिले नाही वगैरे वगैरे.

त्याने ब-याच शाळांमधे बरेच सेमिनार घेऊन सांगीतले की अक्षर खराब असल्यामुळे ब-याच मुलांना दहावी बारावीच्या परीक्षेत गुण कमी मिळतात. त्याने इव्हन हेही पटवले की आधी पालकांचे अक्षर चांगले हवे. तरच मुलांचे अक्षर सुधरेल. आहे कि नाही एका दगडात दोन पक्षी :-) त्यांचे हस्ताक्षर सुधारणा वर्गाचे फेबु. वर जोरदार मार्केटींग चालू आहे.

मला mid brain activation चा मेसेज आलाय मोबाईल वर. पुण्यात तीळक रोड ला परवा फ्री सेमिनार आहे . बघूया तरी जावून काय आहे हे . आता पुण्यात सुधा धुमाकूळ सुरु होणार कि काय

In reply to by द-बाहुबली

+१०००० जेवढ्या मिपाकरांना जमेल तेवढ्यांनी जावा. पाहीजे तर मिपासाठी खास सेमिनार घ्यायला सांगा त्यांना. दूध का दूध पानी का पानी....

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

तीलक रोड
टिळक मार्गाचं तिलक रोड असं मनपाने नामकरण केलं वाटतं. पुण्याचे पण उत्तर भारतीयीकरण शांततेत सुरु झालेय म्हणायचे.. ;)

तीलक रोड>>> खरच चुकलं . माफ करा . टिळक मार्ग बरोबर आहे . मेसेज असा आहे : What is MIDBRAIN ACTIVATION & how it is going to benefit ur child for a lifetime. Attend a free seminar on 17th July 7 pm @MCCIA HALL Tilak Rd, Miscall 9764069900

In reply to by तुडतुडी

प्रत्यक्ष सेमिनारला जायची चांगली संधी आहे आज. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर जावं आणि या धाग्यावर जे प्रश्न उपस्थित झाले त्यावर तिथे उत्तर मिळतायत का बघावी. सेमिनारला जाणार्‍यांनी आल्यावर नविन धागा काढून मत मांडलं तरी चालेल.

In reply to by तुडतुडी

काय...? कुनी गेलेवते की नै? असं कसं चाललं? एवडी मार-के-टींग केली या धाग्यावर... सगळी फेल झाली का बावा?

या असल्या सगळ्या गोष्टी मी वयाचे १५ पार केल्यावरच का सापडायला लागल्या बरं :( ते अ‍ॅबॅकस पण तसंच. मोठ्या माणसाना नाही शिकवणार म्हणे. हे काही खरे असेल असं अज्जिबात वाटत नाहिये. पण असेलच तर काही वर्षांत मोठ्यांना पण कसं हुशार करायचं याचा शोध ही मुलेच लावतील. मला जर असं काय काय अंतर-ज्ञान मिळालं तर काय बहार येईल या स्वप्नात हरवून गेलेय. :) बाकी संदीप भाऊ, तुमच्या अभ्यासाचं फलित नक्की सांगा हो.

In reply to by गिरकी

http://www.mirror.co.uk/news/uk-news/mind-boggling-magician-shows-how-6039713 या चित्र फितीमध्ये सुद्धा मुलगा असाच काहीतरी करत आहे. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेण्यापेक्षा काही दिवस थांबून निर्णय घेणे चांगले.

आपण जी गोष्ट उघड्या डोळ्यांनी पाहतो ती हि मुल डोळे बंद करून पाहतात . पण ह्याचा उपयोग काय ? त्यासाठी एवढे पैसे कशाला घालवायचे ?

In reply to by तुडतुडी

आपण जी गोष्ट उघड्या डोळ्यांनी पाहतो ती हि मुल डोळे बंद करून पाहतात . पण ह्याचा उपयोग काय ? हि मुले अंधारात अभ्यास करू शकतील त्यामुळे उर्जेची बचत होइल, मुलांच्या वस्तू गहाळ होणार नाही. मुलांना चष्मे लागणार नाही. पोलिसांना श्वानपथक बाळगावे लागनार नाही. ...... असे बरेच फायदे आहेत, पैशाकडे बघु नका.