Skip to main content

फिल्म इन्स्टिट्यूटचा पेच

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 07/07/2015 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पुण्यातली संस्था सध्या गाजते आहे ती तिथल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे. नवे अध्यक्ष आल्यानंतर त्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरु आहे. या अध्यक्षांनी अजून कामाला सुरुवातही केलेली नाही. तोवर या आंदोलनाला सुरुवात झाली. का तर अमुक तमुक प्रकारचा अध्यक्ष आम्हाला नको. प्रश्न हा आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की आपला वर्ग(शिक्षणाचे ठिकाण) सोडून वर्गाबाहेर आंदोलने करायची ? वास्तविक या विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती कुठल्यातरी धरणे, आंदोलने यामधून नव्हे तर त्यांच्या कलाकृतीमधून दिसून यावी ही देशाची अपेक्षा आहे. आजच्या अध्यक्षांबाबत काही मुद्दे पुढे केले जात असले तरी यापूर्वी अत्यंत नामवंत चित्रकर्मींनाही विद्यार्थ्यांनी काम करणे अशक्य करून सोडले होते. त्यामुळे त्यांना आपला कार्यकाल पूर्ण करता आला नव्हता. सध्या एक मुद्दा चर्चेत आहे राजकीय पार्श्वभूमी. पण इथे अध्यापक म्हणून काम केलेल्या सईद मिर्झा यांनी तर मोदी पंतप्रधान बनू नयेत यासाठी सह्यांची मोहीम घेतली होती. हे सारे पाहता असे दिसते की अलिकडच्या सत्ताबदलामुळे अनेक छावण्यांमधे अस्वस्थता दाटून आलेली आहे. त्यामुळे आजही आपली उपद्रव क्षमता कमी झालेली नाही हे दाखवण्याचाही या छावण्यांचा प्रयत्न असावा, असा एक अंदाज आहे. सुरुवातीला येथील आंदोलकांनी आमच्या मागे कोणताही पक्ष, कोणताही गट नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना जे एन यू मधून पाठिंबा मिळाल्यावर मात्र हे आंदोलन कुठल्या गटाचे आहे हे स्पष्ट व्हायला लागले आहे. .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 30097
प्रतिक्रिया 214

प्रतिक्रिया

In reply to by आशु जोग

आपल्याकडे सर्वच क्षेत्रांमध्ये संस्थेपेक्षा व्यक्ती मोठी मानण्याचे प्रघात असल्याने हे सगळे होतेय असे ह्यांचे मत. अमूक एक माणूस खूप मोठ्ठा बदल घडवून आणेल अशी भाबडी आशा जनता बाळगते.अशी आशा बाळगण्यात शिकलेले लोकही आघाडीवर असतात. मग 'अब्दुल कलाम नसते तर भारताचे काही खरे नव्हते..''आता मोदी पंतप्रधान झाले आहेत्,सगळे काही आता ठीक होईल..'अशी वाक्ये ऐकायला येतात. तुमच्या त्या नासाचे संस्थापक कोण? हूवर धरण बांधले तेव्हा अमेरिकेचा अध्यक्ष कोण होता?त्याला अमेरिकारत्न मिळाले का?

गजेंद्र चौहान हे कसे लायक आहेत?
या प्रश्नाला कोणत्याही भक्ताने किंवा कोणीही उत्तर दिले नाही.? काळा पहाड कुठे गेले ?

In reply to by कपिलमुनी

गजेंद्र चौहान लायक का आहेत? १. त्यांनी अनेको टीव्ही सिरियल्स मध्ये काम केले आहे. २. त्यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. ३. त्यांनी सिंटाचे अध्यक्षपद भुषवले आहे. ४. सिंटाच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह कामांमध्ये त्यांचा सहभाग होता. सध्याची त्यांची अपॉइंटमेंट ही अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह कामांसाठी आहे असे समजते. ५. एफटीआयआय चे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी अर्ज करावा लागतो असे समजते. ज्या सगळ्यांची नावे घेतली जात आहेत त्यापैकी कोणीही अध्यक्षपदासाठी अर्ज केला नव्हता असे समजते. अश्या परिस्थितीत तयार असलेल्या कलाकाराला सरकारने नियुक्त केले. ६. त्यांनी काही अ‍ॅडल्ट चित्रपटांतुन कामे केलेली असली (पॉर्न नाही हे इथे नमूद करणॅ योग्य) तरीही त्यांनी बर्‍याच टीव्ही सिरियल्स मध्ये कामे केलेली आहेत (आणि ती काही अ‍ॅडल्ट नव्हती). अनेक बुजुर्ग हिंदी चित्रपट खलनायकांनी आणि चरित्र अभिनेत्यांनी देखील प्रसंगी अ‍ॅडल्ट चित्रपटांतुन कामे केलेली आहेत हे इथे नमूद करणे गरजेचे वाटते. या कामासाठी ते क्लसे अयोग्य आहेत? १. चित्रपट बी ग्रेड, सी, ग्रेड की झेड ग्रेड हे इथे महत्वाचे आहे असे मला वाटते. त्यांचे बहुतांशी सिनेमे झेड ग्रेड आहेत. एफटी आय आय चे आधीचे काही चेयरमन नावाजलेले आहेत असे समजते. (सगळेच काही नावाजलेले नव्हते असे समजते). २. गजेंद्र चौहान यांनी काही अ‍ॅडल्ट चित्रपटात काम केलेले आहे. जर एफ्टीआयआय ने किंवा तिथल्या विद्यार्थ्यांनी आजवर कुठल्याच अ‍ॅडल्ट चित्रपटातुन कामे केले नसेल किंवा त्याचे दिग्दर्शन केले नसेल तर एफ्टीआयआय च्या महान परंपरेला गजेंद्र चौहानांच्या काही भूमिकांमुळे बाधा येउ शकते.

In reply to by मृत्युन्जय

बादवे ज्या ३ चित्रपटांवरुन मुख्यत्वे गजेंद्र चौहान यांच्याबद्दल गदारोळ चालु आहे ते ३ चित्रपट आहेतः १. खुली खिडकी - सहकलाकार होते अमजद खान, अरुणा इराणी, टिकु तलसानिया २. जंगल लव्ह (टारझनपट) - सहकलाकार होते अरुणा इराणी आणि रिटा भादुरी २. आज का रावण - सहकलाकार होते मिथुन चक्रवर्ती, मोहन जोशी आणि शक्ती कपूर.

जरा उशीराच उतरतोय चर्चेत, पण वर कुणीतरी, मला वाटतं, डांगेसाहेब बोललेत की ह्या संस्थेची प्रवेशप्रक्रीया अगदी आयएएसच्या तोडीची असते. मी ह्या बाबतींत जास्त पडत नाही, पण आमच्या धोतराच्या पोताशीच तुलना होतेय, तर काही प्रश्न विचारतो.. १) नेमकी काय आणि कशी असते ही प्रवेश-प्रक्रीया? कुठकुठल्या विषयांतील माहिती/ज्ञान अपेक्षीत असते विद्यार्थ्यांकडून? २) कुठकुठल्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरीता खुली असते ही परीक्षा? ३) आवेदन/परीक्षा आणि निवड ह्यांचे गुणोत्तर (सिलेक्शन पर्सेंटेज किती)? ४) निवड प्रक्रीयेत कितपत पारदर्शिता आणि 'ऑब्जेक्टीव्हिटी' असते? माफ करा, पण नागरी सेवा परीक्षा आणि इतर कुठल्याही निवड-परीक्षांमधे एक मुलभूत फरक आहे, तो म्हणजे खुलेपणाचा.. बाकी बव्हांश निवड-परीक्षा त्या-त्या क्षेत्रात आवड/स्पर्धक असलेल्या लोकांपुरत्या सिमीत असतात. ही परीक्षा सगळ्यांना (अ‍ॅज मच पॉसिबल) 'लेव्हल प्लेईंग फिल्ड' देते. तुमचा भुतकाळ आणि त्यातले तुमचे यश/अपयश ह्या परीक्षेत मॅटर करत नाही.. म्हणूनच माझ्यासारखा एखादा बारावीत गणितात नापास झालेला मुलगा यशस्वी होऊ शकतो, आणि आयआयटीचे विद्यार्थीपण सगळे प्रयत्न देऊनही अपयशी होऊ शकतात. एखादा बी.ए. मराठी साहीत्य उमेदवार एखाद्या आय आय टी/आय आय एम उमेदवारापेक्षा वरची रँक काढू शकतो.. This is just to get the record straight. आता जरा चर्चेच्या मतिथार्थाकडे वळतो. मिपावर भरपुर व्यावसायिक शिक्षण घेतलेले सभासद आहेत, जसे की इंजिनीअर्स, डॉक्टर्स, सीए इ.. ह्या सगळ्यांनी जर त्यांच्या व्यावसायिक यशापयशात त्यांच्या व्यावसायिक शिक्षण दिलेल्या संस्थेचा आणि मुख्यत्वेकरुन त्यांच्या संचालकांना कितपत वाटा होता, ह्याबद्दल कौल घेतला/दिला तर मला वाटतं, चित्र जरा स्पष्ट होईल.. बाकी रणकंदन करण्याइतक्या महत्त्वाची ही संस्था असेल-नसेल, स्वायत्त आणि 'सेंटर्स ऑफ एक्सेलंस' असणार्‍या संस्थाच्या बाबतीत राजकीय लुड्बूड असावी की नको, ह्या हिशेबाने चर्चा महत्त्वाची आहे..

In reply to by चिगो

मिपावर भरपुर व्यावसायिक शिक्षण घेतलेले सभासद आहेत, जसे की इंजिनीअर्स, डॉक्टर्स, सीए इ.. ह्या सगळ्यांनी जर त्यांच्या व्यावसायिक यशापयशात त्यांच्या व्यावसायिक शिक्षण दिलेल्या संस्थेचा आणि मुख्यत्वेकरुन त्यांच्या संचालकांना कितपत वाटा होता, ह्याबद्दल कौल घेतला/दिला तर मला वाटतं, चित्र जरा स्पष्ट होईल.. तुम्हाला एफटीआयआय, त्यांचे विद्यार्थी आणि सिनेजगत या तिभी गोष्टी किती महान आहेत हे माहिती नाही म्हणुन तुम्हाला असले फुटकळ प्रश्न पडतात. येणारचेत मोठ्ठाले धागे तेव्हा कळेलच तुम्हाला.

In reply to by मृत्युन्जय

तुम्हाला एफटीआयआय, त्यांचे विद्यार्थी आणि सिनेजगत या तिभी गोष्टी किती महान आहेत हे माहिती नाही म्हणुन तुम्हाला असले फुटकळ प्रश्न पडतात.
हे तर मान्यच करतो हो मी..
येणारचेत मोठ्ठाले धागे तेव्हा कळेलच तुम्हाला.
वा वा.. ज्ञानवर्धनाकरीता उत्सुक आहे.. ;-)

आता आय आय टी,आय आय एमच्या मांडीला मांडी लावून हे एफ.टी.आय.आयवाले बसणार की काय? ह्या मंडळींना तो हवेत सिगारटी उडवणारा रजनीकांत संचालक म्हणून चालला असता असे टी.व्ही.वर ऐकले. हात टेकले ह्या एफ.टी.आय.आय.च्या विद्यार्थ्यांपुढे.!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

>>> हात टेकले ह्या एफ.टी.आय.आय.च्या विद्यार्थ्यांपुढे.! तुम्ही हात टेकले की तुमच्या ह्यांनी? तुम्ही स्वतः काही करत नाही म्हणून विचारलं बरंका ;)

In reply to by प्यारे१

जावाच्या भाषेत माई इंटरफेस आहेत आणि त्यांचे हे इंप्लिमेंटेशन ..! त्यामुळे त्यांनी हात टेकले की त्यांच्या ह्यांनी हा प्रश्न गैरलागू आहे.. ;)

वार्‍यावरची वरात, मधल्या पहिल्या भागात, पुलंचा रामागडी रात्रशाळेत साक्षर झाल्याबरोबर पहिला अर्ज मास्तरांविरुद्ध करुन त्यांना 'डिसमिस' करतो, त्याची आठवण झाली. गजेंद्र योग्य की अयोग्य हा मुद्दा आहेच, पण असे प्रत्येक संस्थेतच जर विद्यार्थ्यांनी कुठला संचालक नेमावा, यावर हस्तक्षेप सुरु केला तर एक वेगळा पायंडा पडेल याची जाणीव ठेवावी. बाकी चालू द्या.

In reply to by तिमा

तिमा साहेब बाडीस एफ टी आय आय च्या विद्यार्थ्यांनी श्री गजेंद्र सिंह यांना नाकारावे यामध्ये त्यांची लायकी काय आहे? उद्या प्रथम वर्षाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांनी उठावे आणी सांगावे कि डॉ. तात्याराव लहाने आम्हाला जे जे चे डीन म्हणून नको किंवा डॉ सुपे आम्हाला के ई एम चे डीन म्हणून नको. श्री गजेंद्र सिंह यांनी तीन चारच सिनेमात काम केले आहे मग या न्यायाने आपले आवडते श्री सलमान खान किंवा संजू बाबा हे त्या पदासाठी जास्त लायक ठरतील. बाकी नेते आणी अभिनेते यांना त्यांच्या ज्ञान, शिक्षण आणी लायकी पेक्षा जास्त नाव, कीर्ती आणी पैसा मिळतो.त्यामुळे त्यांच्या बद्दल मला काडीचाही आदर नाही. ( आम्हाला कुत्र सुद्धा विचारत नाही हा भाग निराळा) जाता जाता -- डाव्या लोकानी केशरी रंग आवडत नाही म्हणून श्रीखंडात केशर घालणे बंद केले आहे/ केशरयुक्त श्रीखंड खाणे बंद केले आहे असे ऐकतो.

In reply to by सुबोध खरे

डॉ. तात्याराव लहाने = गजेंद्र चौहान ? आपापल्या क्षेत्रामध्ये दोघांची कामगिरी एकच आहे का ? "नेते आणी अभिनेते यांना त्यांच्या ज्ञान, शिक्षण आणी लायकी पेक्षा जास्त नाव, कीर्ती आणी पैसा मिळतो.त्यामुळे त्यांच्या बद्दल मला काडीचाही आदर नाही " हे बरेचसे खरे असले तरी १०० % खरे नाही , आज नवाजुद्दिन सिद्दिकी, राजकुमार राव यांसारखे चांगले अभिनेते कोणत्याही बॅकग्राउंड शिवाय आले आहेत . आणि FTII मध्ये फक्त अभिनेते नाहीत तिथे तंत्रज्ञ आणि चित्रपट तंत्र शिकायला आलेले पण विद्यार्थी आहेत. आणि गजेंद्र चौहान एवजी दुसरी नावे चर्चेमध्ये होती ती संजू किंवा सलमानची नव्हती ज्यांना या तंत्राची , माध्यमाची जाण आहे , ज्यांचे काम जागतिक , राष्ट्रीय स्तरावर नावाजले आहे अशांची होती. त्यांना डावलून गजेंद्र चौहान ला पुढे आणण्याचा अट्टाहास का ? "तो भाजपाचा आहे म्हणून त्याला हे पद मिळालेले आहे " हे सत्य तरी मान्य करा आणि अशा संस्थांमध्ये राजकीय ढवळाढवळ अयोग्य आहे. ( पूर्वी काँग्रेसने किंवा इतर कोणी असेच केले असेल तर ते चूकच आहे . त्यांनी केले म्हणून भाजपाचे बरोबर असले गुर्जीय समर्थन योग्य नाही)

In reply to by कपिलमुनी

मुनिवर गजेंद्र चौहान काळा का गोरा हे हि मला माहित नाही आणी जाणून घ्यायची इच्छा हि नाही. त्या ऐवजी शिवराज पाटील किंवा अनंत्मुर्थी असो. मला फक्त खटकले ते डाव्या लोकांनी विद्यार्थ्यांना यात उतरवले ते. विद्यादान आणी विद्यार्जन हे राजकारण विरहीत असावे या मताचा मी आहे. भाजप ला विरोध करायचा तो संसदेत करा विद्यापीठात कशाला? या विद्यार्थ्यांची लायकी काय आहे कि संस्थेचा चालक कोण ते ठरविण्याची? या न्यायाने ८० % इंजिनियरिंग कॉलेजचे मुख्याध्यापक काढून टाकावे लागतील. तेथे कोणी राजकारण करत नाही कारण त्याला कुत्रही विंचारत नाही. सिनेमा क्षेत्र आणी राजकारण याबद्दल मला काडीचाही आदर नाही हे मी पहिल्यान्दाही म्हणालो आहे. तेंव्हा डॉ. तात्याराव लहाने यांचे नाव केवळ संस्थेचे संचालक या नात्याने आणले आहे. त्यांची श्री गजेंद्र चौहान यांच्याशी तुलना करण्याचे कारणच नाही.

In reply to by सुबोध खरे

जाता जाता -- डाव्या लोकानी केशरी रंग आवडत नाही म्हणून श्रीखंडात केशर घालणे बंद केले आहे/ केशरयुक्त श्रीखंड खाणे बंद केले आहे असे ऐकतो. हे लय भारी !!! =)) =)) =)) आतापर्यंत, ते मॉस्कोत बर्फ पडले की दिल्लीत शिंकायला सुरुवात करतात आणि बायजिंगमध्ये पाऊस पडला की मुंबईत छत्री उघडतात इतकेच ऐकून होतो. त्यात या नविन गुणधर्माची भर पडलेली दिसतेय ! :)

In reply to by सुबोध खरे

शोले मधील सांबा ह्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला गुणी अभिनेते राष्ट्रीय पुरस्कार देण्याच्या समितीवर जातो आपल्या नातलग अभिनेत्री रवीना ला पुरस्कार देतो किंवा सैफ ला पद्मश्री दिली जाते तेव्हा हे बॉलीवूड वाले गुणी कलाकारांच्या बाजूने बोलतांना दिसत नाही

http://www.youthconnect.in/2015/07/13/gajendra-chauhan-video/ गजेन्द्रबाबूंच्या प्रेरणादायी कारकिर्दीचा एक धावता आढावा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. असे संचालक बदनाम संस्थेत आणि बेशिस्त विद्यार्थ्यांच्या सेवेत नेमल्याने राष्ट्रकार्यासाठी उमद्या व्यक्तींचा तुटवडा निर्माण झाला तर यास कोण जबाबदार ? एखाद्या महत्वाच्या उदा. रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमधे वगैरे त्यांची प्रतिष्ठापणा व्हावी

In reply to by खटासि खट

गजेंद्र चौहान यांनी रेपिस्ट किंवा इतर भूमिका केल्या असतील तर त्या केवळ भूमिका आहेत. त्याचा आधार विरोधासाठी घेणा चुकीचा आहे. अशा न्यायाने निळू फुलेंना काय म्हणाल ? पण प्रत्यक्षात ते सद्गृहस्थ होते.

In reply to by कपिलमुनी

गजेन्द्र चौहान यांच्याशी निळू फुले, के एन सिंग, अमरीश पुरी, सदाशिव अमरापूरकर, परेश रावल यांची तुलना होईल का ? कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे .... बी ग्रेड काय सी ग्रेड सिनेमे सुद्धा आपल्या अभिनयाच्या जोरावर चालवण्य़ाचं त्यांचं विस्मरणात गेलेलं कसब तुमच्या प्रतिसादामुळे लक्षात घेतलं जाईल अशी आशा करूयात. बाकी प्रतिसाद पूर्ण वाचला असेल तर तुम्ही जे म्हणत आहात त्याच्यापेक्षा काही वेगळं काय आहे हो त्यात ?

In reply to by खटासि खट

अशा न्यायाने निळू फुलेंना काय म्हणाल ? पण प्रत्यक्षात ते सद्गृहस्थ होते. >>> हा न्यूटनचा नियम होऊ शकेल का ? निळू फुलेंच्या जागी शक्ती कपूर, आदीत्य पंचोली किंवा तत्सम नावे घालून बघा बरं..

जाता जाता -- डाव्या लोकानी केशरी रंग आवडत नाही म्हणून श्रीखंडात केशर घालणे बंद केले आहे/ केशरयुक्त श्रीखंड खाणे बंद केले आहे असे ऐकतो. खल्लास्...जबरा शॉट होता हा :)

एक वेगळा मुद्दा जो आतापर्यंत मला सोशल मिडिया वर आढळ नाही आणि तो गजेद्र जीवतोडून सर्वांना समजून सांगत होता माझ्या रिल आणि रिअल लाइफ मध्ये फरक आहे थोडे विषयांतर करूया रमाकांत आचरेकर ह्यांनी प्रत्यक्ष किती आन्राष्ट्रीय सामने खेळले होते दुसरा प्रश्न सचिन आता पार्कात नेट लावून सचिन सोडा पण आमरे आगरकर निर्माण करू शकतो का लता व आशा ह्या संगीत महाविद्यालयात संचालिका झाल्या म्हणून प्रती लता व आशा बनू शकतील का हुशार कलावंत असणे वेगळे कलेच्या शेत्रात त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही मात्र व्यावहारिक व्यवस्थापकीय कार्य ते तेवढ्यास सहजतेने करू शकतील ह्याची काय खात्री अनुपम व पंकज हे दोघेही दादा कलाकार पण दिग्दर्शक म्हणून त्यांनी निर्माण केलेले सिनेमे आठवा ओम जगदीश व मौसम हे नुसते पडले नाही तर त्यांच्या नशिबी सामिक्षकंची उपेक्षा आली ह्याउलट अभिनेता म्हणन नाव न काढता आलेला राकेश पुढे यशस्वी दिग्दर्शक व निर्माता म्हणून उदयास आला अभिनेता म्हणून अयशस्वी सलीम खान पुढे लेखक म्हणून उदयास आले , तात्पर्य एवढेच की अभिनय करणे व निर्माता म्हणून सिनेमा निर्माण करणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तसेच गजेंद्र त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करणार नाहीत कशावरून विद्यार्थ्यांचा रोष नक्की काय आहे गजेंद्र हे भाजपचे आहेत व केशरी राजकारण करायला आले आहेत का ते योग्य उमेदवार नाही आहेत बहुतांशी डाव्या संघटना व विद्यार्थी गजेंद्र ह्यांना नालायक ठरवतांना केशरी राजकारणाचा उल्लेख करत आहे असेच करायचे असते तर संघाने अनेक लायक व्यक्ती ज्या केशरी विचारसरणीची प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या जोडल्या गेले आहेत त्यांना ह्या पदावर बसवले असते ह्या देशात दुबेजी ते अनेक महान कलाकार संघाविषयी आदर असलेले होते व आजही अनेक आहेत त्यांना आणून बसवले असते , मला अजूनही वाटते नाना ला आणून बसावा गजेंद्र च्या जागी एक अभिनेता नाही तर निर्माता म्हणून सुद्धा त्याची निर्मिती प्रहार हि श्रेष्ठ कलाकृती आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

मला अजूनही वाटते नाना ला आणून बसावा गजेंद्र च्या जागी सहमत. पण तो तरी डावे मान्य करतील का? अर्थातच नाही!

सी ग्रेड सिनेमात काम केलेला मनुष्य का हवा याचे समर्थन करताना आपल्या क्षेत्रात ज्याचा वकूब आहे तो चांगला गुरू होऊ शकत नाही आणि सी ग्रेड सिनेमातला बलात्कारी अशी रील लाईफ मधील इमेज असलेला व्यक्ती छान गुरू होऊ शकेल हे ठरवण्याचे निकष काय आहेत ? संधीच द्यायची तर अभिनयात झेंडे गाडणा-या अनुपम खेर आणि गजेंद्र चौहान या दोघातून (दोन्ही केशरी आहेत) कुणाला निवडाल ? या दोघात गजेंद्र चौहानच फिल्म इन्स्टीट्यूटचं संचालकपद भूषवायला योग्य आहे हा साक्षात्कार कसा काय झाला असावा ? ज्या माणसाला स्वतःचे करीयर नीट घडवता आले नाही तो विद्यार्थ्यांच्या करीयरबद्दल निर्णय घेताना यशस्वी होऊ शकेल हा दुर्दम्य आशावाद कुठल्या गणिती प्रमेयाद्वारे मांडला गेला आहे ? विद्यार्थ्यांनी केशरी संचालक नको असं म्हटलं असल्यास कृपा करून ते दाखवून द्यावे. केशरी कनेक्शन असल्याने गजेंद्र चौहान सारख्या व्यक्तीची संचालकपदी नेमणूक होते आहे याचा अर्थ दिग्गज व्यक्ती केवळ केशरी कनेक्शन आहे म्हणून नको असा त्याचा अर्थ होईल का ? आपण ज्या संस्थेत शिकतो त्या संस्थेची संचालक म्हणून असलेली व्यक्ती किमान सन्माननीय असावी अशी मागणी रास्त नाही का ? अनुपम खेर, अमिताभ बच्चन आणि इतर अनेक कलाकारांपैकी किती जणांनी मजबुरी म्हणून खुली खिडकी किंवा तत्सम सिनेमे केले आहेत ? करीयर मधे क्षमता असताना यशस्वी न होणं वेगळं आणि करीयर कुठल्या मार्गाने आपण पुढे नेतो हे वेगळं असावं. उद्या सनी लहानेंना संचालक म्हणून नेमलं तर गजेंद्र चौहानच्या समर्थनार्थ केलेले युक्तीवाद पुन्हा करणार का ? फेसबुक वर काही सज्जन सोनिया गांधी यांचे कॅब्रे डान्सर म्हणून असल्याचे फोटोशॉप्ड मेसेजेस फिरवत असतात आणि त्यांच्या क्षमतेवर शंका उपस्थित करत असतात. त्यातले अनेक जण गजेंद्रच्या समर्थनार्थ रील लाईफ आणि रिअल लाईफचे युक्तीवाद घेऊन हिरीरीने मैदानात उतरलेत. ( मुद्दामच १,२ असे नंबर टाकलेले नाहीत, नाहीतर संपूर्ण प्रतिसाद कॉपी पेस्ट करून विद्वत्ताप्रचुर उत्तरे दिली जातील याची खात्री आहेच).

In reply to by खटासि खट

वरच्या प्रतिसादात राजकारण आणू नये. काँग्रेसने काय केलं हे धडे समर्थन म्हणून द्यायचे असतील तर याचा अर्थ तेव्हां कुठे गेला होता तुझा धर्म म्हणत त्याच चुका पुढे चालू राहणार आहेत. काँग्रेसला याच चुकांची शिक्षा लोकांनी दिलेली आहे, आता हेच लोक जर विद्यार्थ्यांच्या भूमिकेकडे सहानुभूतीने पाहत असतील तर ते काँग्रेसचे एजंट कसे ? आणि जर तसे पाहत नसतील तर फाट्यावर मारा ना आंदोलन.. महत्त्व कशाला द्यावं विरोधाला ?

In reply to by खटासि खट

विद्यार्थ्यांनी केशरी संचालक नको असं म्हटलं असल्यास कृपा करून ते दाखवून द्यावे. “All five members have RSS or BJP connections but no one of them has strong credentials to become the member of such a premier institution. The appointments have made the government’s agenda very clear — saffronise an academic institution of this unique nature,” Kislay Gonzalvez, former general secretary of FTII Students’ Association, told Firstpost. हा व्हिडीओ पहा: या आंदोलनामागे AISA अर्थात कम्युनिस्ट पार्टीने १९९० साली चालू केलेली विद्यार्थी संघटना जाहीरपणे आहे. इथे कोणिही गजेंद्र चौहान फॅन क्लब मेंबर नाही. त्यामुळे कोणी त्यांचे समर्थन करत नाही. किंबहूना या क्षेत्रातली नॉन लेफ्टीस्ट चांगली व्यक्ती मिळू शकली असती असेच आम्ही म्हणत आहोत. पण आधीच्या संचालकांनी नक्की संचालक म्हणून काय काम केले ह्याची यादी मिळेल का? (त्यांच्या ए+ सिनेमांची यादी नको. संस्थेसाठी नक्की काय केले? किती वेळ दिला?) जे बुद्धीवादी उठसुठ सेक्स अथवा तत्सम विषयांबद्दल बोलतात आणि त्याला विरोध करणार्‍यांना संस्कृती रक्षक म्हणून हिणावतात त्यांनी चौहान यांना त्यांच्या काही चित्रपटावरून एफटीआयआय चा धर्म बुडाला म्हणून आरोळी ठोकणे हास्यास्पद आहे.

In reply to by खटासि खट

नुसते ओके? पण आधीच्या संचालकांनी नक्की संचालक म्हणून काय काम केले ह्याची यादी मिळेल का? या प्रश्नाचे उत्तर आहे का तुमच्याकडे? नसल्यास कशाच्या जोरावर त्यांच्या आरत्या ओवाळणे चालू आहे ते समजेल का? खाली सव्यसाची यांनी श्याम बेनेगल यांची मुलाखत दिली आहेच. त्यावर देखील भाष्य केले तर उत्तम. अर्थात श्याम बेनेगल पण आता सी ग्रेडचे वाटल्यास ते देखील समजू शकतो.

In reply to by विकास

डॉलर मिया कुठे क्रिकेट खेळले प्रत्यक्ष आयुष्यात मात्र त्यांच्या अध्यक्षतेखाली बी सी सी आय ने गरुड भरारी घेतली आर्थिक महासत्ता हे बिरुद ह्या संस्थेला चिकटले आजही ते अध्यक्ष त्याच गुणांच्या मुळे आहेत संपात वेळ घालवण्यापेक्ष्या गजेंद्र व विद्यार्थी ह्यांनी आमने सामने येउन संस्थेसाठी तुम्ही काय करू शकता तुमचे भविष्यातील संकल्प व योजना काय आहेत ह्याबद्दल माहिती विचारावी नाहीतर नोटीसा मिळाल्याच आहे ,

"पेच" आणि "पोच" यातला नेमका फरक अधोरेखीत झाला. बाकी चालू द्या !!! अभामिपामांकामिम संचालित मायापुरी+मनोहर कहानीयाँ वाचक संघ

या मुद्द्यावर आतापर्यंत बरीच चर्चा झाली आहे. पण कुणीही एक प्रश्न विचारला गेला नाही आणि तो म्हणजे चेअरमन (अध्यक्ष) चे काम तरी काय असते? २-३ दिवसांपूर्वी श्याम बेनेगल यांची मुलाखत वाचनात आली. त्यात त्यांनी अध्यक्षाचे काम काय आहे ते सांगितले आहे:
Q :You were the chairman of the institute twice. A : Yes, I was. And let me tell you, the chairman is not the director. The director is the one who executes all the decisions on campus. He meets the students on a daily basis and lives on campus. Whereas, the chairman needs to come to campus only six times a year - twice for society meetings and four times for the governing council meets. If it is the concern of running the institute, then the director is contacted and not the chairman. Only when the institute needs more money or a change in the overall policy needs to be made, the chairman is contacted.
ही व्यवस्था ही बर्याच स्वायत्त संस्थांसारखी आहे. उदा: Indian Statistical Institute (ISI) मी आयएसआयचा विद्यार्थी असल्याकारणाने हे नक्की सांगू शकतो. गवर्निंग कौन्सिल चा अध्यक्ष आणि ते कॉलेज याचा किती संबंध येतो हे आम्ही पाहिले आहे. अध्यक्ष शक्यतो पदवीप्रदान समारंभाला कॉलेज मध्ये येतात. मला वाटते कि सीओइपी मध्ये सुद्धा हेच स्ट्रक्चर आहे. आम्ही आमच्या अध्यक्षांना क्वचितच पाहिले असेल. तीच परिस्थिती FTII मधेही दिसते आहे. श्याम बेनेगल यांच्या मुलाखतीतील काही रोचक प्रश्नोत्तरे
Q: The FTII strike against the appointment of Gajendra Chauhan as the chairman is in its 31st day now... A :Yes, I have been following the strike. However, I feel that the action taken by students is extreme. Credentials or no credentials - if the government has sent somebody to be the chairman, he should be given a chance. Students should not just look at the credentials.
Q: So, you are not supporting the strike? A: I want the students to be frank, come ahead and have a dialogue with Chauhan. They should listen to his views and vice versa, and find a road ahead for the institute. Students should not jump the gun even before giving the man a chance.
Q: So, Gajendra Chauhan fits the bill? A: FTII is a professional institute. And it needs immense development in terms of technology. It is a place where you train people and if a man can come and put things in place, then why not? Students cannot claim and assume anything even before he is appointed. If there is a reason for their disagreement over the appointment of the gentleman, they should come forward and have a dialogue rather than going on a strike.
Q: Students claim, as compared to someone like Adoor Gopalakrishnan or Gulzar, Chauhan doesn't have enough body of work. A: How can the students decide if a man is capable or not, if there is a right kind of political alignment or if he will change the colour of the institution? No one's stopping them from clearing the air? But they are unwilling to talk and are dissatisfied. I don't understand what the fuss is all about.
बर्याच बातम्या आल्या कि श्याम बेनेगल पण अध्यक्ष होण्याच्या लिस्ट मध्ये होते. त्याला श्याम बेनेगल यांचे उत्तर:
I was never asked. I have been the chairman twice and I have no idea about the other contenders because nothing was conveyed to me.
गजेंद्र चौहान यांच्या कामाबद्दल:
Q: What do you have to say about Chauhan's credentials? A : I don't even know him. How can I speak about his credibility? Also, it is not the body of work that matters. You can only judge a person after he performs his given duty. Students are not allowing any of those things to happen. They should understand that in an institution, ideological saffronisation is not possible. What's the point of going on a strike and calling names?

In reply to by सव्यसाची

आतापर्यंतच्या चेअरमनने सहाच विजिट केल्या म्हणुन पुढच्यानेही तसेच करावे असा नियम आहे का ?

In reply to by dadadarekar

विरोध काय व्हिझिट्स किती होतात यावरून होता का? बेनेगल यांची उत्तरे काय आहेत ती वाचा आणि मुद्द्यांना उत्तरे द्या... आणि हो आधीच्या संचालकांनी नक्की संचालक म्हणून काय केले ते देखील सांगा.

एक जुनी स्वाक्षरी थोडा बदल करुन हिंदुद्वेष्टे संघटित झाले कि कोणाच्या बापाचे ऐकत नाहि

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

हिंदुद्वेष्टे ??? इथं हिंदू, प्रेमी, द्वेष्टे यांचा काय संबंध? तसेच हिंदुप्रेमी संघटित झाले कि कोणाच्या बापाचे ऐकतात?

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

बर बर व्यत्यासही खरा दिसतोय

डांगे साहेब माझा तो हेतु नव्हता, लेखक महाशयांचि स्वाक्षरी होति पुर्वि मिपा वर "हिंदु संघटित झाला कि कोणाच्या बापाचे ऐकत नाहि" इथे ह्या धाग्याला जो रंग दिला जातोय त्या अनुषंगानेच मि ति स्वाक्षरी 'थोडा बदल करुन' वापरली.

योग्य आणि समर्पक उत्तर डॉ.खरे सरानी दिलच आहे.

In reply to by सुनील

जो गजेंद्र चौहानच्या नियुक्तीविरुद्ध बोलेल तो हिंदुद्वेष्टा, असं आता ठरलय! मंडळी, तुमचं काय ठरतय आता? असं इंडीयन एक्स्प्रेस ने सवंग शिर्षकासाठी लिहीले असावे असे वाटते. त्यांनी शेवटचे वाक्य असे लिहीले आहे: “anti-Hindu fringe elements did what they are best at. They started protesting…” याचा शोध घेण्यासाठी ऑरगनायजर च्या संस्थळावर मुळातून FTII Row : Protest or ‘Conspiracy’? हा लेख वाचला. त्यात असे म्हणले आहे:
The anti-Hindu fringe element theory also gets substantiated by looking at the credentials of past Chairmen, which are as follows:
  • Mrinal Sen, confirmed Marxist
  • Girish Karnad known Hindu hater. At the 2012 TATA Lit Fest held in Mumbai, Karnad was invited to speak about "his life in theater". Instead of talking about the subject, he took the opportunity to lash out at VS Naipaul. So much for freedom of expression.
  • Mahesh Bhatt, a porn promoter, whose son was befriended by David Headley, an accused in the 2008 Mumbai attacks.
  • Shyam Benegal is known for Anti-BJP stand. He famously said “While it is true that Sardar Patel was not a Socialist like Jawaharlal Nehru, this difference in economic outlook cannot be used as a handle to appropriate Patel by the political Right.”
यातील प्रत्येक व्यक्तीवरचे विधान अगदी संघ/भाजपा विरोधकास देखील पूर्णपणे अमान्य होण्यासारखे नसावे असे वाटते. पण जर गजेंद्र सिंग यांना विरोध केलात तर तुम्ही अँटी हिंदू असे म्हणले असे कुठे वाचताना वाटले नाही. त्यातून त्यात नक्की चुकीचे काय आहे ते सांगावेत ही विनंती. याच ऑरगानाइजरच्या लेटेष्ट अंकात आलेला याच विषयावरील FTII Controversy : Deserves an Opportunity हा लेख देखील वाचावात. त्यात अँटी काय हिंदू देखील शब्द नाही. चौहान यांची भलावण नाही, विद्यार्थ्यांचे हक्क अमान्य केलेले नाहीत. पण दोन्हीच्या मर्यादा लिहीलेल्या आहेत. केवळ इंग्रजी अथवा मराठी वॄत्तपत्राने लिहीले म्हणून ते खरे मानणे हे खरेच बुद्धीवादाचे लक्षण राहीले आहे का असा सध्या प्रश्न पडू लागला आहे. (मी तसे मानणार्‍यातला होतो म्हणून असे म्हणत आहे!) असो.

मोदी अभिनय करतात. फोटोमध्ये पोझ देतात. डायलॉग मारतात. आपला कार्यक्रम व्यवस्थीत ब्रॉडकास्ट कसा होइइल याचे मार्केटिंग करतात. निरनिराळे पेहेराव करतात. निरनिराळी वाद्ये वाजवतात. मोदीना अध्यक्ष नेमलं त्या शिनिमाशाळेत की ते सगळी डिपारमेंटं एकटे बघतील.

In reply to by अर्धवटराव

इश्श! आम्ही धर्मच दुसरा घेतोय म्हटल्यावर जातींच्या भिंतीत अम्ही अडकु का ?

In reply to by dadadarekar

"तिकडे" अजून कॉम्प्लिकेटेड जाती असतात. आगीतून फुफाट्यात पडाल हो!

In reply to by पैसा

अगदी अगदी.. त्या कॉम्प्लिकेटेड कॅटेगरीज पण आधी अभ्यासून ठेवा. ते शिया की सुन्नी की अहमदीया (अथवा प्रोटेस्टंट/कॅथलिक्/बिलिवर) मग सुन्नी असेल तर वहाबी वगैरे वगैरे पण आधीच ठरवून ठेवा हो. नै तर परत आयसिस भेटल्यावर कन्फ्युजन व्हायचं.. ;)

In reply to by अस्वस्थामा

परस्पर पीडा जातीय तर मोडता घालण्याचा प्रकार का ते कळलं नाही. शिया बनवून आयसिस च्या जवळपास पाठवून द्यायचं ना.

In reply to by dadadarekar

दुसरा धर्म घ्यायच्या आधी त्यांच्यातल्या जाती अभ्यासायच्या ना आधी. बघा जमले तर शुद्धी करुन घ्या.

In reply to by dadadarekar

आम्ही धर्मच दुसरा घेतोय
दुसरा धर्म कशाला... गजेंद्र हाच महाभारतातला पहीला धर्म आहे ना...

'एफटीआयआय' आंदोलन आता दिल्लीतही होणार गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात सुरू केलेले आंदोलन आता थेट दिल्ली दरबारी नेण्याचे भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी ठरविले आहे. हे आंदोलन अधिक परिणामकारक करण्यासाठी आंदोलक विद्यार्थी आता संसदेसमोर ठाण मांडून बसणार आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असल्यामुळे त्यानिमित्त राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळविण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. .

In reply to by आशु जोग

नेहमीच गरीबांचा कैवार घेणार्‍या राहुल यांनी याहीवेळी आपली भूमिका सोडली नाही. अलिकडच्या पुणे भेटीत राहुल यांनी एफ टी आय आय च्या प्रश्नातही लक्ष घातले. राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक थोर नेत्यांनीही त्यांना साथ दिली .

विद्यार्थ्यांचे आंदोलनाचे साहित्य कुणीतरी जाळून टाकले अशी दोन चार दिवसापूर्वी बातमी होती.

टाइम्स नाउवर ह्या संबंधित कार्यक्रम पाहिला. एक न समजलेली बाब म्हणजे ह्या संस्थेच्या अध्य़क्षाचे 'जॉब प्रोफाईल' काय असते?म्हणजे रोजचे काम काय असते? विनोद खन्ना ह्यांनी हे पद भूषवले आहे. http://timesofindia.indiatimes.com/india/FTII-students-did-not-protest-… ह्या बातमीत असे म्हंटले आहे- The students did not protest against his appointment as he is an eminent actor and knows the art. पण विकिपिडियानुसार खन्ना ह्यांना फिल्मफेयर नॉमिनेशन व (स्टार्डस्ट) वगळता आंतरराष्ट्रीय(म्हणजे कान्स्,पॅरिस्,लंडन वगैरे) अनुभव दिसत नाही. https://en.wikipedia.org/wiki/Vinod_Khanna

फिल्म इंन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन अद्यापही सुरु असून यातल्या एका बाजूकडून एक पाऊल पुढे टाकण्यात आलेले आहे ते म्हणजे या संस्थेच्या प्रांगणात चालू असलेल्या गैरप्रकारांबाबत गुन्हा नोंदवण्यात आलाय बातमी या पानावर पहा अजून एक कोण कोणावर मात करेल माहीत नाही. पण विजय सत्याचा होणार हे नक्की.

In reply to by आशु जोग

पण सत्य नक्की काय आहे?