✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

व्हॉट इज धिस, कोंबडीचं पीस..

ग
गवि यांनी
Sat, 12/04/2010 - 08:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
53260 वाचन

💬 प्रतिसाद (180)

प्रतिक्रिया

सुरेख

विवेक मोडक
Sat, 12/04/2010 - 08:58 नवीन
शाळेची आठवण करुन दिलीस मित्रा!
  • Log in or register to post comments

उभे राहिले

टारझन
Sun, 12/05/2010 - 10:50 नवीन
ड्रायव्हरकाका ड्रायव्हरकाका पुढच्या गाडीला मागे टाका...
रोमांच उभे करणारे .... - (ड्रायव्हरकाका) शिवराम गोविंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक मोडक

हा हा मस्त..जुन्या गोष्टींना

पक्या
Sat, 12/04/2010 - 09:03 नवीन
हा हा मस्त..जुन्या गोष्टींना छान उजाळा मिळाला. अजून एक - एकनाथ गाडी गेली कोकणात आमची स्काऊट ची एक आरोळी होती - हनुमंताने केला पुल , सगळे धोंडे गेले खोल परंतू तेही आले वर , जेव्हा त्याने लिहीले वर - राम राम राम अजून एक आरोळी - स्काउट च्या शिबिराला म्हणायचो..तारे जमीन पर मध्ये ह्याचा काही भाग वापरला आहे एका गाण्यात चिक रिक चिक रिक ची चाय लोलम गुंडो लोलम वन पक वन आक्को टक्को एटी केटी केटी को एटी पाय एटी पाय ची चाय चो. वर तुम्ही 'एके दिवशी फॉक्स कोल्हा....लिहीले आहे ते आम्ही असे म्हणायचो - वन्डे एके दिवशी फॉक्स कोल्हा गार्डन बागे मध्ये वेन्ट गेला देअर तेथे रिव्हर नदी वॉटर पाणी ड्रँक प्याला इंगर्जी माध्यमातील मुलांच्या तोंडून ऐकेलेले - यल्लो यलो डर्टि फेलो लायर लायर पॅन्ट्स ऑन फायर
  • Log in or register to post comments

?

पंगा
Sat, 12/04/2010 - 09:34 नवीन
हे नेमके का आहे? (काय आहे ते माहीत आहे. कशासाठी लिहिले आहे?) (अवांतरः
पोरीत पोरगा लाम्बोडा, भाजून खातो कोम्बडा..
हो कित्येकदा ऐकलेले आहे. तसा मी लहानपणी (आजूबाजूस पुरेशा समवयस्क मुलांच्या अभावी) बहुधा मुलींत खेळत असे (शाळा-शाळा, घर-घर, बाहुलाबाहुलीचे लगीन*, वगैरे वगैरे... तेवढे डॉक्टर-डॉक्टर किंवा आई-बाबा वगैरे खेळायला लागलो की मग मात्र मोठी मंडळी वस्सकन अंगावर येत. पण ते असो.), हे सांगायला मला लाज वाटत नाही. (त्या मुलींनाही बहुतकरून माझ्याबरोबर खेळायला काही लाज वाटत नसे. तर तेही असो.) तसेच, लहानपणापासून मी कोंबडी/कोंबडा (नक्की कोण ते तपासून पाहिले नाही.) भाजून आणि रश्शातला दोन्ही खात आलेलो आहे. त्यामुळे दोन्ही बाबींचा अनुभव आहे. (आणि 'लांबोडा'बद्दल बोलायचे, तर माझी उंचीही नेहमीच बर्‍यापैकी राहिलेली आहे.) मात्र, या दोहोंतील नेमका कार्यकारणभाव (किंवा परस्परसंबंध) मला आजतागायत कळलेला नाही. मात्र, आमच्या आजूबाजूच्या मुलींमध्ये काही थोड्या आगाऊ होत्या (ज्यांच्याशी आम्ही तसेही कधीच खेळायचो नाही), त्या मात्र सतत म्हणायच्या, "मुलीत मुलगा लांबोडा, भाजून खातो कोंबडा." जेलसी, आणि कोंबडी खाण्याबद्दलचा अननुभव, दुसरे काय?) ================================================================= * बाहुलाबाहुलीच्या लग्नात आमचा रोल नेहमी भटजीचा असे. शेवटी आम्ही भटेंच, त्याला कोण काय करणार?** ** डिस्क्लेमरः हे शेवटचे वाक्य पु.लं.च्या कोणत्याशा लेखातून जसेच्या तसे (आणि साभार) उचललेले आहे.
  • Log in or register to post comments

हाहाहा

श्रावण मोडक
Sat, 12/04/2010 - 11:21 नवीन
आधुनिकोत्तर साहित्याचा नमुना म्हणावा का हा प्रतिसाद? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

कशाचा नमुना...

पंगा
Sat, 12/04/2010 - 11:24 नवीन
... ते तुम्ही ठरवा. 'नमुना आहे' म्हणताय एवढे यश आपल्याला रगड आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

एक मणूस होता त्याला ४ ताप

शुचि
Sat, 12/04/2010 - 10:35 नवीन
एक मणूस होता त्याला ४ ताप आला परत ४ ताप आला तो झोपला मग त्याला परत ४ ताप आला परत ४ ताप आला तो डॉक्टरकडे गेला डॉक्टरने त्याला गोळी दिली घरी येऊन झोपला तर त्याचा उंदीर झाला Image removed.From zz
  • Log in or register to post comments

कॅप्टन गरूड

प्रदीप
Sat, 12/04/2010 - 10:59 नवीन
ह्या विंदा करंदीकरांच्य एका बालगीताची ह्यावरून आठवण झाली. त्यात गरूड विमानचालक असतो, व त्याच्या विमानात साप शिरतो, मग त्याची व इतर सगळ्यांची कशी भंबेरी उडते, अशा घटनेचे खमंग वर्णन होते. कवितेसोबत एक छान चित्र (बहुधा सरवट्यांनी काढलेले ) होते.
  • Log in or register to post comments

ओळखा पाहू...

पंगा
Sat, 12/04/2010 - 11:18 नवीन
Image removed. (उत्तरः महात्मा गांधी भिंतीवर चढून उडी मारण्याच्या प्रयत्नात. पलीकडच्या बाजूने पाहिले असता.)
  • Log in or register to post comments

बहुरंगी करमणूक

अत्रन्गि पाउस
Fri, 03/18/2016 - 11:27 नवीन
गांधीजींची बगलेतून मागे आलेली काठी ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

ग्राफीक गोगलगाय.

अभ्या..
Sat, 03/19/2016 - 01:06 नवीन
ग्राफीक गोगलगाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

आणखी काही

बेसनलाडू
Sat, 12/04/2010 - 14:16 नवीन
रायगड पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिरला शिरला तर शिरला वर म्हणतो कसा - <यानंतर आपल्या आवडीचे गाणे समूहाने म्हणणे> गाडी में छननन छननन होए रे (२) || धृ || गाडी में बैठे दो मराठी (२) गाडी में तुझ्या आयला माझ्या आयला होए रे (२) गाडी में बैठे दो मद्रासी (२) गाडी में इडली सांबार वडा सांबार होए रे (२) गाडी में बैठे दो पंजाबी गाडी में बल्ले बल्ले बल्ले बल्ले होए रे (२) या यादीत मग गुजराती, बंगाली, भैये वगैरे घालून गाडीची मालगाडी करता येते. कोणातीही ओळ २दा म्हणताना पहिल्यांदा एकानेच/मुख्य गायकाने म्हणावी आणि दुसर्‍यांदा इतर सगळ्यांनी मिळून एकत्र म्हणावी. मालगाडीतल्या मालावरून आणखी एक आठवले - बम्बई से आई मेरी माल, माल के गुलाबी गाल|| धृ || माल के लिए मैंने साडी मंगाई, साडी का रंग था लाल माल के गुलाबी गाल || १ || माल के लिए मैंने लिप्स्टिक मंगाई, लिप्स्टिक का रंग था लाल माल के गुलाबी गाल || २ || 'बम्बई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो; रात को खाओ पिओ, दिन को आराम करो' याच्या चालीवर हे गाणे म्हणावे. 'माल'साठी मग चुनरी, कंगन वगैरे जमेल तितके मागवावे. केवळ मुलांची शाळा असल्याने (मुलींची शाळा वेगळी होती) आणि वयही काहीसे कच्चे/अडनिडे असल्याने 'माल' शब्दाबाबत काही वावगे, गंभीर वाटतही नसे :) ही सगळी गाणी शालेय सहलींसाठी खास! बसमधील प्रवासात म्हणायची म्हणून प्रसिद्ध! (शाळकरी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

अजून एक

चित्रा
Sun, 12/05/2010 - 09:51 नवीन
माझी लाडकी माझी लाडकी माझी लाडकी सुशीला मला एकट्याला टाकून गेली हो ती स्वर्गाला एक होता सावकार, त्याची इस्टेट लाखावर त्याला होती एक मुलगी, तीच माझी सुशीला होती उंच आणि टंच, माझी लाडकी सुशीला मला एकट्याला टाकून गेली हो ती स्वर्गाला -- असे काहीतरी गाणे होते. सर्व आठवत नाही. दुसरे घरच्या वडील बंधू/भगिनींनी शाळेतून मिळालेले ज्ञान आमच्यापर्यंत पोचवलेले - मेरी तुझे केस लांब लांब लांब जवळ नको येऊ तुझे पप्पा बघतात पप्पा बघतात पप्पा बघतात मेरीचे पप्पा रागं भरतात मेरीने घातलाय डोक्यात केवडा मेरीचा बापुस पक्काच बेवडा.. इ. इ. अजून एक "जास्तीची" मेजॉरिटी असायची. आणि "कमी"ची मेजॉरिटी! :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

पॅक पॅक पॅक पॅक बदक पलाला

बेसनलाडू
Sun, 12/05/2010 - 11:49 नवीन
पॅक पॅक पॅक पॅक बदक पलाला कुनाच्या घरी गेला? (२) || धृ || अरे पानी पिउनशान आलाय कन्टाला सर्बत पायजे मला अरे सर्बत पिउनशान आलाय कन्टाला विस्की पायजे मला || १ || अरे बायको घेउनशान आलाय कन्टाला साली पायजे मला अरे साली घेउनशान आलाय कन्टाला शेजारिन पायजे मला || २ || हे गाणे गल्यान साखली सोन्याची ही पोरी कोनाची च्या चालीवर गावे. (वात्रट)बेसनलाडू जास्तीची मेजॉर्टि आणि कमीची मेजॉर्टि आठवले आणि इतके बरे वाटले!! करवंटी डबा ऐस पैस च्या वेळी आपल्यावर राज्य यायला नको म्हणून नेहमी मेजॉर्टित रहाण्यासाठी देवाची प्रार्थना करायचो ते दिवस आठवले. (स्मरणशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

वाह!

दिपक
Sat, 12/04/2010 - 14:27 नवीन
अजुन येऊद्यात.. जुने दिवस ताजा झाले. रुईया कॉलेजच्या ‘ग म भ न’ ह्या अप्रतिम एकांकिकेतील सुरुवातीचा वर्गातला भन्नाट सिन डोळ्यासमोर आला.
  • Log in or register to post comments

हे एक राहिलंच

यकु
Sat, 12/04/2010 - 16:59 नवीन
टिल्लू जोकर राणीचा नोकर राणी मारते छमछम छड्या टिल्लू मारतो टूण टूण उड्या.. एवढंच येतंय
  • Log in or register to post comments

थांब टकल्या भांग पाडतो. एव्हढ

स्पंदना
Sat, 12/04/2010 - 17:25 नवीन
थांब टकल्या भांग पाडतो. एव्हढ एकच आठवतय हो, बाकि सार विसरल.
  • Log in or register to post comments

मस्त धागा आणि प्रतिसाद.

अवलिया
Sat, 12/04/2010 - 17:55 नवीन
मस्त धागा आणि प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

कट्टी-सो

डावखुरा
Sat, 12/04/2010 - 18:32 नवीन
कट्टी बट्टी........बाल बट्टी.........बारा महीने बोलु नको... पुन्हा खेळ्ताना दोन गट पाडुन खेळत असु तर एखाद्या गटात एखादा भिडु कमी असेल तर... एक भिडु पोटात...खि खि खि... रतडी........रतडी/चिटर.....चिटर(एखादा खेळाडु आउट होउन पण मान्य करत नसेल किंवा नियम तोडत असेल तर त्याला जेरीस आणण्यासाठी वारंवार ह्या शब्दांचा वापर.. ) शाळेच्या सहलीच्या वेळी शेकोटी किंवा बस मधे म्हणायला टाईमपास १]चार वाजले कोंब्डा आरवला.... सखु गेली पाण्याला.... सखुला कोण भेटलं???????? (मग कोणाचेही नाव घ्यायचे म्हणजे उपस्थित असलेल्यांपैकी आणि मग.... ) सखु त्याला काय म्हणाली????? (मग त्याची टिंगल सखुच्या नावाखाली आपणच करायची.....) २]"मालाचा म्हातारा... शेकोटीला चाल्ला मालाचा म्हातारा...म्हातार्‍याची बायको... शेकोटीला चाल्ले... मालाचा म्हातारा...म्हातार्‍याची बायको...बायकोचा मुलगा.. शेकोटीला चाल्ले... मालाचा म्हातारा...म्हातार्‍याची बायको...बायकोचा मुलगा..मुलाची गाय... शेकोटीला चाल्ले... मालाचा म्हातारा...म्हातार्‍याची बायको...बायकोचा मुलगा..मुलाची गाय...गायीचे वासरु.... शेकोटीला चाल्ले... मालाचा म्हातारा...म्हातार्‍याची बायको...बायकोचा मुलगा..मुलाची गाय...गायीचे वासरु....वासराची शेपटी... शेकोटीला चाल्ले... मालाचा म्हातारा...म्हातार्‍याची बायको...बायकोचा मुलगा..मुलाची गाय...गायीचे वासरु....वासराची शेपटी...शेपटीचे केस... शेकोटीला चाल्ले... मालाचा म्हातारा...म्हातार्‍याची बायको...बायकोचा मुलगा..मुलाची गाय...गायीचे वासरु....वासराची शेपटी...शेपटीचे केस...केसावरची पिस्सु.... शेकोटीला चाल्ले...!!"
  • Log in or register to post comments

कापूसकोंड्याची

श्रावण मोडक
Sat, 12/04/2010 - 18:35 नवीन
कापूसकोंड्याची गो­ष्ट कशी विसरले?
  • Log in or register to post comments

तुम्ही नागपुर चे का हो?

नेहमी आनंदी
Sat, 12/04/2010 - 20:28 नवीन
ही सगळी वाक्य जशीच्या तशी आम्ही पण म्हणायचो..
  • Log in or register to post comments

दत्त दत्त ..दत्ताची गाय..

अविनाशकुलकर्णी
Sun, 12/05/2010 - 11:22 नवीन
दत्त दत्त ..दत्ताची गाय..
  • Log in or register to post comments

आदा पादा कोण पादा दामाजीचा

स्पा
Sun, 12/05/2010 - 12:17 नवीन
आदा पादा कोण पादा दामाजीचा घोडा पादा धाम ढूस शेंडी फूस कुजक्या बामना पाद्लास तूच
  • Log in or register to post comments

एक विनंती

पंगा
Sun, 12/05/2010 - 13:17 नवीन
धाम ढूस शेंडी फूस कुजक्या बामना पाद्लास तूच
कृपया आपली जात समजू शकेल काय? आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आय थिंक

डिजेबॉय
Sun, 12/05/2010 - 13:25 नवीन
एलियन आय थिंक :p :hat:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

ओ पंगा उर्फ तथाकथित गागा भट्ट

स्पा
Sun, 12/05/2010 - 14:00 नवीन
मला वाटलेलच कोणीतरी हीन डोक्याचा... लगेच जातीवर येईलच... मी कोकणस्थ ब्राम्हण आहे.... काय म्हणणं आहे तुमचं ..... ओ पंगा उर्फ तथाकथित गागा भट्ट कवितेतला विनोद समजण्याचा सोडून नसते तारे बरे तोडता तुम्ही असो बाकी चालूद्यात.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

आभार

पंगा
Sun, 12/05/2010 - 20:24 नवीन
मी कोकणस्थ ब्राम्हण आहे
माहितीबद्दल आभारी आहे.
कवितेतला विनोद समजण्याचा सोडून
पुन्हा, माहितीबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आदा पादा...

चिगो
Sun, 12/05/2010 - 13:46 नवीन
आदा पादा कोण पादा दामाजीचा घोडा पादा ठाम ठुस ठैय्या ठुस कारे बामना पादला तुच तेलीन बाई तेल दे कोन पादलं सांगून दे... . . . . पांड्या रे पांड्या दुकान मांड्या दुकानाची किल्ली हारपली पांड्यानं बायको झोडपली पांड्याच्या बायकोनं मारली लात पांड्या पडला संडासात संडासात निघला साप पांड्या म्हणे बाप रे बाप...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

वा चीगो सही

स्पा
Sun, 12/05/2010 - 13:55 नवीन
वा चीगो सही
  • Log in or register to post comments

मस्तच....... आटली बाटली कचकन

dipti
Sun, 12/05/2010 - 15:37 नवीन
मस्तच....... आटली बाटली कचकन फुटली माझं नाव घ्यायला लाज नाही वाटली? ------------------------------- सांग सांग सांग दाढी मिशा लाव दाढी गेली वाया पड माझ्या पाया पायाखाली सुपारी तुझा लग्न दुपारी दुपारी आले पाहुणे तेच माझे मेहुणे ....
  • Log in or register to post comments

अजून एक

प्राची
Sun, 12/05/2010 - 15:47 नवीन
शाळेत ऑफ पिरेडला खेळला जाणारा खेळ :नाव,गाव,फळ,फुल(प्राणी,पक्षी,रंग,आडनाव,वस्तू,सिनेमा).
  • Log in or register to post comments

शाळा सुट्ली

ramjya
Sun, 12/05/2010 - 20:00 नवीन
शाळा सूट्ली पाटी फुट्ली
  • Log in or register to post comments

पुढे?

यसवायजी
गुरुवार, 06/25/2015 - 02:20 नवीन
पुढे? - दुकानदाराची नाड़ी सुटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ramjya

अरे

लवंगी
Sun, 12/05/2010 - 22:23 नवीन
मला ते मालाड चा म्हातारा वाटायच.. आम्ही तसच गायचो
  • Log in or register to post comments

आमीबी खेळात सामील हाय...

योगप्रभू
Mon, 12/06/2010 - 01:46 नवीन
एप्रिल फूल, कानात डूल, हातात बांगड्या, सासूबाई लंगड्या बॉईज डू यू अंडरस्टँड? यस सर धिस इज यष्टीस्ट्यँड सोन्याच्या सायकलला चांदीचे स्पोक, ... सरांच्या चड्डीला भले मोठे भोक आप जैसा कोई मेरी जिंदगी मे आये, तो बाप बन जाये
  • Log in or register to post comments

आमच शिकू

ramjya
Mon, 12/06/2010 - 09:52 नवीन
एक मेकाना चिडवताना "आमचे शिकू गाडगे विकु".... खेळ्ताना "नवा गडी नवा राज" मराठी शाळेत "ये रे ये रे पाऊसा तूला देतो पैसा" किन्वा "सान्ग सान्ग भोलानाथ पाऊस पडेल काय?" ईन्ग्रजी शाळेत " रेन रेन गो अवे का शिकवले जाते"?????
  • Log in or register to post comments

जास्त मनावर घेउ नका. मराठीत

किचेन
Sat, 03/19/2016 - 09:38 नवीन
जास्त मनावर घेउ नका. मराठीत पावसाला लाच द्यायला शिकवतात ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ramjya

आपणच आपल्या धाग्यावर कॉमेंट

गवि
Mon, 12/06/2010 - 09:56 नवीन
आपणच आपल्या धाग्यावर कॉमेंट टाकल्याने आपला धागा वर येतो का ते अजूनही कळलेलं नाही. तरीही आपला धागा वर काढण्यासाठी प्रत्येक कॉमेंटवर प्रति कॉमेंट टाकतोय असा (गैर)समज होऊ नये म्हणून आता एकदाच प्रतिसाद देतोय. सर्व प्रतिक्रिया देणार्‍यांचे अत्यंत आभार. बरीच भर घातलीत या बडबडवाक्यांमधे. एकदम दोस्तांचा कट्टा जमल्यासारखं वाटलं. धमाल.
  • Log in or register to post comments

आयला.. गगनविहारी कुठेही

डावखुरा
Mon, 12/06/2010 - 14:41 नवीन
आयला.. गगनविहारी कुठेही संकोच...
  • Log in or register to post comments

शाळेची आठवण

योगेश सुदाम शिन्दे
Mon, 12/06/2010 - 18:39 नवीन
शाळेची आठवण आली हो
  • Log in or register to post comments

परमवीर

निनाद मुक्काम …
Tue, 12/07/2010 - 04:29 नवीन
इयत्ता दुसरीत असताना परमवीर ह्या मालिकेच्या शीर्षक गीताचे माझे विडंबन त्याकाळी वर्गात मुलांच्या तोंडी होते .((चाल सर्वांच्या लक्षात असेलच ) परम वीर (टेटे टे.....) परमवीर (.........) जो करी जीवाचे आम्लेट छातीवर झेलून चॉकलेट जो चहात घालतो घासलेत तो खातो पापलेट खातो पापलेट परमवीर (.....)खरच शाळेचे मयुरपंखी दिवस आठवले .मस्त आहे हा लेख .
  • Log in or register to post comments

हे हे हे.. हेच आमच्या गोटात

गवि
Tue, 12/07/2010 - 09:47 नवीन
हे हे हे.. :) हेच आमच्या गोटात : परमवीर.. जो करी जिवाची शेळी छातीवर झेलून केळी.. जो देशदद्रोह नित पाळी.. तो परमवीर.. हा देश तुडविण्यासाठी.. अन्याय घडविण्यासाठी.. वगैरे... फाजीलपणा सगळा.. छान आठवण करुन दिलीत. धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

अजून एक आठवले - कोणी म्हणजे

पक्या
Tue, 12/07/2010 - 08:09 नवीन
अजून एक आठवले - कोणी म्हणजे काय विचारले की - 'म्हंजे म्हंजे वाघाचे पंजे कुत्र्याचे पाय उंटाची मान.....' असे बरेच काहीतरी होते.
  • Log in or register to post comments

मुलीला म्हणायचे

अरुण मनोहर
गुरुवार, 06/25/2015 - 05:33 नवीन
म्हंजे म्हंजे वाघाचे पंजे कुत्र्याचे पाय उंटाची मान..... तुझं माझं लग्न सावधान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

उंटाची मान म्हशीचं शाण

बॅटमॅन
गुरुवार, 06/25/2015 - 15:07 नवीन
उंटाची मान म्हशीचं शाण गाढवाची शेपूट हेही ऐकले आहे पुढे. तदुपरि- का? कावळा खा. कावळ्याचं बी उगाळून पी. पिणार कोण ? तू. पुढे खास हग्रुप्त आज्ञा आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

वर्गात पैला लंबर आला की

यसवायजी
गुरुवार, 06/25/2015 - 15:21 नवीन
वर्गात पैला लंबर आला की म्हणायचो- पैला पेढा, दुसरा रेडा, तिसरा तिरंगी झेंडा, चौथा गाढवाचा लेंडा, पाचवा समथींग समथींग...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पेढा अन रेडा पर्यंत आठवतेय,

बॅटमॅन
गुरुवार, 06/25/2015 - 15:27 नवीन
पेढा अन रेडा पर्यंत आठवतेय, पुढचे नवीन आहे/आठवत नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

वेणी- रिबिन घालणार्या छोट्या मुली

ramjya
Tue, 12/07/2010 - 09:39 नवीन
झिम पोरी झिम कपाळे चे भिन्ग भिन्ग गेले फुटुन पोरी आल्या उठून पोरीत पोरी मीच गोरी आरसा फणी घाल माझी वेणी.. आता तश्या छोट्या(शाळेत जानार्या) वेणी घातलेल्या मुली खूप कमी दिसतात
  • Log in or register to post comments

सही... हे राहिलंच..

गवि
Tue, 12/07/2010 - 09:48 नवीन
सही... हे राहिलंच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ramjya

पुढे हे

मृगनयना
Fri, 07/27/2012 - 15:28 नवीन
पुढे हे असे काहीसे आठवतंय ... बरोबर आहे ना ?? ..... झिम पोरी झिम कपाळे चे भिन्ग भिन्ग गेले फुटुन पोरी आल्या उठून पोरीत पोरी मीच गोरी काळे ते काळे मोत्याचे जाळे लाट्या बाई लाट्या सारंगी पेट्या मामाने दिल्या रंगीत पेट्या हरी गुजरी कृष्ण गुजरी पिंडीवरचा हार माझा सोळा पदरी सोळा पदरी ......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ramjya
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा