✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सदाहरित खाद्यजत्रा -- आज कुठे नि काय खाल्लंत

स
सस्नेह यांनी
Wed, 06/17/2015 - 17:09  ·  लेख
लेख
आपण मिपाकर्स आद्य खाद्यप्रेमी आहोत. तेव्हा जिथे जाऊ तिथे खाऊ खाऊ करत असतो. सगळ्या खाद्य-खासियती आम्हा ठावकी. तर इथे आपण कुठे काय मस्त मस्त चमचमीत हादडले ते साग्रसंगीत सांगायचंय आणि तोंपासु फोटो पेस्टवायचे आहेत. ..चला तर मग ईनोचं दुकान खोलूया. मी आज दुपारी कोल्हापुरात एस्टी दत्तासमोर मस्त कटवडा चापला ! पण हाय ! फोटो काढायला दम धरवेना ! तो हो ज्जाव सुरू !!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
24459 वाचन

💬 प्रतिसाद (125)

प्रतिक्रिया

आज काय खाल्ले?

एस
Sun, 06/21/2015 - 08:15 नवीन
आज (पण) आम्ही (हिचे) टोमणे खाल्ले. चविष्ट होते. थोड्या वेळाने इडली मिळणार आहे, म्हणून (नेहमीप्रमाणेच) शांतपणे खाऊन घेतले. इडली फस्त करून झाल्यावर जमल्यास (आणि उरल्यास) फोटो टाकतो.
  • Log in or register to post comments

आज बरेच दिवसांनी बाहेर खाल्ले

श्रीरंग_जोशी
Sun, 06/21/2015 - 08:47 नवीन
आमच्या शहरातल्या पॅराडाइझ बिर्यानी पॉइंट या उपहारगृहात लंच बुफे खाल्ला. तिथले दक्षिण भारतीय पदार्थ रुचकर असल्याने उत्तर भारतीय पदार्थांकडे पाहिलेही नाही. नावाला थोडेसे चाट, इडली सांभर व चटणी, एकदम खुसखुशीत मेदूवडे, थोडेसे पोरियाल, पुरी भाजी अन दहीभात. त्यानंतर इथल्या सर्वात मोठ्या भारतीय वाणसामानाच्या दुकानातून खरेदी केली. दुर्दैवाने हापूस आंबे यायला अजुन एक आठवडा लागणार आहे असे कळले. त्या दुकानाबाहेर ताजा उसाचा रस मिळतो आजकाल. तेव्हा प्राशन करणे शक्य नसल्याने टू गो करून घरी आणला व निवांतपणे पिला. Image removed.
  • Log in or register to post comments

१०० झाल्यानिमित्त से

टवाळ कार्टा
Wed, 06/24/2015 - 18:12 नवीन
१०० झाल्यानिमित्त से स्नेहांकिता तैंचा सत्कार भविष्यात होणार्या तांदूळ मोहोत्सवात एक फ्लेक्ष लावून करणेत येईल हे आश्वासन देउन करणेत येत आहे - शुभेच्छूक अखिलमिपातांदूळवाडीमित्रमंडळ
  • Log in or register to post comments

फक्त एक फ्लेक्ष?

मोहनराव
Wed, 06/24/2015 - 18:28 नवीन
१ किलो दावत बासमती पाठवुन द्या की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

त्यापेक्षा इंद्रायणीच द्या !

सस्नेह
Wed, 06/24/2015 - 22:41 नवीन
त्यापेक्षा इंद्रायणीच द्या ! उद्या पावट्याच्या मोडाचा रस्सा भाताबरोबर ओरपणार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

पावट्याच्या मोडाचा रस्सा

गवि
Wed, 06/24/2015 - 23:22 नवीन
पावट्याच्या मोडाचा रस्सा भाताबरोबर ओरपणार !
आय हाय..काय त्रास आहे..यांचे खाते गोठवा रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

वा रे वा !

सस्नेह
गुरुवार, 06/25/2015 - 12:20 नवीन
तुम्ही मटण-भात लपक लपक करत खायचा आणि आमची खाती गोठवायची होय ..? हम्म....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

कालच केला !

सस्नेह
Mon, 07/27/2015 - 10:54 नवीन
पावट्याच्या मोडाच रस्सा अन इंद्रायणी भात ! Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

आज अंडाभुर्जी खाल्ली. फोटो

मोहनराव
Wed, 06/24/2015 - 18:26 नवीन
आज अंडाभुर्जी खाल्ली. फोटो काढायच्या आत संपली.
  • Log in or register to post comments

तुम्हाला नक्की किती हात आहेत

काळा पहाड
Wed, 06/24/2015 - 18:34 नवीन
तुम्हाला नक्की किती हात आहेत हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

थांबा हं मोजतो...

मोहनराव
Wed, 06/24/2015 - 18:36 नवीन
थांबा हं मोजतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

आज आमचा कुठेतरी बाहेर लंच चा

पद्मावति
Wed, 06/24/2015 - 21:35 नवीन
आज आमचा कुठेतरी बाहेर लंच चा प्लान बनला. साऊथ इंडियन खाण्याचा मूड होता म्हणून south croydon च्या नवरत्न रेस्टोरेंट मधे गेलो होतो. गेल्यावर तेथील माणसाने आमचे अगदी प्रसन्न हसून स्वागत केले आणि आज कुठले कुठले पदार्थ उपलब्ध नाहीत याची लिस्ट पटापटा म्हणून दाखवली. त्याच्या नन्नाच्या लिस्ट मधे लिस्ट मधे वडा नाही, गोडामधे गुलाबजाम नाही, पेयामधे फिल्टर कॉफी नाही वगैरे वगैरे. आता वडा नाही म्हणजे वडा-सांबार, रसम वडा, दही वडा हे सगळे प्रकार कॅन्सल. मग डोसा आणि इडली ऑर्डर केली. डोसा मात्र अप्रतिम. इतका छान डोसा मी तरी अजुन पर्यंत खाल्ला नव्हता. इडली सुद्धा मस्तं. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

अरे आताच तर फोटो दिसत होते.

पद्मावति
Wed, 06/24/2015 - 22:06 नवीन
अरे आताच तर फोटो दिसत होते. कुठे गायब झाले काही समजत नाही....पुन्हा फोटो टाकते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

हे फोटो.

पद्मावति
Wed, 06/24/2015 - 22:10 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

खासंच

श्रीरंग_जोशी
Wed, 06/24/2015 - 22:43 नवीन
फोटो पाहून तोंडाला पाणी सुटले :-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

भारी फोटू.

रेवती
Wed, 06/24/2015 - 23:37 नवीन
भारी फोटू. त्याने नन्नाचा पाढा वाचला तरी तुमच्या हाती काहीतरी लागलं म्हणायचं! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

तो डोसा काय कुरकुरीत दिसत आहे

रुपी
Wed, 06/24/2015 - 23:56 नवीन
तो डोसा काय कुरकुरीत दिसत आहे. असाच उचलून खावासा वाटतोय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

वा छान!

मोहनराव
गुरुवार, 06/25/2015 - 02:42 नवीन
वा छान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

आज जेवायला मस्त कांदा भजी

सुबोध खरे
Wed, 06/24/2015 - 23:50 नवीन
आज जेवायला मस्त कांदा भजी होती. भरपूर हादडली. कारण बाकी जेवायला भेंडीची भाजी, आमटी आणि पोळी होती. नंतर बायकोला कटकट केली इतकी भजी छान झाली होती त्यामुळे फार खाल्ली आता पोटात जागाच नाही आणि हळूच जेवणाला फाटा मारला.
  • Log in or register to post comments

इंद्रायणी भात

अभिरुप
गुरुवार, 06/25/2015 - 12:50 नवीन
गवि... मी बर्‍याचदा हा तांदूळ मुंबईत अपना बाजार मध्ये खरेदी केला आहे. तसेच थेट वाशी मार्केटमधून सुद्धा मिळतो.
  • Log in or register to post comments

अपना बाझार अजून आहे हे माहीत

गवि
गुरुवार, 06/25/2015 - 12:53 नवीन
अपना बाझार अजून आहे हे माहीत नव्हतं. आता शोधतो आणि मिळवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरुप

गवि

कपिलमुनी
गुरुवार, 06/25/2015 - 12:58 नवीन
मुंबई पुणे प्रवासात एकदा तळेगावला या. चांगला जुना तांदूळ घेउन देतो. मस्त कट्टा करू :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पाया सूप

अभिरुप
गुरुवार, 06/25/2015 - 12:56 नवीन
काल कामानिमित्त अ‍ॅंटॉप हिल ला गेलो होतो तेव्हा जवळच सरदार नगर मध्ये सरदार पाया हाऊस मध्ये पाया अन बटर राईस विथ चिकन सुर्वा चापला. खूप फेमस आहे हे ठिकाण. अप्रतिम चव..फटु काढता आले नाहीत त्या बद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments

फटु काढता आले नाहीत त्या

गवि
गुरुवार, 06/25/2015 - 13:13 नवीन
फटु काढता आले नाहीत त्या बद्दल
फटु काढता आले नाहीत त्या बद्दल आभार..!! ;) आता तिथे जाणे आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरुप

डोम्बिवलीतील मिसळीची ही बातमी

दुर्गविहारी
Sat, 06/27/2015 - 11:08 नवीन
डोम्बिवलीतील मिसळीची ही बातमी म. टा. मध्ये आलेली आहे डोम्बिवलीतील मिसळीची
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा