✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सदाहरित खाद्यजत्रा -- आज कुठे नि काय खाल्लंत

स
सस्नेह यांनी
Wed, 06/17/2015 - 17:09  ·  लेख
लेख
आपण मिपाकर्स आद्य खाद्यप्रेमी आहोत. तेव्हा जिथे जाऊ तिथे खाऊ खाऊ करत असतो. सगळ्या खाद्य-खासियती आम्हा ठावकी. तर इथे आपण कुठे काय मस्त मस्त चमचमीत हादडले ते साग्रसंगीत सांगायचंय आणि तोंपासु फोटो पेस्टवायचे आहेत. ..चला तर मग ईनोचं दुकान खोलूया. मी आज दुपारी कोल्हापुरात एस्टी दत्तासमोर मस्त कटवडा चापला ! पण हाय ! फोटो काढायला दम धरवेना ! तो हो ज्जाव सुरू !!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
24459 वाचन

💬 प्रतिसाद (125)

प्रतिक्रिया

ढॅSSSSSट्स इट !!!

सस्नेह
गुरुवार, 06/18/2015 - 13:33 नवीन
ढॅSSSSSट्स इट !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

१ ल्लूल्लूल्लूल्लूऊऊऊऊ x ४

एस
गुरुवार, 06/18/2015 - 14:06 नवीन
एक ल्लूल्लूल्लूल्लूऊऊऊऊ दोन ल्लूल्लूल्लूल्लूऊऊऊऊ तीन ल्लूल्लूल्लूल्लूऊऊऊऊ चार ल्लूल्लूल्लूल्लूऊऊऊऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/18/2015 - 14:27 नवीन
ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

कुणी तरी खात्रीपुर्वक सांगा

गणामास्तर
Wed, 06/17/2015 - 22:37 नवीन
कुणी तरी खात्रीपुर्वक सांगा रे एकदाचं की कोल्हापुरात नक्की चांगलं काय आणि कुठे मिळतं खायला. प्रसिद्ध म्हणून भेट दिलेली आजपर्यंतची सगळी ठीकाणं एकजात गंडलेली निघालीयेत्.
  • Log in or register to post comments

कोल्हापुरात जाऊन मिसळ खाऊ नये

वगिश
Wed, 06/17/2015 - 23:09 नवीन
कोल्हापुरात जाऊन मिसळ खाऊ नये,कोल्हापुरी मिसळ कोल्हापुरच्या बाहेरच चांगली मिळते.(अनुभवावरून)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

+१

सूड
Wed, 06/17/2015 - 23:12 नवीन
आम्ही कोल्लापूरात सन्मानमधला बटाटेवडा खायचा राहून जाणार नाही असं बघतो. कट्ट्याच्या वेळी त्या येष्टीवाल्यान् माती खाल्लंन्. नायतर तेव्हा पण चुकला नसता!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश

घाटी दरवाजासमोरची दत्त मिसळ

सस्नेह
गुरुवार, 06/18/2015 - 14:29 नवीन
घाटी दरवाजासमोरची दत्त मिसळ खा. ...पाणीपण मागू शकणार नै ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

...पाणीपण मागू शकणार नै ;)

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/18/2015 - 14:57 नवीन
...पाणीपण मागू शकणार नै ;)
आयला...डायरेक्ट खच्याक????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

कुठंशीक आलं हे सन्मान?

गणामास्तर
Fri, 06/19/2015 - 15:26 नवीन
कुठंशीक आलं हे सन्मान?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

म्हाद्वार रोड (?) वर

सूड
Fri, 06/19/2015 - 17:50 नवीन
म्हाद्वार रोड (?) वर अंबाबैच्या देवळाकडं तोंड करुन हुबारला का नै, डाव्या हाताला हिंदुस्तान बेकरीच्या लायनीतच अलीकडं सन्मान हाय!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

काय नाय तर ठिकठिकाणी मिळणारा

मृत्युन्जय
गुरुवार, 06/18/2015 - 12:21 नवीन
काय नाय तर ठिकठिकाणी मिळणारा गोटी सोडा, राजाभाऊची भेळ आणि खासबागची मिसळ हे मस्ट. मला पर्सनली फडतरे मात्र अजिबात म्हणजे अजिबात म्हणजे अजिबातच आवडले नाही. त्यापेक्षा बरी मिसळ पुण्यातल्या कुठल्याही गल्लीत मिळेल. फार पुर्वी मी जेव्हा कोल्हापूरात रहायचो त्यावेळेस रंकाळ्यावर कुठलेसे दुकान होते तिथे मिळणारी भेळ केवळ अप्रतिम तशी अजुन कुठे खायला मिळाली नाही. गांगावेशेतल्या मेघदूत मध्ये खाल्लेली अंडाकरी सुद्धा अजुन विसरलेलो नाही (आता मेघदूत आहे की नाही ते माहिती नाही). मंदिराजवळच मिळणारी तिखटजाळ मिसळ देखील अशीच मामलेदारच्या तोडीस तोड होती (दुकानाचे नाव आठवत नाही). बाकी सोळंकीचे आइसक्रीम खाल्ले. चांगले होते पण काही विशेष असे वाटले नाही. बाकी ते पांढरा / तांबडा प्रकरण पूअर व्हेज असल्याने आम्हाला पुर्ण वर्ज्य आहे. त्यामुळे त्याबाबत काही माहिती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

मला पर्सनली फडतरे मात्र

गणामास्तर
Fri, 06/19/2015 - 15:24 नवीन
मला पर्सनली फडतरे मात्र अजिबात म्हणजे अजिबात म्हणजे अजिबातच आवडले नाही. त्यापेक्षा बरी मिसळ पुण्यातल्या कुठल्याही गल्लीत मिळेल. हज्जारदा सहमत. मला खासबाग.फडतरे, बावडा वा आहार यांपैकी कुठलीचं मिसळ आवर्जुन खाण्यालायक वाटली नाही. बाकी पांढरा / तांबडा रस्सा सुद्धा कोल्हापुरा बाहेरचं चांगला मिळतो असे निरीक्षण नोंदवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

कोल्लापुरातल्या मिसळीत

कंजूस
गुरुवार, 06/18/2015 - 09:46 नवीन
कोल्लापुरातल्या मिसळीत पंचगंगेचच शुद्ध जल वापरले जाते खडकवासल्याचं नाही.
  • Log in or register to post comments

.

बबिता बा
गुरुवार, 06/18/2015 - 10:37 नवीन
घाटकोपर स्टेशन पू .... दारात मसाला पापड मिळतो.
  • Log in or register to post comments

हल्ली अधिक महिन्यामुळे सकाळ

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/18/2015 - 13:17 नवीन
हल्ली अधिक महिन्यामुळे सकाळ सकाळच्या वख्ताला जगताप हास्पिटल जवळ लागणाय्रा एका अण्णाच्या गाडीवर डोसे उत्ताप्पे उडवण्याचा कार्यक्रम सुरु केलेला आहे. सकाळि 6 च्या पुढे एकदिड तासच असते ही गाडी. पण एकदम फ्रेश्श माल असतो. चुरचुरीत गरम. आणि त्येचा कटाळा आला ,तर संतोष बेकरित भट्टी फ़्रेस्स प्याटिस , क्रिमरोल, आणि माझा तिथला आवडता हनीकेक ..
  • Log in or register to post comments

संतोष

स्वाती दिनेश
गुरुवार, 06/18/2015 - 15:56 नवीन
आपटे रोड वरची संतोष बेकरी ना.. तिथले पॅटिस लै भारी.. हिंदुस्तानच्या पेक्षाही मला संतोषचे पॅटिस जास्त आवडतात, आणि क्रिमरोल्स.. वावा, काय आठवण काढलित.. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बेकरी तीच. फ़क्त सिंहगड

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/18/2015 - 16:18 नवीन
बेकरी तीच. फ़क्त सिंहगड रोडवरचि. संतोष हॉल चौकातली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

चिकन समोसा आणि चिकन शवर्मा @ एरोली, नवी मुम्बई

लव उ
गुरुवार, 06/18/2015 - 15:57 नवीन
एरोली सेक्टर १९ मध्ये म्हाळसा हाईट्स मधे एक बिस्मिल्ला कॅट्रिंग दुकान आहे. तिथे मिळ्णारा चिकन समोसा आणि चिकन शवर्मा एकदम मस्त असतो.
  • Log in or register to post comments

आ य ला

इरसाल
गुरुवार, 06/18/2015 - 16:46 नवीन
भारी ना, तुम्हाला सेपरेटली लु ऊ ऊ ऊ ऊ करावे लागत नसणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लव उ

=))

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/18/2015 - 20:51 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

वरणफळं खातोय तुप घालुन स्वतः

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 06/18/2015 - 21:11 नवीन
वरणफळं खातोय तुप घालुन स्वतः केलेली.
  • Log in or register to post comments

आज ताजी ताजी पाप्लेट्

स्नेहानिकेत
गुरुवार, 06/18/2015 - 23:13 नवीन
आज ताजी ताजी पाप्लेट् खाल्लीएत मस्तपैकी तळून आणि कालवण करुन.
  • Log in or register to post comments

आज आलू पराठा विथ कांद्याची

बॅटमॅन
Fri, 06/19/2015 - 00:24 नवीन
आज आलू पराठा विथ कांद्याची चटणी खाल्ला, बरी होती टेस्ट. पराठा बनवायचा अस्मादिकांचा पहिलादुसराच प्रयत्न असल्याने लै खास झाला नै, पण उम्मीद पे दुनिया कायम है.
  • Log in or register to post comments

आलू पराठा करायचा असेल तर, खालील लिंक बघा....

मुक्त विहारि
Fri, 06/19/2015 - 07:49 नवीन
https://www.youtube.com/watch?v=I8dwCXCYdHE बादवे, आमचा आजचा मेन्यु : नाश्ता : इडली-चटणी-सांभार जेवण : चिकन बिर्याणी + टोमॅटो-सोलकढी दुपारी : कांदे-पोहे (लग्न झाले आहे) रात्री : कढी-खिचडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खाद्यजत्रेत खाऊन झाल्यावर हात

कंजूस
Fri, 06/19/2015 - 08:25 नवीन
खाद्यजत्रेत खाऊन झाल्यावर हात धुवून फक्त बातमी द्यायची आहे का प्रत्येकाने ?फोटो बिटो कोणीच देत नाहीयै. पुढच्या वेळेस बुवांना मिसळ खायला घालून रीतसर मुहुर्ताची फुलांची आरास करून सुरुवात करा.
  • Log in or register to post comments

.घ्या..खेड शिवापूर.जगदंबा

गवि
Fri, 06/19/2015 - 11:35 नवीन
.घ्या..खेड शिवापूर.जगदंबा हॉटेल. .इंद्रायणी भात आणि मटणरस्सा.परमानंदम..हा भात वेगळाच आहे..मुंबई वगैरे साईडला हा तांदूळ मिळाला तर वाह. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

लै भारी हॉटेल

कपिलमुनी
Fri, 06/19/2015 - 14:23 नवीन
लै भारी हॉटेल आहे . मटण हंडी तर लाजबाब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ते मोबाईलवरून फोटो कसे

एस
Fri, 06/19/2015 - 13:12 नवीन
ते मोबाईलवरून फोटो कसे चढवायचे मिपावर याची टिप द्या ना इथेपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मोबाईलवरून फोटो

मधुरा देशपांडे
Fri, 06/19/2015 - 13:21 नवीन
कंजूस काकांनी इथे सांगितले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

कुठे आहे हे हॉटेल

प्रशांत हेबारे
Fri, 06/19/2015 - 17:36 नवीन
Highway la आहे का हे हॉटेल
  • Log in or register to post comments

आज घरातच जेवले, जसे आपण नेहमी

रेवती
Fri, 06/19/2015 - 22:56 नवीन
आज घरातच जेवले, जसे आपण नेहमी जेवतो तसे. आता पोळी आणि रेड चार्डच्या भाजीचा फोटो नाही काढला. शेजार्‍यांनी चिकन पाठवलेय. ते खाल्ले नाही.
  • Log in or register to post comments

शेजार्‍यांनी चिकन पाठवलेय. ते खाल्ले नाही.

मुक्त विहारि
Sat, 06/20/2015 - 00:12 नवीन
आमच्याकडे पाठवा..... (कोंबडी-बोकड-शेळी-मत्स्य-अंडी प्रेमी) मुवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

जरूर.

रेवती
Sat, 06/20/2015 - 00:15 नवीन
जरूर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

१-२ तास थांबत असाल तर....

मुक्त विहारि
Sat, 06/20/2015 - 00:23 नवीन
ढेमस्याच्या भाजीची रेसीपी टाकतो... आत्त्ता लिहीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आँ? अहो मुवि, ती ओळ मी लिहून

रेवती
Sat, 06/20/2015 - 00:32 नवीन
आँ? अहो मुवि, ती ओळ मी लिहून नंतर डिलिटली होती..........दिव्यदृष्टी वगैरे लाभलीये का? आमच्याकडे दुपार आहे म्हणून मी येती जाती आहेच पण तुम्ही जागरणे करून काही लिहित बसू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

जागरणे करून काही लिहित बसू नका.

मुक्त विहारि
Sat, 06/20/2015 - 00:44 नवीन
भाजीचे फोटो हरवले होते.आज काही मिळाले. आमच्या जादूच्या घरात परत फोटो मिळतील न-मिळतील, तेंव्हा आजच पा.कृ. लिहीतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

@ रेवती ताई....

मुक्त विहारि
Sat, 06/20/2015 - 02:19 नवीन
ढेमश्याच्या भाजीची पाकृ टाकली आहे. http://www.misalpav.com/node/31712
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

इंद्रायणी भात

अभिरुप
Sat, 06/20/2015 - 14:39 नवीन
इंद्रायणी भात हा मुख्यत: खेड शिवापूर तसेच भोर खोरे आणि पुरंदर खोर्‍यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पिकतो. मटण रश्श्याबरोबर इंद्रायणी भात म्हणजे स्वर्गानुभवच. चवीला अप्रतिम असूनसुद्धा फक्त चिकट होत असल्या कारणाने खूप कमी लोक हा भात प्रेफर करतात. बाकी छान धागा. शुभेच्छा...
  • Log in or register to post comments

.

धडपड्या
Sun, 06/21/2015 - 00:02 नवीन
ह्याचा फोडणीचा भात अप्रतिम लागतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरुप

मावळ

कपिलमुनी
Wed, 06/24/2015 - 16:13 नवीन
ओ भौ , मावळ प्रांत विसरला काय ? इंद्रायणी आमच्या मावळामधलाच एक नंबर ! बाकी आजकाल चांगला आंबेमोहोर मिळत नाही . म्हणून इंद्रायणीचा भाव वाढला आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरुप

हा फक्त मावळ, पुरंदर इत्यादि

गवि
Wed, 06/24/2015 - 16:31 नवीन
हा फक्त मावळ, पुरंदर इत्यादि ठिकाणच्या दुकानांतच मिळतो का? मुंबईपुण्याकडे कुठे मिळेल का? मॉल्समधे वगैरे नेहमी शोधतो, पण इंद्रायणी तांदूळ असं काही दिसलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

खात्री

कपिलमुनी
Wed, 06/24/2015 - 17:49 नवीन
साधारण पुणे जिल्ह्यात सर्वत्र मिळतो पण माव़ळात शेतकर्‍याकडून डायरेक्ट घेतलेला अनपॉलिश्ड तांदूळ सर्वात उत्तम आणि खात्रीच असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मावळला विसरुन कसं चालंल?

मोहनराव
Wed, 06/24/2015 - 18:08 नवीन
इंद्रायणी भाताची चव जिभेवर तरंगत राहते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

एक किलो अगदी शेतकर्‍याकडनं

सूड
Wed, 06/24/2015 - 18:28 नवीन
एक किलो अगदी शेतकर्‍याकडनं घेऊन खाल्ला. काही विशेष वाटलं नाही हो. शिजवायची पद्धत वेगळी असते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

इंद्रायणी भाताची चव जिभेवर तरंगत राहते.

अविनाश पांढरकर
गुरुवार, 06/25/2015 - 12:24 नवीन
इंद्रायणी भात माझाही आवडता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

आज चिवण्या खाल्ल्या.मस्त

स्नेहानिकेत
Sat, 06/20/2015 - 23:32 नवीन
आज चिवण्या खाल्ल्या.मस्त गाभोळी होती प्रत्येक चिवणि मधे.चिवणि हा मासा फक्त पावसाळ्यातच मिळतो भाताच्या शेतात किंवा खाडीत.चवीला मस्त पण साफ़ करायला चिकट असल्यामुळे त्रासदायक.
  • Log in or register to post comments

गाभोळी ?

कपिलमुनी
Wed, 06/24/2015 - 16:17 नवीन
म्हणजे पोटामधली अंडी ना ? अरेरे ! अशामुळे माशांची पैदास कमी होते . या सीझनला तरी माशांना सोडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्नेहानिकेत

आज आईस्क्रीम खाल्ले.

रेवती
Sun, 06/21/2015 - 06:43 नवीन
आज आईस्क्रीम खाल्ले.
  • Log in or register to post comments

फोटू ???

सस्नेह
Sun, 06/21/2015 - 07:05 नवीन
फोटू ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हाणलं का मला!

रेवती
Sun, 06/21/2015 - 07:38 नवीन
हाणलं का मला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा