✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तत्त्वभान

न
निरन्जनदास यांनी
गुरुवार, 06/18/2015 - 21:12  ·  लेख
लेख
मित्रहो, मी गेल्या वर्षी म्हणजे २०१४ साली ‘लोकसत्ता’मध्ये 'तत्त्वभान' हे सदर लेखन करीत होतो. तत्त्वज्ञान या विषयाची ओळख करून देणारं. मी तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक आहे. तत्त्वज्ञान हा जरी उच्च दर्जाचा प्रतिष्ठित विषय असला तरी त्याच्या नादी कुणी फारसं लागत नाही. एका विशिष्ट पातळीच्या खाली येऊन त्यावर लेखन करता येत नाही, अशीही भानगड आहेच. पण वृत्तपत्राचा वाचक सर्व स्तरावरचा असतो. सामान्य माणसापासून प्रतिभावंत तत्त्ववेत्त्यापर्यंत एक मोठा पट या वाचकात असतो. त्यामुळे या सर्वाना सुलभ वाटेल, असे तत्त्वज्ञानविषयक लेखन करण्याचा माझा हा प्रयत्न होता. दर गुरुवारी हे सदर प्रसिद्ध होत असे. एकूण ५० लेख प्रसिद्ध झाले. उदंड प्रतिसाद लाभला. ‘मिसळपाव’ च्या रसिक वाचकांसाठी हे लेखन मी पुन्हा उपलब्ध करून देत आहे. हा उपक्रम पुढील आठवड्यात सुरु करू यात. तुमच्या काटेकोर प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. आपला श्रीनिवास हेमाडे
  • तूर्तास महत्वाचे
  • १. तत्त्वभानाच्या दिशेने
  • २. भानावर येण्यापूर्वी
  • तत्त्वभान ३. स्वजाणिवेचे पक्व रूप
  • तत्त्वभान ४. तत्त्वाचा 'ते'पणा
  • तत्त्वभान ५ .युद्ध ते धर्मयुद्ध.. तत्त्वासाठी

Book traversal links for तत्त्वभान

  • तूर्तास महत्वाचे ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
माध्यमवेध
लेख

प्रतिक्रिया द्या
18235 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

छानच.

राही
गुरुवार, 06/18/2015 - 23:17 नवीन
ते सर्व लिखाण आवडले होते. पुन्हा वाचायलाही आवडेल. पण अशा लेखनाची एक 'नीश' असते. सर्वांना आवडेल असे नाही. स्वागत आणि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

तत्त्वज्ञान हा जरी उच्च

द-बाहुबली
गुरुवार, 06/18/2015 - 23:36 नवीन
तत्त्वज्ञान हा जरी उच्च दर्जाचा प्रतिष्ठित विषय असला तरी त्याच्या नादी कुणी फारसं लागत नाही.
हम्म्म... आमचं मत जरा वेगळं आहे. लिखाण सुरु कराच.
  • Log in or register to post comments

अरे वा

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 06/18/2015 - 23:43 नवीन
तत्वज्ञान हा माझ्याही आवडीचा विषय आहे (त्यातलं फारसं काही कळत नसलं तरीही). तुमच्या लेखमालिकेच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

लेखानाची वाट पहात आहे.

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/18/2015 - 23:50 नवीन
लेखानाची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments

अरे वा ! मिपावर स्वागत.

स्रुजा
गुरुवार, 06/18/2015 - 23:51 नवीन
अरे वा ! मिपावर स्वागत. तुमच्या लेखमालेला शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

लेखमाला आवडली होती. आता

विशाखा पाटील
Fri, 06/19/2015 - 00:02 नवीन
लेखमाला आवडली होती. आता पुन्हा वाचायला मिळेल, याचा आनंद आहे. विशेष म्हणजे, लेखकाशी इथे चर्चा करता येईल.
  • Log in or register to post comments

..उत्कृष्ट.

गवि
Fri, 06/19/2015 - 00:14 नवीन
..उत्कृष्ट. .ती मालिका नेहमी वाचायचो..इथे लिहिताय म्हणून खूप आनंद झाला.
  • Log in or register to post comments

प्रतीक्षेत. लेखमाला वाचली

बॅटमॅन
Fri, 06/19/2015 - 00:21 नवीन
प्रतीक्षेत. लेखमाला वाचली नाही, काय असेल याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

नविन शिकायला

वॉल्टर व्हाईट
Fri, 06/19/2015 - 00:22 नवीन
नविन काही शिकायला मिळेल. तुमच्या लेखांच्या प्रतिक्षेत आहे.
  • Log in or register to post comments

येउद्या!!

स्पंदना
Fri, 06/19/2015 - 04:13 नवीन
येउद्या!!
  • Log in or register to post comments

लिहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/19/2015 - 07:00 नवीन
शुभेच्छा. लेखनाची वाट पाहतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

छ्या::::

अर्धवटराव
Fri, 06/19/2015 - 07:20 नवीन
तुम्ही अस्सल मराठी दिसता. मिपावर या विषयावर लेखमाला प्रसवण्याचं टैमिंग चुकलं तुमचं. मिपावर एक सर्वाधिकारी तत्ववेत्ता वावरायचा पुर्वी. कुणा दुष्टाने/दुष्ट कंपूने त्या आयडीला बळेच जीवंत समाधी दिली. त्या महात्म्याच्या प्रतिसादांशिवाय कुठलंही तत्वज्ञान अगदीच हे वाटतं आम्हाला... च्यायला.. करमणुक नावाची चिझ गायबच झाली मिपावरुन.
  • Log in or register to post comments

लेखकाला अन्य आजीमाजी संदर्भ

गवि
Fri, 06/19/2015 - 12:24 नवीन
लेखकाला अन्य आजीमाजी संदर्भ माहीत नसल्याने उगीच संभ्रम होऊ शकतो किंवा त्यांचं स्वतःचं लेखन चुकीच्या वेळी येतंय असं काहीतरी वाटू शकतं. यास्तव.. श्री. हेमाडेसाहेब, तुम्ही अवश्य इथे तुमचं लिखाण प्रकाशित करा. कोणतीही मदत लागल्यास अथवा अडचण आल्यास खालील लिंकला भेट द्या आणि त्यावर उल्लेखिलेल्या साहित्य संपादक मंडळापैकी कोणाच्याही नावावर क्लिक करुन त्यांना व्यक्तिगत निरोप पाठवा. ते नक्कीच मदत करतील. "संपादक मंडळ" या आयडीला व्यक्तिगत निरोप केला तरी चालेल. इथे धमासान चर्चा होत असतात. तसं झालं तरी विशेष व्यक्तिगत असं त्यात काही घेऊ नका असंच सर्वजण वेगवेगळ्या मार्गाने सांगताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

येक्झॅक्टली !!!

अर्धवटराव
Fri, 06/19/2015 - 22:28 नवीन
इथे धमासान चर्चा होत असतात. तसं झालं तरी विशेष व्यक्तिगत असं त्यात काही घेऊ नका असंच सर्वजण वेगवेगळ्या मार्गाने सांगताहेत.
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मस्त....

मुक्त विहारि
Fri, 06/19/2015 - 07:33 नवीन
झक्कास...
  • Log in or register to post comments

ती लेखमाला आवर्जून वाचत असे.

सतिश गावडे
Fri, 06/19/2015 - 08:53 नवीन
ती लेखमाला आवर्जून वाचत असे. इथेही जरूर लिहा. मात्र एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते ती ही की वृत्तपत्रांमधील लेखनावर थेट चर्चा करता येत नाही, जशी मिसळपाव किंवा इतर कुठल्याही संस्थळावर करता येते. वृत्तपत्रांमधील लेखनावर चर्चा करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वाचकांचा पत्रव्यवहार, जो खूप मर्यादित असतो. इथे तुम्हाला मतमतांतरे वाचायला मिळतील. हबकून जाऊ नका. :) - एपिक्टेटसच्या स्टोईसिझम तत्वज्ञानाचा पंखा.
  • Log in or register to post comments

इथे तुम्हाला मतमतांतरे

विशाल कुलकर्णी
Fri, 06/19/2015 - 11:13 नवीन
इथे तुम्हाला मतमतांतरे वाचायला मिळतील. हबकून जाऊ नका. :) सहमत आहे. बाकी लेखमालेच्या प्रतीक्षेत. आमच्या आवडीचा विषय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

वरील

नाखु
Fri, 06/19/2015 - 11:26 नवीन
प्रभूतींशी सहमत. अश्या सुसंवादाने पुढे लेखकालाही फायदा होईल का हे माहीत नाही, किमान आम्हा वाचकांची "जळमटे" दूर झाली तरी चांगले . अगदी बाळबोध नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

प्रभृती असा शब्द असावा.

प्यारे१
Sun, 06/21/2015 - 23:01 नवीन
प्रभृती असा शब्द असावा. भाषापंडितांनी लक्ष द्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

आपले आणि तत्वज्ञान विषयाचे

सस्नेह
Fri, 06/19/2015 - 09:03 नवीन
आपले आणि तत्वज्ञान विषयाचे स्वागत !
  • Log in or register to post comments

+१

सुचेता
Fri, 06/19/2015 - 11:03 नवीन
प्रति़षेत.
  • Log in or register to post comments

स्वागत!

तुषार काळभोर
Fri, 06/19/2015 - 11:16 नवीन
प्रतिक्षा करतोय. उत्सुकता आहेच.
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Fri, 06/19/2015 - 15:07 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

अरेवा छान... मालिका वाचली

संदीप डांगे
Fri, 06/19/2015 - 12:10 नवीन
अरेवा छान... मालिका वाचली नाही. इथे वाचायला आणि चर्चा करायला आनंद वाटेल. अनाहूत सल्ला: (वादळाच्या आधीची शांतता फील होत आहे) रोलर कोस्टरसाठी तयार राहावे...
  • Log in or register to post comments

स्वागत !

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 06/19/2015 - 12:43 नवीन
स्वागत ! छापील नियतकालिकांमधे जे शक्य नसते असे प्रतिक्रियांव्दारे वाचकांशी प्रत्यक्ष संवाद साधता येणे हे मिपासारख्या संस्थळांचे बलस्थान आहे. तत्वज्ञान हा विषय बर्‍याच जणांच्या डोक्यावरून जात असला तरी काही मोजक्या लोकांच्या आवडीचा आणि अभ्यासाचा आहे. मिपा खुले संस्थळ असल्याने मिपाचे सभासद सामान्य जनतेच्या प्रमाणातच असणार. अभ्यासू प्रतिक्रिया येतील तश्या काही टवाळही येतील. प्रथम प्रकारांशी तुमच्या प्रतिक्रियांव्दारे चर्चा करून लेखावरच्या माहितीचे मुल्य आणि आकलन अजून वाढवता येईल. दुसर्‍या प्रकाराला प्रत्येक प्रतिक्रियेच्या मगदूराप्रमाणे आणि तुमच्या मानसिकतेप्रमाणे, थोडी गम्मत समजून खेळीमेळीत (शाब्दीक) ढुश्या द्या किंवा अगदी सरळ दुर्लक्ष करा (मिपाच्या भाषेत, फाट्यावर मारा) ! लेखमालेच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

+१००

अजया
Fri, 06/19/2015 - 13:27 नवीन
लेखनाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

मित्रहो,

निरन्जनदास
Fri, 06/19/2015 - 18:54 नवीन
मित्रहो, केवळ घोषणेवर इतका दणदणीत प्रतिसाद वाचून मी पोटापासून गदगदून, गहिवरून,दहीवरू.... आलो आहे ! काय बाई सांगू ! कित्ती कित्ती ग अॉब्लिक अरे सांगू !! रोलर कोस्टर, ढुश्या, ढिशांव, हम्म्म...हम्म्म...,'नीश' साठी ' मैं भी रेडी हाव तैय्यार ' सोमवारी शिवशंभो अन् भुडूश करून हर हर महादेव करू ! कसें ! ? श्रीनिवास हेमाडे
  • Log in or register to post comments

प्रतिसाद आवडला

श्रीरंग_जोशी
Fri, 06/19/2015 - 18:58 नवीन
खेळकर प्रतिसाद आवडला :-) . अशा खेळीमेळीच्या वातावरणात तत्वज्ञानाचे धडे मिळणे ही माझ्यासारख्यांसाठी पर्वणीच असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निरन्जनदास

..दॅट्स द स्पिरिट..(!!!) ;)

गवि
Fri, 06/19/2015 - 18:58 नवीन
..दॅट्स द स्पिरिट..(!!!) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निरन्जनदास

अरे वा!

पैसा
Fri, 06/19/2015 - 18:57 नवीन
मिपावर स्वागत! येऊ द्या मालिका!
  • Log in or register to post comments

स्वागत

कपिलमुनी
Fri, 06/19/2015 - 19:31 नवीन
लेखमालेच्या प्रतीक्षेत :)
  • Log in or register to post comments

शक्य तेवढे वाचीन.

रेवती
Fri, 06/19/2015 - 22:58 नवीन
शक्य तेवढे वाचीन.
  • Log in or register to post comments

लेख मालिकेची वाट पाहत आहे!

जुइ
Sun, 06/21/2015 - 19:24 नवीन
स्वागत आहे आपले मिपावर!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा