तिने पटापटा भाकऱ्या टाकल्या. लाल भडक पातळ तुरीची डाळ करून गाडग बाजूला ठेवलं. झोपलेल्या आपल्या बापाला उठवत ती म्हणाली
”जेवण करून ठेवल हाय, नंतर खाऊन घे. म्या जरा विहिरीवर जाऊन येते.”
बापाने काही न बोलता हातानेच तिला जाण्याचा इशारा केला. इशारा करणारा हात खाली जोरात आदळला तशी शेजारी ठेवलेली दारूची बाटली पडली. तिने बाटली सरळ करून ठेवली आणि विहिरीला जाणारा रस्ता धरला. वाहिरी जवळ पाच सहा बायका आधी पासूनच पाणी भरत होत्या. रोज तीन चार घागरी घेऊन येणारी ती आज एकच घागर घेऊन कशी आली याच आश्चर्य करत कास्तुराने तिला विचारले, “आज एकच घागर ? सकाळी लवकर उठून पाणी भरल व्हत का ”
ती विहिरीत पाहत म्हणाली. “आज जास्त पाणी नाही लागणार म्हनुन एकच घागर आणली.”
कस्तूरा त्यावर काही बोलली नाही पण अचानक काही आठवून कस्तुरा म्हणाली, “ रात्री लय मारलं का तुझ्या बापाने ?"
ती तशीच एकटक विहिरीत पाहत होती. कास्तुराचा प्रश्न तिला ऐकू आला नाही. तिच्या कोपराला झालेली जखम बघत कास्तुराही शांत राहिली.
सगळ्या बायका जाऊन तिथे फक्त ३ जणी उरल्या होत्या. ती पाणी न भरता तशीच उभी होती. अचानक तिच्या डोक्यात काही विचार आला. तीने आपले पाय आतल्या दिशेने टाकले आणि ती विहिरीच्या कट्ट्या वर बसली.
ति अशी बसलेली पाहून मागच्या कास्तुराने तिला हाक मारली, “ अगं तस बसू नकोस, उगाच मरशील.”
ति मागे पाहत म्हणाली “सगळ्यांनाच कधी ना कधी मारायच आहे मग आज मेल काय आणि उद्या मेल काय, एकच आहे”. तिने वाकून विहिरीत पहिले.
काही वेळाने विहिरीत कोणी तरी पडले आहे हि बातमी गावभर पसरली.
वाचने
2999
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
:-(
लिखान आवडले .. बाकी कहानी
:(
कथा
कथा छान लिहिलीय
मोजक्याच शब्दांत बरंच काही!!
+१
In reply to मोजक्याच शब्दांत बरंच काही!! by सूड
:(
:( :(
:-(
:(
वाचवत नाही हो!
आई ग!
:(
मनपूर्वक धन्यवाद
चांगले लेखन. थोडे अधिक
या कथेत बाप या शब्दाच्या जागी