Skip to main content

आळी मिळी गुप चिळी!

लेखक सटक यांनी मंगळवार, 09/06/2015 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
आळी मिळी गुप चिळी! तू पेटव चिता, त्यावर मी भाजतो पोळी.. आळी मिळी गुप चिळी! तू शोध साधू, त्याना मी देतो सुळी.. आळी मिळी गुप चिळी! तू बनव शत्रू, त्याना मी देतो हाळी.. आळी मिळी गुप चिळी! तू लागल्यासारखे कर, मी ठोकतो आरोळी.. आळी मिळी गुप चिळी! अर्धे शतक माझे आता आली तुझी खेळी.. आळी मिळी गुप चिळी! मी नागवलेच आहे, आता तू फेडशील ती वेगळी..
लेखनविषय:

वाचने 3890
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

तुम्ही अमितसांगली यांची हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी ही नितांत सुंदर कविता वाचून त्यापासून प्रेरणा घेतली का?

In reply to by सतिश गावडे

ती कविता खरेच सुन्दर आहे! तुम्ही म्हणलात आणि वाचली! राजकारणात सध्या दुसरे सान्गण्यासारखे आहेच काय? खूप सारख्या असल्या तरी प्रेरणा नाही! माझे मिसळपाववरचे वाचन अगदी तुटपुन्जे आहे!

In reply to by सतिश गावडे

ओक्के, कोणाचाही काही शॉर्टफॉर्म करतात राव. ते काय गुर्देव आहेत का नुसत्या शॉर्टफॉर्मवर ओळखायला.

In reply to by सूड

या कवितेचा आणि निसोंच्या कवितांचा साकल्याने विचार केलात तर त्यांनी केलेला शॉर्टफॉर्म चुकीचा नाही हे तुमच्याही लक्षात येईल. तोच कॉन्टेक्स्ट वापरुन मी ही हा शॉर्टफॉर्म शोधला. :)

असल्या कवितांसाठी खरडफळा नामक सुविधेचा वापर करावा.. च्यामारी झीट आला आता असल्या कवितांचा.

In reply to by सटक

हिचं विडंबन पडलं, आणि तरी तुम्ही हिते टीकलात.. तर मग टुम्म्ही खरे मि पाकर व्हाल!