Skip to main content

शेअरबाजार- बस्स 02 मिनिट्स...आपण काय करावे??

लेखक प्रसाद भागवत यांनी बुधवार, 03/06/2015 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या गाजत असलेल्या 'मॅगी' प्रकरणामुळे आज नेस्ले ईडिया कंपनीच्या शेअरने जवळजवळ 10% ची गटांगळी खाल्ली. हे प्रकरण मिडियात आल्यापासुन म्हणजेच गेल्या पंधराएक् दिवसांत हा शेअर सधारण 1000 रुपयांनी (म्हणजे जवळजवळ 14% घसरला) आपण, एका सामान्य गुंतवणुकदाराने या बाबत काय करावयास हवे असे आपणास वाटते??.. कर्मधर्मसंयोगाने मी याच विषयावर् अर्थपुर्णच्या येत्या मासिकात एक लेख लिहिला आहे. जरुर वाचावा. आपल्या प्रतिक्रिया, सुचनांचे स्वागत आहे. - प्रसाद भागवत

वाचने 49680
प्रतिक्रिया 113

प्रतिक्रिया

In reply to by नगरीनिरंजन

'जाहिर सहभागांतुन चर्चा' याचा अर्थ प्रत्येकाने एखाद्या बाबीवर त्याचा वा त्याला पटणारा दृष्टिकोण मांडणे असाच आहे. अशा बाबीचे सर्व ज्ञात-अज्ञात पैलु जर एखाद्याला मांडता अले तर मग ती 'चर्चा' कसली ?? दुसर्याने काय मांडावे याचा शहाजोगपणाने सल्ला देण्याकरिताच 'पब्लिक फोरम' असतात हा गैरसमज आहे. शिवाय फंडामेण्टल असो वा टेक्नीकल...,त्यांचे उपयोग वेगवेगळ्या परिस्थितीत अधिक परिणामकारक पद्ध्तीने करता येतात कारण दोघांच्याही काही मर्यादा आहेत.फंदामेंटल्स विषेश न बदलुनही भाव दिवसागणिक बदलतातच आणि या वस्तुस्थितीचा अनुकुल वापर करावयाचा असल्यास अपरिहार्यपणे टेक्नीकल्स पहावी लागतात. आणि त्या शास्त्रालाही भक्कम गणिती,सांख्यिकी आधार आहेत तेंव्हा त्याचा अभ्यास करुन काढलेले निष्कर्ष हे अगदीच केराच्या टोपलीत टाकण्याच्या योग्यतेचे नसतात असे मला वाटते.

In reply to by नगरीनिरंजन

बिंगो. मला वाटतं या चिखल उडवणुकीमुळे मॅगीचं नाव इतकं खराब झालं आहे की त्याच्यात आता सुधारणा होणं अवघड आहे. मॅगी हा नेस्लेचा कदाचित सर्वात जास्त खपणारा ब्रँड असावा. आणि त्याचा रेव्हेन्यू बंद होणं नेस्ले च्या शेअरसाठी धोक्याची घंटा असायला हवी.

In reply to by काळा पहाड

पहाड्साहेब, काश ऐसा होता........याच न्यायाने,सल्लुचे संजुबाबाचे पिक्चर्स पहायला कोणा जाणार नाही असे आपल्याला वाटते का?? सिगारेट्च्या पाकिटावरील '---मुळे कॅन्स्र होतो' हा विअधानिक ईशारा व्हाचुन किती जणांनी सिगारेट सोडली असेल ??

हेच जर युरोपातल्या गोर्‍या मर्कटांनी भारतीय कंपनीच्या उत्पादनावर वा भारतीय आंबे किंवा द्राक्षादिंवर बंदी आणली असती तर लोकांनी हूं का चूं नसतं केलं. कसला हा न्यूनगंड?

फंडामेंटल्स रिपोर्ट्स ब-याच वेळा फुकट उपलब्ध नसतात. त्यात वेळ द्यावा लागतो. ॲप्रोक्स रेव्हून्यू इंपॅक्टचे भाकीत करणे नक्कीच सोपे नाही. मार्केट शेअर मध्ये काय बदल होतील? कुठल्या प्रतिस्पर्धी कंपनीला फायदा होईल? याचा अंदाज घेणे कठीण आहे (अनुभवी माणसाचे काम आहे. ब्रिटानियाचा स्टॉक मिन टाईम वाढला). तसाही नेस्ले मला खूपच महाग वाटतो अजूनही. ईटी इंटेलिजन्स वगळता मी फॉलो करत असलेल्या कुठल्याच ब्रोकरची रेटींग नव्हती. (ब्रोकरच्या रिपोर्ट्स वर किती विश्वास ठेवायचा हाही प्रश्न आहेच) इटी इंटिलिजन्सचं सब्स्क्रिब्शन नसल्याने नेमकं ॲनालिसिस अजूनही मिळालं नाही वाचायला. सीकींग अल्फा नावाचं संकेतस्थळ आहे पण त्यात खास करून अमेरीकेतल्या स्टॉक्स वरचे रिपोर्ट्स हरहुन्नरी, नवशिखे देत असतात. आपल्याकडे असं कुठलं संकेतस्थळ आहे का याची कल्पना नाही.

In reply to by hitesh

तुमच्याकडे आला असेल ना गुप्त अहवाल...? रामदेवबाबाकडे असंख्य प्रॉडक्ट्स आहेत. तेवढं निवडून मॅगीला धोपटण्यासारखं काय होतं?

नेस्ले शेयरविषयी तज्ञ चर्चा करत आहेतच .. पण एक अवांतर माहिती शेयर करतोय .माझी या आधीची कंपनी नेस्लेला गेल्या ३० वर्षांपासून बॉयलर पुरवठा करते. नेस्लेच्या भारतातील सगळ्याच प्लांट मध्ये त्या कंपनीचा बॉयलर आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. माझ्या एका वरीष्ठांनी सांगीतल्याप्रमाणे देशभरात रोज २५० टन मॅगीचे उत्पादन होते. मॅगी जर तीन-चार महिने बाजारात आली नाही तर नेस्लेचे किती नुकसान होईल याचा जाणकारांनी अंदाज लावावा.

In reply to by चिनार

मी जे वाचलं त्यावरून नेस्लेचा ३०% रेव्हेन्यू मॅगी कडून येतो. साधारण पणे २२०० कोटी रुपये.

अरे लोकांनो.. घेऊ की नको..? ५६०० ला पोचतंय आता. की थोडेथोडे दर आठवड्याला घेऊ? -(उडी टाकण्यासाठी नाक मुठीत धरुन विहिरीच्या काठावर पुढेमागे डोकावत उभा) गवि

In reply to by गवि

हे एक उत्तर आहे: http://economictimes.indiatimes.com/markets/stocks/recos/not-a-good-tim… पण खरं सांगायचं तर कुणालाही माहीत नाही. हे मॅगी-युद्ध कदाचित किचकट, लांबलचक आणि दमवणारं ठरणार आहे.

गवि साहेब, दुसर्‍याच्या सल्ल्याने शेअर घेतला किंवा विकलात तर नुकसान होण्याचे चान्सेस खूप जास्त असतत. तर, स्वत; अभ्यास करा आणि निर्णय घ्या प्रेमाचा सल्ला ! (अशा प्रकारात हात पोळलेला) आनंद

मोतिलाल ओस्वालचा रिसर्च रिपोर्ट इथे पहाता येईल. त्यांच्या मतानुसार नेस्टलेच्या संपूर्ण रेव्हिन्यूपैकी २०% हिस्सा आणि नेट प्रॉफिटचा २५% हिस्सा हा न्यूडल्स मधून येतो. (१/४ हा मोठा आकडा आहे). आणि २०१४ मध्ये याच कॅटेगरीचा सेल्स ग्रोथ सर्वात जास्त होता. मॅगी लहान मुलं खात असल्याने ब्रॅंड इक्विटी वर मोठा फरक पडणार आहे. कारण परत विश्वासार्हता परत मिळवण्यास वेळ जाईल. आणि सर्वांना ज्यात जास्त उत्सुकता आहे त्या प्रश्नाचं उत्तर देताना ("स्टॉक खरेदी करण्याच्या पातळीवर पोहोचला का?" ) रिपोर्ट म्हणतो. अजून त्या पातळीवर आलेला नाही. २०१५ आणि २०१६ च्या एक्सपेक्टेड अर्निंग नुसार स्टॉक (फॉर्वर्ड) पीई रेशो ३७ आणि ३२ आहे. (37x CY15E and 32x CY16E EPS) भविष्यकाळात नेस्टलेच्या डॅमेज कंट्रोल अ‍ॅक्टिव्हीटीनुसार त्यांचे अंदाज बदलू शकतात. २०१६ चा एक्स्पेक्टेड ईपीएस (रु. १९०, त्यांच्या रिसर्च नुसार) च्या साधारण ३३ पट त्यांनी टार्गेट किंमत (रु. ६३००) ठरवली आहे आणि स्टोक्स अजून करेक्ट होईल असे त्यांना वाटते. रिपोर्टच्या डिस्क्लोजर मध्ये "अ‍ॅनालिस्ट कडे स्टॉक्स नाहीत आणि अ‍ॅनालिस्ट नेस्टलेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवर, वा नेस्टलेचा एम्प्लॉई नाही" असे नमुद केले आहे. ओस्वालखेरीज दुसर्‍या कुणाचा रिपोर्ट मिपाकरांना माहीत असेल तर जरूर शेअर करा.

मॅगीची सिंगापूरची टेस्टींग पास झाली. स्टॉक एका दिवसात ९% वर गेला. गुरुंजींना लॉटरी लागली. :) http://www.livemint.com/Money/Pqw3XTnsJq9LUjdOrhA6UI/Nestle-India-share… आपल्या (FSSAI) टेस्टींग आणि सिंगापूर टेस्टीग मध्ये फरक का? कुछ तो गडबड है|

In reply to by सुधीर

भारतात स्थानिक बाजारात विकण्याच्या वस्तू आणि निर्यातिसाठीच्या वस्तू असा भेदभाव आणि त्यांतील फरक नविन नाही. सिंगापूरमध्ये अन्नपदार्थांत भेसळ सापडली तर सीईओ सरळ आत जाईल. नेसलेच्या सीईओने भारतात केले तसे त्या देशात जाऊन त्यानाच उपदेशामृत पाजणे तो स्वप्नातही पाहणार नाही. शिवाय, तेथे त्याच्या वचनांची भलावण करणारी विकाऊ फौजही मिळणे कठीण आहे... कारण त्यांच्यावरही कायद्याचा बडगा पडेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पूर्वी कॅडबरी, शीतपेये इ. वर असाच आरडाओरडा झाला होता. त्यांनी सर्व मॅनेज करून आपल्यावरील किटाळ दूर केले. नेस्ले मॅगीच्या बाबतीत तसेच करणार याची खात्री बाळगा.

In reply to by hitesh

हितेश भाऊ तुम्ही तुमचा काळा चष्मा काढा. शिशाचे मोदी साहेबांशी काय घेणे देणे आहे? तुमचा मोदी द्वेष समजू शकतो पण तो येथे अनाठायी आहे. उद्या तुम्ही असेही म्हणाल कि पप्पू म्यागी खातो म्हणून मोदी साहेबांनी त्याच्या वर बंदी आणली. जाता जाता- केजरीवाल साहेबांच्या दिल्लीत किंवा अखिलेश रावांच्या उत्तर प्रदेशात पण म्यागीवर बंदी आणली यालाही मोदी साहेबच जबाबदार आहेत का?

गुरुजी ५६७० ला घेतलेला एक समभाग त्यात ०. ८% कमिशन आणि समभाग विनिमय कर(STT) धरून आपल्याला प्रत्यक्षात ५७१५ ला पडतो आणी जेन्व्हा आपण विकत तेंव्हा परत हे ०.८ % लागतात तेंव्हा हा समभाग जेंव्हा ५७६० रुपयाला पोहोचतो. तेंव्हा आपला नक्त नफा शून्य असतो. यावर जितका वर चढेल तो किती दिवसात चढेल त्याप्रमाणे त्यावर मिळालेला नफा टक्केवारीत काढायला लागेल. हे गणित आपण केलेले असेलच पण सर्व सामान्य जनांसाठी म्हणून हा हिशेब लिहित आहे

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, माझ्या एका क्लायंटची कॉन्ट्रॅक्ट नोट आत्ताच पाहिली, मुळ खरेदी 5820 दराने आणि आपण म्हणता ते सर्व एतर खर्च मिळुन नक्त खरेदी 5843.28 ला झालेली दिसली. म्हणजेच मुळ खरेदीपेक्षा साधारणतः २३ रुपये अधिक...आपल्या उदाहरणांत कर व अतिरिक्त भार हा 45 रुपयांचा दिसतो. मला वाटते आपण थोडे (की जवळजवळ दुप्पट??) अधिक ब्रोकरेज देत आहात.

In reply to by प्रसाद भागवत

माझा ब्रोकर ०.७ % घेतो अधिक इतर कर. एखादा ब्रोकर कमी घेत असेलही. जास्तीत जास्त ब्रोकरेज १. ५% लावता येते(BSE च्या नियमानुसार) पण कमीत कमी किती हे सांगितलेले नाही. बाकी नेसले हि कंपनी (ब्लू चीप) उत्तम आहे हे मी वर म्हटलेले आहेच. फक्त समभाग फार महाग आहे.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टसाहेब, तुमचा हिशेब बरोबर आहे. मला शेअर्स घेताना अंदाजे ०.७% व विकताना तेवढेच अतिरिक्त पैसे द्यावे लागतात. यात ब्रोकरेज व इतर करांचा समावेश असतो. मी घेतलेल्या शेअर्सची नोंद एका एक्सेल शीट मध्ये ठेवतो. घेताना द्यावी लागलेली एकूण किंमत व त्यात विक्रीच्या वेळचे ब्रोकरेज वगैरे धरून ब्रेक इव्हन साठी तो शेअर कमीत कमी किती किंमतीला विकायला हवा याचीही नोंद ठेवतो. त्यामुळे विक्री करताना कमीतकमी कितीला विकायचा याचा अंदाज येतो. मी २ दिवसांपूर्वी नेस्लेचे शेअर्स ५६७० ला घेतले. खरेदी व विक्रीचे ब्रोकरेज धरून हा शेअर मला कमीतकमी ५७५० ला विकला तरच फायदा होईल. त्या किंमतीची मी नोंद करून ठेवली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी मनी कंट्रोल वर( किंवा अशा कोणत्याही अर्थ विषयक साईट वर) आपला पोर्ट फ़ोलिओ बनवून ठेवला तर तेथे आपल्या समभागाचे व्यवस्थित विवरण करता येते आणि त्याचा हिशेब अत्यंत सोपा आहे. नुसतेच तसे नव्हे तर ह्रस्व मुदतीचा आणि दीर्घ मुदतीचा फायदा त्यात आपो आप हिशेब करता येतो. वर्षाच्या शेवटी अल्पमुदतीचा भांडवली नफा मोजण्यासाठी आणि कर भरण्याच्या दृष्टीने ते अत्यंत सोयीचे जाते. हि गोष्ट मी २००७ पासून करीत आलो आहे. आणि तेंव्हा पासून मी विकत घेतलेल्या आणि विकलेल्या प्रत्येक समभागाचा लेख जोखा तेथे उपलब्ध आहे. आपली चूक कुठे झाली आणि कुटेह आपल्याला फायदा झाला याचा हिशेब लावण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. आपला असा पोर्ट फ़ोलिओसुद्धा असेलच पण या क्षेत्रात नवीन असलेल्या लोकांसाठी हि एक उपयुक्त माहिती ठरावी.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, मनीकंट्रोलवर माझा पोर्टफिलिओ आहेच. मी मनीकंट्रोलच्या माध्यमातूनच समभागांच्या भावावर नजर ठेवतो. मनीकंट्रोलमधील आपला पोर्टफोलिओ सर्व्हर साईडला स्टोअर होत असल्याने दुसर्‍या कोणत्याही संगणकावरून अथवा भ्रमणध्वनीच्या माध्यमातून पोर्टफोलिओ बघता येतो. पूर्वी मी इक्विटीमास्टरवर पोर्टफोलिओ बनविला होता. परंतु तो पोर्टफोलिओ क्लायंट साईडला कुकीजमध्ये साठविला जात असल्याने इतर संगणकावरून तो वापरता येत नाही.

In reply to by सुबोध खरे

मी सुद्धा मनीकंट्रोल २००७ पासून वापरतोय. सध्य उपलब्ध वेबबेस्ड संगणक प्रणालीं मध्ये मनीकंट्रोल चांगलं वाटतं. मनीकंट्रोल स्वतंत्ररित्या समभागाचा नफा-तोटा, परतावा आणि वर्षभराचा नफा-तोटा चांगलं दाखवते. पण त्यात काही त्रुटी अलिकडे जाणवत होत्या. उदा. फंड मॅनेज करताना कॅश इनफ्लो-आउटफ्लो ची क्ल्पना मिसींग वाटत होती. कॅश-इन्फ्लो-आउटफ्लो लक्षात घेऊन संपूर्ण पोर्टफोलिओचे रिटर्न्स मोजता येत नव्हते. पोर्टफोलिओची बेंचमार्क बरोबर तुलना करता येत नव्हती. अ‍ॅसेट क्लासवाईज (कॅश, डेट फंड्ज, इक्विटी लार्ज कॅप, मिड कॅप वगैरे), इंडस्ट्रीवाईज डिस्ट्रीब्युशन्स हवे तसे बघता येते नव्हते. मी स्वत:पुरता बनवलेल्या एक्सेल मध्ये ते अ‍ॅड केलयं. शॉर्ट टर्म (१ वर्षाच्या आतला) -लाँग टर्म रिअलाइज्ड गेन फिन-इअर वाईज बघता येऊ शकतो. सध्या तरी एक्सेल जनरेट (अगदी पिव्होट टेबलसहीत) करण्यासाठी छोटे खानी अ‍ॅप्लिकेशन बनवलं आहे. पण त्यासाठी दररोजचा प्राईज डेटा मला माझ्या सिस्टीममध्ये अपलोड करून प्रोसेस कारावा लागतो. बघु भविष्यात वेब अ‍ॅप डेव्हलप करून घेणे किती फायद्याचे ठरते. ;)

आज नेस्ले इंडियाने चांगलाच टेकऑफ घेतला आहे. ६००० ते ६३०० जवळजवळ ३०० वाढ तीन तासांत. काय चालू आहे नेमकं ? कितीपर्यंत वाढ ही समाधानकारक समजायची ? ता. क. ओह.. गॉट इट.. Mumbai HC allows export of Maggi noodles

सुप्रभात. आज सर्वोच्च न्यायलयात बजाज ऑटो कंपनीसंदर्भात एक महत्वाचा खट्ला निकली निघण्याची शक्यता आहे. Quadricycle – RE 60 या कंपनीच्या महत्वाकांक्षी प्रॉडक्ट बद्द्लचा निर्णय आज बहुधा लागेल. Bajaj has high expectations that the product would soon hit the Indian roads giving the commuters a long overdue alternate to auto rickshaws. A favourable verdict would provide a very big boost to Bajaj Auto’s stock price in the short term and its financials in the long term. आज बजाजच्या शेअरवर नजर ठेवणे आपल्या हिताचे आहे.......मुळ विषयाला सोडुन लिहिलेल्या प्रतिक्रियेबद्दल क्षमस्व.. - प्रसाद भागवत.

महिना दीडमहिन्यापुर्वी सुरु झालेल्या मॅगी पुराणाची इतिश्री होण्याच्ये रंग दिसत आहेत. अर्थातच मॅगीची 'घरवापसी' होवुनच. सुरवातीस ह्या प्रकरणाचा परिणाम म्हणुन मॅगी बनविणारी कंपनी 'नेस्ले ईंडिया'चा शेअर गडगडला तेंव्हाच हे,(आता घडते आहे ते) असेच होणार हे भाकित करुन मी सर्वांना ही नेस्लेसारख्या उत्त्म कंपनीच्या शेअरच्या खरेदीची सुवर्णसंधी आहे असे आग्रहपुर्वक सांगितले होते, . आता ह्या प्रकरणांतील 'Fizz' संपणार असेल तर संभाव्य उसळी लक्षात घेवुन तेथे फायदा 'बुक' केलेलाच बरा. मला खरेदी करतेवेळीच अल्प काळात 6700 ची पातळी अपेक्षित होती. अशा व्यवहारांतुन आर्थिक फायदा मिळतो हे कमी महत्वाचे नाही, प्रंतु त्यापेक्षाही आपला तर्क योग्य ठर्ला याचा आनंद अधिक असतो. आज हा निर्भेळ आणंद पुभा एकद उपभोगतो. धन्यवाद.

In reply to by प्रसाद भागवत

प्रतिक्रिया बाजार उघडलेला असतानाच लिहिल्याने जरा घाईत प्रकशित झाली आहे. शुद्ध्लेखनाच्या चुकांबद्दल माफी असावी.