त्याच अस झाल की परवा मी माझ्या पुतण्याला प्ले स्कूल मधे सोडायला गेलो होतो. खरे म्हण्जे त्याला एक छानसे पत्र लिहावे अशीच माझी इछ्छा होती. पण तो घरात राहुनच रोज २ तास शाळेत जाणार होता. त्यामुळे उगाच पोष्टाचा खर्च कशाला वाढवा असा सुज्ञ विचार मी केला. शिवाय 'शाळेत जाणार नाही ' असे त्याने जोर्दार भोकाड पसरले होते. त्यात त्याला पत्र वाचायला देणे मला तरी योग्य वाटले नाही. एक तर माझे अक्षर कुणाला लागत नाही. (माझे पेपर तपासणार्यांना ते कसे लागले आणि त्यानी मला कसे पास केले हा एक संशोधनाचा विषय आहे. यावरून एकंदर शिक्षण पध्धती विषयीच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे पण ते पुन्हा कधीतरी.)
आणि शिवाय माझ्या पुतण्याला अजुन लिहिता वाचता येत नाही.(त्यासाठीच तर त्याला शाळेत पाठवत होते.) त्यामुळे मी पत्र लिहायचा विचार डोक्यातून काढून टाकला.
सहज सुचले म्हणून मी माझ्या प्रीप्रायमरी स्कूलच्या (आम्ही त्याला मराठीत माँटेसरी म्हणायचो) दिवसांची आणि ह्या आजकालच्या पोरांच्या शाळेची तुलना करू लागतो. अगदी चप्पल पासुन शाळेतील बाईंपर्यंत (ई वरील अनुस्वार दिसत नसला तरी दिलेला आहे. क्रुपया गैरसमज नकोत.) सगळ्या गोष्टींची तुलना डोळ्यासमोरुन झरझर सरकू लागली. आमच्या काळी चप्पल ही पायाला इजा होउ नये म्हणून वापरायची वस्तू होती. ड्रेसला म्याचिंग, फ्याशन असले प्रकार आमच्या पालकांच्या आणि पर्यायाने आमच्या गावीही न्हवते. वॉटरब्याग ही संकल्पनाच आम्हाला ठाउक न्हवती. शाळेच्या टाकीच्या नळाला ओंजळ धरून त्यात साठणारे पाण्यात गाई-म्हशींसारखे तोंड बुडवून पाणी प्यायचे येवढेच माहीत होते. शाळेत लागणारी वह्या पुस्तके न्यायच्या खाकी रंगाच्या दप्तरावर मिकीमाऊस असावा की डोनाल्डडक असा प्रश्न कधी आम्हाला पडला नाही आणि दप्तर सारख्या म्लेंछ शब्दाला संस्क्रुतोद्भव शब्द दिल्याने मराठी भाषेचे अतोनात नुकसान होइल काय असा विचारही मनाला शिवला नाही.
पण आजकाल माझ्या पुतण्याचा शाळेला जायच्या आगोदरचा १०-१५ मिनिटे वेळ 'आज कुठल्या रंगाची वॉटरब्याग न्यायची आणि कुठला बूट्/चप्पल घालायची हे ठरवण्यात जातो.
आमच्या माँटेसरीच्या बाई आणि माझ्या पुतण्याच्या टीचर यांची तर तुलनाच करवत नाही. कुठे आमच्याकाळातील त्या नऊवारी साडी नेसलेल्या पन्नाशीच्या पुढच्या मास्तरीण बाई आणि कुठे आजकालच्या लिप्स्टीक् लावलेल्या स्लीवलेस मधील टीचर...
पण हे झाले बाह्यबदल. दोन्हीचे विद्यादानाच्या कार्यात सारखीच तन्मयता असेल असे वाटते.
कुणीसे म्हटलेच आहे.....
"शाळा ते घर, घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा"
शिक्षणपध्धती पुर्वीची असो की आत्ताची, विद्यार्थ्यांची उन्नती हेच खरे ध्येय असले पाहिजे.
कवटी.
वाचने
3748
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
शिक्षणपध्
१३_१३
In reply to शिक्षणपध् by ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्तच...
>> अगदीच
In reply to मस्तच... by बिपिन कार्यकर्ते
>>अहो
In reply to >> अगदीच by ३_१४ विक्षिप्त अदिती
थोडं अवांतरः
In reply to >>अहो by कवटी
आभार
In reply to थोडं अवांतरः by ३_१४ विक्षिप्त अदिती
बिपिनराव, त
In reply to मस्तच... by बिपिन कार्यकर्ते
चोरी
सर्किटजी
In reply to चोरी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
धन्यवाद
In reply to सर्किटजी by कवटी
सर्किट
In reply to धन्यवाद by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
कुणीसे म्हटलेच आहे.....
कुणीसे
In reply to कुणीसे म्हटलेच आहे..... by बिपिन कार्यकर्ते
सर्किटजी,
In reply to कुणीसे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
वाङमयचौर्य
In reply to कुणीसे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)