✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

करंssट-मिसळ(४४० व्होल्ट)

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Wed, 02/01/2012 - 13:38  ·  लेख
लेख
बरेच दिवस लिहिन..लिहिन म्हणत होतो,,,सौरभनी काल आमच्या या करंट मिसळची अठवण करुन दिली ,आणी आज मुहुर्त लागला...तर ठाकाण कोणतं..? अमच्या(च)मंगला टॉकिज बाहेर वॉल्सवॅगेनचं शोरुम हाय ना त्येच्या भायेर...अगदी रोडटच.हे आमचे करंट मिसळचे जन्मदाते मामा आणी त्यांची त्यांच्या व्यक्तिमत्वासारखीच मिसळची गाडी ओपनींगची येळ मंजी सामान्यपणे म्युन्सिपाल्टीतले,पिएमटितले (आणी पी-एम.टि.तले) चाकरमानी, सक्काळी सक्काळी ७ते९ यादरम्यान कामाला भायेर पडतात त्या येळची. गाडीचा लवाजमा लागे लागे पर्यंत खाणार्‍यांची पण लाइन लागते.या मिसळला आंम्ही करंट मिसळ का म्हणतो? याचं इंगित जेवढं मिसळच्या तर्रीत आहे,तेवढच ते खाणार्‍या अट्टल गिर्‍हाइकातही आहे...सामान्य भूक भागवणारे जसे इथे येतात,तसे पट्टीचे मसालेदार डोक्यात करंट येइपर्यंत तिखट खाणारेपण इथेच येतात.सायकलवर टांग मारुन कामाला पळणारे-घरुन सकाळची भाकर किंवा चपात्यांची चवड घेऊन मिसळ हानायला बी हितच येतात,तसे रातीची ओव्वर-फुल्ल झाल्याले सकाळी उतरल्यावर उतारा-काढायला किंवा परत दुपार पर्यंत टांग्यातच बसुन र्‍हायला पण इथच येतात,टांगापल्टिंच्या शब्दशास्त्रानुसार हिला कॉटरमिसळ किंवा फुल्ल-ब्याट्रीचार्जमिसळ असंही नाव आहे. ब्याट्रीचार्ज साठी काढुन ठेवलेली तर्री :-) आणी आपण फक्त दिल से खाणारे असू तरी हिची नशा त्यांच्या इतकीच अपल्यालाही झाल्याशिवाय रहात नाही..आमच्या मामांची मिसळ जर का मनापासुन अनुभवायची असेल तर फक्त एकच अट आहे.अट ही की सक्काळी ११च्या आत जायला हवे.आणी पोटात वैश्वानरानी अरोळी मारलेली असायला हवी.मिसळ खाल्यापासुन पुढिल तीनएक तास कामाचं कोणतही ओझं डोसक्यावर नको...म्हणजेच पोटाइतकच मनही रिकामं हवं.नायतर देवर्शनाला जाताना मानात दुसरे इतर भाव असले तर ते गणित फसतं, आणी देवाचं दर्शन होण्याऐवजी नुसतच देवळाचं दर्शन होतं..तसं होइल हां अजुन एक पेशालिटि हाय बरं का..! मिसळ मंजे फक्त जाळ तिखट असच इथे गणित नाहीये.सामान्या पणे मिसळ इथे आपल्याला मानवेल अशी म्हणजे तिन टाइपमधे दिली जाते. १)तर्री मिसळ२) लाइट मिसळ३) व्हाइट मिसळ हे तिन सामान्य प्रकार पण त्याशिवाय आपल्याला हवं ते काँबिनेशनही इथे घडवुन मिळतं,मंजे पोहे मिसळ,बटाटा भाजी पेशल मिसळ,किंवा आम्हाला-लागणारी फक्त फरसाण मिसळ... एरवी त्यांनी दिलेली मिसळ म्हणजे शांपल+ मटकी/मूग किंवा वाटाण्याची उसळ+फरसाण+शेव....जोडिला रोज सकालीच येणारे ताजे पाव आणी कांदा/लिंबू/तर्री-शांपल लागल तेवढं आपण(मागुन) घेतलं नाही तरी मामा वरनं विचारतात,टाकू का गरम...आणी काम करणार्‍या पोरांना हाळी देत असतात-'ए...लाइट दे रे खाली'...'मागच्या बाकाला पाव लाव'...'या तात्या...(तात्यांची रात्र ओळखत..) आजा डबल तर्री दिऊ का..?,बसा खाली वार्‍याला'' शंकराच्या देवळात जसे पुजारी आणी भक्तांचे हुंकार मंत्र अरोळ्या ऐकू येत असतात..तस आमच्या मामांच्या गाडिवरच वातावरण खरोखरीचं भक्तिमय असतं..(नाटकी गिर्‍हाइक इथे टिकत नाही,ते काही दिवसातच शेजारीच असलेल्या तसल्याच गाडीवर जातं) यात पलिकडं ती लाल गाडी दिसतीये..बघा तुंम्ही एकदा इथले मेंबर झालात की तुमची मिसळही त्यांच्या री-मेंबरमधे जाते...इथला पुलाव वडे पोहे या साइड डिशपण अगदी साध्या दिसणार्‍या पण वेगळ्या चविच्या आहेत...उसळ फरसाण मारलेले पोहे बी झ्याक..आणी गरम काढलेला वडा तितक्याच गरम शांपल बरोबर कपाळावर आणी अन्यत्र ;-) घाम येत असला तरी खाण्यात तेवढीच मज्जा. आरोग्यदायी कवि कल्पनांच्या आहारी गेलेल्यांचा हा प्रांतच नव्हे,,,त्यांनी आपलं स्वच्छ आरोग्य भुवनातच जावं ..हां,,,पण मनाचं आरोग्य बिघडलं तर मात्र त्यांनाही आमच्या मामांच्या गाडिवर कमित-कमी ६महिने यावे लागेल. कारण अमच्या दृष्टीनी पोट भरण्या इतकीच मानसिक आरोग्य फुलवणारी वाढवणारी ही जागा हाय...कारण ही मिसळ जितकी चढते,डोक्यातही जाते,अगदी केस उभे करते,डोक्यात घाम काढते...तितकीच खाऊन झाल्यावर आपल्या आवडी नुसार कडक चहा,पान,तंबाखू,शिगरेट याच्या साथिनी पुन्हा बहरते देखिल(म्हणुनच हिला कॉटर मिसळ म्हणतात ;-) ) फक्त ही मिसळ घरी आणुन खाण्याचे पातक करू नाही,पांडुरंग घरी आणत नसतात,त्याच्या भेटीलागी पंढरपुरासी जावे लागते...तसेच अमच्या मामांच्या मिसळचे आहे...पारावरच्या मारुतीसारखं बारा महिने तेराकाळ भक्तांसाठी खुलं असलेलं मिसळ मंदिर हे काही अजुन फोटो,,,विशेषतः तर्री कशी बनते त्याचे काढलेले--- १)पातेलं पाणी कडधान्य घेऊन शिजायला लागतं २)त्यात बटाट्याची वडे करायची भाजी मिसळली जाते ३)नंतर ते मिसळण आणखि पाण्यासह घालुन पातेलं टॉप-अप केलं जातं ४)अता त्याला तर्री पडनार हाय... त्यासाठी एका भांड्यात आधी खणखणीत तिखट ५)मग त्याहुन झणझणीत स्पेशल फक्त तिखटच असलेल्या मिर्च्यांचा मसाला ६)अता त्यो गरम त्येलात घोळला जातोय... ७) ही...लागली बघा तर्री.....१) २) ८)अता हे बघा ३ब्रँड-संपत आलेली व्हाइट(आमच्या लेखी बेचव..!)-तळाला गेलेला मग, दुसरा फुल्ल भरलेला पिवळसर लाइट (आमचा ब्रँड-करंटवाला),आणी मागे तिसरा कॉटरमिसळ ब्रँड ९)उसळ फरसाण पोहे १०)साधासुधा-पण बासमतीच्या तोंडात मारेल असा-पुलाव ११)हे आमचे हरहुन्नर्री आवाज देणारे मामा १२) आणी हे त्यांचे तेवढेच फिल्मी राम/लखन(मंगला टॉकिज शेजारी,राम लखन तयांचे अंतरी ;-) ) १२) आणी सगळ्यात शेवटी ही भल्याभल्यांची नशा उतरवणारी आणी चढवणारी देखिल-टॉप-अप पातेल्यातील पहिल्या तर्रीची वाटी....मिसळचं आणी आमचं जिवनतत्वही आणी जिवनसत्वही
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
साहित्यिक
समाज
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
आस्वाद
लेख
अनुभव
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
42374 वाचन

💬 प्रतिसाद (144)

प्रतिक्रिया

नेवाळे मिसळ म्हणजे नुसताच

झकासराव
Wed, 05/27/2015 - 16:44 नवीन
नेवाळे मिसळ म्हणजे नुसताच भडकाच. दुसरी चव येतच नाही. आणि ३-४ वर्षामागे मी गेलो होतो तेव्हाच हाटीलच इन्टेरियर १८५७ च्या उठावापासुन तसेच आहे इतके कळकटलेले. परत ट्राय केलीच नाही मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अगदी अगदी.

प्रचेतस
Wed, 05/27/2015 - 16:47 नवीन
अगदी अगदी. त्याची भजी मात्र लै भारी असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव

करंट-बिरंट लांब राहिला! तो

सूड
Tue, 05/26/2015 - 16:09 नवीन
करंट-बिरंट लांब राहिला! तो पुण्यात आत्तापर्यंत फक्त काताकिर्र्र ला मिळालाय
अगदी, मुंबईत मामलेदार, मुनमुन आणि पुण्यात काटाकिर्र!! सुदैवाने ही मामांची मिसळ खाल्लेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

हुइहुइहुइहुइहुइ

वेल्लाभट
Tue, 05/26/2015 - 11:27 नवीन
हुइहुइहुइहुइहुइ खायलाच पैजे की !
  • Log in or register to post comments

कशी राहिली

खंडेराव
Tue, 05/26/2015 - 12:22 नवीन
ही मिसळ खायची? पुन्यात शक्य तेवढ्या ठिकाणी मिसळ खाल्ली आहे. एकेकाळी दुपारचे जेवण मिसळच होते. आता पुढच्या वेळी नक्की!
  • Log in or register to post comments

१०० हुश्श

प्रसाद गोडबोले
Tue, 05/26/2015 - 14:13 नवीन
१०० हुश्श
  • Log in or register to post comments

१०० बद्दल

नाखु
Tue, 05/26/2015 - 14:29 नवीन
फेब्रु २०१२ चे धाग्याला मे २०१५ मध्ये शंभरी पार केल्याबद्दल समस्त मिपाकरांचे (धाग्यावर पळणार्‍या/जळणार्‍या/खेळ्णार्‍या) २०१२ सालचे शँम्पल व आजचे पाव देऊन कर्रंट सत्कार करणेत येत आहे (जाताना आपापले बिल देऊन जाणे) अभामिपामांकासस. पिंचीशाखा स्वगत : ऐन्वळी हा जेपी कुठे गेला सत्काराचे वेळी!
  • Log in or register to post comments

आपके पांव जमीं पर मत रख्खे...

टवाळ कार्टा
Tue, 05/26/2015 - 14:32 नवीन
आपके पांव जमीं पर मत रख्खे....मैले हो जायेंगे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

चेपूवरचा जोक

टवाळ कार्टा
Tue, 05/26/2015 - 14:33 नवीन
चेपूवरचा जोक देवा मला पाव...देवा मला बटरपण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सेंचुरी मारल्याबद्दल बुवाचा

प्रचेतस
Tue, 05/26/2015 - 15:06 नवीन
सेंचुरी मारल्याबद्दल बुवाचा आत्मा अता त्रुप्त झाला असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

सुप्तावस्थेत गेलेल्या

सतिश गावडे
Tue, 05/26/2015 - 16:03 नवीन
सुप्तावस्थेत गेलेल्या धाग्याला ज्याने वर आणले त्याला मामाची करंट मिसळ बुवांनी खाऊ घालायला हरकत नाही आता.
  • Log in or register to post comments

येस्स येस्स!!

तुषार काळभोर
Wed, 05/27/2015 - 11:03 नवीन
बुवा खाऊ घालणार असतील तर गंडलेली मिसळपन चालवून घेऊ. (बदल्यात त्यांना काटाकिर्र्ची / किंवा नेवाळेची (!!!) मिसळ आम्ही खाऊ घालू)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अ.आ. तुम्ही दिलेल्या पा..कृ

नूतन सावंत
Wed, 05/27/2015 - 10:12 नवीन
अ.आ. तुम्ही दिलेल्या पा..कृ.प्रमाणे लाईट मिसळ घरीच बनवली.मस्तच झाली.धनस.
  • Log in or register to post comments

मामा आणी त्यांची त्यांच्या व्यक्तिमत्वासारखीच मिसळची गाडी

Sanay
Wed, 05/27/2015 - 11:37 नवीन
खुप छान आहे हि मिसळ
  • Log in or register to post comments

क्या बात है गुरुजी…

शि बि आय
Wed, 05/27/2015 - 17:06 नवीन
क्या बात है गुरुजी… तुम्हाला बरी सगळी तर्रीची रेशिपी संगीतालीन मामानं… अट्टल मिसळकर हाय का ? आता तोंडाला सुटलेले पानी पळवणारी मिसळ चाखायाचं पाहिजे
  • Log in or register to post comments

वल्ली ...

गणेशा
गुरुवार, 05/28/2015 - 17:33 नवीन
वल्ली ... आदितीत जाऊया एकदा.. पिंपरी वाघेरे.. वल्ली येरे घेवुन सगळ्यांना... शक्यतो रविवार सकाळी लवकर .. शनिवार जमत नाही.. बाकी गुरजींच्या मिसळला नावे ठेवल्याने शाप मिळेल काय कोणाला ?
  • Log in or register to post comments

अतिथी असे वाचावे... शाळेच्या

गणेशा
गुरुवार, 05/28/2015 - 17:35 नवीन
अतिथी असे वाचावे... शाळेच्या समोर... मागे नविन दिप्ती झाले आहे... पण आधीपासुन एकच आवडते आपल्याला.. चव चांगली शिवाय गरम पण होत नाही पोटात.. दिलखुलास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

जाऊ ना राव.

प्रचेतस
गुरुवार, 05/28/2015 - 20:58 नवीन
जाऊ ना राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

ज्यांना असल्या मिसळ खावुन मुळव्याध झाला आहे...

बाबा पाटील
गुरुवार, 05/28/2015 - 19:07 नवीन
त्यांनी औषधोपचारासाठी समक्ष भेटावे...आणी अद्याप झाला नसेल तर भविष्यात नक्की होइल.सांगताही येत नाही आणी सहनही होत नाही असा हा आजार आहे,त्यामुळे मंडळी वेळीच जागे व्हा.
  • Log in or register to post comments

सर्व चर्चा वाचली. कळायला

खटपट्या
गुरुवार, 05/28/2015 - 20:56 नवीन
सर्व चर्चा वाचली. कळायला लागल्यापासुन ठाण्याची मामलेदार मिसळ खात आहे. पण कोणी करंट म्हणजे काय ते सांगेल काय ??
  • Log in or register to post comments

ह्यांना कुणीतरी

तुषार काळभोर
गुरुवार, 05/28/2015 - 21:09 नवीन
नेवाळेकडे न्या रे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

मस्त!

अनंत छंदी
गुरुवार, 05/28/2015 - 21:24 नवीन
बा अतृप्ता, तुझ्या या धाग्यामुळे कालच इथे भेट दिली. पण वेळ मिसळ खाण्याची नसल्याने पुलाव चापला. त्याबरोबर मिळालेले "शांपल" इतके छान होते की फक्त तेच पुन्हा वाटीभर मागवून प्यावे असे वाटत होते. अर्थात कुठून आलं ह्ये येडं असं मामांना वाटायला नको म्हणून मोह आवरला. पण आता लवकरच मिसळ खाण्यासाठी हजेरी लावण्याचा विचार आहे. तो पर्यंत मी पण अतृप्त आत्मा! :)
  • Log in or register to post comments

@ त्याबरोबर मिळालेले "शांपल"

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/28/2015 - 22:01 नवीन
@ त्याबरोबर मिळालेले "शांपल" इतके छान होते की फक्त तेच पुन्हा वाटीभर मागवून प्यावे असे वाटत होते.>>> हाच तो करंट पॉइंट! हे शांपल आहे ना,तिच या मिसळची कलाकारी आहे. फक्त इथलं हे शांपल पातेल्याच्या सेकंड हाफ ,म्हणजे तळाच्या गाळातलं नशिबी आलं,तर ते नुस्तच तिखट जाळ लागतं.आणि मग मिसळ टुकार,छपरी इत्यादी लागते. अर्थात अनेक मिसळ स्पॉटवर हाच प्रकार असतो. आणि हे लक्षात ठेऊन ,हेरुन इथली चव चाखायला हवी. तुम्हाला ती सहज मिळाली...पण ज्यांना अजुनही हवी असेल्,त्यांनी मी हे गणित जमवलं,तर नक्कीच निराशा होणार नाही. नायतर मग नुसताच काटा आणणारं कीर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र पाणी आहेच...प्यायला - इतरत्र!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंत छंदी

कीर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 05/28/2015 - 22:05 नवीन
गेल्या वर्षी आयुष्यात प्रथमच घरी न बनलेली मिसळ खाल्ली. भावाने काटाकिर्रर्रर्रर्र मधून पार्सल आणलं होतं.
नुसताच काटा आणणारं कीर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र पाणी आहेच...प्यायला -
हीच अवस्था झाली ;-) . पुढच्या भारतवारीत करंट मिसळीचा झटका घेऊन बघीन :-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

त्यांनी मी हे सांगितलेलं गणित

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/28/2015 - 22:07 नवीन
त्यांनी मी हे सांगितलेलं गणित जमवलं,तर नक्कीच निराशा होणार नाही. नायतर मग नुसताच काटा आणणारं कीर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र पाणी आहेच...प्यायला - इतरत्र!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मामाचा नंबर द्या हो.

प्रचेतस
Fri, 05/29/2015 - 14:12 नवीन
मामाचा नंबर द्या हो. तिथे जायच्या आधी मामाला फोन करुन विचारीन म्हणतो की शांपलची पातळी पातेल्यात कुठपर्यंत आलीय ते. मगच जाईन म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ते प्रत्यक्ष भेटीतच ओळ खायचे

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/29/2015 - 14:32 नवीन
ते प्रत्यक्ष भेटीतच ओळ खायचे गणित आहे, बघा जम्ले तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आम्हीं प्रत्यक्ष भेटीतच

प्रचेतस
Fri, 05/29/2015 - 14:38 नवीन
आम्हीं प्रत्यक्ष भेटीतच खाल्लेली ती पण तुमच्या संगे. तरी पण पाणचट लागली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

त्या दिवशीच सांगितलं होतं, ही

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/29/2015 - 14:45 नवीन
त्या दिवशीच सांगितलं होतं, ही आज आपल्याला गाळातली मिळालेली आहे म्हणून! पण त्ते लक्षात ठेवलं तर कसं ना? शिवाय हे तर्रीच्या पातेल्याचं गणित आजवर अनेकदा बोलतानाही सांगितलेलं आहे. पण आता ते ही आठवणार नाहीच्च टुम्हास! त्त्यामुळे आता...असोच्च! बाकि माझ्या बरोबर मीसौरभ नी सुद्धा एकदा मस्स्स्स्स्त करंट तिथे खाल्लेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

@तरी पण पाणचट लागली.>>> टुमची

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/29/2015 - 14:47 नवीन
@तरी पण पाणचट लागली.>>> टुमची आमची आवड वेगळी आहे. त्या तर्रीदार पाण्याचा मझा आंम्हास येतो,तुम्हास येत नाही... हा आवडीचा फरक असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हो..

प्रचेतस
Fri, 05/29/2015 - 14:50 नवीन
हो.. पण मिसाळ गंडलेली आहे असे म्हणणारे येथेच अनेक जण निघालेत पहा ना...मी, यसवायजी, धन्या......, त्यांचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

त्यानीही तशीच खाल्ली असेल मग!

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/29/2015 - 14:58 नवीन
त्यानीही तशीच खाल्ली असेल मग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पण त्याला "आंम्हाला आवडलेली

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/29/2015 - 15:00 नवीन
पण त्याला "आंम्हाला आवडलेली नाही" असे म्हणतात.. गंडलेली म्हणणं..हे म्हणजे........................................ तुम्हाला जे मला म्हणायचय..ते निश्चित माहिती आहे ना............... तेच्च असतं! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

पण त्याला "आंम्हाला आवडलेली

प्रसाद गोडबोले
Fri, 05/29/2015 - 15:05 नवीन
पण त्याला "आंम्हाला आवडलेली नाही" असे म्हणतात.. गंडलेली म्हणणं..हे म्हणजे........................................ >>>

स्वमतांधता

=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कुंथा आता... दिवस रात्र मग!

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/29/2015 - 15:14 नवीन
कुंथा आता... दिवस रात्र मग! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

इथे मी तुमच्या बाजुने बोलत

प्रसाद गोडबोले
Fri, 05/29/2015 - 15:21 नवीन
इथे मी तुमच्या बाजुने बोलत होतो बुवा . स्वतः ला अवडली नाही म्हणुन मिसळ गंडलेली आहे असे म्हणणे ही हत्तीची स्वमतांधता आहे असे म्हणत होतो . पण बहुतेक तुम्हीच स्वमतांधतेचा कॉपीराईट घेतलेला आहे , अत्मरंजना सारखाच ... ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मिसळ गंडलेली म्हणजे फसलेली

प्रचेतस
Fri, 05/29/2015 - 15:14 नवीन
मिसळ गंडलेली म्हणजे फसलेली असणं. इथे मामा मिसळ पानचट असल्याने फसलेली होती म्हणजेच गंडलेली होती. ती गंडलेली असल्यानेच आवडली नाही म्हणजेच गंडणं = न अवडणं. ल्ल्ल्लूऊऊऊऊऊउ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बाकी मिसळ खाताना कधीच

प्रचेतस
Fri, 05/29/2015 - 15:17 नवीन
बाकी मिसळ खाताना कधीच पातेल्याकडे बघून (तुमच्याशिवायच बहुधा) कोणीच खात नसतो. त्यामुळे गंडलेली ती गंडलेलीच. बाकी मधुच्या गाडीवरचे पदार्थ मला सर्वच आवडतात. त्यांना मी चांगलंच म्हणतो. जे चांगलं ते चांगलंच. त्यात आपलं परकं काय करायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

@त्यामुळे गंडलेली ती गंडलेलीच

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/29/2015 - 15:28 नवीन
@त्यामुळे गंडलेली ती गंडलेलीच. बाकी मधुच्या गाडीवरचे पदार्थ मला सर्वच आवडतात. त्यांना मी चांगलंच म्हणतो. जे चांगलं ते चांगलंच. त्यात आपलं परकं काय करायचं? >>> हम्म्म्म्म्म्म्म्म्म! आधीच लक्षात आलेलं होतं.. फक्त सदर चिडवाचिडवीचा हाच्च डाव आहे, हे पटलावर आणायच होतं. म्हणूनच मी ही थोडी ढील दिली! Image removed. फार्च पटक्क्न खुला सा - दिल्याबड्डल ढण्यवाद हो आगोबा! Image removed. आता चालू द्या तुमच........................ Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

चांगल्याला चांगलंच म्हणण्यात

प्रचेतस
Fri, 05/29/2015 - 15:42 नवीन
चांगल्याला चांगलंच म्हणण्यात चिडवाचिडवी ती काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@.मी, यसवायजी, धन्या......,

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/29/2015 - 15:30 नवीन
@.मी, यसवायजी, धन्या......, त्यांचे काय?>> तिघात मिळून ..माझा मैसळीक खून पाडायचा पूर्व-नियोजित कट आहे हा..................... हे काय ओळखू येत णाही काय आंम्हास? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

एकदा फक्त मिसळ खायचा कट्टा

डॉन व्हिटो कॉर्लिऑन
Fri, 05/29/2015 - 06:33 नवीन
एकदा फक्त मिसळ खायचा कट्टा करुयात का? त्या निमित्ताने मिपाकर दिसतील.
  • Log in or register to post comments

मुंबईमधील आनंदभुवनची मिसळ अप्रतिम

अभिरुप
Fri, 05/29/2015 - 14:02 नवीन
मिसळ जरी पुणेरी आणि कोल्हापूरी फेमस असली तरीही मुंबईत सुद्धा अशी कही ठिकाणे आहेत जिथे ती पुणे-कोल्हापूर सारखीच चवदार मिळते. उदा...आनंदभुवन(नायगांव परेल), सरदार(लालबाग पण आता बंद झाले आहे). आनंदभुवन मध्ये पोळा नावाचा डोश्यासारखा दिसणारा एक पदार्थही मिळतो जो उसळीबरोबर खाल्ला जातो. मिपाकरांनी एकदातरी भेट द्यवीच असे हे ठिकाण.
  • Log in or register to post comments

मी खाल्लेल्या सगळ्या मिसळीत

मृत्युन्जय
Fri, 05/29/2015 - 14:38 नवीन
मी खाल्लेल्या सगळ्या मिसळीत मामलेदारचा नंबर फार वरचा लागतो. दिवे आगरला आवळसकरांकडे सुद्धा सुंदर मिसळ मिळते. पण सगळ्यात आवडती मिसळ मात्र बेडेकर.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा