✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सुंदरीचे ओझे

श
शिव कन्या यांनी
Wed, 05/20/2015 - 17:28  ·  लेख
लेख
तान्झेन आणि इकीदो पायी प्रवास करीत होते. नुकताच मुसळधार पाउस पडून गेला होता. अधून मधून पावसाच्या हलक्या सरी येतच होत्या. चालता चालता ते एका खेडेगावापाशी पोहचले. तिथे एक अरुंद ओढा होता. त्यातून चिखलाचे पाणी वहात होते. हे दोघे तिथे जरा थांबले. तेवढ्यात, तिथे एक कमनीय बांध्याची, कोमल तनुची, तरुण, जपानी रमणी आली. पावसाने स्वच्छ झालेल्या हवेत तिचे मुखकमल अधिकच प्रसन्न दिसत होते. ती आपला फुलाफुलांचा रेशमी किमोनो सावरत ओढ्यापाशी थांबली. परंतु त्या बिचारीला, प्रयत्न करूनही तो ओढ काही ओलांडता येईना. तिची ती अवस्था पाहून, तान्झेन पुढे झाला. ‘चिंता करू नकोस मुली, ये!’ असे म्हणून त्याने तिला अलगद उचलले आणि ओढ्यापलीकडे नेऊन सोडले. इकीदो हा सगळा प्रकार तोंड वासून पाहत होता. मुक्कामाचे ठिकाण येईपर्यंत तो काहीच बोलला नाही. रात्र झाली. पाउस पूर्ण थांबला . आकाशात पूर्ण चंद्र उगवला . दोघे उघड्यावर हवा खात बसले. तान्झेन शांतच होता पण इकीदोला काही रहावले नाही! जराशा उद्वेगाने तो म्हणाला, ‘आपणा भिक्खूना स्त्रियांच्या जवळही जाण्याची परवानगी नाही, त्यातल्या त्यात तरुण, सुंदर स्त्रीच्या जवळ तर नाहीच नाही. तसे करणे म्हणजे आपल्या यमनियमांचे उल्लंघन केल्यासारखे आहे! हे माहित असूनही, तू त्या सुंदर मुलीला का उचललेस?’ तान्झेन किंचित हसला आणि शांतपणे उत्तरला, ‘ मी त्या मुलीला तेव्हाच तिथे सोडले. तू मात्र अजूनही तिला आपल्या बाहूंत वागवत आहेस!’ [झेन परंपरेतील कथा. ]
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
वाङ्मय
कथा
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
4906 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

ही कथा भारतीय स्वरुपात अनेकदा

चुकलामाकला
Wed, 05/20/2015 - 17:32 नवीन
ही कथा भारतीय स्वरुपात अनेकदा ऐकली आहे.
  • Log in or register to post comments

मस्तय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/20/2015 - 17:35 नवीन
आवडली कथा....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वाचत असल्याबद्दल धन्यवाद. रूप

शिव कन्या
Wed, 05/20/2015 - 17:41 नवीन
वाचत असल्याबद्दल धन्यवाद. रूप भारतीय असो,जपानी असो वा आणखी कोणतेही.... कथेने 'स्व-रूप' पहायची नजर दिली म्हणजे झाले!
  • Log in or register to post comments

अर्थ आवडला

गणेशा
Wed, 05/20/2015 - 18:04 नवीन
अर्थ आवडला
  • Log in or register to post comments

उत्तम कथा आहे.

बॅटमॅन
Wed, 05/20/2015 - 18:33 नवीन
उत्तम कथा आहे. बाकी
कोमल तनुची
हे जपानी नावच वाटले एकदम. असो.
  • Log in or register to post comments

बॕटमन.... आपल्या विचक्षण

शिव कन्या
Wed, 05/20/2015 - 18:55 नवीन
बॕटमन.... आपल्या विचक्षण नजरेला सलाम!:-)
  • Log in or register to post comments

एक कमनीय बांध्याची, कोमल

विवेकपटाईत
Wed, 05/20/2015 - 19:54 नवीन
एक कमनीय बांध्याची, कोमल तनुची, तरुण, जपानी रमणी आली. ......मुखकमल अधिकच प्रसन्न दिसत होते. असे वाटले संस्कृत काव्य वाचतो आहे. कथा आवडली
  • Log in or register to post comments

एक शंका आहे.

बाबा पाटील
गुरुवार, 05/21/2015 - 19:29 नवीन
एक कमनीय बांध्याची, कोमल तनुची, तरुण, जपानी रमणी आली. ......मुखकमल अधिकच प्रसन्न दिसत होते मजबुत बांध्याची तरुणी सुंदर नसते का हो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

Short n Sweet Story. तुमच्या

NiluMP
Wed, 05/20/2015 - 23:20 नवीन
Short n Sweet Story. तुमच्या कथा थोडक्यात बरंच काही सांगून जातात.
  • Log in or register to post comments

हाहा!

पैसा
Wed, 05/20/2015 - 23:36 नवीन
कथा आवडली. पूर्वी वाचलेली आहे.
  • Log in or register to post comments

आवडली.

राही
Wed, 05/20/2015 - 23:43 नवीन
कथा आवडली. याच्या अनेक भारतीय आवृत्त्या वाचायला मिळतात. याचे मूळ झेन आहे हे आज कळले. ता.क. मला कोमल तनुची हे जपानी पेक्षा इटालियन वाटले. निकोलाव मनुची सारखे. पण अर्थात Manucci चा नक्की उच्चार माहीत नाही.
  • Log in or register to post comments

छान..

रुपी
Wed, 05/20/2015 - 23:43 नवीन
पूर्वी ऐकलेली आहे, तेव्हाही खूप आवडली होती. कमीअधिक प्रमाणात आपण सगळेच काही ना काही वागवत असतो, सोडलं तर किती सुखी होऊ! तुमची शब्दांवरची पकड मात्र कमालीची आहे!
  • Log in or register to post comments

अगोदर थोड्या वेगळ्या रुपात

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/20/2015 - 23:59 नवीन
अगोदर थोड्या वेगळ्या रुपात माहीत असली तरी ही अर्थपूर्ण रुपककथा माझी आवडती आहे !
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 05/21/2015 - 00:10 नवीन
अगदी हेच म्हणायला आलो होतो. शब्दांची निवड आकर्षक वाटत असली तरी तुम्ही आजवर लिहिलेल्या कथांच्या तुलनेत अपेक्षाभंग झाला. हीच भारतीय स्वरूपातली बौद्ध भिक्षूंची रुपककथा माझी खूपच आवडती असल्याने असे झाले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आवडली !!

सानिकास्वप्निल
गुरुवार, 05/21/2015 - 00:08 नवीन
कथा आवडली, तुम्ही छान लिहिता.
  • Log in or register to post comments

पुढची झ्येन कथा लाकुडतोड्याची

दमामि
गुरुवार, 05/21/2015 - 07:42 नवीन
पुढची झ्येन कथा लाकुडतोड्याची का?
  • Log in or register to post comments

छानच !

सस्नेह
गुरुवार, 05/21/2015 - 08:23 नवीन
रूपककथा रुपांतरण यावर चांगले प्रभुत्व आहे तुमचे.
  • Log in or register to post comments

कथा आवडली

अमृत
गुरुवार, 05/21/2015 - 08:48 नवीन
तुमच्या सगळ्याच कथा छान असतात!
  • Log in or register to post comments

या स्वरुपातली कथाही आवडली.

अजया
गुरुवार, 05/21/2015 - 09:01 नवीन
या स्वरुपातली कथाही आवडली.
  • Log in or register to post comments

हेच हेच

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 05/21/2015 - 19:47 नवीन
हेच हेच हेच हेच तत्वज्ञान आम्ही मांडतो तर केवढा मोठ्ठा गहजब माजतो ... सारे करा फक्त कशात गुंतुन पडु नका ... तेन त्यक्तेन भुंजीथा: !! कर्म बंधनकारक नाहीये , त्याच्या फलाची आसक्ती बंधन कारक आहे ! जर आसक्ती सुटली असेल तर कितीही मुलींना उचलुन पलीकडे पोहचवा , काही फरक पडत नाही पण हेच जर आसक्ती सुटली नसेल तर कितिही यम नियम पाळुन तुम्ही अडकलेलेच रहाणार ! रासक्रिडा करिता वनमाळी हो | सखे होतो आम्ही विषय विचारी | टाकुनि गेला तो गिरीधारी | कोठे गुंतुन बाई हा राहिला || सांगा मुकंद कुणी हा पाहिला !!!
  • Log in or register to post comments

प्रगो ....... वाचत

शिव कन्या
गुरुवार, 05/21/2015 - 22:58 नवीन
प्रगो ....... वाचत असल्याबद्दल धन्यवाद. उत्तम विवेचन.
  • Log in or register to post comments

दामामि ......... आपल्यासारखे

शिव कन्या
गुरुवार, 05/21/2015 - 22:59 नवीन
दामामि ......... आपल्यासारखे गुणी वाचक असतील तर 'झ्येन बत्तीशी' पण लिहू.
  • Log in or register to post comments

ओ तर्री ताई, बत्तिशी कुठून

दमामि
Fri, 05/22/2015 - 06:35 नवीन
ओ तर्री ताई, बत्तिशी कुठून काढली तुम्ही? दंत चिकित्सक आहात का? चान चान! रच्याकने झ्येन चिमण्या बाळाला आंदोळ घालतात का? - एक निर्गुणी वाचक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या

बाबा पाटील , अहो इतके जेरीस

शिव कन्या
गुरुवार, 05/21/2015 - 23:03 नवीन
बाबा पाटील , अहो इतके जेरीस नका येऊ. असते कि! मजबूत बांध्याची मजबूत सुंदरी असणारच कि. नाय कोण म्हणतंय? पण या कथेसाठी तिचा काय उपेग नाय , म्हणून तिला 'नाजूक तनुची' केली.
  • Log in or register to post comments

मजबूत बांध्याची असली असती तर

कानडाऊ योगेशु
Fri, 05/22/2015 - 09:17 नवीन
मजबूत बांध्याची असली असती तर भिक्खुनींच तिला "आम्हाला नदी पार करुन दे"अशी विनंती केली असती व तिनेही त्या दोघांना बगलेत घेऊन नदी पार केली असती.... पण प्रश्न व कथेचा मतितार्थ मात्र तोच राहीला असता....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या

हे आठवलं

श्रीरंग_जोशी
Fri, 05/22/2015 - 09:25 नवीन
मजबूत बांधा. प्रतिसाद मार्मिक हं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

श्रीरंग जोशी..... वाचनातील

शिव कन्या
गुरुवार, 05/21/2015 - 23:09 नवीन
श्रीरंग जोशी..... वाचनातील आणि प्रतिक्रियेतील सातत्याबद्दल धन्यवाद. होय, असे होते! तेच कथा बीज दुसऱ्या मातीत, दुसऱ्या वेशात वाचले कि जरासे खटकते. पण, कथेचा अंतरात्मा तोच असतो.
  • Log in or register to post comments

चुकलामाकला , स्नेहांकिता,

शिव कन्या
गुरुवार, 05/21/2015 - 23:11 नवीन
चुकलामाकला , स्नेहांकिता, सानिकास्वप्नील, पैसा, इस्पिकचा एक्का, रुपी इ इ इ ..... सर्वांचे वाचत असल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments

ही कथा वाचण्यात किंवा ऐकण्यात

मदनबाण
Fri, 05/22/2015 - 11:56 नवीन
ही कथा वाचण्यात किंवा ऐकण्यात आलेली आहे... और भी आने दो...

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा