Skip to main content

सुट्टी म्हणजे -[बालकविता]

लेखक विदेश यांनी रविवार, 17/05/2015 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
सुट्टी म्हणजे नुसती धमाल पर्यटनाची भलती कमाल .. गडावर जाऊ शिकू इतिहास भुगोलातले प्रदेश खास .. बसू घरात ऊन असल्यावर पत्ते क्यारम गार फरशीवर .. टीव्हीवर एनजी डिस्कव्हरी डोरेमोन भीम बीनची मस्करी .. अधूनमधून भेंड्या नि गाणी आईस्क्रीम आणिक लिंबूपाणी .. पुस्तकं वाचू खूप छान छान माहितीची करू देवाणघेवाण .. संध्याकाळी खेळू बागेत खेळ खेळून खाऊ बागेबाहेर भेळ .. सुट्टी म्हणजे क्रिकेट खेळणे अभ्यासाशी गट्टी फू करणे .. .
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1694
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

काव्यातला सर्वात दुर्गम प्रकार कोणता तर तो बालकवितांचा.. कारण आपल्याला त्या वयास जावे लागते.. कविता आवडली... कविता जितकी साधी तितकी ती बोलकी... साधं समीकरण

अर्व, गणेशा .. प्रतिसादाबद्दल आभार !