सेलिंग किंवा मार्केटिंग हे एक स्किल आहे; जे सगळ्यांना जमत नाही. एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी समोरच्या माणसाला प्रवृत्त करणं, हे मला तरी महाकठीण काम वाटतं. नॉट माय चहाचा कप. आज बाजारात तुम्हाला कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तरी तुमच्यापुढे अनेक पर्याय असतात. बरं, स्पर्धा इतकी आहे की कंपन्याही आपली वस्तू विकली जावी (मग ती कशीही असो काहीही असो) हा एककलमी कार्यक्रम घेऊन शर्यतीत उतरलेल्या असतात. त्यांचे मोहरे असतात ते म्हणजे सेल्समन.
ग्राहक म्हणून तुमचा अधिक संबंध येतो तो या 'सेल्समन' नावाच्या प्रजातीतील व्यक्तींशी. कुणाचीही हेटाळणी करायचा उद्देश नाही, त्यामुळे हलकेच घ्या (take it easy). तर या सेल्समन व्यक्ती बहुतेकदा डोक्क्यात जातात. कशा, ते काही प्रकारांतून, सवयींतून सांगतो.
मागे लागणं - मॉल मधे जाऊन खरेदी सुरु झाल्यावर मुख्य फायदा झाला तो म्हणजे तुम्हाला 'विचार' करून चार गोष्टी बघून तुमच्या स्वतंत्र निर्णयातून खरेदी करता येऊ लागली. नाहीतर दुकानात गेलं की तो दाखवेल तेच दिसतं आणि नाही आवडून आपण चालायला लागावं तर और देखो ये देखो वो देखो करत आग्रह सुरू होतो. बरं मोठं दुकान असेल तर आपण निघाल्यावर तुच्छ नजरेने आपल्याकडे बघितलं जातं ते वेगळंच. हे दुकानातल्या सेल्समन चं मागे लागणं डोक्क्यात जातं. आता मॉलमधेही फिरते सेल्समन असतात म्हणा.
त्यांच्याकडे आहे तेच बेस्ट - मला विंडोज फोन हवा होता. एका दुकानात शिरलो. त्याने 'रेंज' विचारली 'रेंज'. म्हटलं लुमिया दाखव. "ये देखो सेमसंग गेलेक्सी अमूक" "हा नको लुमिया दाखव" "उससे बेस्ट ये है. १३ मेगापिक्सेल...." .... "अरे ते मेगापिक्सेल गेलं ......त. मी काय मागतोय?"... मग म्हणाला शेवटी की नही है वो. म्हणजे, आलेल्या पाहुण्याला रिकाम्या हाताने पाठवू नये ची पद्धत फार मनावर घेतल्यासारखं आलेल्या ग्राहकाच्या गळ्यात काहीतरी मारूनच त्याला पाठवायचं असा प्रकार झाला. डोक्क्यात !
आजकाल हेच चालतं - 'ट्रॅडिशनल वेअर' चं दुकान. मी कॉटन चा झब्बा मागितला. त्याने झगरमगर एम्ब्रॉयडरी वाला स्टारप्लस छाप झब्बा दाखवला. "हे नाही. सोबर दाखवा", मी. "हे बघा तर, नवीन कलेक्शन आहे" "अरे नको बाबा साधे दाखव ना जरा डिसेंट प्रिंट वाले" त्यापुढच्या उत्तरानंतर मी बाहेर पडलो. "आजकाल ते नाही चालत. आजकाल हाच ट्रेंड आहे" "हो का? ठेव मग तो तुझ्याकडे", मी. मला आजवर असंख्य वेळा हा डैलॉग सहन करावा लागलाय. सगळ्यांनाच असेल. पण माझ्या तो डोक्क्यात जातो. 'तू कोण ठरवणार कसला ट्रेंड आहे आणि मी तो फॉलो करावा का नाही?'
दाखले देणे - मोबाईलचंच उदाहरण. बिलबुक काढून दाखवलं होतं एकदा बघा... गेले चार मोबाईल अमके अमके विकले. म्हणून सांगतो हा बेस्ट आहे. किंवा मग 'आज के दिन मे चार प्रॉडक्ट्स गये साब इसके!' (म्हणजे, तू मूर्ख आहेस जे दुसर काहीतरी मागतोयस) असे डैलॉग.
तुम्हाला झाडावर चढवणं - या ट्रिकला बायका हमखास भुलतात. (ओह... जेंडर स्पेसिफिक स्टेटमेंट) कधी कधी मुलं/पुरुषही भुलतातच. म्हणजे उदहारणार्थ बघा; साडीचं दुकान. "ये आपको बहुत अच्छा दिखेगा" (सेल्समनचे उद्गार नाईलाजाने हिंदीत लिहावे लागत आहेत कारण बहुतांश ते हिंदीतच असतात) असं म्हटलं की म्याडमचा फोकस त्या साडीवर येण्याची पुरेपूर शक्यता. मग नवरा असेल सोबत तर तो म्हणतो की "ही नाहीये इतकी चांगली". त्या औषधाचा परिणाम झाला तर ठीक, नाहीतर त्यालाही "तुम्हाला त्यातलं कळंत नाही" वगैरे म्हटलं जाऊ शकतं. असो. कपड्यांच्या दुकानात हे समजू शकतो पण एकदा एका रंगा-याला जेंव्हा मी म्हटलं की ही शेड जी तू केली आहेस ती परफेक्ट नाही झाली आहे, तेंव्हा तो मला म्हणाला "अरे उससे ज्यादा ये अच्छा दिखेगा!" सटकलीच माझी तेंव्हा म्हणजे. घर कोणाचं? रंग कोण ठरवणार? असो. पण एकंदरित सेल्समनची ही पकपक सुद्धा डोक्यात जाते.
अवांतर प्रश्न - यात आता हेतू वेगवेगळे असू शकतात. काही वेळा खरंच तुमचा विचार समजून घ्यायला प्रश्न विचारले जात असतील. पण काहीवेळा हे इंट्रूडिंग होतं फार. शर्ट घेताना, 'पार्टीत घालणार आहात?' 'शादी घरका है के बाहरका?' असे प्रश्न ऐकून प्रतिप्रश्न येतोच मनात. "तुला का.....य फरक पडतोय?'
फास्ट आणि खूप जास्त बोलणे - हे कॉमन आहे खूप. भरभर तोंडातल्या तोंडात काहीतरी बोलायचं आणि असं सगळंच म्हणजे खूप जोराची लागली आहे आणि ग्राहक गेला की धावलोच अशा घाईत उत्पादनं दाखवायची. डोक्क्यात.
मागे मागे फिरणं - मॉल मधे होतं हे आजकाल. तुम्ही एका रॅक जवळ ३० सेकंदापेक्षा जास्त थांबलात, की एक मुलगा/मुलगी मागे येऊन उभी राहते तुमच्या. आणि मग 'सांग ना, काय झालं?' च्या सुरात 'क्या लेना है?', 'ट्राउजर लेना है?', 'ऑफिस के लिये?' असे हळूच हळूच प्रश्न पुटपुटत राहते. दुस-या रॅकशी जा, तिथेही तुम्हाला फॉलो करते. एकदम चोर बिर असल्याची भावना येते मनात. समबडी इज फालोविंग मी.... डोक्क्यात.
एकूण काय; नो ऑफेन्स बट हे अॅग्रेसिव मार्केटिंग किंवा कंपेलिंग सेल्समनशिप या फार वैताग देणा-या गोष्टी आहेत. त्यामुळे मी मॉल मधे गेलो तर सरळ 'मी बघतो आणि गरज लागली तर तुम्हाला सांगतो' असं नम्रपणे सांगून दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो. दुकानात गेलो तर थंड रहायचा प्रयत्न करतो. :)
हे सगळं असूनही जेंव्हा मी मला त्यांच्या जागी ठेवतो, एका मोबाईल शॉपी मधल्या सेल्समनने मला सांगितलेलं त्यांच्या कामाचं स्वरूप व मालकाचा जाच आठवतो, जेंव्हा त्यांना मिळणा-या कमी पैशांची आणि असणा-या अवास्तव टार्गेट्सची कल्पना करतो, तेंव्हा त्यांच्याबद्दल कणव वाटल्यावाचून रहात नाही. त्यांच्या कामाबद्दल त्यांचं कौतुकच वाटतं. पण तरीही जेंव्हा मी ग्राहकाच्या जागी असतो तेंव्हा....
वाचने
11416
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
माल ...
ह्यापेक्षा जास्त अत्याचार
सिरियसली!
In reply to ह्यापेक्षा जास्त अत्याचार by राजेंद्र मेहेंदळे
काय त्रास आहे!
In reply to ह्यापेक्षा जास्त अत्याचार by राजेंद्र मेहेंदळे
चांगले लिहिले आहे....
हो ते झालंच... !
In reply to चांगले लिहिले आहे.... by गणेशा
सहमत..
In reply to चांगले लिहिले आहे.... by गणेशा
टार्गेट टार्गेट टार्गेट ....
हं.....
In reply to टार्गेट टार्गेट टार्गेट .... by अनुप७१८१
माझा मॉल मधील सेल्समन्सचा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींच्या मंगोलियाभेटीचे महत्त्व Why on earth is Narendra Modi going to Mongolia? Forget Uranium. Real reason behind PM Modi’s Mongolia visit is China Beijing believes unrest in Tibet linked with Tawang: Zhang Li India’s foreign policy must continue to move past the parochial Make in India: Defence ministry okays $3.4 billion deals including procurement of US-origin M777 artillery gunsभलतेच लक्की ब्वा तुम्ही !
In reply to माझा मॉल मधील सेल्समन्सचा by मदनबाण
मिपावर
मी उमेदवारी केली होती,
In reply to मिपावर by कपिलमुनी
चोर बिर असल्याची भावना
थोडक्यात काय ….
In reply to चोर बिर असल्याची भावना by अत्रन्गि पाउस
हाहाहाहाहाहा !
In reply to थोडक्यात काय …. by पगला गजोधर
एकदम बरोबर
In reply to थोडक्यात काय …. by पगला गजोधर
माझ्या वडिलांनी बावीस वर्षं
हे भारीच !!
In reply to माझ्या वडिलांनी बावीस वर्षं by आदूबाळ
आवडलं
In reply to माझ्या वडिलांनी बावीस वर्षं by आदूबाळ
मुरलेला सेल्समन आणि ट्राफिक
:)
मला थोडी दया येते या लोकांची.
+१ धन्यवाद!!
In reply to मला थोडी दया येते या लोकांची. by Dhananjay Borgaonkar
हेच बोल्तो.
In reply to मला थोडी दया येते या लोकांची. by Dhananjay Borgaonkar
दूरध्वनी वरची सेल्समनशिप
In reply to मला थोडी दया येते या लोकांची. by Dhananjay Borgaonkar
चांगलं लिहिलंयत हो दादा.
हा हा हा..या
सेलसमन
पण याहून डोक्यात जाते अॅमवे
हा हा हा मस्तच.
In reply to पण याहून डोक्यात जाते अॅमवे by चुकलामाकला
अॅमवे वाल्यांना तर फटके
In reply to पण याहून डोक्यात जाते अॅमवे by चुकलामाकला
अॅम वे मुळे
In reply to अॅमवे वाल्यांना तर फटके by चिनार
आम्हाला तर एकाने घरी येण्याचे
In reply to अॅम वे मुळे by सौन्दर्य
हां, आत्ता आठवलं की हामेरिकेत
In reply to आम्हाला तर एकाने घरी येण्याचे by रुपी
अॅम वे मुळे
In reply to अॅमवे वाल्यांना तर फटके by चिनार
हे सर्व आता रोजच्या आयुष्याचा एक भागच आहे.
अॅमवे - वाय झेड जात साली.
त्यापे़क्षा दंबुक दाखावायची
In reply to अॅमवे - वाय झेड जात साली. by बाबा पाटील
दंबुक
In reply to त्यापे़क्षा दंबुक दाखावायची by कॅप्टन जॅक स्पॅरो
हा हा हा
In reply to अॅमवे - वाय झेड जात साली. by बाबा पाटील
लय भारि
In reply to अॅमवे - वाय झेड जात साली. by बाबा पाटील
हाहा! छान आहे! चष्मे बद्दूर
एम एल एम वाल्यांची दोन तास
खर आहे..ड्रेसेसच्या दुकानात
सगळेच सेल्समन
काही काही ठिकाणी माल पाहुन
पाण उतारा
In reply to काही काही ठिकाणी माल पाहुन by मोहनराव
निगोशियेशन
In reply to काही काही ठिकाणी माल पाहुन by मोहनराव
पाणउतारा
बजेट कितना है ?
बजेट कितना है
In reply to बजेट कितना है ? by सौन्दर्य
चेन मार्केटीग वाल्या लोक्सना कटवण्याचा उपाय
मस्त धागा आणि मस्त
मागे एकदा माझ्या एका
कठीण जॉब
तरी बरं हल्ली अॅम वे , जपान
>>> तुम्हाला झाडावर चढवणं -
सेलिंग किंवा मार्केटिंग हे एक
मॉलमधे जाताच कशाला?