काय दुखलंय...?
लेखनप्रकार (Writing Type)
एका प्रश्नाचे उत्तरः
प्रसंग एकः
बांद्र्याचे जे जे होस्टेल. रात्रीचे २ वाजलेत. अगदी पाप्याचे पितर असलेला एक मुलगा लघुशंकेला गेला असता चक्कर येऊन तिथेच पडला. बेशुद्ध झाला नाही. पण अंगात उठण्याचे त्राण बिल्कुल नाही. त्याला उचलून रेक्टरच्या गाडीत घालून जवळच्या एकमेव उपलब्ध असलेल्या मल्टी-स्पेशॅलिटी हॉस्पीटल मधे नेले. निवासी डॉकने छातीला स्टेथो लावून तपासले. काही प्रश्न विचारले. ताबडतोब रक्त/लघवी तपासणी, छातीचा एक्स-रे वैगेरे काढायला लावला. आम्ही जाम टेंशनमधे. च्यायला, हे पोरगं आई-बापापासून हजार किमी दूर. ह्याला काय झालं अन काय नाही. डॉकने गोळी दिली. सकाळी परत बोलावले. रात्रभर आम्ही चिंतेत. तो चिंतेत. सकाळी पेशंट आणि मी मस्त चालत हॉस्पीटलला गेलो. सगळे रीपोर्ट्स नॉर्मल. डॉक म्हणतो. अरे बीअर भरपूर प्यायला, जेवला नाही. अॅसिडीटी झाली होती. बाकी काळजीचं काही कारण नाही.
सर्व खर्चः २,५०० रुपये. सन २००४.
प्रश्नः अॅसिडीटी होती हे कळायला एक्स-रे लागतो? काय खायला प्यायला हे रात्रीच सांगितले मग एवढ्या टेस्ट्स का?
उत्तरः डॉक्टर आपल्यापेक्षा जास्त शहाणे असतात. ते बरोबर आपल्याला कापतात.
प्रसंग दुसरा:
आयपीएलमधे असतांना रात्रंदिवस बसून काम केल्याने उष्णता वाढून 'योग्य ठिकाणी' चांगले ७-८ गळू झाले. भयंकर वेदना. उठण्या-बसण्याची बोंब. काहीच उपाय सुचेना. जवळच्या मल्टी-स्पेशॅलिटी हॉस्पीटलमधे गेलो. बायकोची आजी तिथली कायमची पेशंट असल्याने बरीच ओळख वैगेरे. प्रथितयश सर्जन डॉकने तपासले. निदान: ऑपरेशन करावे लागेल. खर्च १५ ते २० हजार वैगेरे. लगेच करून घ्या किंवा परिस्थिती हाताबाहेर जाईल. थोडे संशयास्पद वाटले.
बायको म्हणाली, आमच्या जुन्या फॅमिली डॉकचे मत घेऊया. ते योग्य काय ते सांगतील. हे ठाण्यातलेच एक वयोवृद्ध डॉक्टर, मोठं पण जुनं हॉस्पीटल. काही गुणवान, नावाजलेल्या, चांगल्या डॉक्टरांपैकी एक. त्यांच्याकडे गेलो. तपासले. म्हणाले, "अरे काय नाही, साधं गळू आहे. ४ दिवसांत ठीक होईल. गरम पाण्यात डेटॉल टाकून बस. चांगला तासभर शेक घे. गळू दाबून पू व रक्त काढून टाक. ह्या अँटीबायोटीक घे. बास. आराम कर आठ दिवस."
सर्व खर्चः ३०० रुपये. सन २००९.
प्रश्नः एकाच पेशंटच्या एकाच रोगाचे एकाच अवस्थेबद्दल एकसारखे शिक्षण घेतलेल्या दोन डॉक्टरांचे निदान एकच पण उपचार पद्धती वेगळ्या का? दुसर्या डॉकनी खर्चिक उपाय का सांगितला? त्याला खर्चिक उपायच शिकवला होता का?
उत्तरः काही डॉक्टर आपल्यापेक्षा जास्त शहाणे असतात. ते बरोबर आपल्याला कापतात. काही डॉक्टर आपल्याला खरंच वाचवतात, खर्च आणि रोग दोघांपासून.
प्रसंग तीसरा:
ठाण्यातले प्रसिद्ध असे नर्सिंगहोम. बापाने सुरू केलेले, आता आई, मुलगा, सून सांभाळते. खुप लोकांकडे चौकशी करून इकडे नाव नोंदवले.
सातव्या महिन्यात रेगुलर चेक-अप ला गेलो असता. डॉक-आईनी नेहमीप्रमाणे तपासले. तपासून झाल्यावर नेहमीच्या डिस्कशन-क्वेरीज ला बसलो. बायको म्हणाली, की तीला दोन-तीन दिवसांपासून बाळाची हालचाल, ठोके, खालच्या दिशेला जाणवतायत, खुप दुखतंय. कपाळावर काळजीच्या आठ्या आणत डॉक म्हणाल्या, जरा परत एकदा तपासू. मग हात घालून नीट तपासले. बायकोचे म्हणणे खरे निघाले. बाळ गर्भ-पिशवीच्या तोंडावर धडक मारायच्या तयारीत होते. ताबडतोब बेड-रेस्ट सांगितली. आणीबाणीची परिस्थिती असल्याने तिथेच लगेच अॅडमिट केले. ३-४ दिवस निरिक्षणाखाली होती. बाळ परत पुर्ववत झाले. आम्ही घरी आलो.
सर्व खर्चः दोनदा टेबलवर घेतले म्हणून दुप्पट तपासणी फी, (हॉस्पीटलायझेशनचा खर्च वेगळा) सन २०१०.
प्रश्नः पहिल्यांदाच चेक-अप ला टेबलवर घेतल्यावर ही आणीबाणीची परिस्थिती एवढ्या अनुभवी डॉकला का जाणवली नाही? मग नक्की रेगुलर-टेबल-चेक-अप काय असतो? गर्भवती 'डॉकला कळतं, तेच सांगतील काय असेल ते' असे म्हणून घरी गेली असती आणि काही कमी-जास्त झाले असते तर जबाबदारी कुणाची?
उत्तरः काही डॉक्टर आपल्यापेक्षा जास्त शहाणे असतात. पण त्यांना पेशंटशी काही घेणे-देणे नसते.
ठाण्यात पहिल्या बाळाच्या वेळेस ९ सोनोग्राफी झाल्यात एकूण खर्चः११,३००. नाशिकमधे दुसर्या बाळाच्या वेळी एकूण काळात ४ सोनोग्राफी झाल्यात. एकूण खर्चः२४००. असे का? तुम्ही कुठल्या गावात आहात यावर किती सोनोज ठरतात का?
प्रसंग चौथा:
नऊ महीने पुर्ण झाले. आता बाळ योग्य पद्धतीने वाढतंय. ठोके व्यवस्थित आहेत. डोके खाली आहे. आगमनाची वेळ जवळ आली आहे. कुठल्याही क्षणी कळा सुरु होतील. होणारी माता-पिता वेगवेगळ्या भावनांच्या सागरलहरींमधे हिंदकळतायत. मातेची प्रकृती उत्तम आहे. बाळाची प्रकृती उत्तम आहे. सर्व चिन्हे उत्कृष्ट बाळंतपण होईल अशीच आहेत. नववा संपल्यावर रेगुलर चेक-अप ला गेलो. डॉक-आईच्या डॉक-मुलाने तपासणी केली. पहिल्यांदाच क्लिनिकमधले सोनोग्राफी मशिन पोटावर फिरवून तपासणी केली. शांतपणे आम्ही डॉकसमोर बसलोय. आता काय काळजी घ्यावी आणि कळा सुरु झाल्यावर काय करावे याचे मार्गदर्शनाची वाट पाहू लागलो. तेव्हाच त्या थंड डॉकच्या थंड आवाजाने आमची मनं चिरली. "सिझर करावं लागेल, बाळ पायाळु आहे." त्याचे वाक्य संपायच्या आत मातेचे अश्रू सुरु. मी हजार प्रश्न विचारतोय, त्याचे एकच उत्तर. सोनोग्राफीत बाळ पायाळु दिसतंय, आम्ही रिस्क घेऊ शकत नाही. नाळ गळ्यात अडकेल, मुल डिस्ट्रेस होईल. डेट ठरवा. सिझर उत्तम राहील.
आम्ही नखशिखांत हादरलो. बायकोने नॉर्मल डीलीवरीसाठी सर्व काळजी घेतली होती. तीला पोट कापून घ्यायचेच नव्हते. पण नशिबापुढे काय चालते म्हणून आम्ही सिझर साठी तयार झालो. दुसर्या मतासाठी कुणाला विचारावे अशी परिस्थितीच नव्हती, बायको विचार करते आहेच की मला ठोके खाली जाणवतायत. बाळाच्या ठोके मोजायचं मशीनही खालच्या बाजूलाच फायनेस्ट रिस्पॉन्स देतंय. मग बाळ पायाळू कसं?
सर्व खर्चः १ लाख २५ हजार रुपये. (नॉर्मल डीलीवरी: ६५ हजार) सन २०१०
प्रश्नः ५० हजारासाठी गळे कापणारे आणि ५० हजारासाठी पोट कापणारे यांच्यात फरक काय? तो आपण ठरवणारे कोण?
उत्तरः काही डॉक्टर... जाऊ दे.
प्रसंग पाचवा:
डीलीवरीनंतर काही महिन्यांत बायकोच्या दोन्ही तळव्यांवर सूज यायला लागली, भयंकर कळा यायच्या. तिच्या खांद्याजवळ जन्मापासूनची एक बोराएवढी छोटी गाठ होती. तीही अचानक मोठी होऊ लागली. आता आम्ही अगदी ओळखीच्या व २५-३० वर्ष अनुभवी सर्जनला दाखवले. मनगटांमधे सिस्ट आहेत, ते काढल्यावर सूज यायची थांबेल असे त्याने निदान केले. खांद्याजवळच्या गाठीला ताबडतोब काढून टाकायचे ठरवले. कॉम्प्लीकेशन्स बद्दल विचारले असता काही होणार नाही असे सांगितले. दोन्ही हात व खांदा इथली ऑप्स एकाच वेळेस केली. गाठ काढल्यावर लॅबटेस्ट नुसार कॅन्सरवाली नाही असे निदान झाले.
ऑप्स नंतर सूज कमी झालीच नाही. त्याबद्दल विचारले असता होईल ३-४ आठवड्यात कमी असे सांगितले. ३-४ आठवड्यांनीही कमी झाली नाही. मूळ त्रास तसाच आहे. फक्त थोडा कमी झाला, की बायकोने त्याची सवय करून घेतली माहित नाही. खांद्याजवळचे काही मज्जातंतूंना डॅमेज झालाय. थोड्या भागात नम्बनेस आहे. तोही सहा महिन्यात निघून जाईल असे सांगितले. तीन वर्षे झाली. सगळ्या समस्या तशाच आहेत. आता कुणाकडेही काहीही दाखवायची हिंमत राहीली नाही. नवा सर्जन पैसे उकळायला परत चिरफाड करेल, आराम मिळणार नाहीच अशी भीती खोलवर रुजून बसलीये.
सर्व खर्चः ३५ हजार रुपये. सन २०१२.
प्रश्नः आपली फसवणूक झाली हे सिद्ध कसे करायचे? कुठे? न्याय काय मिळेल? न्यायदानात शरीर ठीक होईल, एकदम ठणठणीत?
उत्तरः?????
प्रसंग सहावा:
बहीणीला मूल नाही. लग्नाला सहा वर्षे झाली. अॅलोपॅथी डॉक्स फक्त प्रयोग करतायत असे कालांतराने लक्षात आले. त्याचे पुर्ण डीटेल्स माहित नाहीत. मी एका नामांकित सर्वोपचार डॉकला ओळखतो. प्रजननविषयक त्याचे फार कार्यक्रम टीव्हीवर येत असतात. महाराष्ट्रात किमान ३० शाखा आहेत. बहिणीला म्हटले बघ प्रयत्न करून. योग्य उपचार होतील अशी आशा आहे. त्यात त्यांनी एक अॅलोपॅथी इंजेक्शन वापरले. अजून काय काय न काय काय? जवळपास एक लाख रुपये घालवून काहीच उपयोग होत नाही म्हटल्यावर मी त्या डॉकला फैलावर घ्यायचे ठरवले. तर तो बहिणीला म्हणाला, तुम्ही सांगितलेली योगासने केलीत का? योगासने करा, फायदा होईल. लाखभर रुपयाची निरर्थक पंचकर्म ट्रीटमेंट, औषधी पचवून जर हा सांगतोय योगसनं करा, फायदा होईल. तर त्याचे डोके का फोडू नये असा विचार तिथेच आला. पण आपण त्याला कुठल्याही प्रकारे कायद्याच्या कचाट्यात पकडू शकत नाही हे ध्यानात आले. मुकाट घरी आलो.
ती विशिष्ट इंजेक्शने विशिष्ट कालावधीत घ्यायची असल्याने बहिण परत सासरी निघून गेली. या आयुर्वेदिक डॉक्सनी लिहून दिलेल्या प्रीस्कवर तीचा अॅलोपॅथी डॉक तेच अॅलोपॅथी इंजेक्शन देण्यास तयार नव्हता. तो म्हणाला मी माझी प्रोसीजर वापरणार आणि नंतर ठरवणार हे कधी द्यायचे ते. इतर बर्याच जिवघेण्या गमती-जमती कळल्या या प्रवासात. आपलं गिर्हाईक दुसरीकडे उपाय शोधतंय म्हटल्यावर तीच्या सासरकडच्या डॉकला नवे प्रयोग करायचा उमाळा आला. दोन-तीन सर्जरी करून टाकल्या त्या भरात त्याने.
एक वर्ष झाल्ंय या सगळ्या गोष्टींना. कुणीही काहीच खरं सांगत नाही आहे. कसलीही हमी देत नाही आहे. सर्वांचे उत्तर आम्ही प्रयत्न करतो, होईलच काहीतरी (तुम्ही फक्त पैसे मोजत राहा)
सर्व खर्चः ५ लाख रुपये आतापर्यंत. उपयोग शून्य.
प्रश्नः अशा धादांत क्वॅक्सना अशी अडलेल्या लोकांना फसवणारे धंदे करण्याची मोकळीक कशी मिळते? आम्ही अमुक इतक्या हजार घरांमधे हास्य फुलवलं अशी पेजपेजभर नियमबाह्य जाहिरात सरकारी व्यवस्था कशी खपवून घेते? अॅलोपॅथी वा आयुर्वेद किंवा अजून कोणी, यांना अशा सर्फ एक्सेलछाप जाहिराती करण्याची अजिबात लाज वाटत नाही?
उत्तरः?????
प्रसंग सातवा:
दोघांच्याही डोळ्यात कसले तरी इन्फेक्शन झालेले. ओळखीच्या एक फॅमिली फिजीशियन बाईंचा मुलगा नुकताच आय-स्पेशालिस्ट एम.डी झालेला त्याच्या कडे गेलो. त्याने डोळे तपासून सांगितले तुम्हाला चश्मा आहे. आपण जरा व्यवस्थित टेस्ट करून योग्य नंबर काढू. पुढचे तीन दिवस त्याने रोज संध्याकाळी डोळ्यात वेगवेगळे ड्रॉप्स टाकून नंबराची ट्रायल घेतली. प्रत्येक वेळेस नंबर वेगवेगळा येत होता. प्रत्येक विझिटची फी ५०० रुपये. १५०० घालवल्यावर अक्कल आली. त्याच्याच बाजूच्या मेडीकलवरून ओटीसी आय-ड्रॉप घेतलं, दुसर्या दिवशी सकाळी डोळे ठीक एकदम. मग स्वच्छ दिसू लागले. तीन दिवस आम्ही दोघे आणि एक २०-२२ वर्षिय मुलगी जिला रांजणवडी झालेली अशा तिघांवर साहेबांचे मनसोक्त प्रयोग सुरु होते. फक्त १५ दिवसांआधी मी डोळे तपासून घेतले होते कंपनी आय-चेक-अप कँपमधे. कुठलाही नंबर नव्हता. आणि हा मला -१.५ ते ३.५ असे भन्नाट आकडे रोज देत होता. देवकृपेने रोज १२ ते १४ तास कॉम्पवर काम करूनही गेल्या दहा वर्षात चश्मा नाही लागला.
(आठ दिवसांनी ती रांजणवडी वाली तरुणी दिसली. तीची अवस्था भयंकर झाली होती. साध्या गरम शेकाने आणि थंड मातीच्या लेपाने दोन दिवसात बरी होणारी रांजणवडी डोळाभर झाली होती.)
सर्व खर्चः १५५० रुपये.
प्रश्नः जीवंत माणसांना, आपल्याकडे आलेल्या रुग्णांना गिनीपिग म्हणून वापरतांना अशा डॉक्टरांना लाज लज्जा शरम काहीच वाटत नसेल काय? तेही धादांत खोटे बोलून?
उत्तरः?????
हे फक्त माझे अनुभव आहेत. प्रातिनिधिक आहेत. यांचे डिसेक्शन करायची काहीच गरज नाही. समाजात फिरलात तर हजारोंनी सापडतील. सुर्य उगवतोच. कोंबडं झाकून उपयोग नाही. हे सगळे रुग्णांचे गैरसमज आहेत असे म्हणाल तर यापेक्षा निर्लज्ज प्रतिसाद नसेल.
इतर अनेक धाग्यांवर अनेकांनी आपापली मते मांडली आहेत. तीच परत परत इथे मांडून माझ्याच दिमागचं दही करून घेत नाही. बर्याच धाग्यांवर मी डॉक्टरांच्या समर्थनार्थ लिहिलंय कारण चांगले डॉक्स बघितले आहेत. सगळे बेड रिकामे पडले असून, गरज नसल्याने मुलाला अॅडमिट न करता धीर देऊन घरी परत पाठवणारा डॉक बघितलाय, एका झटक्यात तापातून उठवणारा डॉक बघितलाय, महिना दहा-वीस हजार रुपयेच मिळवणारा डॉ़क बघितलाय. कुठलाही मानसन्मान न घेता गरिबांसाठी फुकट औषधपाणी देणारा डॉक बघितलाय. पण 'डॉक्टर लोक फसवतात' हे आता 'सरकारी कर्मचारी भ्रष्ट असतो' इतके सामान्य झालेलं आहे. ज्याच्या खांद्यावर विश्वासाने डोके ठेवावे त्यानेच गळा कापावा अशी वेळ आली आहे. यात काही डॉ़क्स चांगले काही वाईट अशी सफाई नकोय. जर सगळे एकच शिक्षण घेतात, एकच प्रतिज्ञा घेतात तर हे चांगले-वाईट कुठून येतात? चांगला की वाईट, मला नेमका कुठला डॉक्टर वाट्याला येईल हे कसे सांगता येईल? माझं निदान, उपचार खात्रीपुर्वक योग्यच झाले आहेत याची कोण हमी देईल? नाही देता येत तर मग पैसे कसे खणखणीत वाजवून घेतले जातात? तुमचा रुग्ण मेला/ रोग बरा नाही झाला म्हणून आम्ही पैसे घेणार नाही असे कुणी डॉक्टर म्हणेल काय?
सगळे मुसलमान अतिरेकी नसतात पण सगळे अतिरेकी मुसलमान असतात याच धर्तीवर वैद्यकक्षेत्रातले सगळे डॉक्स वाईट नसतात पण सगळे वाईट डॉक्स वैद्यकक्षेत्रातच असतात हे भयानक सत्य आहे. मला कुणा ईंशुरन्स वाल्याने कापले, माझे कुणी पाकिट मारले, कुणी घरात चोरी केली, अगदी पद्धतशीर उल्लू बनवून लुबाडले तर मला जेवढे दु:ख होणार नाही त्यापेक्षा हजारो पटीने असले डॉक्स नशिबात आले की होतं. पैसे जातात त्याचं दु:ख नाही. चुकीच्या निदान/उपचारांनी जीव जातो, माणूस आयुष्यभर कुणा दुसर्याच्या हलगर्जीपणा, अर्धवट ज्ञान, पैशाची लालुच याचे फळ भोगत राहतो. याचं दु:ख मोठं आहे.
डॉक्टर लोकांच्या अनीती व्यवहारांवर कुणी काहीही बोलले की अंगावर धावून जाणार्या, मुजोरीची भाषा करणार्या, असल्या डॉक्टरांचे सगळे व्यवहार चुकीचे असले तरी योग्यच आहेत असे भासवणार्या तथाकथित उच्चशिक्षित उच्चभ्रू डॉक्टरांना माझा साधा प्रश्न. रुग्णांचे रक्त पिणारे हरामखोर डॉक्टर खरंच अस्तित्वात नाहीत असा तुमचा दावा आहे काय? ते आहेत असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही व्यवसायाला कलंक ठरणार्या व्यवसायबंधूंच्या विरूद्ध प्रत्यक्ष मैदानात षड्डू ठोकण्याऐवजी नागवल्या गेलेल्या रुग्णांच्या/नातेवाईकांच्या विरूद्ध मिपावर युद्ध पुकारून तुम्हाला काय मिळतं? १ ट्क्का असो वा ९९ टक्के, अशा हरामखोर डॉक्टरांना हाकलून लावणं चांगल्या डॉक्टरांचं कर्तव्य नाही काय?
आपापल्या व्यवसायात नाव कमवण्यासाठी फक्त डॉक्टरच नाही, यच्चयावत सगळ्यांनाच ढोरमेहनत करावी लागते. डॉक्टर जी मेहनत करतात ती रुग्णांचे प्राण वाचावे त्यांचे रोग बरे व्हावे म्हणून. त्यांच्या मेहनतीचं, खर्चाचं, घालवलेल्या वर्षांचं, त्यांच्यावर होणार्या अन्यायाचं, हल्ल्यांचं भांडवल करून कुणाही नडलेल्या, अज्ञानी रुग्णाला लुबाडण्याचा परवाना मिळतो काय? तुमच्या ज्ञानाला कुणी आव्हान देऊ शकत नाही म्हणून वाट्टेल तसे वागण्याचा परवाना मिळतो काय? मग कुणी काळजीने अथवा कशानेही तुम्हाला क्रॉस करण्याचा प्रयत्न केला तर इगो दुखावतो का?
पैसे कितीही घ्या, पैशाचा आणि उपचाराच्या खात्रीचा काय संबंध? उपचार, निदान यांची खात्री वादातीत असावी. तरच ते शास्त्र म्हणवून घेण्याच्या लायकीचं ठरतं. अन्यथा 'आम्ही तुमच्या वर फक्त प्रयोग करतो' असं मान्य करून मोकळं व्हावे सगळ्या डॉक्टर्सनी. मग आमचे तेच शास्त्रीय, बाकीच्या भाकडकथा असं तुणंतुणं वाजवत फिरू नये.
वैद्यकक्षेत्रात शं भ र टक्के पारदर्शकता पाहिजेच पाहिजे. देअर इज नो अदर वे अराउंड.
(मी आजारी पडल्यावर अॅलोपॅथी डॉक्टरांकडे जाऊ नये असे सुचवणार्यांना एक निरोप. कृपया वैद्यकक्षेत्रातले सगळे वाईट डॉक्टर हटवण्याची हिंमत आधी दाखवावी नंतर लोकांना सल्ले देत फिरावे.)
प्रतिक्रिया
भयानक...
इथे येऊन लिहीण्यापलीकडे आपण
करू शकतो.
नक्कीच...
Expose them
अशी कृत्ये करणाऱ्या ड़ॉक्टराना उघडे पाडा.
वैदयक क्षेत्रातल्या नीतिमत्तेच्या नियमांबद्धल जागृती
शेवटी डॉक्टरांपरत्वे उपचार
वाईट.
मला हे सगळं डेजा-वू सारखं का
आप बिल्कुल सही है सर.. ये
खूप वाईट
माझ्या आईच्या कॅन्सरच्या
ऑपरेशन करणारे सर्जन आणि
अच्छा अच्छा. आय माय स्वारी.
@ संदीप डांगे - माझे तुमच्या
काहीही ?
बाकीच्या २ प्रश्नांची उत्तरे
बाकी प्रश्न
१. तुम्हाला २ वाईट अनुभव आले.
तुम्हाला २ वाईट अनुभव आले.
डांगे त्यांच्यासाठी आणि
बिल्डर, नगरसेवक आणि
@प्रसाद१९७१
मग डॉक्टर कडे जाणे बंद करा.
+१
+२
असले चंपक प्रतिसाद वाचल्यानंतर तुम्ही डॉक्टर नसाल अशी आशा करतो.अगदी...सही बोले मुनिवर... :)
डॉक्टर फीमुळे बुडतो २० हजार कोटींचा कर - वर्तमानपत्रातील लेख
हे आत्तापर्यंत लक्षातच आलं
हाफशेंच्युरी निमीत्त तमाम
उडीद दाळ*
उडदामाजी काळेगोरे,काय निवडावे
qikwell किंवा Practo
डांगेसाहेब
उत्तम प्रतिसाद.
+१
सही रे कर्णा
एक लक्षात येतंय का?
या धाग्यावर फक्त एकदोघांशिवाय
जिथे अापल्याला काही स्पष्ट मत अाहे
आपणास मुद्दा कळलेला नाही...
_/\_
भयानक आहे हे सगळ. अशा
शेवटी यात कॉम्प्युटर्स
इडिओक्रसी- आपला ऑलटाईम फेवरेट
Doesn't matter how much
ते पूर्वीचे डॉक्टर करायचे..
+१०००००
मशिन रिपोर्ट वर अवलंबुन
Pagination