(सुचत नाही....)
लेखनविषय:
काव्यरस
तुझा माझा चंद्र आज थांबला आकाशी
कसा जाऊ स्वागताला , भिजलेली उशी...
तुझ्या माझ्या पावसाने अबोला धरला
कसे सांगू जीवनाचा मेघ हरवला...
तुझी माझी जाई पाणी असून सुकली
कुणी नाही पुसायला मायेने खुशाली...
तुझ्या माझ्या वाटेवर माजलेले रान
उजाड त्या माळरानी जाय आता कोण ...
सखी गेली अर्ध्यावरी सोडूनिया साथ
नाव "साफल्य" घराला, वाटतसे व्यर्थ .
वाचने
2093
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
अशीच अवस्था .. शब्द मस्त..
अरे,द्या ना! वाचायला
फार छान .
मस्त छान
धन्यवाद!
छान कविता.
ह्म्म!!