ऋष्या... हे दोन्ही धनगर परत भेटले कधी तुला तर माझा दंडवत सांग रे बाबा!!! बरेच वेळा असे अनपेक्षितपणे खूप वेगळे लोक भेटतात, आणि आपल्यालाच समृद्ध करून जातात. गड किल्ल्यांचं सार्वजनिक पब्स मधे रुपांतर करणारे किंवा त्यांचं राजकारण करणार्यांपेक्षा असे साधे सरळ लोक बरे. माझ्या माहितीतला एक धनगर, त्याच्या घरचे आणि मित्रमंडळी सुद्धा अशीच जनावरांशी किंवा शेतातल्या रोपांशी गप्पा करताना बघितली आहेत.
अवांतरः गार वारा भरारा.... तुझ्या मित्राच्या निरीक्षणाशी १००% सहमत. आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय हा तर ठरलेला डायलॉग... ;)
बिपिन कार्यकर्ते
डोंगरावरची शाळा,म्युझिकल मठ आणि भजनं,घरचे जिने चढावे अशा सहजतेने डोंगर चढणारा दुसरा धनगर हिरो.. सगळंच खूप आवडलं..सुंदर लिहिले आहेस ऋषिकेश..
त्या वाचायला आवडणार्या हिरोला डोंगरयात्रा भेट दिलस की नाही?:)
स्वाती
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
पण मी पुस्तक देऊ केले नाहि.. कारण ते माझे गाईड आहे.. मला साधारण दर महिन्याआड ते लागते.. आणि त्याला त्या पुस्तकाचा तसा फायदा काहिच नव्हता.. वगैरे वगैरे...
अर्थात हे नंतरचे विचार झाले.. जिंक्स असा की मी पुस्तक देऊ केले नाहि :(
-(कुचका) ऋषिकेश
वाचनाची आवड असणारा, कधी वर-कधी खाली असा गडाच्या अंगाखांद्यावर खेळणारा, शेळ्यांशी मनसोक्त गप्पा मारणारा, या राकट वातावरणात राहूनही अजूनही लाजू शकणारा हा असा दुसरा धनगरही आमची सहल संस्मरणीय करून गेला यात शंका नाही.
वा ऋष्या,
अतिशय सुरेख लिहिलं आहेस... जियो..!
तात्या.
दोन्ही भाग उत्कृष्ट.
शाळकरी पोर, म्युझिकल मठ, चिंच, सरपटणे, विहीर, इथला धनगर सगळे मनात छान रंगले.
कुकुडकुंभा (भारद्वाज) किंवा कोकीळ यांची साद आपोआप जोडीला आली.
फोटोंबद्दलचं तुमचं मत बरोबर आहे. वाचनातून डोळ्यासमोर उभे राहणारे दृष्य मेंदूत ठसते.
प्रतिक्रिया
दंडवत...
व्वा..
असंच
देऊ केले नाहि.. :(
वा!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
अप्रतिम
हं....
अं??
पहिल्या
ऋषिकेश,
वाचनाची
मस्तं हायती तुमची धनगरे
मस्ताड लेख
मस्तच रे !!
वा!
मस्त
धन्यवाद!
लय ब्येस!
सुरेख