१. अर्थातच ही कविता पूर्णपणे काल्पनिक आहे.
२. कुणालाही आक्षेपार्ह वाटल्यास उडवून लावली तरी चालेल.
अल्फा असो वा याहू! बेटा
'गामा' पैलवान फाटे फोडी
पिंक टाकून चौपाटीवर
ठेल्यावर तंबाखू चोळी
अनिवासी त्या बोधकथेतील
चिखल पसरे जिकडेतिकडे
कुणा दिसती अनेक माद्या
कुणा दिसती गोरी माकडे
सदाचाच हा खेळ चालला
जुने गडी पण नवेच भांडण
वैशाखाचा वणवा 'चैत्री'
कळपांचे माद्यांना आंदण
वाचा चावा फरक कळेना
'किट'ले अमुचे कान
एबीजीएस कुणी बोलतो
बलसागर देश महान
'शिरा' ताणुनि पान ओरडे
पुरे जाहला चुना
चंचीबांधव आपण सगळे
का मग हा 'सामना'
नवे वदति नवल देखुनि
हे अमुच्याहूनही सान
ल्हानांहुनि पण ल्हान जाहले
विसरूनी सारे भान
पुन्हा 'मिसळ'तील सारे
जरी आज उठे आकांत
शिमग्यामागून येते उफराटी
गोडबोली संक्रांत
Taxonomy upgrade extras
वाचने
5060
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त !!!!!!!
नंदनसायबा,
मस्तच रे नंदन
सिक्सर...
सीक्सर नाय....
In reply to सिक्सर... by बिपिन कार्यकर्ते
वातावरण सैल केल्या बद्दल आनंद
नंदन
चंदन
In reply to नंदन by यशोधरा
एक शंका
(नाही,
In reply to एक शंका by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मस्त कविता...
वा!
ह्याच
संक्रांत
In reply to ह्याच by सखाराम_गटणे™
नंदन,
नंदन,
वा