Skip to main content

कोल्हापूर कट्टा . .

लेखक अद्द्या यांनी बुधवार, 22/04/2015 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी . . येत्या मे महिन्यातल्या १० तारखेला कोल्हापुरात कट्टा करणेचे योजिले आहे . . सध्या मी , अन्या दातार, स्नेहांकिता, कंफ्युज्ड अकौंटंट हि एवढी मंडळी तयार आहोत . . ३०० किमी च्या परिघातल्या सर्वाना हे जाहीर निमंत्रण . ४-५ तासाच्या प्रवासात कट्टा होऊन जैल आरामात त्या बाहेरचे लोक येणार असतील तर अति उत्तम . . कोण कोण येतंय . आणि येत असल्यास कसं . कोल्हापुरात कुठे, कधी भेटायचं . इत्यादी समदं हिक्डीच बोलू . . कट्टा १० तारखेला साधारण ११ वाजता सुरु होईल . सध्या ताराबाई पार्कात भेटण्याचं ठरलं आहे . ज्यांचं यायचं नक्की आहे त्यांनी तसं कळवावं . म्हणजे त्यानुसार इतर गोष्टींची तयारी करता येईल . काही प्रश्न असल्यास खालील पैकी कोणालाहि इथेच किंवा व्यनि करून किंवा फोनावून विचारू शकता . आदित्य (म्हणजे मी ) = ९७४३१८६६५९ अन्या दातार = ९८९०८९७४०७

पूर्ण पत्ता : सर विश्वेश्वरय्या हॉल, आर.एम.मोहिते हाउससमोर, किरण बंगल्याजवळ, ताराबाई पार्क कोल्हापूर. सदर हॉलमध्ये खालच्या मजल्यावर अन्य कार्यक्रम असून आपली व्यवस्था टेरेसमध्ये आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि येताना फोनवावे. तसेच जेवण आधी ऑर्डर करायचे असल्याने येणार्‍यांनी कृपया व्हेज/नॉनव्हेज कन्फर्म करावे, ही विनंती.

चालू हो जाव

वाचने 56915
प्रतिक्रिया 305

प्रतिक्रिया

अरे कट्टा हुकणार माझा. त्या दरम्यानच सांगलीला यायचा बेत होता पण तो सध्या रद्द झाला आहे :( आणि मी कोल्हापूरपासून ३०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर राहतो :( मार्च २०११ मध्ये कोल्हापुरातच मी, अन्या दातार आणि विनायक पाचलग यांचा एक छोटेखानी कट्टा झाला होता त्याची आठवण झाली. कट्ट्याला शुभेच्छा. दणदणीत मजा करा.वृत्तांत लिहायला आणि फोटो टाकायला विसरू नका :)

In reply to by टवाळ कार्टा

किती जण येतात बघू. वल्ली, बुवा, यशो एवढे सध्या आहेत. तुला काय स्पेशल गिफ्ट आणायची का? =))

In reply to by पैसा

नै...कोणी जाणारे असेल तर मी पिग्गीबॅक करून येईन...तुम्हीच सांगा तुम्हाला काय हवे...ठाणेकर शब्द पाळतात ;)

आपल्या भागात कट्टा होत आहे आणि कट्ट्याला यायची जबरी इच्छा आहे पण ७-८-९-१० ला असलेल्या लग्नांमुळे जमेल असे वाटत नाही ~असिफ

कट्टेकर्यांना शुभेच्छा. खा-प्या-मजा करा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तुम्ही आणि नाना कट्ट्याला मेहूण म्हणून या !

In reply to by कपिलमुनी

ओटी भरायचा कार्यक्रम करायचा का शालजोडी ते पण ठरवा. उगीच ऐन वेळी धावाधाव नको॥

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

माईंची ओटी भरा. त्यांच्या 'ह्यां' ना शाल द्या. माईंचे बाकीचे 'अवतार' (नाना, ग्रे.थिं., हितेश इत्यादी) अवतीर्ण झाले तर शालजोडीतले द्या. हा.का.ना.का.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तुम्ही येणार का हो माईसाहेब? कोट-पगडी घालून आलात तरी चालेल. एकदा माई आणि नानासाहेब यांना सदेह पाहिले की मी डोळे मिटायला मोकळी!

In reply to by पैसा

******* पाहिले की मी डोळे मिटायला मोकळी! असे लिहायची मिपावर लेटेश्ट फ्याशन आहे कै? नुकतीच एका साफसफाई झालेल्या धाग्यावर पण अश्शीच प्रतिक्रीया वाचलेली ;)

In reply to by टवाळ कार्टा

माएसाहेब आणि नानासाहेब यांना सदेह पाहणे म्हणजे साक्षात स्वर्गप्राप्तीच की!

In reply to by पैसा

अगदी अगदी=)) मी कोट पगडी घालून आलेल्या माईची पण खणानारळाने ओटी भरायला तयार आहे! माईची पंखी क्र१

In reply to by टवाळ कार्टा

माईन माईन मुंडर पे तेरे बोल रहा है णाणा!! ;) रेफ्रन्स: आम्ही तुमचे कोण?

In reply to by बॅटमॅन

हाये नाना ये क्या हुआ..क्यु ऐसे हमे सताने लगे माई इतनी प्यारी हो सामने नाना काबु मै कैसे रहे.. तुझ्यावर परत "ह" आला.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हम आपके है कौन.....नाना माईके है कौन.... बेचैन है, उस्की खवं...डुआयडी-मुळे हे असं.... स आलं.

In reply to by बॅटमॅन

सपने मे मिलती है..हो माई तेरी सपने मे मिलती है.. सारा दिन घुंगटे मे बंद कुडियासी ओए ओए ओए ओए सारा दिन घुंगटे मे बंद कुडियासी नानाजी को मिलती है!!! =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आता ह वरुन मला गाण सुचत नैय्ये! स वरुन चांगलं सुचलं होतं तर! :| :P

In reply to by यशोधरा

सोदा मंजे सापडेल. २०० कट्टा आयोजकांचे प्लॅस्टिकच्या डिस्पोजेबल डिश, ग्लास आणि चमचे देउन सत्कार करण्यात येत आहे. (कचरा कचरापेटीतचं टाकावा नैतर पर्स किंवा बॅगेत टाकुन घरी पाठवण्यात येईल.) -चिमण हटेला आणि नाखुभाई गँग्स ऑफ पिंचिंपुर-

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मेल्यांनो, अंताक्षरीचा वेगळा धागा काढा बघू..कट्ट्याच्या धाग्याचं त्या माई-नानाच्या नादात काश्मीर नका करु!!

In reply to by सूड

ए काश्मिर कसलं रे? आत्ताशिक लग्नाची गाणी चालु झालीयेत. काश्मिर, चिंचेचं झाड, चिनार वृक्ष, ९-तरुणी परंत पोचायला अवकाश आहे. आधी पुजा करायची असते म्हणलं.

In reply to by यशोधरा

हाल कैसा है नाना का ? क्या खयाल है माई का हितेश मचल गये ओ ओ ओ थि़ंकर फ़िसल गये, आ आ आ

In reply to by सिद्धार्थ ४

पोरांनो आवरा अता. आपण वेगळा धागा काढु उखाळ्या-पाखाळया काढायला.

एक चांगला चानस हुकणार राव. लई लांब असल्याने जमणार न्हाय . पण जूनच्या शेवटच्या आठवड्यात माहेरी सांगलीला येणार आहे.

अजुन स्पेसिफिक - १० तारखेला कधी ? मला १० मे ला संध्याकाळी ६ च्या आधी एका शिबिरासाठी सातार्‍यात पोहोचायचं आहे. त्यामुळे दुपारी भेटणार असू तर येऊ शकेन.

In reply to by मितान

पोचू शकशील. १० तारखेला सकाळी ११ ला कट्टा. ठिकाण ताराबाई पार्क. जेवण वगैरे आवरून ३ ला तू निघालीस तरी पाचला साताऱ्यात पोचशील.

In reply to by अनन्न्या

नक्की असेल तर सांग. म्हणजे मी इकडून थेट जाण्यापेक्षा व्हाया रत्नागिरी येईन.

कट्टा १० तारखेला साधारण ११ वाजता सुरु होईल . . सध्या ताराबाई पार्कात भेटण्याचं ठरलं आहे . नक्की पत्ता स्नेहांकिता ताई लवकरच देतील . . ज्यांचं यायचं नक्की आहे त्यांनी तसं कळवावं . . म्हणजे त्यानुसार इतर गोष्टींची तयारी करता येईल . काही प्रश्न असल्यास खालील पैकी कोणालाहि इथेच किंवा व्यनि करून किंवा फोनावून विचारू शकता . आदित्य (म्हणजे मी ) = ९७४३१८६६५९ अन्या दातार = ९८९०८९७४०७ संपादकांना विनंती :- हि पोस्ट धाग्यातच अडकवता आली तर पहा

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काॅलेजला सुट्टी लागली असेल तर वैनींना घेऊन शनि-रवि दौरा काढा की. अंबाबाईचं दर्शनपण होईल +)

In reply to by यशोधरा

मी आणि प्रीतमोहर हल्लीच जाऊन आलो. सुटीच्या दिवशी थोडे गर्दी असते म्हणे, पण एकूण व्यवस्थापन खूपच चांगले आहे. रांग फार मोठी असेल अन वेळ नसेल तर सभामंडपातून मुखदर्शन घेऊन पटकन बाहेर पडता येते.

In reply to by पैसा

पण एकूण व्यवस्थापन खूपच चांगले आहे.
कोल्हापूरला दर्शनासाठी आटा-पिटा करावा लगत नाही तुळजापूर सारखा शिवाय मंडपातून दर्शन्-सोय आहेच. दोन्ही दर्शन अनुभवी. नाखु

In reply to by सस्नेह

सुट्ट्या लागल्या आहेत. गेल्या वर्षी येऊन गेलोय कलापुरात. आणि हिचं म्हणाल तर कलापुरातून पुढे वाट स्वर्गात जरी जाणारी असली तरी 'असल्या उन्हात' आम्ही घर सोडणार नाही. -दिलीप बिरुटे

कोल्लापुरात कट्टा एकच नंबर… सांगली मध्ये असतो तर नक्कीच आलो असतो . पण जे कोणी येतील त्यांनी सांगलीचा भडंग मात्र जरूर खावा /खरेदी करावा :-) . जयसिंगपूर चा अंबा भडंग पण भारी असतो

In reply to by सांगलीचा भडंग (verified= न पडताळणी केलेला)

जयसिंगपूर चा अंबा भडंग ---> आपुनका फेवरेट!!

In reply to by अन्या दातार

आधी नक्की नौ का धा ते सांग की! होताहोईतो धा वगैरे असं नको. नाहीतर आम्ही येऊ धा ला आणि तुम्ही ९ ला कट्टा संपवलेला असायचा. म्हंजे गेली सुट्टी फुकट!

अन्या , मी , स्नेहांकिता , अकौंटंट वेताळ , मीतान हि मेम्ब्र नक्की झालीत . अनन्या , टवाळ कार्टा , यस वाय जी , यशोधरा , वल्ली हि मेम्ब्र नक्की नाहीत . . लोकहो . कळवो पटापट पुणे मुंबई , गोवा किंवा अगदी हुबळी धारवाड सांगली मिरज कोणी असतील तर प्रयत्न करा येण्याचा . एका दिवसात होण्यासारखा प्रवास आहे . .

In reply to by पैसा

अर्र . . गडबडीत काही पोस्ट सुटल्यात . . भरपाई म्हणून पेशल कुंदा चालेल का? :P

यायचा प्रयत्न करेन. मात्र कोल्हापुरातला मिसळपाव हा मिसळ आणि 'पाव' या दोहोंचाही अपमान आहे असे नोंदवून ठेवतो. ;)