Skip to main content

कोल्हापूर कट्टा . .

लेखक अद्द्या यांनी बुधवार, 22/04/2015 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी . . येत्या मे महिन्यातल्या १० तारखेला कोल्हापुरात कट्टा करणेचे योजिले आहे . . सध्या मी , अन्या दातार, स्नेहांकिता, कंफ्युज्ड अकौंटंट हि एवढी मंडळी तयार आहोत . . ३०० किमी च्या परिघातल्या सर्वाना हे जाहीर निमंत्रण . ४-५ तासाच्या प्रवासात कट्टा होऊन जैल आरामात त्या बाहेरचे लोक येणार असतील तर अति उत्तम . . कोण कोण येतंय . आणि येत असल्यास कसं . कोल्हापुरात कुठे, कधी भेटायचं . इत्यादी समदं हिक्डीच बोलू . . कट्टा १० तारखेला साधारण ११ वाजता सुरु होईल . सध्या ताराबाई पार्कात भेटण्याचं ठरलं आहे . ज्यांचं यायचं नक्की आहे त्यांनी तसं कळवावं . म्हणजे त्यानुसार इतर गोष्टींची तयारी करता येईल . काही प्रश्न असल्यास खालील पैकी कोणालाहि इथेच किंवा व्यनि करून किंवा फोनावून विचारू शकता . आदित्य (म्हणजे मी ) = ९७४३१८६६५९ अन्या दातार = ९८९०८९७४०७

पूर्ण पत्ता : सर विश्वेश्वरय्या हॉल, आर.एम.मोहिते हाउससमोर, किरण बंगल्याजवळ, ताराबाई पार्क कोल्हापूर. सदर हॉलमध्ये खालच्या मजल्यावर अन्य कार्यक्रम असून आपली व्यवस्था टेरेसमध्ये आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि येताना फोनवावे. तसेच जेवण आधी ऑर्डर करायचे असल्याने येणार्‍यांनी कृपया व्हेज/नॉनव्हेज कन्फर्म करावे, ही विनंती.

चालू हो जाव

वाचने 56916
प्रतिक्रिया 305

प्रतिक्रिया

सध्या फिंगर्स क्रॉस्ड! काम आटपत आल्यास हजर रहाण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. कोल्हापुरातले मस्त जेवण हादडायचे आहे!

In reply to by सस्नेह

मिलनाईच मंगताय! पुण्याला ३ फेर्‍या मारल्या तरी चहा मिळेना म्हणून रडारड केल्यावर एकदा चहा, एकदा कॉफी (शीशीडीतली का असेना!) आणि एक मस्तानी मिळाली होती! आता तुम्ही कोल्लापूरकर म्हटल्यावर असेच जाऊ देणार काय! खाण्याच्या ढिगात बुडवाल! ;)

In reply to by पैसा

किती (दिवस) ती रडारड! जिथेतिथे ह्यांना पुणेच आठवतं. उद्या हामेरिकन सर्कारचा व्हिसा मिळाला तर त्या गोर्‍यांनाही म्हणाल, थँक्यू हं! नाहीतर त्या पुण्यात, आय टेल यू, एक चहापण देत नाहीत हो लोक्स! स्स्स्सो चिंगूस, यू नो?

In reply to by एस

तरी पुण्याच्या जवळच पिंचिं आणि धायरी आहेत म्हणून बरं. तिथले लोक विरघळतात रडारड ऐकून. नैतर पुण्यात पाण्याचा घोट मिळताना मुश्किल हो!

In reply to by अत्रुप्त आत्मा

पाणी मागीतल्या मुळे हा गैरसमज झाला असावा. असे आम्चे दै "नस्ती ऊठाठेव" चे वार्ताहर श्री.जवळपास धायरीकर कळवितो.

In reply to by पैसा

आर उ शुअर की तुम्ही पुण्यातच आला होतात??? नाही म्हणजे चहा, कॉफी आणि मस्तानी मिळाली म्हणुन विचारतोय. कदाचित तुम्ही नदीपल्याडच्या भागात गेला असाल. अस्सल पुणेरी त्या भागाला पुणे समजत नाही. (अस्सल पुणेरी गोव्याकड्च्या माणसांना माणूस समजतो की नाही ते यशोधरेला विचारायला लागेल)

In reply to by मृत्युन्जय

अगदी जंगली महाराज रस्त्यावर आणि सपे. त सुद्धा आले होते! मात्र चहा कापी आणि मस्तानी देणारे पिंचिं, धायरी रहिवासी आणि अनिवाशी कोकणी होते हो! =)) यशो पण अनिवाशी कोकणी. अजून पुरती धर्मांतरित झालेली नाय!

In reply to by पैसा

टेक्निकलि स्पीकिंग, जंगली महाराज रस्ता पुण्यात येत नाही- नदीपल्याडच्या भांबुर्ड्यात येतो.

In reply to by टवाळ कार्टा

उगी हं बाळा!! तू येणार असशील तर सांग बरं का, तुझ्यासाठी श्रीखंडाच्या गोळ्या आणतो.

In reply to by सूड

जवळ-लांब काय लावलैस? थर्मास विकत घेईन. तू ये.. तुला फुकट देईन.

In reply to by यसवायजी

तू ये.. तुला फुकट देईन.
नको, आहे माझ्याकडे. तुला हवाय का? पण फुकट बिकट मिळणार नै!! ;)

In reply to by पैसा

यशो पण अनिवाशी कोकणी. >> मी अविनाशी वाचलं! =))

In reply to by मृत्युन्जय

अस्सल पुणेरी गोव्याकड्च्या माणसांना माणूस समजतो >> गोवा आणि पुणे दोन्ही मला तितकीच प्रिय आहेत. शिवाय त्यात कोल्लापूर, ब्येळगांव (असंच म्हणतात खरंतर), उर्वरीत कोकणपट्टी हेही धरा :) हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर, लेह, लडाख विसरु नये.पंजाब, त्यातल्यात्यातही चंदीगड राहतच होतं.. :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

पण ते टेक्निकली पुण्याच्या बाहेर हो! आणि देणारी माणसं पण आमचीच! पुण्यात रहातात पण अजून वाण नाही लागला.

In reply to by स्पंदना

खाल्लेही होतेच की! आम्ही देशावरचे बरं का! नुसतं दाखवून बोळवण नाही केली हो! ;)

आता निदान कट्ट्याचा वृत्तांत, फोटू तरी चढवू नका. नाहीतर जळजळीपासून जळफळाटापर्यंत असा लेख लिहीन.

In reply to by रेवती

मागे तुम्हीच म्हणाला होतात . . "लिहित जा" वृत्तांत तर येणारच :D

In reply to by अद्द्या

मग लिहा........आणि द्या आम्हाला त्रास! जौदे! निदान मेणू तरी कळेल.

In reply to by रेवती

सोप्पा उपाय हाय ना काक्कू . . एक क्वोल्लापूर तिकिटात सगळा त्रास वाचेल नं

In reply to by अद्द्या

शनि रवि कदाचित हापिसला जावे लागण्याची शक्यता आहे.

भारतात असतो तर आवर्जुन आलो असतो. आजवर दक्षिण महाराष्ट्रात एकदाही जायचा योग आला नाही :-( . भविष्यात कधीतरी प्रिती-संगमाजवळ मिपाकट्टा व्हावा.

In reply to by सस्नेह

नाही नाही स्नेहांकिता ताई… संपूर्ण बालपण ज्या कृष्णा-कोयनेच्या प्रीतीसंगमात पोहण्यात गेले तो कोणाचा असे विचारण्याचा नाठाळपणा कसा करेन मी … फक्त खात्री करत होतो कि जगात दुसरा एखादा प्रीतीसंगम तर तयार नाही न झाला...

अन्या दातार ला लुटायला णक्की येणार. ;) जेवायचा बेत काय आहे ते सांगा मग सांगतो जमेल का नै ते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नैतर हापिसाचं काम म्हणून पिंचिं मधे असायचा नेमका!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

"शुभकार्यासाठी" सक्रीय सहभाग घेण्याची तयारी आहे. अखिल मिपा बुवा चारोळी+आऱोळी पंखा संघ

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दिवसा(एकटा) तावडीत सापडून त्याचे अपहरण करून अत्रुप्तबुवांचे ताब्यात देणे किंवा देईन असे सांगून त्याचेकडून "पार्टी" खंडणी उकळणे या कामाला "शुभ" (आप्ल्याला) म्हणून "शुभकार्य"... हुश्श्$$$हुश्श इतक विस्कटून सांगायला लागतं तुला म्हणून मुवींच्या बुवांच्या दरबारात नेत नाहीत कुणी !!!

In reply to by पैसा

तुम्हाला बोलावलं की समस्तं पिंचिं करांना सांगायला विसरु नका :P

In reply to by नाखु

अन्या दिवसा(एकटा) तावडीत सापडून त्याचे अपहरण करून अत्रुप्तबुवांचे ताब्यात देणे किंवा देईन असे सांगून त्याचेकडून "पार्टी" खंडणी उकळणे या कामाला "शुभ" (आप्ल्याला) म्हणून "शुभकार्य"
अत्रुप्तबुवांच्या ताब्यात देण्याच्या नावाखाली खंडणी?? कोण देणार तुम्हाला त्यासाठी खंडणी?? छ्या, कैच्याकैतरीच तुमचं!

In reply to by अन्या दातार

अत्रुप्त बुवाचं देणार खंडणी. पहिजे तेवढे पैसे घ्या पण ह्याला घेउन जा म्हणुन... ;)

In reply to by अन्या दातार

जब कोई घबराता है तो ऐसा बोलता टेन्शन नही लेनेका सस्तेमे छुट्कारा मिलेंगा.. गुमान तोडपाणी कॅप्ट्न चिमन हटेला गँग कल्लापूर

कोल्लापूर लई आवडीचं! जायला जमेल का ह्याची चाचपणी सुरु करण्यात यील. ९ ला का धा ला ते नक्की सांगा की!

In reply to by यशोधरा

९९% दहालाच . कारण रविवार आहे . . इतर मंडळी काय ठरवतात ते बघायचं