सनावृता इन सुकांता !
खरेतर ही माहीती जाहीर केल्याबद्दल आम्हाला वाळीत टाकले जावु शकते तथापि त्याचि फिकिर न करता आम्ही कंडुशमनार्थ हा वृतान्त लिहावयास घेतलाच असलयाने हे सांगणे भाग आहे
संपादित
त्यात प्रामुख्याने पोपशास्त्री , दयाघना , अग्यावेताळ( अ कि ह ह्यावर तज्ञांचा अजुन वाद सुरु आहे , तुर्तास आपण अ म्हणु ), खाटुक , फ्रॉईड आणि बीयरानंद हे सक्रिय कार्यकर्ते आहेत , इतरहि कार्यकर्ते अधुन मधुन उपस्थिती नोंदवत असतात पण प्रामुख्याने हेच ते महाभाग .
संपादित
नुकतेच सुकांताला झालेल्या कट्ट्याचा ( प्लीज नोट : नॉनमुवी कट्टा ) वृत्तांत पाडत आहे .
तर बीयरचा अतीव तीरस्कार करणारे महाभाग बीयरानंद केवळ मित्रांना भेटण्या करिता पुण्यपत्तनास येत आहेत हे ऐकुन पोपशास्त्रांचा आनंद बीयरसारखा ओसंडुन वाहु लागला आणि मग सुकांताला जाऊन आमरस ताबलण्याचे ठरले .
पोपशास्त्री ह्यांना रस्ते लक्षात रहात नसल्या कारणाने त्यान्नी तडक अग्यावेताळाला गाठले आणि त्यांच्या सोबत पुण्ण्यपत्तन्नस्थ अक्षरधारा ह्या जगाच्या केन्द बिंदुकडे आगमन केले. रस्ते त्यांचा लक्षात राहिले नाहीतच पण मधे शेल चे पेट्रोल भरले तेथे " पेट्रोल म्हणजे फक्त शेलचेच बाकी सारे केरोसीनतुल्य " असा अजब तर्क त्यान्नी फारसा वाद न घालता स्विकारला !
खाटुकेश्वर , अक्षरधारा येथे पोहचलेच होते त्यांची इतिहासाची पोतडी घेवुन . त्यांच्या सोबत भोज्जाला हात लावुन आल्या सारखे अक्षरधारा प्रदर्शनात एक फेरफटका मारुन झाला . पोपशास्त्रांन्नी २-४ अध्यात्मिक पुस्तके उचलुन आपली पोप शास्त्राची इमेज खोडुन काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांची डाळ काही शिजली नाही.
मग चहापानाचा मुड आल्याने अग्यावेताळ , खाटुक आणि पोपशात्र्यांनी मनसोक्त लस्सी पिली . खाटुकाने त्याच्या पोतडीतुन अवाढव्य अशी एक ऐतिहासिक बखर काढुन दाखवली आनि मग हडप्पा, वैदिक , सातवाहन पासुन पेशव्यांपर्यंत चर्चा झाली ( नाही हो नाही हो घटकंचुकी सत्य की कवि कल्पना ह्यावर चर्चा झाली नाही ..... ह्या वेळेला. )
असो तर ही सारी चर्चा चालु असताना हॉटेलचा मालक आमच्याकडे आम्ही येरवड्यावरुन आलो आहोत काय अशा नजरेने बघायला लागला . त्यातच खाटुकाने सांगितले कि हे पुस्तक डॉ. मीनैबोलणारज्जा सिंगांच्या मुलीने लिहिले आहे तेव्हा तर त्या होटेल मालकाची खात्रीच पटली असावी... मग आम्ही पटकन बिल देवुन काढता पाय घेतला . ठाण्याचा पेशंट सॉरी सॉरी महानुभाव अजुन याचा होता !
तर ते असो . अक्षरधारा येथे अखेर फ्रॉईड आला आंणि मग आम्ही त्याचा सोबत तडक सुकांताला पोहचलो . तिथे हु म्हणनुन गर्दी ( अर्थात कोणी "हु" म्हणत नव्हते इतकेच ) . "गर्दी बरी होती" ... पण शेवटी पुनं ते पुनंच त्याला काही केल्या आमच्या मुंबैची सर येत नाहीच . असो . आलिया भोगासी असावे सादर !
कोपर्यातील काही खुर्चा पकडुन अध्यात्म , इतिहास , शिल्पकला आणि मानसशात्र अशा विषयांवर काथ्या कुटणे सुरु झाले !
पण काहीही म्हणा ह्या अशा बहु आयामी कंपुं मुळेच मिसळपावचे नामाभिधान सार्थ ठरते असे आमचे ठाम मत झाले आहे ...
तर बीयरानंद अर्थात ठाण्याचे महानुभव ही सुकांताला प्राप्त झाले आणि चर्चेने जोर धरला ... पण अजुन दयाघना आले नसल्याने मिसळपाववाल्याने फक्त मिसळ दिली आणि तर्री दिलीच नाहीत आपल्या मनात जशा भावना येतात तसे काहीसे होत होते . सुकांता कश्टंबर आत घ्यायला सुरुवात केली आणि तितक्यातच दयाघना ह्यांचे आगमन झाले आणि अग्यावेताळ ह्यांचा जीव भांड्यात पडला ... कोणत्या भांड्यात ... अं ... असो ...असोच्छ्च ... #निरर्थकअत्मरंजन
काहितरी चमत्कार जाहला आणि एवढ्या सगळ्या वेटिंग लिस्टमधल्या लोकांना बाजुला सारुन सुकांतावाल्याने आमचे नाव पुकारले ! तो धक्का पचवत आम्ही आमरस पचवण्यासाठी हाटेलात जाऊन स्थानापन्न झालो . तसे जेवताना बोलु नये हे आम्हाला शिकवले आहे म्हणुन आम्ही फक्त कामापुरते संवाद करत जेवण केले त्याचा वृतांत खालील प्रमाणे :
अग्यावेताळ : मी आता अजंठा वेरुअळला जाणार अमुक तमुक मित्रां सोबत
दयाघना : मे नाही येणार... दु दु दु
फ्रॉईड :परत ? च्यायला तुला दर वेळी कोण ना कोण बकरा घावतोच
पोपशास्त्री : ओ आमरस आणा
खाटुक : फारसी भाषेत ओ हे अक्षरच नसल्याने ट्रॉय भाषांतरीत करताना फार प्रॉब्लेम्स आले
बीयरानंद : उद्याचा प्लान करा रे काहीतरी
अग्यावेताळ : चला वेरुळला
दयाघना : मला वेळं नाही
फ्रॉईड : वेळं कि केळं
अग्यावेताळा : हाहाहा
दयाघना : (मराठी भाशेत सांगता येणार नाहीत असे काहीसे क्रोधदर्शक आवाज काढताना )रान्डु क्कर ह्ह ती दुत्त दुत्त ( आणि मीठ फेकुन मारताना )
( आता ह्यातले मीठ का फेकुन मारतात हे आम्हाला आजवर कळालेले नाहीये . )
पोपशास्त्री :ओ आमरस आणा
खाटुक : आमरसाचा पहिला उल्लेख अशोकाच्या सायप्रस येथील शिलालेखात सापडतो
बीयरानंद : सिंहगडाला जायचं का
अग्यावेताळ : पण सिंहगडावर लेण्या नाहीत , बेडसे ला जाऊ
दयाघना : मला नाही जमणार
फ्रॉईड : हो तुम्हाला घंटा वाजवायला जायचे असेल
दयाघना :( फ्रीस्मायली.कॉम च्या स्मायल्यांचे अविर्भाव चेहर्यावर आणुन ) दुत्त दुत्त
अग्यावेताळ : ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ
पोपशास्त्री :ओ आमरस आणा
खाटुक : आणा हे चलनी नाणे अकबराच्या काळात वापरात आले .
बीयरानंद : (वैतागुन) नुसता फालतु वेळ घालवु नका बे , कोठे तरी जाऊ.
अग्यावेताळ : ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ
दयाघना : आं .... दुत्त दुत्त
खाटुक : हडपसरला ग्लायडिंग करता येईल पण मी नाही येणार
पोपशास्त्री : ओ आमरस आ ( वाक्य अर्धे तोडत ...) समोरच्या भिंतीवरील पेंटींग सुंदर आहे !
दयाघना : काय ?
अग्यावेताळ : कसलं फालतु पेंटिंग आहे
फ्रॉईड : नाही नाही , खुप सुंदर आहे पेंटींग !
खाटुक : हो हो अत्यंत सुंदर आहे पेंटींग !
बीयरानंद : ठीक आहे , इतकेही खास नाहीये .
अग्यावेताळ : ओह्ह ओके ओके . छान आहे पेंटिंग
दयाघना : काय ? काय बोलताय तुम्ही ?
फ्रॉईड : तुम्हाला नाही समजणार तुम्ही गपा हो . वेटर ह्यांना शिकरण द्या हो आणुन !
अग्यावेताळ : लिबलिबित केळाचे ! हाहाहा !!
दयाघना : आं दुत्त दुत्त !
पोपशास्त्री : हां तर पेंटिंग खुपच सुंदर आहे पण ... ओ वेटर त्या पेंटिंग पाशी रेंगाळत बसु नका , इकडे आमरस आणा .
बीयरानंद : हायला ... आवरा रे ... कुठे तरी जाऊ रे , नुसता आला गेला मनोगती करु नका .
पोपशास्त्री :ओ आमरस आणा
फ्रॉईड : जाऊ रे जाऊ कोठे तरी . उद्या बघु . अत्ता आमरस ओढ तु !
( असो . तर संवाद बराचसा काल्पनिक आहे . ... पण माझा लेख / वृतांत आहे ...मी काहीही(ण) लिहीन ... डीलीट झाले तर बघु =)) )
तर असो असा सुख संवाद करत जेवळ आटोपल्यावर तुडुंब पोटे घेवुन महानुभाव बाहेर पडले आणि अति जेवल्याचे प्रायशिचित्त म्हणुन झेड पुलावर फेरफटका मारण्यास गेले !
झेड पुलावर अनेक जोडपी जवळ'पास' बसली होती ... इकडे मात्र सनातनी पुरोगामी मोरोपंत वामनपंडीत फ्रॉईड बीएफ स्किनर संघ अंनिस सातवाहन राष्ट्रकुट ठाणे पुणे कोराईगड वैदिक सत्यनारायण वगैरे चर्चा पडत होत्या . एका महानुभावाने भावना अनावर झाल्याने दुसर्या एका महानुभावाला ठोकुन काढण्याचा प्रयत्न केला पण तो अपुरणच राहिला . असो . उत्तरायण म्हणुन कोराई गडाला जाऊन क्यॅलरी बर्न करण्याचा प्रायशित्त रुपी निरणय काही महानुभावांनी घेतला ( तिथला बीयर वृत्तान्त बीयरानंद सविस्तर सांगतीलच ) , नेक्स्ट टाईम दुर्वांकुरला भेटायचे ठरले . झेड पुलाचे नामकरण "झ" पुल असे व्हाय्ला पाहिजे हा ठराव सर्वानुमते पास करण्यात आला आहे .
इतरही काही निवांत चर्चा झाल्या त्या आता आठवत नाहीत ... शेवटी सारेच अठवले पाहिजे असे कुठे आहे ... आयुश्यात गेल्या २८ वर्षात एकालाही एकदाही भेटलो नव्हतो अशा मित्रांचा ग्रुप झालाय , तो मनात येईल तेव्हा भेटतोय , टोकाचे मतभेद असुनही कोणताही राग मनात न ठेवता मनसोक्त गप्पा मारत एका मेकात मिसळतोय ... अजुन काय हवं यार ... अशा भिन्नभिन्न क्षेत्रातल्या कलंदर अभ्यासु माणसांच्या ग्रुप मधे उभेराहुन पान खाताना इतके काही शिकायला मिळत असते की सारे लक्षात रहाणे अशक्यच ! आणि असं जर लक्षात रहात असतं तर दुसरं "व्यक्ती आणि वल्ली" लिहिणारा दुसरा पुलं मी झालो नसतो का !!
अर्थात हे सारेच व्हॉट्सॅप वर चर्चेस आलेच संपादित... जेवढे सुचले स्मरले तेवढे लिहिले ... असो ...
आता पुढच्या भेटीला ............................ मटन च्च !!
अवांतर : ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊ
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ळोळ
देवाधिदेव किसन द्येव चिडलं,
ओ आमरस आणा...
=)) =)) =))
अले वा!
अंक्लिद्य सनावृता™ मधे
आणि त्यासोबतच अनेक
इन सब को पहले कहीं देख्या
हा हा हा हा हा हा !!!
जबराट लिवलस रे गिर्जा
काहीही झेपले नाही
गिरीजा काका!!
मस्ताड
श्यॅ राव :( हे काही योग्य
मजा नै आली वाचायला. वर्णन कसं
अंक्लिद्यतेच्या विरुद्ध उदा.
=))
अंक्लिद्यतेचे दोन शुंभनिशुंभ
आम्ही तर