✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सनावृता इन सुकांता !

प
प्रसाद गोडबोले यांनी
Wed, 04/22/2015 - 22:51  ·  लेख
लेख
खरेतर ही माहीती जाहीर केल्याबद्दल आम्हाला वाळीत टाकले जावु शकते तथापि त्याचि फिकिर न करता आम्ही कंडुशमनार्थ हा वृतान्त लिहावयास घेतलाच असलयाने हे सांगणे भाग आहे संपादित त्यात प्रामुख्याने पोपशास्त्री , दयाघना , अग्यावेताळ( अ कि ह ह्यावर तज्ञांचा अजुन वाद सुरु आहे , तुर्तास आपण अ म्हणु ), खाटुक , फ्रॉईड आणि बीयरानंद हे सक्रिय कार्यकर्ते आहेत , इतरहि कार्यकर्ते अधुन मधुन उपस्थिती नोंदवत असतात पण प्रामुख्याने हेच ते महाभाग . संपादित नुकतेच सुकांताला झालेल्या कट्ट्याचा ( प्लीज नोट : नॉनमुवी कट्टा ) वृत्तांत पाडत आहे . तर बीयरचा अतीव तीरस्कार करणारे महाभाग बीयरानंद केवळ मित्रांना भेटण्या करिता पुण्यपत्तनास येत आहेत हे ऐकुन पोपशास्त्रांचा आनंद बीयरसारखा ओसंडुन वाहु लागला आणि मग सुकांताला जाऊन आमरस ताबलण्याचे ठरले . पोपशास्त्री ह्यांना रस्ते लक्षात रहात नसल्या कारणाने त्यान्नी तडक अग्यावेताळाला गाठले आणि त्यांच्या सोबत पुण्ण्यपत्तन्नस्थ अक्षरधारा ह्या जगाच्या केन्द बिंदुकडे आगमन केले. रस्ते त्यांचा लक्षात राहिले नाहीतच पण मधे शेल चे पेट्रोल भरले तेथे " पेट्रोल म्हणजे फक्त शेलचेच बाकी सारे केरोसीनतुल्य " असा अजब तर्क त्यान्नी फारसा वाद न घालता स्विकारला ! खाटुकेश्वर , अक्षरधारा येथे पोहचलेच होते त्यांची इतिहासाची पोतडी घेवुन . त्यांच्या सोबत भोज्जाला हात लावुन आल्या सारखे अक्षरधारा प्रदर्शनात एक फेरफटका मारुन झाला . पोपशास्त्रांन्नी २-४ अध्यात्मिक पुस्तके उचलुन आपली पोप शास्त्राची इमेज खोडुन काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांची डाळ काही शिजली नाही. मग चहापानाचा मुड आल्याने अग्यावेताळ , खाटुक आणि पोपशात्र्यांनी मनसोक्त लस्सी पिली . खाटुकाने त्याच्या पोतडीतुन अवाढव्य अशी एक ऐतिहासिक बखर काढुन दाखवली आनि मग हडप्पा, वैदिक , सातवाहन पासुन पेशव्यांपर्यंत चर्चा झाली ( नाही हो नाही हो घटकंचुकी सत्य की कवि कल्पना ह्यावर चर्चा झाली नाही ..... ह्या वेळेला. ) असो तर ही सारी चर्चा चालु असताना हॉटेलचा मालक आमच्याकडे आम्ही येरवड्यावरुन आलो आहोत काय अशा नजरेने बघायला लागला . त्यातच खाटुकाने सांगितले कि हे पुस्तक डॉ. मीनैबोलणारज्जा सिंगांच्या मुलीने लिहिले आहे तेव्हा तर त्या होटेल मालकाची खात्रीच पटली असावी... मग आम्ही पटकन बिल देवुन काढता पाय घेतला . ठाण्याचा पेशंट सॉरी सॉरी महानुभाव अजुन याचा होता ! तर ते असो . अक्षरधारा येथे अखेर फ्रॉईड आला आंणि मग आम्ही त्याचा सोबत तडक सुकांताला पोहचलो . तिथे हु म्हणनुन गर्दी ( अर्थात कोणी "हु" म्हणत नव्हते इतकेच ) . "गर्दी बरी होती" ... पण शेवटी पुनं ते पुनंच त्याला काही केल्या आमच्या मुंबैची सर येत नाहीच . असो . आलिया भोगासी असावे सादर ! कोपर्‍यातील काही खुर्चा पकडुन अध्यात्म , इतिहास , शिल्पकला आणि मानसशात्र अशा विषयांवर काथ्या कुटणे सुरु झाले ! पण काहीही म्हणा ह्या अशा बहु आयामी कंपुं मुळेच मिसळपावचे नामाभिधान सार्थ ठरते असे आमचे ठाम मत झाले आहे ... तर बीयरानंद अर्थात ठाण्याचे महानुभव ही सुकांताला प्राप्त झाले आणि चर्चेने जोर धरला ... पण अजुन दयाघना आले नसल्याने मिसळपाववाल्याने फक्त मिसळ दिली आणि तर्री दिलीच नाहीत आपल्या मनात जशा भावना येतात तसे काहीसे होत होते . सुकांता कश्टंबर आत घ्यायला सुरुवात केली आणि तितक्यातच दयाघना ह्यांचे आगमन झाले आणि अग्यावेताळ ह्यांचा जीव भांड्यात पडला ... कोणत्या भांड्यात ... अं ... असो ...असोच्छ्च ... #निरर्थकअत्मरंजन काहितरी चमत्कार जाहला आणि एवढ्या सगळ्या वेटिंग लिस्टमधल्या लोकांना बाजुला सारुन सुकांतावाल्याने आमचे नाव पुकारले ! तो धक्का पचवत आम्ही आमरस पचवण्यासाठी हाटेलात जाऊन स्थानापन्न झालो . तसे जेवताना बोलु नये हे आम्हाला शिकवले आहे म्हणुन आम्ही फक्त कामापुरते संवाद करत जेवण केले त्याचा वृतांत खालील प्रमाणे : अग्यावेताळ : मी आता अजंठा वेरुअळला जाणार अमुक तमुक मित्रां सोबत दयाघना : मे नाही येणार... दु दु दु फ्रॉईड :परत ? च्यायला तुला दर वेळी कोण ना कोण बकरा घावतोच पोपशास्त्री : ओ आमरस आणा खाटुक : फारसी भाषेत ओ हे अक्षरच नसल्याने ट्रॉय भाषांतरीत करताना फार प्रॉब्लेम्स आले बीयरानंद : उद्याचा प्लान करा रे काहीतरी अग्यावेताळ : चला वेरुळला दयाघना : मला वेळं नाही फ्रॉईड : वेळं कि केळं अग्यावेताळा : हाहाहा दयाघना : (मराठी भाशेत सांगता येणार नाहीत असे काहीसे क्रोधदर्शक आवाज काढताना )रान्डु क्कर ह्ह ती दुत्त दुत्त ( आणि मीठ फेकुन मारताना ) ( आता ह्यातले मीठ का फेकुन मारतात हे आम्हाला आजवर कळालेले नाहीये . ) पोपशास्त्री :ओ आमरस आणा खाटुक : आमरसाचा पहिला उल्लेख अशोकाच्या सायप्रस येथील शिलालेखात सापडतो बीयरानंद : सिंहगडाला जायचं का अग्यावेताळ : पण सिंहगडावर लेण्या नाहीत , बेडसे ला जाऊ दयाघना : मला नाही जमणार फ्रॉईड : हो तुम्हाला घंटा वाजवायला जायचे असेल दयाघना :( फ्रीस्मायली.कॉम च्या स्मायल्यांचे अविर्भाव चेहर्‍यावर आणुन ) दुत्त दुत्त अग्यावेताळ : ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ पोपशास्त्री :ओ आमरस आणा खाटुक : आणा हे चलनी नाणे अकबराच्या काळात वापरात आले . बीयरानंद : (वैतागुन) नुसता फालतु वेळ घालवु नका बे , कोठे तरी जाऊ. अग्यावेताळ : ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ दयाघना : आं .... दुत्त दुत्त खाटुक : हडपसरला ग्लायडिंग करता येईल पण मी नाही येणार पोपशास्त्री : ओ आमरस आ ( वाक्य अर्धे तोडत ...) समोरच्या भिंतीवरील पेंटींग सुंदर आहे ! दयाघना : काय ? अग्यावेताळ : कसलं फालतु पेंटिंग आहे फ्रॉईड : नाही नाही , खुप सुंदर आहे पेंटींग ! खाटुक : हो हो अत्यंत सुंदर आहे पेंटींग ! बीयरानंद : ठीक आहे , इतकेही खास नाहीये . अग्यावेताळ : ओह्ह ओके ओके . छान आहे पेंटिंग दयाघना : काय ? काय बोलताय तुम्ही ? फ्रॉईड : तुम्हाला नाही समजणार तुम्ही गपा हो . वेटर ह्यांना शिकरण द्या हो आणुन ! अग्यावेताळ : लिबलिबित केळाचे ! हाहाहा !! दयाघना : आं दुत्त दुत्त ! पोपशास्त्री : हां तर पेंटिंग खुपच सुंदर आहे पण ... ओ वेटर त्या पेंटिंग पाशी रेंगाळत बसु नका , इकडे आमरस आणा . बीयरानंद : हायला ... आवरा रे ... कुठे तरी जाऊ रे , नुसता आला गेला मनोगती करु नका . पोपशास्त्री :ओ आमरस आणा फ्रॉईड : जाऊ रे जाऊ कोठे तरी . उद्या बघु . अत्ता आमरस ओढ तु ! ( असो . तर संवाद बराचसा काल्पनिक आहे . ... पण माझा लेख / वृतांत आहे ...मी काहीही(ण) लिहीन ... डीलीट झाले तर बघु =)) ) तर असो असा सुख संवाद करत जेवळ आटोपल्यावर तुडुंब पोटे घेवुन महानुभाव बाहेर पडले आणि अति जेवल्याचे प्रायशिचित्त म्हणुन झेड पुलावर फेरफटका मारण्यास गेले ! झेड पुलावर अनेक जोडपी जवळ'पास' बसली होती ... इकडे मात्र सनातनी पुरोगामी मोरोपंत वामनपंडीत फ्रॉईड बीएफ स्किनर संघ अंनिस सातवाहन राष्ट्रकुट ठाणे पुणे कोराईगड वैदिक सत्यनारायण वगैरे चर्चा पडत होत्या . एका महानुभावाने भावना अनावर झाल्याने दुसर्‍या एका महानुभावाला ठोकुन काढण्याचा प्रयत्न केला पण तो अपुरणच राहिला . असो . उत्तरायण म्हणुन कोराई गडाला जाऊन क्यॅलरी बर्न करण्याचा प्रायशित्त रुपी निरणय काही महानुभावांनी घेतला ( तिथला बीयर वृत्तान्त बीयरानंद सविस्तर सांगतीलच ) , नेक्स्ट टाईम दुर्वांकुरला भेटायचे ठरले . झेड पुलाचे नामकरण "झ" पुल असे व्हाय्ला पाहिजे हा ठराव सर्वानुमते पास करण्यात आला आहे . इतरही काही निवांत चर्चा झाल्या त्या आता आठवत नाहीत ... शेवटी सारेच अठवले पाहिजे असे कुठे आहे ... आयुश्यात गेल्या २८ वर्षात एकालाही एकदाही भेटलो नव्हतो अशा मित्रांचा ग्रुप झालाय , तो मनात येईल तेव्हा भेटतोय , टोकाचे मतभेद असुनही कोणताही राग मनात न ठेवता मनसोक्त गप्पा मारत एका मेकात मिसळतोय ... अजुन काय हवं यार ... अशा भिन्नभिन्न क्षेत्रातल्या कलंदर अभ्यासु माणसांच्या ग्रुप मधे उभेराहुन पान खाताना इतके काही शिकायला मिळत असते की सारे लक्षात रहाणे अशक्यच ! आणि असं जर लक्षात रहात असतं तर दुसरं "व्यक्ती आणि वल्ली" लिहिणारा दुसरा पुलं मी झालो नसतो का !! अर्थात हे सारेच व्हॉट्सॅप वर चर्चेस आलेच संपादित... जेवढे सुचले स्मरले तेवढे लिहिले ... असो ... आता पुढच्या भेटीला ............................ मटन च्च !! अवांतर : ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊ
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
इतिहास
वाङ्मय
फलज्योतिष
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
6034 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

ळोळ

किसन शिंदे
Wed, 04/22/2015 - 23:04 नवीन
दूत्त दूत्त गिर्जा..का....का????? ;)
  • Log in or register to post comments

देवाधिदेव किसन द्येव चिडलं,

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/23/2015 - 00:29 नवीन
देवाधिदेव किसन द्येव चिडलं, मंजी ल्येख आनी त्येच्यातील उल्लेख तीणतीणदा वाचाया फायजे,आनी मंगच परतीसाद हनाया फायजे... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

ओ आमरस आणा...

सतिश गावडे
Wed, 04/22/2015 - 23:09 नवीन
पेंटींग खरंच सुंदर होते.
  • Log in or register to post comments

=)) =)) =))

प्रचेतस
Wed, 04/22/2015 - 23:12 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

अले वा!

पैसा
Wed, 04/22/2015 - 23:14 नवीन
अले वा! अच्चं जालं तल! बाकी पात्रे कळ्ळी. बीयरानंद कोण ते लक्षात येईना. सांगितल्यास प्रतिसाद बदलून चान चान म्हणण्यात येईल. स्लिम आणि ट्रिम फटुग्राफर तर नव्हे!
  • Log in or register to post comments

अंक्लिद्य सनावृता™ मधे

यसवायजी
Wed, 05/06/2015 - 06:27 नवीन
अंक्लिद्य सनावृता™ मधे हुब्बाहुब्बाला न घेतल्याबद्दल केळेश यांचेकडून निषेढ़.
  • Log in or register to post comments

आणि त्यासोबतच अनेक

बॅटमॅन
गुरुवार, 04/23/2015 - 00:11 नवीन
आणि त्यासोबतच अनेक द्राक्षासवांच्या गुणधर्माबद्दलही चर्चा जाहली. पोपशास्त्री यांनी अर्थकारणावर अनेक मौलिक विचार मांडले. आम्ही अजून चाणक्याचे अर्थशास्त्रच वाचले नसल्याने कुठला अर्थ आणि कुठले शास्त्र. तस्मात निष्ठेने श्रवणभक्ती केली. अगोबासाहेबांच्या वेरूळप्रेमावरही बराच काथ्या कुटण्यात आला. आम्ही दक्षिणेची उदा. दिली, पण "नॉर्थ ऑर साऊथ, एक्सेप्ट वेरूळ ऑल अनकाऊथ" असे म्हणून त्यांनी मुद्दाच निकालात काढला. सुकांतामध्ये वाट बघत असताना तत्रस्थ बहि:स्थ ज्योतिषी दिसला, त्याच्या चर्येकडे बघून एकदम दयाघनाचा भास झाला. दयाघनाच्या आगमनानंतर मात्र वातावरण एकदम बदलले. झ पुलावरदेखील लय मज्या आली. फ्रॉईडसाहेबांनी अनेक सिद्धांत मांडले, पण पोपशास्त्र्यांसमवेत आम्ही विरोधी क्यांप जॉईन केला. बीयरानंद मात्र अंमळ वैतागलेले दिसत होते, साहजिकच आहे- श्रीस्थानकाहून पुण्यपत्तनी मजल दरमजल करून आलो तो काय निरर्थक अत्मरंजनासाठी? मग दुसर्‍या दिवशी कोरी पाटी ठेवून समस्त अ‍ॅक्टिव्हिटीज़ सुरू कराव्यात असा निर्णय घेण्यात आला आणि मंडळी आपापल्या गोटात पांगली. गडावर स्वारीचे आवताण अर्थात आम्हांसही होतेच, पण पीतदंत विदूषक आणि इतर पुंडांचा आमच्या गौतमहळ्ळीच्या जहागिरीतील सनातन उपद्रव निस्तरण्याकरिता आम्हांस जाणे भाग होते. त्यात परत स्वारी पंच पंच उषःकाली सुरू होईल असे सांगितल्याने आम्ही अज्जीच नकार दिला. सुकांतातील आमरसाची तर वेगळीच मजा. नावाला आमरस पण होता खासरस. सुरुवातीस मुदपाकातल्या लगबगीपुढे वाढपी निगाह फर्मावत नव्हते, त्यांचा उजूर मानून सर्व स्वार्‍यांनी एकमुखे यल्गार केलियावरी वाढप्ये आले आणिक वाट्या भरभरोन वाढू लागले. शेवटी अनेक आम्रांना आहुती दिल्यावर मंडळी तृप्त जाहली. तांबूल भक्षून झ-उपाख्य साकवावरी अंमळ शतपावली करायास बाहेर पडली...
  • Log in or register to post comments

इन सब को पहले कहीं देख्या

आदूबाळ
गुरुवार, 04/23/2015 - 00:16 नवीन
इन सब को पहले कहीं देख्या देख्या लगता हय... #दीनप्रतिसाद
  • Log in or register to post comments

हा हा हा हा हा हा !!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 04/23/2015 - 00:24 नवीन
हा हा हा हा हा हा !!!
  • Log in or register to post comments

जबराट लिवलस रे गिर्जा

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/23/2015 - 01:06 नवीन
जबराट लिवलस रे गिर्जा काssssssss काssssssss Image removed. आता उद्या फ्री झाल्यावर आणखि निरर्थक ब्याटींग करेण म्हण्तो. Image removed.
इतरही काही निवांत चर्चा झाल्या त्या आता आठवत नाहीत ... शेवटी सारेच अठवले पाहिजे असे कुठे आहे ... आयुश्यात गेल्या २८ वर्षात एकालाही एकदाही भेटलो नव्हतो अशा मित्रांचा ग्रुप झालाय , तो मनात येईल तेव्हा भेटतोय , टोकाचे मतभेद असुनही कोणताही राग मनात न ठेवता मनसोक्त गप्पा मारत एका मेकात मिसळतोय ... अजुन काय हवं यार ... अशा भिन्नभिन्न क्षेत्रातल्या कलंदर अभ्यासु माणसांच्या ग्रुप मधे उभेराहुन पान खाताना इतके काही शिकायला मिळत असते की सारे लक्षात रहाणे अशक्यच ! आणि असं जर लक्षात रहात असतं तर दुसरं "व्यक्ती आणि वल्ली" लिहिणारा दुसरा पुलं मी झालो नसतो का !!
ह्या एंडिंगला एक नम्र सलाम!
अर्थात हे सारेच व्हॉट्सॅपच्या अंक्लिद्य सनावृता™ वर चर्चेस आलेच ... जेवढे सुचले स्मरले तेवढे लिहिले ... असो ... आता पुढच्या भेटीला ............................ मटन च्च !! अवांतर : ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊ
Image removed. आणि ह्या एंडलेस एंडि़गला मात्र ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊऊ >> Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

काहीही झेपले नाही

वाचक
गुरुवार, 04/23/2015 - 03:21 नवीन
अभ्यास (बराच) वाढवावा लागेल असे दिसतेय. (साला रोजच्या रोज वाचून देखिल काही समजेना हा खरडफळ्यावर न गेल्याचा परिणाम असावा का?) मे मधे भारतात आल्यावर एका (ठाणे) कट्ट्यासंबंधी विचारणा करावी असे धाडस आता करवणार नाही.
  • Log in or register to post comments

गिरीजा काका!!

स्पंदना
गुरुवार, 04/23/2015 - 04:02 नवीन
गिरीजा काका!! कट्टा झाल्याचे कळले, पण बराच असंदब्ध झाल्या सारखे वाटते आहे. तरीही भारीच! मज्जा आली! जळजळ झाली असे म्हणण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments

मस्ताड

नाखु
गुरुवार, 04/23/2015 - 08:36 नवीन
ठसकेबाज्+तर्रीबाज्+खमंग व्रुत्तांत. क्या मै फ्राईड को भेट्या है ? "दया"घना इस गुथ्थीका दरवाजा (आतून) तोडो ! या खाटुकला एकदा ठोकून काढला पाहीजे** पिंची कट्ट्याला बरा माहेरी पळतो! **किमान त्याकरीता तरी घावला पाय्जे पहिला ह्योच मोट्टा पिराब्लेम आहे आहे आमचा!!! नाखु सुमकुंडरीकर
  • Log in or register to post comments

श्यॅ राव :( हे काही योग्य

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 04/23/2015 - 13:45 नवीन
श्यॅ राव :( हे काही योग्य नाही . आमच्या प्रतिसादांवर लोक जाहीररित्या कंपु गिरीने प्रतिसाद देत आहोत असे कबुल करतात त्यांच्यावर कारवाई होत नाही , अन आम्ही मात्र प्रत्युत्तर दिले तेही कोडेडे गुप्त सांकेतिक भाषेत की लगेच संपादन :( दुत्त दुत्त ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊ :-\ असो . आता पुढची जिलेबी " गिरिजा इन अ वन्डरलॅन्ड " अशी लिहितोय .... त्यातल्या किती जिलेबीच्या कड्या तुटणार देव जाणे !!
  • Log in or register to post comments

मजा नै आली वाचायला. वर्णन कसं

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/23/2015 - 17:14 नवीन
मजा नै आली वाचायला. वर्णन कसं खुसखुशीत झालं पाहिजे जे आले नाहीत त्यांनाही 'आतल्या आत कसं तरी झालं पाहिजे' सॉरी किमान 'जळजळ' तरी झाली असा प्रतिसाद लिहिण्याचा उत्साह प्रतिसाद प्रकाशित करण्यापर्यन्त टिकला पाहिजे.आता पुढच्या वेळी सर्वांचे कट्टे चुकविन पण तुमचे चुकवनार नाही, पुढच्या वेळी मुलं सासुबाईकडे सांभाळायला सोडू म्हणजे मुलांचा त्रास होणार नाही,असं एखादं तरी वाक्य पाहिजे होतं किंवा अरेच्चा ! , अरे हट ! , साली ही दुनियादारी, नै तर दोन हजार पानांचा वृत्तांत लिहिला असता तरी चाललं असतं. कंटाळा आला तरी नाविलाजाने वाचावं लागतं असं तरी लिहिलं पाहिजे उदा. दाखवू का एखादं मिपावर ? :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अंक्लिद्यतेच्या विरुद्ध उदा.

बॅटमॅन
गुरुवार, 04/23/2015 - 17:16 नवीन
अंक्लिद्यतेच्या विरुद्ध उदा. म्हणायचंय का तुम्हांला? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 04/23/2015 - 17:31 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अंक्लिद्यतेचे दोन शुंभनिशुंभ

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/23/2015 - 18:15 नवीन
अंक्लिद्यतेचे दोन शुंभनिशुंभ खाटुक आणि गिर्जा का......का.........! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आम्ही तर

तिमा
गुरुवार, 04/23/2015 - 18:35 नवीन
आम्ही तर, 'अनावृत्ता इन सुकांता' असं वाचल्यामुळे धागा उघडला होता. पण एकही अनावृत्त फटु न दिसल्यामुळे पुन्हा शीर्षक वाचलं आणि सोडून दिलं.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा