ठळक माझी मेहुणी, ठ परी ठळकातल्या
स्थूल आणि ठेंगणी, ळ परी ठळकातल्या
गोल आणि देखणी, क परी ठळकातल्या
कडक माझी मेहुणी, वाघ बकरी चहापरी
वाघ माझी बायको, डोळा सदा माझ्यावरी
गुरकते, डरकाळते , पण मेहुणी जबरी खरी
लाख नखरे बायकोचे शांत चित्ते साहतो
मेहुणी येता घरा मी सभ्यतेने वागतो
आलिया भोगासि म्हणुनी बोल नशिबा लावतो
:(:(:(:(:(:(:(:(:(:(
काव्यरस
वाचने
12286
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
=))
चुकलामाकला, बरेच आहात की!!
सर्व अनाहितांची माफी मागतो
सर्व अनाहितांची माफी मागतो अजया ताई! :)
काव्यरस: Deep assets Lol
काव्यरस: Deep assets
Lol
=)) आणि विराणी...
In reply to काव्यरस: Deep assets Lol by जेम्स बॉन्ड ००७
=))
आणि विराणी...
चालायचच
माणूस चुकत माकतच शिकतो.
+१
In reply to चालायचच by नाखु
+१
हा हा !
चुकू नका माकू नका, घेतली बायको टाकू नका
ठळक मेहुणी झळकली तरी गृहस्वामिनी सोडू नका...
चुकलामाकला, वैनीना सांगा
चुकलामाकला, वैनीना सांगा अनाहितात वेल्कम आहेत त्या.जरा गप्पा मारु त्यांच्याशी.
:)
In reply to चुकलामाकला, वैनीना सांगा by अजया
:)
अजया ताई ,कशाला गरिबाच्या
In reply to चुकलामाकला, वैनीना सांगा by अजया
अजया ताई ,कशाला गरिबाच्या जीवाशी खेळताय ? जे काय हाय ते इथल्याइथं मिटवून टाकू कसं?
ठळक माझी मेहुणी, ठ परी
ठळक माझी मेहुणी, ठ परी ठळकातल्या
स्थूल आणि ठेंगणी, ळ परी ठळकातल्या
गोल आणि देखणी, क परी ठळकातल्या
जबरी !!!
या प्रकाराला मराठी व्याकरणात आणि साहित्यात काय म्हणता माहित नाही...पण जे काय आहे ते लय भारी !!!
याचं श्रेय पुसटश्या सासुबाईंना बरं!
In reply to ठळक माझी मेहुणी, ठ परी by चिनार
धन्यवाद ! पण याचं श्रेय पुसटश्या सासुबाईंना बरं!
त्या युगपरिवर्तक
In reply to याचं श्रेय पुसटश्या सासुबाईंना बरं! by चुकलामाकला
त्या युगपरिवर्तक कवियत्रींपासून प्रेरणा घेऊन अनेक नवकवी मिपावर जन्म घेतील याबद्दल शंका नाहीच !!
हाहाहा!
In reply to याचं श्रेय पुसटश्या सासुबाईंना बरं! by चुकलामाकला
पुसट सासूबै! =)) =))
+१
In reply to ठळक माझी मेहुणी, ठ परी by चिनार
भारी आहे हे
"उनक"साठी समुहगीत म्हणून
"उनक"साठी समुहगीत म्हणून चांगलं आहे.
उनक????
In reply to "उनक"साठी समुहगीत म्हणून by सूड
उनक????
उपेक्षित्त नवरे कमिटी.
In reply to उनक???? by चुकलामाकला
उपेक्षित्त नवरे कमिटी.
उनाड हा शब्द अधिक योग्य वाटेल
In reply to उपेक्षित्त नवरे कमिटी. by कॅप्टन जॅक स्पॅरो
उनाड हा शब्द अधिक योग्य वाटेल .;)
लय भारी
हा हा हा
बाकी मेहुणी आणि बायको मिपावर नसण्याचे फायदे.
अशी मेहुणी लाभली. गेल्या
अशी मेहुणी लाभली. गेल्या जन्मातले पुण्य आणखीन काय...
=))
=))
आता "ठळक माझा दीर" अशी कविता
आता "ठळक माझा दीर" अशी कविता अनाहितांकडून येण्याच्या प्रतीक्षेत.
श्श्शी
In reply to आता "ठळक माझा दीर" अशी कविता by बॅटमॅन
हीनहीण प्रतिसाद !अहो ठळक म्हटलंय, कठीण काये
In reply to श्श्शी by प्रसाद गोडबोले
अहो ठळक म्हटलंय, कठीण काये त्यात ;)
बॅट्या
In reply to अहो ठळक म्हटलंय, कठीण काये by बॅटमॅन
तुला ठळक आणि नाठाळ हे शब्द समानार्थी वाटू लागले काय?
जाणकारांच्या प्रक्षुब्ध्/लुब्ध्/कृद्ध प्रतीसादपेक्षीत.
नाखु
पिटातील पेक्षक आसन क्र १८
जेप्या तुझी आणि रंगाषेठची जागा पकडली आहे लवकर येणे.
दू....दू...दू... !
In reply to बॅट्या by नाखु
दू....दू...दू... !
माजी जागा ण पकडल्या बड्डल णिसेध!
एक डाव माफ करा
In reply to दू....दू...दू... ! by अत्रुप्त आत्मा
मला वाटलं तुम्ही कुठे "सोडवणूक" करण्यात अडकलायत असे मला ट्क्यानेच सांगीतले.
पाहिजे तर जेपी ला विचारा !!
जेपी ऊठ जागा हो बघ बुवा आले तुला आईसकांडी घेऊन!
जल्ला काय झाला???
In reply to एक डाव माफ करा by नाखु
जल्ला काय झाला???
कायले माज्या नावाने आल्डाओल्डा चाललय..
(सुस्त)जेपी
जल्ला मी हिकडची काडी तिकडे
In reply to एक डाव माफ करा by नाखु
जल्ला मी हिकडची काडी तिकडे सारत नै...मांज्या नावाचा कापिरैट्ट घ्यायलाच पैजे मिपावर
नाय ओ नाखुकाका. कठीण हा शब्द
In reply to बॅट्या by नाखु
नाय ओ नाखुकाका. कठीण हा शब्द अंमळ सूचक होता. ;)
खरच कठीण आहे .. आता!
In reply to नाय ओ नाखुकाका. कठीण हा शब्द by बॅटमॅन
खरच कठीण आहे ..
आता!याबद्दलचा विदा कुठे आणि कसा
In reply to खरच कठीण आहे .. आता! by अत्रुप्त आत्मा
याबद्दलचा विदा कुठे आणि कसा गोळा केलात याचे जामच कुतूहल जागृत झालेय आता...
यद्यपि आम्ही स्वतः हा विदा गोळा करायला कालत्रयीही जाणार नाही हेवेसांनल. ;)
अस्ले प्रश्न विचारणार्या
In reply to याबद्दलचा विदा कुठे आणि कसा by बॅटमॅन
अस्ले प्रश्न विचारणार्या बॅट्याला ट्रॉय सिरीज लवकरात लवकर पुर्ण करण्याची शिक्षा फर्मवाण्यात येत आहे.
जेपीलीस
जेपीलीस, द्या मला ट्याम्पीलीस
In reply to अस्ले प्रश्न विचारणार्या by जेपी
जेपीलीस, द्या मला ट्याम्पीलीस.
कचकुन टाळ्या...आणि दणकुन
In reply to अस्ले प्रश्न विचारणार्या by जेपी
जेपीसठी, कचकुन टाळ्या...आणि दणकुन हणुमोदण्ण!
दीर पुसट(सासुबाईंसारखेच ^_~)
In reply to आता "ठळक माझा दीर" अशी कविता by बॅटमॅन
दीर पुसट(सासुबाईंसारखेच ^_~) असल्याने पास दिलाय!!!
"ताई तुझा दीर दिवाणा" वुड
In reply to दीर पुसट(सासुबाईंसारखेच ^_~) by अजया
"ताई तुझा दीर दिवाणा" वुड डिसॅग्री ;)
असते आमचे दीर ठळक रणबीर
In reply to "ताई तुझा दीर दिवाणा" वुड by बॅटमॅन
असते आमचे दीर ठळक रणबीर कपूरपरी।
लिहिले असते काव्य त्या दिवाण्या दीरावरी॥
एकनंबर... =))
In reply to असते आमचे दीर ठळक रणबीर by अजया
एकनंबर...
=))
क्या बात!!!! जबरी
In reply to असते आमचे दीर ठळक रणबीर by अजया
क्या बात!!!!
जबरी
ह्या ह्या ह्या ह्या! :-D
In reply to असते आमचे दीर ठळक रणबीर by अजया
ह्या ह्या ह्या ह्या! :-D जब्राट! :-D
बोल आता खाटुका! ;-)
वाह वाह .
In reply to असते आमचे दीर ठळक रणबीर by अजया
वाह वाह .
असते आमचे दीर ठळक जर सल्लू
In reply to असते आमचे दीर ठळक रणबीर by अजया
असते आमचे दीर ठळक जर सल्लू खानापरी
धुवावयाची गरजच नसती शर्टं अन् कॅालरी
ह्ये बी जबरी ल्हिवलय ! लय
In reply to असते आमचे दीर ठळक जर सल्लू by प्राची अश्विनी
ह्ये बी जबरी ल्हिवलय ! लय भारी !
:)
:)