सकाळचा "च्य़ा "
"कसला ह्यो च्या म्हणायचा?? दे वोतुन मोरीत...!!!" आबा कडाडले.. ..
नवीनच लग्न होऊन आलेल्या आबांच्या सुनेचे डोळे भरून आले ... तरीही मन घट्ट करून तिने विचारलेच, "आबाजी, काय झाल जी? चहा गुळमाट झाला व्हय? पर दिसायस तरी बेस दिसतोया... "
"अग बाय, दिसण्यात आणि असण्यात वाईच तरी फरक अस्तो का न्हाय?? तूच पिऊन बघ ह्यो च्या, म्हंजी समजल तुला बी...."
"आता उरला नाय, व्ह्ता नव्हता त्यो समदा तुम्हासणीच दिला नव्हं...." सुनेने उत्तर दिले.
" सक्काळच्या पारीचा "च्या" कसा पाइजी ठाव हाय का तुला?" आणि आबा चहाच्या वर्णात बुडाले... "कडक, ताज्या दुधाचा, दाटसर, गवती पात, जरा येलची पुड घातलेला, नुसत्या चहाच्या वासानंच मन तिप्त व्हावं असा....ह्या आजकालच्या पोरी च्या करत्यात म्हणं, ह्यो त्यांनी केलेला च्या पिण्या पेक्षा म्हशीच मु* पिल्याल परवाडल..!!" आबा चहाच्या समाधीतुन जागे होत बोलले.
"माझी सुलू गेल्यापासन "च्या" काय मला मनाजोगता मिळना... " आबांच्या तोंडाची बडबड चालूच होती.. आणि आबा त्यांच्या जुन्या दिवसात, बायकोच्या आठवणीत रमून गेले.
आबा तसे सधन शेतकरी. २० एकर बागायती जमीन, ४ म्हशी,२ गाय, बैलाची जोडी,बैलगाडी, शेतात राबायला गडी माणसं, आणि आबांच्या आणि सुलुच्या स्वभावामुळे माणसाला माणूस जोडलेला. घरी येणा-य़ा जाणा-या लोकांचा राबता ही भरपूर.
आबांचे आई - वडील आबां लहान असतानाच वारले. आबा त्यांच्या मामापाशीच लहानाचे मोठे झाले. आबांच्या मामानेच आबांची शेतीवाडी सांभाळली, आणि आबांचे लग्न झाल्यावर आबांच्या स्वाधीन केली. पुढे आबांनी मेहनतीने त्यात अजून भर पाडली.
सुलू, आबांची बायको. सकाळी सुलूच्या हातच्या चहा प्यायची आबांना इतकी सवय झाली होती की, दुस-य़ा कोणी चहा केलेला त्यांच्या पसंतीस उतरत नसे.
सुलू सकाळी लवकर उठून सडा-रांगोळी, देव पूजा करे. तो पर्यत आबा उठायचे, ते आंघोळीला गेले, की सुलू म्हशींच्या धारा काढायला जायची. आबांची देवपूजा होईपर्यत दोघांसाठी ताज्या दुधाचा चहा ठेवायची. आबांची देव पूजा झाली, की चहा घेण्यासाठी आबा माजघरात येत. आबांनी चहाचा पहिला घोट घेईपर्यत सुलूचे डॊळे आबांच्या डॊळ्यांशी गुंतलेले असत. आबांनी चहाची दाद डॊळ्यांनी दिल्यावरच सुलू सुखावे ,आणि तिच्या घशातून चहाचा घोट खाली जाई. अशी चहाबरोबर प्रेमाचीही देवाण घेवाण करून त्यांचा दिवस चालू होत असे. सुलूच्या चहाचे कौतुक आबा सगळ्यांजवळ करत, आणि आबांच्या कौतुकभरल्या प्रेमात सुलू सुखावत असे. अशा अनेक आठवणी आबांच्या चहाशी जोडल्या होत्या.
सुलू आबांना सोडुन देवाघरी जाऊन काही महिनेच झाले होते. घरातल बाईपण संपू नये म्हणून आबांनी सुलू गेल्यावर थोड्या महिन्यांतच लेकाचे लग्न करून घरात सून आणली. आबांची सून नेहमी आबांना आवडेल तसा चहा करायचा प्रयत्न करायची, पण आबांना तो काही पसंतीस उतरत नसे. इतर सगळ्या गोष्टींत बापाच्या मायेने समजून घेणारा सासरा, चहा मनासारखा मिळत नसल्याने सुनेवर चहावरून मात्र नाराज होई! मग एके दिवशी परत आबांनी चहा वरून बोलायला सुरू केल्यावर, न राहवल्यामुळे सून आबांना बोलली, "तुम्हासनी तरी जमतो का,तुम्हाला पाहिजे तसा च्या कराया..? " सुनेच्या ह्या वाक्यानी आबांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या, आणि आज पर्यत कधीच चहा देखिल न केलेल्या आबांनी चहा साठी चुल फुंकली!!
एकाच दिवसात सात-आठ वेळा स्वत: केलेला चहा त्यांना पसंत पडला नाही, त्यामुळे ते चहा जाऊन ओतून येत आणि परत करत आणि मग त्यांना हव्या तशा चवीचा चहा बनविण्यात ते यशस्वी झाले. त्यावेळी त्याच्या चेह-यावर लहान मुला आनंद दिसत होता!!
आबांनी सुनेला आनंदाने हाक मारली, आणि स्वत:च्या हाताने बनविलेला कपात ओतला. सुनेला बोलले, "घे दोन घोट, बघ कसा लागतोया! ह्यो ज्यो मी केला नव्हं, त्यास "च्या" म्हणत्यात!!" स्वत:वरच खुश होत भुर्रर्रर्र आवाज काढीत चहा संपविला!
त्यांच्या चेह-यावरील तो आनंद पाहुन सुनेच्या डोळ्यांतुन अश्रू वाहू लागले!
याद्या
16478
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
शीतल, मस्त
मस्तच ! 'तू'
ए क णं ब र
In reply to मस्तच ! 'तू' by भाग्यश्री
लघुकथा
खरच! चहा
मगदूम चहा
आम्हाला आठवली हो मग्दूम चा ची जैरात!
In reply to मगदूम चहा by कपिल काळे
सरस्वती चहा
In reply to मगदूम चहा by कपिल काळे
सरस्वती चा
In reply to सरस्वती चहा by कोलबेर
मला ही माहित आहे ती जाहिरात.
In reply to मगदूम चहा by कपिल काळे
कथा
चहा ओतून देणे
In reply to कथा by मुक्तसुनीत
गुळाची आठवण
In reply to चहा ओतून देणे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
असेच
In reply to चहा ओतून देणे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
खी... :)
In reply to असेच by शितल
पटत नाही
In reply to असेच by शितल
:)
In reply to चहा ओतून देणे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
लघुकथा आवडली
In reply to चहा ओतून देणे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
>>फुकट्टचा
In reply to लघुकथा आवडली by सहज
चहा
चांगली चा
मस्त च्या!!
+१
In reply to मस्त च्या!! by चतुरंग
+१
In reply to +१ by छोटा डॉन
सहमत आहे
In reply to मस्त च्या!! by चतुरंग
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
In reply to सहमत आहे by नंदन
++१
In reply to मस्त च्या!! by चतुरंग
उत्तम
मला वाटलं
In reply to उत्तम by अभिज्ञ
गूळ
In reply to उत्तम by अभिज्ञ
+१
In reply to उत्तम by अभिज्ञ
छान आहे कथा
कथा आवडली
कथेतले
चहाकथा
कथा छानच आहे.........
कथा
मगदुम चाच पितो
चहा!
शीतल ताई..
अरे वा
धन्यवाद !
अरे वा!
वा मस्त
चवीने पिण्याची चिज
च्या..
छान लेख
मस्तच आहे
गुळाचा चहा
बाकी तुमचा चहा आवडला खूप गोड होता !
मी ऐकलेलि म्हण