✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सकाळचा "च्य़ा "

श
शितल यांनी
Fri, 11/21/2008 - 00:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16437 वाचन

💬 प्रतिसाद (51)

प्रतिक्रिया

य
यशोधरा Fri, 11/21/2008 - 00:41 नवीन

शीतल, मस्त

शीतल, मस्त गं :)
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 11/21/2008 - 00:52 नवीन

मस्तच ! 'तू'

मस्तच ! :) 'तू' ' चहावर' लिहीणार याची खात्री होती! :) (चहाप्रेमी) भाग्यश्री http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 11/21/2008 - 22:04 नवीन

ए क णं ब र

च्या भारी च्च ... आबाच्या चिकाटीला सलाम... शेवटी आबाला त्याच्या आवडीचा च्या जमल्यावर सुन त्या च्याला छ्या म्हणेल का काय असं वाटून गेलं.. (गवती चहा) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
प
प्राजु Fri, 11/21/2008 - 00:52 नवीन

लघुकथा

छान जमली आहे लघुकथा. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Fri, 11/21/2008 - 01:11 नवीन

खरच! चहा

खरच! चहा असावा तर नुसत्या आव्या दुधाचा (पाणी न घालता)... थोडं आलं घातलेला... आलं नसलं तर तुळशीची पाने घातलेला... सोबतीला थोडी वेलची कुटून घातलेली... योग्य प्रमाणात चहा पत्ती आणि अगदी थोडी साखर... मस्त बदामी रंग येई पर्यंत उकळलेला.... आहा! विचार करुनच चहा प्यायची तलप जागी झाली! शितल तै, छोटेखानी कथा आवडली....!!! बाकी वर लिहिल्याप्रमाणे चहा आवडत असला तरी माझी कोणत्याच चहाला ना नसते... 'च्या' आमचा वीक पॉंईंट.... म्हणतात की चहा ने झोप जाते... पण शिकायला असताना रात्री २-३ वाजता मित्रांबरोबर टवाळक्या करून झाल्यावर कोठेतरी चहाची टपरी शोधायची... नुसता पाण्याचा चहा मिळाला तरी ढोसायचा... त्या शिवाय झोपच येत नसे..... नंतर पुण्यात असताना रात्री-बेरात्री फक्त स्वारगेट किंवा शिवाजीनगर स्टेशनलाच चहाची तहान भागवायचो (कारण बाकी सगळी अमृततुल्य बंद असायची).... तसं नंतर भांडारकर रोडवर एक छोटा चहा/कॉफीचं शॉप होतं जे रात्री ३ पर्यंत तरी उघडं असायचं... मग तिथं जायचो... बोनस म्हणून तिथं हाय-फाय सोसायटीतल्या, आपापल्या बॉयफ्रेंड बरोबर आलेल्या पोरी टापायला मिळायच्या....!! मजा यायची!!! 'च्या' बद्दल बऱ्याच जणांनी लिहलय आधी... पण चहा वाचायला आणि प्यायला कधीही आवडतो... तसंही कुठेतरी वाचलं/ऐकलं आहे ते सगळ्यांनी लक्षात ठेवावं.... "बाईनं कुंकवाला अन मर्दानं च्या ला कदी ना म्हणू नै! " (चहाप्रेमी) अनामिक अवांतरः निळू फुले च्या सपट च्याची आठवण आल्यापासून राहवले नाही!
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Fri, 11/21/2008 - 01:46 नवीन

मगदूम चहा

अरे ही कथा वाचताना सांगली आकाशवाणी वर लागणारी एक जाहिरात आठवत होती. अनामिक ने त्यातील एकच ओळ लिहिली आहे. ती जाहिरात अशी "राम राम दौलतराव" "राम राम" "सून बाई दोन चा टाका पाहू" "नगं नगं" "का? अवो सिवासिनीने कुकवाला आनि मर्दाने चा ला नगं म्हनू नये" "पन आमी न्हेमी मर्दांचा कडाक मग्दूम चा च पितो" " मंग आमी का उन पानी पितो काय?, आमी बी आमच्या आबा आज्ज्यापास्न मग्दूम चा च पितो" "अश्शी, मंग हून जाउद्या डब्बल" के टी मगदूम आणि कंपनी सांगली ह्यांचा उत्साहवर्धक चहा मगदूम चहा.. मग ही जिंगल... उन्हाळा, हिवाळा असो पावसाळा मगदूम चहा हवा नित्य आम्हा. टीण टीण टीण ट्याण ट्याण ट्याण ट्याण इथे कुणाला आठवते का ही जाहिरात. ( प्राजु?) ही बालपणीची जैरात आठवून दिल्याबद्दल शीतलचे आभार. छान कथा. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 11/21/2008 - 02:04 नवीन

आम्हाला आठवली हो मग्दूम चा ची जैरात!

बर्‍याचवेळा ऐकलेली सकाळी सकाळी लागायची सांगली आकाशवाणीला अगदी चहाच्याच वेळेत! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
क
कोलबेर Fri, 11/21/2008 - 02:10 नवीन

सरस्वती चहा

त्याच बरोबर "पिण्या पाजण्या अस्सा फर्मास चहा कोणता सांगाजी.. सरस्वती चहा म्हणती त्याला फर्मसासुनी लै भारी!" हे जिंगल पण रेडियोवर लागायचे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
क
कपिल काळे Fri, 11/21/2008 - 02:37 नवीन

सरस्वती चा

ही पण जैरात लागायची तेव्हा. कोलबेर चे आभार . आता आठवली. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
श
शितल Fri, 11/21/2008 - 02:25 नवीन

मला ही माहित आहे ती जाहिरात.

मला ही आठवते ती जाहिरात. ती जाहिरात सकाळी रेडिओच्या बातम्याच्या आधी का मध्ये लागायची. आम्ही कोल्हापुरात मगदुम चहा , कधी गद्रे चहा वापरायचो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
म
मुक्तसुनीत Fri, 11/21/2008 - 01:51 नवीन

कथा

छोटीशी कथा आवडली. सासू-सासर्‍यांपैकी एकाच्या निधनानंतर सूनेलाच मागे राहिलेल्या वृद्धांची आई व्हावे लागते हे सनातन भारतीय विचारसरणीतले सूत्र अधोरेखित करणारी. वृद्ध , कठोर स्वभावाच्या सासर्‍याला त्याच्या वृद्धापकाळी सून त्याच्या स्वतःमधले लहान मूल शोधण्यास मदत करते हा शेवटचा प्रसंग हृदयस्पर्शी. (थोडीशी साने गुर्जी छाप , थोडी खांडेकरी वळणाची , ग्रामीण भाषेमुळे शंकर पाटलांच्या कथेसारखी. ५०-७० वर्षांपूर्वीच्या गावातल्या वातावरणात घडणार्‍या या कथेत खरे म्हणजे वाचण्यासारखे काय असे कुणाला वाटू शकेल :-) पण मला नाही बुवा वाटले ...कथा आवडली. हघ्याहे सर्वांनाच सांनल ;-) )
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 11/21/2008 - 01:56 नवीन

चहा ओतून देणे

खेड्यातल्या एखा द्या विधुर माणसाने साताठ वेळा स्वतः केलेला चहा ओतून देणे, खरेच मनाला पटत नाही. असा विक्षिप्त नवरा असल्यानेच सुलूने प्राण त्यागले असावेत असे वाटते. आणि चहात साखरे ऐवजी गूळ होता का, अशीही शंका मनाला चाटून जाते. पण ही कथा जी एंची नसल्याने आवडली. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
क
कपिल काळे Fri, 11/21/2008 - 02:25 नवीन

गुळाची आठवण

सध्या गुराळांचा मोसम सुरु आहे. त्यामुळे गुळाची आठवण बरेच वेळेस येणे स्वाभाविक. इथे नको राडा घालायला. खरोखर कथा मस्त . ती मला माझ्या लहानपणात घेउन गेली आहे. मी ती सांगली रेडियो वरची जैरात सध्या एकतोय. आणि दुपारचा चा पितोय. गुळाचा राडा माझ्या ख.व. मध्ये मनसोक्त घाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
श
शितल Fri, 11/21/2008 - 02:34 नवीन

असेच

>>>खेड्यातल्या एखा द्या विधुर माणसाने साताठ वेळा स्वतः केलेला चहा ओतून देणे, खरेच मनाला पटत नाही मस्ती ओ अजुन काय बोलणार, गोठ्यात चार म्हशी आहेत, शेतात उस आहे, मग दुसरे काय करणार :) >>आणि चहात साखरे ऐवजी गूळ होता का, अशीही शंका मनाला चाटून जाते. गुळाचा चहा दुधात केला तर तो फाटतो, मला वाटते, गुळाचा चहा करून दुसरी कडे दुध गरम करून मग तो चहात ओतत असावा. मी एक दोनदा गुळाचा चहा केला होता लहानपणी तेव्हा तो फाटलेला कारण दुध गुळाचा चहा गरम असतानाच ओतले होते आणि उकळी काढली होती. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
य
यशोधरा Fri, 11/21/2008 - 10:31 नवीन

खी... :)

:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 11/21/2008 - 12:32 नवीन

पटत नाही

मस्ती ओ अजुन काय बोलणार, गोठ्यात चार म्हशी आहेत, शेतात उस आहे, मग दुसरे काय करणार अर्थकारणातील भयस्वप्नांचे लेख वाचल्यास, त्या चार म्हशींपासून आणि शेतातील उसांपासून मिळणार्‍या पैशांचे अवमूल्यन होणार, आणि शेवटी जगभरात गरीबी पसरणार असे चेंगट विधान ह्या म्हातार्‍याला कळले नसावे, हे पटतच नाही. चहा टाकून देणे हे ह्या अर्थव्यवस्थेत शक्य नाही. १९७० च्या मंदीतही हे शक्य नव्हते, आणि १९२९ ते १९४५ पर्यंतच्या मंदीतही शक्य नव्हते. भारतातील खेड्यात तर १९३४ पासून सुरू झालेली आर्थिक दुरवस्था अद्याप कायम आहे. मग ही आर्थिक दुरवस्था असतानादेखील हा म्हातारा साताठ वेळा चहा टाकून देतो हे पटत नाही. जपानचे मंदीच्या काळात काय झाले, हे ह्या म्हातार्‍याला माहित असावेच. त्यामुळे ही कथा सत्य वाटत नाही. असो, -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
आ
आजानुकर्ण Fri, 11/21/2008 - 02:34 नवीन

:)

(:)) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सहज Fri, 11/21/2008 - 08:04 नवीन

लघुकथा आवडली

लघुकथा आवडली तसेच मुसु व सर्केश्वरांची प्रतिसादरुपी बिस्किटे त्या चहाबरोबर नक्कीच भारी :-) फुकट्टचा च्या प्यायला फुकटा आला होता असे दिसते. :-) (कॉफीप्रेमी) सहज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
ध
धमाल नावाचा बैल Fri, 11/21/2008 - 20:18 नवीन

>>फुकट्टचा

>>फुकट्टचा च्या प्यायला फुकटा आला होता असे दिसते. अरे सहजा, पुरे आता! तिकडे हसं करुन घेतलस तसं इकडही नको!! -बैलोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सूर्य Fri, 11/21/2008 - 01:56 नवीन

चहा

चहा हा माझा वीक प्वाईंट. दिवसातुन कितीही वेळा आणि कधीही चहा पिऊ शकतो. पण चहाची चव पाहीजे तशीच लागली पाहीजे :). असो. वेगळ्या विषयावरील कथा आवडली.
  • Log in or register to post comments
म
मीनल Fri, 11/21/2008 - 02:00 नवीन

चांगली चा

ही `चा` चांगली जमली बघा शितल ताई तुमास नी. मीनल.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 11/21/2008 - 02:01 नवीन

मस्त च्या!!

आत्ताच दुपारचा च्या घेतघेत कथा वाचली! अनुभव सच्चा असलेले कथेत समजतेच. कुठलेही अलंकारिक शब्द न वापरता लिहिलेली, एकदम तुमच्या आमच्यातली, कुठल्याही घरात घडेल अशी कथा आवडली. चतुरंग
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 11/21/2008 - 02:25 नवीन

+१

कुठलेही अलंकारिक शब्द न वापरता लिहिलेली, एकदम तुमच्या आमच्यातली, कुठल्याही घरात घडेल अशी कथा आवडली.
एकदम चपलख रंगाशेठ, सहमत आहे. असेच म्हणतो .... एकदम नेटकी आणि बेश्ट कथा .... बाकी, आत्ताच रात्रीचा ऑरेंज ज्युस घेतघेत कथा वाचली! अनुभव सच्चा असलेले कथेत समजतेच. अवांतर : का हो , चहा साखरेचा चांगला की गुळाचा ??? (सगळ्या चवी आवडणारा ) छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मनस्वी Fri, 11/21/2008 - 13:07 नवीन

+१

प्रसंग किती साधा! पण त्याचे डिटेलींग मस्त केलंएस. लघुकथा आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
न
नंदन Fri, 11/21/2008 - 02:44 नवीन

सहमत आहे

कथा आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
पिवळा डांबिस Fri, 11/21/2008 - 07:12 नवीन

+१

सहमत. मलाही कथा आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
र
राघव Fri, 11/21/2008 - 19:27 नवीन

++१

सहमत आहे. मस्त कथा! आता एक "चा"हाणावाच लागेल!! :) ("चा"प्रेमी)मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
अ
अभिज्ञ Fri, 11/21/2008 - 02:36 नवीन

उत्तम

शितल, अतिशय साधी व सुंदर भाषेत लिहिलेली लघुकथा आवडली. अभिनंदन. अवांतर (फाटे)- गुळाचा चहा पण छानच होतो,फक्त गुळाला "चव" पाहिजे.;) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Fri, 11/21/2008 - 02:53 नवीन

मला वाटलं

मला वाटलं फक्त नारळाचा चव असतो... ;) (ह.घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
आ
आजानुकर्ण Fri, 11/21/2008 - 03:20 नवीन

गूळ

इनो प्रमाणेच गूळ हा शब्दही एकंदर लोकप्रिय झाला तर. आपला (गूळ आवडणारा) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
घ
घाटावरचे भट Fri, 11/21/2008 - 08:39 नवीन

+१

सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
च
चित्रा Fri, 11/21/2008 - 05:01 नवीन

छान आहे कथा

चांगलीच आहे. आवडली. चित्रा
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/21/2008 - 07:36 नवीन

कथा आवडली

ग्रामीण कथेचा बाज हाताळणार्‍या लेखिकेची लघुकथा आवडली. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 11/21/2008 - 09:20 नवीन

कथेतले

कथेतले वातावरण आवडले झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 11/21/2008 - 09:58 नवीन

चहाकथा

चहाकथा आवडली.. :) शितल, जियो.. ! इराण्याच्या चहा आपल्याला लै आवडतो... आपला, (चहाप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मैत्री Fri, 11/21/2008 - 12:23 नवीन

कथा छानच आहे.........

तुमचा च्या बाकी झाआआआआआआआआआआआक हाय बरका शीतल ताई...............!
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 11/21/2008 - 12:29 नवीन

कथा

आवडली ...
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Fri, 11/21/2008 - 12:46 नवीन

मगदुम चाच पितो

चहा... मस्त कथा. चहावरून सांगलीचा 'भगवानदास कंदी' मसाला चहा आठवला. 'आमीबी मगदुम चाच पितो' वरून आठवले - लोकप्रभा दिवाळी०८ मधला अविनाश बिनीवाल्यांचा 'चाहतसे मजबूर' हा लेख उत्तम आहे. त्यात या सांगली-जयसिंगपूरच्या मगदूम च्या वाल्यांचा उल्लेख आहे - "लायपुली नावाच्या गावात दीपा मगदुम - आता सौ. दीपा सिंह - या एका मराठी महिलेचा असाच एक चहाचा कारखाना आहे. आहे ना आपल्याला अभिमानास्पद गोष्ट?!" जिज्ञासूंनी लेख जरूर वाचावा.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 11/21/2008 - 15:18 नवीन

चहा!

लघु कथा आवडली! बाकी आपल्याला अमृततुल्यातला चहा लै आवडतो! - टिंग्या श्रीकृष्ण अमृततुल्य नळष्टाप चहा बनवणं चांगलं.....पण तो ७-८ वेळा फेकणं वाईट!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 11/21/2008 - 17:24 नवीन

शीतल ताई..

सह्ही कथा :) मला माझ्या आजोबांची आठवण आली. ह्या कथेतलं बरचसं वर्णन त्यांना तंतोतंत लागु पडतं :) आणि ते असेच चहाचे शौकीन. चहा नीट, त्यांना आवडणारा असा झाला असेल तर ठीक. नाहीतर ज्या कपबशीत चहा दिलाय, ती कपबशी आपण विसरुन जायची. पण फक्त मी केलेला कसलाही चहा मात्र ते निमुट प्यायचे बॉ.(अर्थात त्यावेळी बरंच वयही झालं होतं त्यांचं..कदाचित वयोमानापरत्वे राग कमी झाला असेल :) )
"कडक, ताज्या दुधाचा, दाटसर, गवती पात, जरा येलची पुड घातलेला, नुसत्या चहाच्या वासानंच मन तिप्त व्हावं असा....ह्या आजकालच्या पोरी च्या करत्यात म्हणं, ह्यो त्यांनी केलेला च्या पिण्या पेक्षा म्हशीच मु* पिल्याल परवाडल..!!"
:) चारदोन शब्द इकडं तिकडं असतील कदाचित...पण असंच म्हणायचे तेही! असो, छान जमलीये कथा.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 11/21/2008 - 17:37 नवीन

अरे वा

अरे वा ! चहाची कथा आवडली.. छानच आहे... -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 11/21/2008 - 18:25 नवीन

धन्यवाद !

"च्या" आवडल्याचे सांगितल्या बद्दल धन्यवाद ! :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 11/21/2008 - 19:32 नवीन

अरे वा!

छान कथा लिहिलीस. धन्यवाद! चहाचं वर्णन झकास! रेवती
  • Log in or register to post comments
ध
धमाल नावाचा बैल Fri, 11/21/2008 - 20:14 नवीन

वा मस्त

वा मस्त कथा शितलताई! च्या वाइच आवडला.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Fri, 11/21/2008 - 20:25 नवीन

चवीने पिण्याची चिज

कचेर्‍यांमध्ये नळाचा चहा आल्यापासून कचेरीत चहा बंद केला. संध्याकाळी घरी परत येताना वाटेत मस्त पैकी भटाच्या टपरीवर उभे राहुन चहा प्यायचा हे बरे. एकुण चहा ही चवीने पिण्याचे चिज आहे, समोर येइल तो गरम द्र्व चहा म्हणुन पिणे शक्य नाही कथा आवडली
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 11/21/2008 - 21:05 नवीन

च्या..

च्याची गोष्ट आवडली शीतल, छान लिहिले आहेस, स्वाती
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 11/21/2008 - 23:35 नवीन

छान लेख

लेख छान लिहिला आहे. कुठचीही स्त्री कुणालाही तिने केलेला पदार्थ आवडावा म्हणूनच करित असते.खाणार्‍याने हे लक्षात ठेवून खाल्लं, तर तिला किती आनंद होईल. ज्या घरात स्त्रीला सन्मान नाही ते घर सुसंस्कृत नसावं असं मला वाटतं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 11/22/2008 - 03:01 नवीन

मस्तच आहे

छान कथाकथन. **शेवटचे वाक्य थोडे साच्यातले आहे, जरा बदलले तर आणखी आवडेल**
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 02/05/2014 - 15:37 नवीन

गुळाचा चहा

गुळाच्या चहा ची कृती Google वर शोधताना ही कथा सापडली. मस्त आहे कथा. नंतर अजून एक छान कथा वाचायला मिळाली मग अजून एक ह्र्दयस्पर्शी कथा सापडली पण गुळाच्या चहा ची कृती अजून मिळालेली नाही ...प्रयत्न सुरु आहेत.
  • Log in or register to post comments
P
psajid Wed, 02/05/2014 - 16:53 नवीन

बाकी तुमचा चहा आवडला खूप गोड होता !

अरे ही कथा वाचताना सांगली आकाशवाणी वर लागणारी एक जाहिरात आठवत होती. अनामिक ने त्यातील एकच ओळ लिहिली आहे. ती जाहिरात अशी "राम राम दौलतराव" "राम राम" "सून बाई दोन चा टाका पाहू" "नगं नगं" "का? अवो सिवासिनीने कुकवाला आनि मर्दाने चा ला नगं म्हनू नये" "पन आमी न्हेमी मर्दांचा कडाक मग्दूम चा च पितो" " मंग आमी का उन पानी पितो काय?, आमी बी आमच्या आबा आज्ज्यापास्न मग्दूम चा च पितो" "अश्शी, मंग हून जाउद्या डब्बल" के टी मगदूम आणि कंपनी सांगली ह्यांचा उत्साहवर्धक चहा मगदूम चहा.. मग ही जिंगल... उन्हाळा, हिवाळा असो पावसाळा मगदूम चहा हवा नित्य आम्हा. टीण टीण टीण ट्याण ट्याण ट्याण ट्याण इथे कुणाला आठवते का ही जाहिरात. ( प्राजु?) हो मला आठवत आहे जशी च्या तशी ! सांगली आकाशवाणी वरून मला वाटतंय अजून एक कार्यक्रम व्हायचा. प्रभातीचे रंग नावाचा सातच्या बातम्या संपल्या कि, निवेदक प्रभातीचे रंग काही घटना, माहिती आणि माहितीवर आधारित जुन्या नव्या चित्रपटातील गीतांचा कार्यक्रम असे म्हणायचा आणि कार्यक्रमाची सुरुवात करायचा ! खूप छान होता तो कार्यक्रम सुद्धा ! बाकी तुमचा चहा आवडला खूप गोड होता !
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा