च्या भारी च्च ... आबाच्या चिकाटीला सलाम...
शेवटी आबाला त्याच्या आवडीचा च्या जमल्यावर सुन त्या च्याला छ्या म्हणेल का काय असं वाटून गेलं..
(गवती चहा) टारझन
खरच! चहा असावा तर नुसत्या आव्या दुधाचा (पाणी न घालता)... थोडं आलं घातलेला... आलं नसलं तर तुळशीची पाने घातलेला... सोबतीला थोडी वेलची कुटून घातलेली... योग्य प्रमाणात चहा पत्ती आणि अगदी थोडी साखर... मस्त बदामी रंग येई पर्यंत उकळलेला.... आहा! विचार करुनच चहा प्यायची तलप जागी झाली!
शितल तै, छोटेखानी कथा आवडली....!!!
बाकी वर लिहिल्याप्रमाणे चहा आवडत असला तरी माझी कोणत्याच चहाला ना नसते... 'च्या' आमचा वीक पॉंईंट.... म्हणतात की चहा ने झोप जाते... पण शिकायला असताना रात्री २-३ वाजता मित्रांबरोबर टवाळक्या करून झाल्यावर कोठेतरी चहाची टपरी शोधायची... नुसता पाण्याचा चहा मिळाला तरी ढोसायचा... त्या शिवाय झोपच येत नसे..... नंतर पुण्यात असताना रात्री-बेरात्री फक्त स्वारगेट किंवा शिवाजीनगर स्टेशनलाच चहाची तहान भागवायचो (कारण बाकी सगळी अमृततुल्य बंद असायची).... तसं नंतर भांडारकर रोडवर एक छोटा चहा/कॉफीचं शॉप होतं जे रात्री ३ पर्यंत तरी उघडं असायचं... मग तिथं जायचो... बोनस म्हणून तिथं हाय-फाय सोसायटीतल्या, आपापल्या बॉयफ्रेंड बरोबर आलेल्या पोरी टापायला मिळायच्या....!! मजा यायची!!!
'च्या' बद्दल बऱ्याच जणांनी लिहलय आधी... पण चहा वाचायला आणि प्यायला कधीही आवडतो...
तसंही कुठेतरी वाचलं/ऐकलं आहे ते सगळ्यांनी लक्षात ठेवावं.... "बाईनं कुंकवाला अन मर्दानं च्या ला कदी ना म्हणू नै! "
(चहाप्रेमी) अनामिक
अवांतरः निळू फुले च्या सपट च्याची आठवण आल्यापासून राहवले नाही!
अरे ही कथा वाचताना सांगली आकाशवाणी वर लागणारी एक जाहिरात आठवत होती. अनामिक ने त्यातील एकच ओळ लिहिली आहे. ती जाहिरात अशी
"राम राम दौलतराव"
"राम राम"
"सून बाई दोन चा टाका पाहू"
"नगं नगं"
"का? अवो सिवासिनीने कुकवाला आनि मर्दाने चा ला नगं म्हनू नये"
"पन आमी न्हेमी मर्दांचा कडाक मग्दूम चा च पितो"
" मंग आमी का उन पानी पितो काय?, आमी बी आमच्या आबा आज्ज्यापास्न मग्दूम चा च पितो"
"अश्शी, मंग हून जाउद्या डब्बल"
के टी मगदूम आणि कंपनी सांगली ह्यांचा उत्साहवर्धक चहा मगदूम चहा..
मग ही जिंगल...
उन्हाळा, हिवाळा असो पावसाळा मगदूम चहा हवा नित्य आम्हा.
टीण टीण टीण ट्याण ट्याण ट्याण ट्याण
इथे कुणाला आठवते का ही जाहिरात. ( प्राजु?)
ही बालपणीची जैरात आठवून दिल्याबद्दल शीतलचे आभार. छान कथा.
http://kalekapil.blogspot.com/
छोटीशी कथा आवडली. सासू-सासर्यांपैकी एकाच्या निधनानंतर सूनेलाच मागे राहिलेल्या वृद्धांची आई व्हावे लागते हे सनातन भारतीय विचारसरणीतले सूत्र अधोरेखित करणारी. वृद्ध , कठोर स्वभावाच्या सासर्याला त्याच्या वृद्धापकाळी सून त्याच्या स्वतःमधले लहान मूल शोधण्यास मदत करते हा शेवटचा प्रसंग हृदयस्पर्शी.
(थोडीशी साने गुर्जी छाप , थोडी खांडेकरी वळणाची , ग्रामीण भाषेमुळे शंकर पाटलांच्या कथेसारखी. ५०-७० वर्षांपूर्वीच्या गावातल्या वातावरणात घडणार्या या कथेत खरे म्हणजे वाचण्यासारखे काय असे कुणाला वाटू शकेल :-) पण मला नाही बुवा वाटले ...कथा आवडली. हघ्याहे सर्वांनाच सांनल ;-) )
खेड्यातल्या एखा द्या विधुर माणसाने साताठ वेळा स्वतः केलेला चहा ओतून देणे, खरेच मनाला पटत नाही. असा विक्षिप्त नवरा असल्यानेच सुलूने प्राण त्यागले असावेत असे वाटते. आणि चहात साखरे ऐवजी गूळ होता का, अशीही शंका मनाला चाटून जाते.
पण ही कथा जी एंची नसल्याने आवडली.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
सध्या गुराळांचा मोसम सुरु आहे. त्यामुळे गुळाची आठवण बरेच वेळेस येणे स्वाभाविक.
इथे नको राडा घालायला. खरोखर कथा मस्त . ती मला माझ्या लहानपणात घेउन गेली आहे. मी ती सांगली रेडियो वरची जैरात सध्या एकतोय. आणि दुपारचा चा पितोय.
गुळाचा राडा माझ्या ख.व. मध्ये मनसोक्त घाला
>>>खेड्यातल्या एखा द्या विधुर माणसाने साताठ वेळा स्वतः केलेला चहा ओतून देणे, खरेच मनाला पटत नाही
मस्ती ओ अजुन काय बोलणार, गोठ्यात चार म्हशी आहेत, शेतात उस आहे, मग दुसरे काय करणार :)
>>आणि चहात साखरे ऐवजी गूळ होता का, अशीही शंका मनाला चाटून जाते.
गुळाचा चहा दुधात केला तर तो फाटतो, मला वाटते, गुळाचा चहा करून दुसरी कडे दुध गरम करून मग तो चहात ओतत असावा.
मी एक दोनदा गुळाचा चहा केला होता लहानपणी तेव्हा तो फाटलेला कारण दुध गुळाचा चहा गरम असतानाच ओतले होते आणि उकळी काढली होती.
:)
मस्ती ओ अजुन काय बोलणार, गोठ्यात चार म्हशी आहेत, शेतात उस आहे, मग दुसरे काय करणार
अर्थकारणातील भयस्वप्नांचे लेख वाचल्यास, त्या चार म्हशींपासून आणि शेतातील उसांपासून मिळणार्या पैशांचे अवमूल्यन होणार, आणि शेवटी जगभरात गरीबी पसरणार असे चेंगट विधान ह्या म्हातार्याला कळले नसावे, हे पटतच नाही.
चहा टाकून देणे हे ह्या अर्थव्यवस्थेत शक्य नाही. १९७० च्या मंदीतही हे शक्य नव्हते, आणि १९२९ ते १९४५ पर्यंतच्या मंदीतही शक्य नव्हते. भारतातील खेड्यात तर १९३४ पासून सुरू झालेली आर्थिक दुरवस्था अद्याप कायम आहे. मग ही आर्थिक दुरवस्था असतानादेखील हा म्हातारा साताठ वेळा चहा टाकून देतो हे पटत नाही.
जपानचे मंदीच्या काळात काय झाले, हे ह्या म्हातार्याला माहित असावेच.
त्यामुळे ही कथा सत्य वाटत नाही.
असो,
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
लघुकथा आवडली तसेच मुसु व सर्केश्वरांची प्रतिसादरुपी बिस्किटे त्या चहाबरोबर नक्कीच भारी :-)
फुकट्टचा च्या प्यायला फुकटा आला होता असे दिसते. :-)
(कॉफीप्रेमी) सहज
आत्ताच दुपारचा च्या घेतघेत कथा वाचली! अनुभव सच्चा असलेले कथेत समजतेच.
कुठलेही अलंकारिक शब्द न वापरता लिहिलेली, एकदम तुमच्या आमच्यातली, कुठल्याही घरात घडेल अशी कथा आवडली.
चतुरंग
कुठलेही अलंकारिक शब्द न वापरता लिहिलेली, एकदम तुमच्या आमच्यातली, कुठल्याही घरात घडेल अशी कथा आवडली.
एकदम चपलख रंगाशेठ, सहमत आहे.
असेच म्हणतो ....
एकदम नेटकी आणि बेश्ट कथा ....
बाकी, आत्ताच रात्रीचा ऑरेंज ज्युस घेतघेत कथा वाचली! अनुभव सच्चा असलेले कथेत समजतेच.
अवांतर : का हो , चहा साखरेचा चांगला की गुळाचा ???
(सगळ्या चवी आवडणारा ) छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
कथेतले वातावरण आवडले
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
चहा... मस्त कथा.
चहावरून सांगलीचा 'भगवानदास कंदी' मसाला चहा आठवला.
'आमीबी मगदुम चाच पितो' वरून आठवले -
लोकप्रभा दिवाळी०८ मधला अविनाश बिनीवाल्यांचा 'चाहतसे मजबूर' हा लेख उत्तम आहे.
त्यात या सांगली-जयसिंगपूरच्या मगदूम च्या वाल्यांचा उल्लेख आहे -
"लायपुली नावाच्या गावात दीपा मगदुम - आता सौ. दीपा सिंह - या एका मराठी महिलेचा असाच एक चहाचा कारखाना आहे.
आहे ना आपल्याला अभिमानास्पद गोष्ट?!"
जिज्ञासूंनी लेख जरूर वाचावा.
सह्ही कथा :)
मला माझ्या आजोबांची आठवण आली. ह्या कथेतलं बरचसं वर्णन त्यांना तंतोतंत लागु पडतं :)
आणि ते असेच चहाचे शौकीन. चहा नीट, त्यांना आवडणारा असा झाला असेल तर ठीक. नाहीतर ज्या कपबशीत चहा दिलाय, ती कपबशी आपण विसरुन जायची. पण फक्त मी केलेला कसलाही चहा मात्र ते निमुट प्यायचे बॉ.(अर्थात त्यावेळी बरंच वयही झालं होतं त्यांचं..कदाचित वयोमानापरत्वे राग कमी झाला असेल :) )
"कडक, ताज्या दुधाचा, दाटसर, गवती पात, जरा येलची पुड घातलेला, नुसत्या चहाच्या वासानंच मन तिप्त व्हावं असा....ह्या आजकालच्या पोरी च्या करत्यात म्हणं, ह्यो त्यांनी केलेला च्या पिण्या पेक्षा म्हशीच मु* पिल्याल परवाडल..!!"
कचेर्यांमध्ये नळाचा चहा आल्यापासून कचेरीत चहा बंद केला. संध्याकाळी घरी परत येताना वाटेत मस्त पैकी भटाच्या टपरीवर उभे राहुन चहा प्यायचा हे बरे. एकुण चहा ही चवीने पिण्याचे चिज आहे, समोर येइल तो गरम द्र्व चहा म्हणुन पिणे शक्य नाही
कथा आवडली
लेख छान लिहिला आहे.
कुठचीही स्त्री कुणालाही तिने केलेला पदार्थ आवडावा म्हणूनच करित असते.खाणार्याने हे लक्षात ठेवून खाल्लं, तर तिला किती आनंद होईल.
ज्या घरात स्त्रीला सन्मान नाही ते घर सुसंस्कृत नसावं असं मला वाटतं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
गुळाच्या चहा ची कृती Google वर शोधताना ही कथा सापडली. मस्त आहे कथा.
नंतर अजून एक छान कथा वाचायला मिळाली
मग अजून एक ह्र्दयस्पर्शी कथा सापडली
पण गुळाच्या चहा ची कृती अजून मिळालेली नाही ...प्रयत्न सुरु आहेत.
अरे ही कथा वाचताना सांगली आकाशवाणी वर लागणारी एक जाहिरात आठवत होती. अनामिक ने त्यातील एकच ओळ लिहिली आहे. ती जाहिरात अशी
"राम राम दौलतराव"
"राम राम"
"सून बाई दोन चा टाका पाहू"
"नगं नगं"
"का? अवो सिवासिनीने कुकवाला आनि मर्दाने चा ला नगं म्हनू नये"
"पन आमी न्हेमी मर्दांचा कडाक मग्दूम चा च पितो"
" मंग आमी का उन पानी पितो काय?, आमी बी आमच्या आबा आज्ज्यापास्न मग्दूम चा च पितो"
"अश्शी, मंग हून जाउद्या डब्बल"
के टी मगदूम आणि कंपनी सांगली ह्यांचा उत्साहवर्धक चहा मगदूम चहा..
मग ही जिंगल...
उन्हाळा, हिवाळा असो पावसाळा मगदूम चहा हवा नित्य आम्हा.
टीण टीण टीण ट्याण ट्याण ट्याण ट्याण
इथे कुणाला आठवते का ही जाहिरात. ( प्राजु?)
हो मला आठवत आहे जशी च्या तशी !
सांगली आकाशवाणी वरून मला वाटतंय अजून एक कार्यक्रम व्हायचा. प्रभातीचे रंग नावाचा सातच्या बातम्या संपल्या कि, निवेदक प्रभातीचे रंग काही घटना, माहिती आणि माहितीवर आधारित जुन्या नव्या चित्रपटातील गीतांचा कार्यक्रम असे म्हणायचा आणि कार्यक्रमाची सुरुवात करायचा ! खूप छान होता तो कार्यक्रम सुद्धा !
बाकी तुमचा चहा आवडला खूप गोड होता !
प्रतिक्रिया
शीतल, मस्त
मस्तच ! 'तू'
ए क णं ब र
लघुकथा
खरच! चहा
मगदूम चहा
आम्हाला आठवली हो मग्दूम चा ची जैरात!
सरस्वती चहा
सरस्वती चा
मला ही माहित आहे ती जाहिरात.
कथा
चहा ओतून देणे
गुळाची आठवण
असेच
खी... :)
पटत नाही
:)
लघुकथा आवडली
>>फुकट्टचा
चहा
चांगली चा
मस्त च्या!!
+१
+१
सहमत आहे
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
++१
उत्तम
मला वाटलं
गूळ
+१
छान आहे कथा
कथा आवडली
कथेतले
चहाकथा
कथा छानच आहे.........
कथा
मगदुम चाच पितो
चहा!
शीतल ताई..
अरे वा
धन्यवाद !
अरे वा!
वा मस्त
चवीने पिण्याची चिज
च्या..
छान लेख
मस्तच आहे
गुळाचा चहा
बाकी तुमचा चहा आवडला खूप गोड होता !