इतका सुरेख धागा पुन्हा वरती काढल्यापद्धल.
किचकट विषयांचे आंजावरील लेख बहुतेक वेळा इंग्रजीत असल्याने समजायला कठीण असतात. पण तेच सहज सोप्या मराठीत वाचल्यावर त्यातुन बरीच माहिती मिळते.
धन्यवाद आदिती. छान लिहिले आहे.
'स्वॅप्स'च्या प्रश्नाबद्दल -
मला चांगले फोटो चटकन सापडले नाहीत, त्यामुळे शब्दातच मांडायचा प्रयत्न करते.
त्याचा प्रश्न असा आहे की या दुर्बिणी ३० किमी अंतरावर पसरलेल्या आहेत. म्हणजे दोन स्वतंत्र अँटेनांमधलं अंतर जास्तीतजास्त ३० किमी आहे. या परिसरात एकूण ३० दुर्बिणी आहेत. त्यात पृथ्वीच्या परिवलनाचा (स्वतःभोवती फिरणं) फायदा घेऊन जास्तीतजास्त फायदा कसा होतो?
याचं उत्तर असं -
समजा आपल्या डोक्यावर एक वस्तू तरंगती ठेवली. आपल्याला या वस्तूच्या बुडाकडचाच भाग दिसेल; पण तिच्या बाजूला काय आहे हे दिसणार नाही. मग आपण आपली खुर्ची थोडी सरकवून एका बाजूला घेतली, तर कडेचा थोडा आणि बुडाचा थोडा भाग दिसेल. पृथ्वीच्या परिवलनामुळे अगदी हेच होतं. खुर्ची सरकवण्याऐवजी पृथ्वी हलते, त्यामुळे दुर्बीणींची आकाशातल्या ठराविक वस्तूकडे बघण्याची दिशा बदलते.
समजा आपण पृथ्वीपासून लांब अंतरावर आहोत. आणि लांबून या दुर्बीणीकडे पाहिलं, तर दुर्बीणी एका ठराविक ठिकाणी दिसतील. मग पुन्हा थोड्या वेळाने पाहिलं तर त्यांचं configuration तेच दिसेल. पण जागा हललेली असेल. एकूण ३० किमी व्यासाच्या परीघात ३० दुर्बिणी तशाच राहिल्या, पण त्यांची या वर्तुळातली जागा बदलली. त्यातून एकसंध, ३० किमी व्यासाची दुर्बीण वापरल्याचा परिणाम साधता येतो.
खालचं चित्र पहा, यात एक सेकंद दुर्बीण वापरली तर एका अँटेनाचा एक असे तीस ठिपके दिसतील. पृथ्वीच्या परिवलनामुळे अँटेनांची जागा बदलते, आणि सलग काही तासांनंतर पाहिलं तर सगळे ठिपके मिळून चित्र भरायला लागतं.
ही चार चित्रं निरनिराळी दिसतात, ती बघण्याच्या दिशेमुळे. बऱ्यापैकी उत्तरेला असणारी वस्तू बघितली जात असेल तर वरची दोन चित्रं योग्य आहेत. दुर्बीण खूपच क्षितीजाजवळच्या वस्तूकडे पाहत असेल तर तिसरं/चौथं चित्र बनेल. (दुर्दैवाने या प्रतिमेमधे कोणती वस्तू आणि तिचं आकाशातलं स्थान नीट वाचता येत नाहीये.)
ते चित्र जेवढं काळं तेवढं प्रतिमा बनवण्यासाठी जास्त विदा गोळा झालेला असतो.
फारच छान माहिती. या दुर्बिणीच्या विशिष्ट आकारामुळे जास्तीत जास्त परिक्षेत्रावरील प्रारणे ग्रहण करणे आणि संवेदनशील अॅन्टेनांमुळे उच्च दर्जाची कोनीय पृथक्करणक्षमता असणे ह्या दोन बाबी खगोलनिरीक्षकांसाठी फारच उपयुक्त ठरतात. दुर्बिणीचा आकार आणि पृथ्वीचे परिवलन यामुळे एकाच २५ किमी व्यासाच्या दुर्बिणीइतकीच क्षमता जीएमआरटीला प्राप्त झाली आहे. खासकरून तू धुंडाळून आणलेल्या ह्या आकृत्या ही बाब छानपैकी स्पष्ट करतात. त्याबद्दल विशेष आभार.
वादाबद्दल मला वाचल्याचे आठवते त्याप्रमाणे जीएमआरटीचे स्थान कुठे असावे यावरून नाही, तर जीएमआरटीचा वापर पृथ्वीव्यतिरिक्तच्या अंतराळात जीवसृष्टी असण्याच्या शक्यतेचा मागोवा घेण्यासाठी करावा की नाही अशा स्वरूपाचा वाद होता. त्यामागील भूमिका महत्त्वाच्या, भूमिकांचे पुरस्कर्ते कुणी का असेनात. असो.
(अवांतर - याच वादाची फोडणी स्वतःच्या मसाल्यात घालून मनू जोसेफ यांनी लिहिलेली "सिरिअस मेन" ही उपहासात्मक विनोदी कादंबरी कदाचित कुणाला वाचायला आवडेल.)
जीएमआरटीचा वापर पृथ्वीव्यतिरिक्तच्या अंतराळात जीवसृष्टी असण्याच्या शक्यतेचा मागोवा घेण्यासाठी करावा की नाही अशा स्वरूपाचा वाद होता.
मग मला हे "गॉसिप" अजिबातच माहित नाही. (याबद्दल आमच्या गप्पा, मित्रांची टांग खेचणं इतपतच मर्यादित असायच्या.)
जीएमआरटीमधून पीएच.डी. करणारा माझा एक मित्र 'सेटी' (Search for Extra-Terrestrial Intelligence) वर काम करत होता. अर्थातच त्याला त्यापैकी उल्लेखनीय काही सापडलं नाही, पण 'सेटीवर काम करणारा एकमेव भारतीय वैज्ञानिक' अशा शीर्षकाचा, त्याच्या कामाबद्दल असणारा लेख 'टाईम्स अॉफ इंडिया'त छापून आला होता. (बाकीचं त्याचं काम पल्सार्सबद्दल आहे, आणि व्यक्तिशः मला ते जास्त रोचक वाटतं.) या कादंबरीबद्दल त्यालाही सांगितलं पाहिजे.
एका अवघड विषयाची सोप्या शब्दात ओळख
अजून येउदे ,
कोणी ४ तारे नक्षत्र सांगणारा कधी तरी एखाद्या गडावर भेटतो ,तेव्हा तो काय सांगेल आणि त्यातील काय लक्षात राहील तेव्हढीच या विषयाशी ओळख आहे
डॉक्टर स्वरूप यांच्या बद्द्ल हि लिहा.
जी एम आर टी ही "वन मिटर वेव्ह लेंग्थ" श्रेणीतली जगातली सर्वात मोठी अन आधुनिक दुर्बिण असल्याचे वाचले होते, हे खरे आहे का ?
अशी एक अभिमानास्पद गोष्ट आहे भारतीयांसाठी ती म्हणजे " द हानले ऑब्झर्व्हेटरी, लडाख , जमु कश्मीर, भारत"
ही एक ऑप्टीकल दुर्बीण आहे जी पुर्ण पणे रीमोट ऑपरेटेड आहे, तिथे फक्त १५ दिवसातुन एकदा लोकल लडाखी स्टाफ मेंटेनेन्स च्या कामाला जातो, धुळविरहीत वातावरण अन कोल्ड डेझर्ट च्या वातावरणामुळे हानले स्थापन करण्यात आली, तिचे नियंत्रण चक्क कर्नाटकातल्या "हासन" इथल्या मास्टर कंट्रोल फॅसीलिटी (एम सी एफ) मधुन होते
जी एम आर टी ही "वन मिटर वेव्ह लेंग्थ" श्रेणीतली जगातली सर्वात मोठी अन आधुनिक दुर्बिण असल्याचे वाचले होते, हे खरे आहे का ?
आता हे फारसं खरं नाही. GMRT चा विकास सुरू झाला या गोष्टीला आता दोन दशकं लोटली आहेत. मधल्या काळात दुर्बिणीवर काही काम केलंच नाही असं नाही; पण जुन्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी अद्ययावत ठेवण्यापेक्षा कधीकधी पूर्ण नवीन गोष्टच बनवणं सोपं पडतं. या दशकाच्या सुरूवातीला, नेदरलंड्समधे LOFAR नावाची नवीन दुर्बिण सुरू झाली; ती GMRT पेक्षा अधिक अद्ययावत आणि मोठी आहे. त्यांचा सध्याचा मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे विदागाराचा. एका observation run मधे जमा होणारा विदा साठवून, तो जगात जिथे कुठे संशोधक बसला असेल तिथे पाठवणं तापदायक होतं आहे. त्यामुळे त्यांनी मिळालेल्या विदेतून वापरण्यास योग्य अशा प्रतिमा मिळवण्यात automation सुरू केलं आहे. GMRT मधे अशी एक प्रतिमा बनवायला, वेळेस दोन-दोन आठवडे (आणि बरीच mental sanity) जाते.
१९७० च्या दशकात बनवलेली VLA नामक अमेरिकन दुर्बीण आता कात टाकते आहे आणि ती सुद्धा अद्ययावत होत आहे. GMRT अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे; हे प्रोजेक्ट पूर्ण होईल तेव्हा ती बरीच जास्त कालसुसंगत होईल.
पण आहे तीच GMRT वापरून तीन वर्ष, पूर्ण आकाशाचा सर्व्हे करण्याची निरीक्षणं पूर्ण होत आहेत. यासाठी आवश्यक असणारी ढोरमेहेनेत पूर्ण होईल तेव्हा GMRT ची पत बरीच जास्त वाढेल, अशी आशा मला वाटते.
---
हानलेची जी दुर्बिण आहे ती अवरक्त प्रकाशात काम करते; अधिकतर त्यात. पण ही दुर्बिण एकमेवाद्वितीय वगैरे नाही. हिचा आकार बराच लहान आहे, त्यातून फार काही पथप्रदर्शी, नवीन विज्ञान-संशोधन होत नाही; पण भारतीय खगोल-संशोधकांच्या पिढीला शिक्षणासाठी याचा बराच उपयोग आहे. गोविंद स्वरूपांनी त्यांच्या वयाच्या तिशीत दुर्बिणी बांधायला सुरूवात केली तेव्हा साठीत आल्यावर GMRT बनवण्याची ताकद अभियंत्यांमधे आणि वापरण्याची ताकद खगोलसंशोधकांमधे आली.
बहुतांश दुर्बिणी लांबूनच चालवल्या जातात; प्रत्यक्ष दुर्बिणीपाशी बसून काम करण्याचं प्रमाण आता, जगभरच बरंच कमी होत आहे. त्यात भारत आणि भारतीय दुर्बिणीही आल्याच.
१. "ढोरमेहेनेत" हा शब्द ढोरमेहेनत असा वाचावा.
२. रेडीओ दुर्बिणीच्या आकारामुळे जेवढी देखभाल करावी लागते, तेवढे कष्ट दृष्य आणि अवरक्त दुर्बिणींसाठी होत नसावा, असा अंदाज. पण मी कधीही दृष्य/अवरक्त दुर्बिणी असतात अशा संस्थेत काम केलं नाही, त्यामुळे हा फक्त अंदाजच.
गोविंद स्वरूप सारखे वैज्ञानिक आपलं मत देतात परंतु एकदा सरकारी निर्णय झाला की त्यानंतर मात्र त्याविषयी बोलणार नाहीत .
खोडद का भोपाळ अथवा इतर काही तांत्रिक मुद्दयांची चर्चा आता पुन्हा उकरून काढणार नाहीत असं मला वाटतं . त्यामुळे तो वाद काय होता हे गौण झाले आहे असे मानू .
ही बातमी वाचली आणि हा धागा आठवला.
http://timesofindia.indiatimes.com/india/ECILs-giant-telescope-to-be-transported-to-Ladakh/articleshow/37160036.cms
Similar telescopes set up in Namibia, Europe and US have been realized by collaborative efforts of multiple institutions, whereas, the present MACE Telescope has been designed and realized from conceptual stage to trial assembly stage by ECIL, Hyderabad with technology support from BARC
जगातली दुसर्या क्रमांकाची गॅमा किरण दुर्बिण लडाखला बसवताहेत. भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन!
ताऱ्याचा अंत झाल्यावर त्यातून 'पल्सार' हा स्वत:भोवती वेगाने फिरणारा घटक निर्माण होतो.. हा खगोलशास्त्रीय सिद्धांत शास्त्रज्ञांना ठाऊक आहे. पण पल्सारची निर्मिती होताना ती प्रत्यक्ष टिपण्याची अतिशय दुर्मीळ कामगिरी भारतीय दुर्बीण, संस्था आणि शास्त्रज्ञांच्या पथकाने करून दाखवली आहे.. पृथ्वीपासून तब्बल ४५०० प्रकाश वर्षे दूरवर असेलेल्या पल्सारची निर्मिती सुरू आहे. ती या पथकाने पुणे जिल्ह्य़ातील खोडद येथील 'जाएंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप' (जीएमआरटी) या दुर्बिणीतून टिपली आहे.
जगात यापूर्वी केवळ दोन वेळा अशी घटना टिपण्यात यश आले होते. आताच्या घटनेचे वैशिष्टय़ असे की, ती भारतीय महादुर्बीण, भारतीय संस्था आणि भारतीय शास्त्रज्ञांनी टिपली आहे. पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स (एनसीआरए) या संस्थेचे डॉ. जयंत रॉय यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली. त्यात याच संस्थेचे प्रो. जयराम चेंगालूर, ब्रिटनमधील डॉ. बेन स्ट्रापर्स, अमेरिकेतील डॉ. पॉल रे, डॉ. भासवती भट्टाचार्य यांचाही समावेश आहे.
'पल्सार' म्हणजे स्वत:भोवती अतिशय वेगाने फिरणारा खगोलीय घटक. ताऱ्याचा अंत झाल्यानंतर त्यांची निर्मिती होते. ते ताऱ्याचीच ऊर्जा वापरून गती प्राप्त करतात. खोडद येथील महादुर्बिणीतून निरीक्षण करत असताना या शास्त्रज्ञांना ४५०० प्रकाशवर्ष दूर अंतरावर असलेल्या ताऱ्यापासून पल्सारची निर्मिती होत असलेली दिसली. ही निर्मितीची प्रक्रिया काही महिन्यांपासून सुरू झाली असून, ती पुढे काही वर्षे सुरू राहण्याची शक्यता आहे.
palsar450 ताऱ्यातून ऊर्जा मिळवून स्वत:ची गती वाढवणाऱ्या 'पल्सार'चे चित्र. प्रचंड वेगाने फिरणाऱ्या (मध्ये चमकणाऱ्या) पल्सारपासून रेडिओ बीम व प्रचंड ऊर्जा असलेले वारे निर्माण होत आहेत. ते शेजारच्या ताऱ्याला (उजवीकडील) नष्ट करत आहेत.(सौजन्य- 'नासा'चे गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर)
फोटो पाहण्यासाठी पहा लोकसत्ता: भारतीय दुर्बीण अन् शास्त्रज्ञांनी विश्वातील अद्भुत घटना टिपली
प्रतिक्रिया
धन्यवाद एक्का काका.
ते श्रेय बहुगुणीं यांचे.
'स्वॅप्स'च्या प्रश्नाबद्दल -
धन्यवाद अदिती
जीएमआरटीचा वापर
खोडदच्या दुर्बिणीवरील अजून एक
मी अद्यापही डॉ.स्वरुपांबरोबर
जरूर लिहा. वाचायला नक्की
जायंट मीटरवेव्ह रेडीओ टेलिस्कोप
जी एम आर टी ही "वन मिटर वेव्ह
वा ! खरंच अभिमानास्पद आणि
जी एम आर टी ही "वन मिटर वेव्ह
१. "ढोरमेहेनेत" हा शब्द
गोविंद स्वरूप सारखे वैज्ञानिक
MACE दुर्बिण
विश्वातील अद्भुत घटना