✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जायंट मीटरवेव्ह रेडीओ टेलिस्कोप

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
Sat, 07/26/2008 - 17:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
40433 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Sat, 07/26/2008 - 18:53 नवीन

या

या दुर्बिणीबद्दल आपल्या सर्वांना अभिमान वाटण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे फक्त या डिश अँटेनाच नाही तर संपूर्ण इलेकक्ट्रॉनिक्सही भारतात, भारतीय अभियंत्यांनीच तयार केले आहे. खरोखर अभिमान वाटावा असा शोध ! एका किलिष्ट विषयाबद्दल सरळ साध्या सोप्या मराठी मध्ये छान माहीती !!!! आवडले... अजून लिहा.... तारे व आकाश ह्याचे वेड लहानपणापासूनच .. पण फक्त रात्री साध्या डोळ्याने आकाश बघणे ईतकंच प्रेम आमचं ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 07/26/2008 - 19:24 नवीन

अरे

अरे व्वा,,जबरदस्तच आहे हे सर्व आणि सर्व भारतीय बनावटीचं ही तर अभिमान वाटावा अशीच गोष्ट आहे.. (खगोल प्रेमी) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 07/27/2008 - 01:57 नवीन

सहमत...

अरे व्वा,,जबरदस्तच आहे हे सर्व आणि सर्व भारतीय बनावटीचं ही तर अभिमान वाटावा अशीच गोष्ट आहे.. सहमत आहे! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 07/26/2008 - 19:45 नवीन

खूपच छान

खूपच छान माहिती आहे. जी.एम.आर.टी. बद्दल थोडी थोडी माहिती होती, तुम्ही एवढी बैजवार माहिती आणि एवढ्या सोप्या शब्दात दिली त्यामुळे तुमचे कौतुक आणि धन्यवाद. काही प्रश्नांची उत्तरे मिळाली तर आवडेल. ०१. एन.सी.ए.आर. चे कार्यालय पुणे विद्यापीठात आहे का? ०२. जर लहान मुलांना न्यायचे असेल तर शक्य आहे का? साधारण १२ वर्ष वयातील मुलं. ०३. तिथे मुलांना समजेल अश्या भाषेत काही माहिती मिळेल असा काही उपक्रम आहे का? बिपिन.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 07/26/2008 - 20:06 नवीन

जरुर

०१. एन.सी.ए.आर. चे कार्यालय पुणे विद्यापीठात आहे का? हो! विद्यापीठाच्या खडकीच्या बाजूला जे फाटक आहे, तिथून २ मिनीटांवर एन.सी.आर.ए. आहे (आयुकाच्या समोर, रस्त्याच्या दुसय्रा बाजूला). ०२. जर लहान मुलांना न्यायचे असेल तर शक्य आहे का? साधारण १२ वर्ष वयातील मुलं. जी.एम.आर.टी. मधे त्यांना जरूर न्या. एन.सी.आर.ए. मधे त्यांना फक्त लेक्चर देता येईल; पण प्रत्यक्ष बघण्याचा आनंद नाही. साधारण ८ वीच्या पुढच्या मुलांना (आणि बाकी सर्वांनाच) जनरल खगोलशास्त्राबद्दलही काही सांगता येईल. तुम्हाला जर तिथे मुलांना घेऊन जायचं असेल आणि इतरही मागणी असेल तर काही स्पेशल सहल काढता येईल का याची मी चौकशी करू शकते. आणि तुम्हाला मराठीतून माहिती हवी असेल तर आपल्या सर्वांच्या सोयीने आपण काहीतरी करू शकतो. ०३. तिथे मुलांना समजेल अश्या भाषेत काही माहिती मिळेल असा काही उपक्रम आहे का? सध्यातरी नाही; पण शाळेची सहल काढली तर थोडे प्रयत्न करून काहीतरी नक्कीच मॅनेज करता येईल. पुढचं वर्ष आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्ष जाहिर झालं आहे. त्यामुळे आता काही दिवसात (किंवा महिन्यात) एन.सी.आर.ए. प्लॅनींग सुरू होईल, लोकांपर्यंत खगोलशास्त्र आणि विषेशतः जी.एम.आर.टी. पोहोचवण्यासाठी काय करता येईल ते ... त्यामुळे आपले सर्वांचे प्रतिसाद, मतं आले तर आम्हाला त्याचा फायदा होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 07/26/2008 - 19:53 नवीन

छान !!!

रेडियो दुर्बीणीचे जनक डॉ. गोविंद स्वरूप आहेत आणि भारतीय अभियंत्यानीच अशा दुर्बीणीचा विकास केला आहे. ही अभिमानाची गोष्ट. माहितीपूर्ण लेखाबद्दल आभारी !!! एका किलिष्ट विषयाबद्दल सरळ साध्या सोप्या मराठी मध्ये छान माहीती !!!! अस्सेच म्हणतो. आकाश निरिक्षण काही कळत नसतांना अनेकदा चंद्रावरील खड्डे, मंगळ, शनी, तार्‍यांचा पाठलाग करत अनेक रात्री घातल्या आहेत. ( विमानाच्या चमकणार्‍या लाइटांचाही पाठलाग केला आहे. ) -दिलीप बिरुटे (टेलिस्कोप १०० मी.मी. / १००० मी.मी ने आकाश भ्रमण करणारा )
  • Log in or register to post comments
अ
अरुण वडुलेकर Sat, 07/26/2008 - 20:36 नवीन

खूपच छान .....

........आणि उद् बोधक माहिती. कांही दिवसांपूर्वीच जुन्नर जवळील ओझर आणि लेण्याद्रीला जात असतांना त्या डिश एन्टेना (दूरूनच) पाहिल्या.त्या कशाच्या आहेत हे कुतुहल कोणी स्थानिक रहिवाशी शमवू शकला नाही. तुम्ही ती महिती दिलीत.धन्यवाद. तरीही एक कुतुहल बाकी आहे.त्या डिश त्यांचा आकाशाकडील कोन बदलतांनाही दिसत होत्या. ते कशासाठी? ((या दुर्बिणीबद्दल आपल्या सर्वांना अभिमान वाटण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे फक्त या डिश अँटेनाच नाही तर संपूर्ण इलेकक्ट्रॉनिक्सही भारतात, भारतीय अभियंत्यांनीच तयार केले आहे. आणि याच्याच अनुभवातून अरेसिबो या पोर्टो रिको मधल्या रेडिओ दुर्बिणीचं इलेकक्ट्रॉनिक्स थोड्या प्रमाणात बदललं गेलं. )) ही माहिती वाचून त्या अभियंत्यांचा अभिमान वाटला.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 07/26/2008 - 20:50 नवीन

एकाचाच पाठलाग करण्यासाठी...

त्या डिश त्यांचा आकाशाकडील कोन बदलतांनाही दिसत होत्या. ते कशासाठी? एकाच वस्तूकडे उदा: देवयानी दीर्घिका, जर काही तास पहायचं असेल तर अँटेना फिरवाव्या लागतात. नाहीतर सोर्स एकीकडे आणि अँटेना भलतीकडे असं व्हायचं. शिवाय अधून मधून काही स्टँडर्ड सोर्स आहेत त्यांच्याकडे पहावं लागतं. आपल्याला रस आहे त्या वस्तूकडून किती उर्जा येत आहे ते कॅलिबरेट करण्यासाठी! किंवा एका वस्तूकडे पाहून पूर्ण झालं किंवा ते ऑब्जेक्ट क्षितीजाजवळ आलं की दुसय्राकडे बघतात. म्हणूनच असेल ... अगदी क्वचित, जर फार वारा आला तर मात्र अँटेना मोडू नयेत म्हणून फिरवाव्या लागतात. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण वडुलेकर
ट
टारझन Sat, 07/26/2008 - 23:17 नवीन

एक नंबर ग .

संहिता , खगोलिय अभ्यास हा शास्त्रिय झाला की बोर होतं, ते नुसत बघणे , आणि मजा घेणे यात आनंद मिळतो , पण तु तर कमाल केलीस .. मस्त डिस्क्राईब केलंस. आपल्या भाषेत प्रत्येक ईंग्लिश शब्दाला ऊपशब्द सापडेल असं नाही, पण तु नॉन सायंस पब्लिक ला पण समजेल अशा भाषेत लिहीलय. अवांतर : मला त्या दुर्बिणींमधे शिरून आत काय आहे याची ऊत्सूकता आहे. आम्ही तुझे नातेवाईक म्हणून आत प्रवेश मिळवू शकतो का ? दुर्बिन तुटली तर जोडून देईल मी फेव्हिक्विक ने ! कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 07/27/2008 - 05:47 नवीन

दिव्स निघून गेले! आठवणी मात्र येतात!

अदितीने अतिशय कल्पकतेने आणि जरूरी प्रमाणे टेकनीकल शब्द वापरून कुणालाही वाचायला इंटरेस्ट येईल अशा शब्दात हा रेडिओ एस्ट्रॉनॉमीचा क्लिष्ट विषय विशद करून लिहिला आहे.वाचून बरं वाटलं.अभिनंदन. जाता जाता--- डॉ.गोविंद स्वरूप यानी "रेडिओ एस्ट्रॉनॉमी" चा नव्याने सेक्शन स्थापन केला त्यावेळी मी मॅगनॅटो-हायड्रो-डायनामिक्स, म्हणजेच प्लाझ्मा पिझिक्स,ह्या विषयावर tifr मधे संशोधन करीत होतो तेव्हा प्रो.मेनन यांच्या सुचनेनुसार मी व श्री.एस.एस.भावे मिळून डॉ.स्वरूपना जॉईन झालो होतो.मी टेकनीकल एसीस्टंट म्हणून आणि भावे रिसर्च एसीस्टंट म्हणून.भाव्यानी आपला सहभाग चालूच ठेवला पण मी पुन्हा प्रो.मेनन यांच्या सांगण्यावरून CDC 3600 ह्या मेन फ्रेम कंप्युटर वर काम करू लागलो.नंतर मला आणखी मोठ्या मेन फ्रेम Cyber कंप्युटरवर ट्रेनींग साठी अमेरिकेत मिनियापोलीस मिनेसोटा स्टेट मधे एक वर्षाच्या ट्रेनींग साठी tifr ने पाठवलं. हे सर्व लिहिण्याचा प्रपंच एव्हड्यासाठी की अदितीने लेखात लिहिलेल्या डिश एनटेना आणि त्या संबधाने लागणार्‍या इलेक्ट्रॉनीक्सच्या विषयाच्या टेबलावरच्या योजनांच्या प्रक्रियेत माझा अल्प असा सहभाग होता.नारायणगावाला डॉ.स्वरुपांबरोबर आमच्या बर्‍याच ट्रिपा व्हायच्या.ते आठवलं. दिवस निघून जातात पण आठवणी मात्र येतात.एव्हडंच. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 07/27/2008 - 20:27 नवीन

पब्लिक डिमांड

आता तुम्ही डॉ. स्वरुपांबद्दलच्या अनुभवांबद्दल लिहाच. तुम्हाला छायाचित्र हवं असल्यास मी पुरवते. आणखी एक सांगण्याजोगी गोष्ट म्हणजे: गेल्याच वर्षी, सप्टेंबरमधे, जॉड्रल बँक ऑब्झव्हेटरीमधे (मँचेस्टर, यू.के), डॉ. गोविंद स्वरूप यांना ग्रोट रीबर सुवर्ण पदक मिळाले. ग्रोट रीबर म्हणजे पहिला खगोलशास्त्रज्ञ ज्याने एक चौरस किमी क्षेत्रफळाची सर्वात पहिली रेडीओ दुर्बिण बनवली. माझ्या सुदैवाने हा सोहळा मला पाहता आला कारण तिथेच माझं माहेर ... (आम्ही मुली जिथे पी. एचडी. करतो त्याच जागेला माहेर म्हणतो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत
ड
डॉ.प्रसाद दाढे Sun, 07/27/2008 - 10:32 नवीन

फार छान लेख

सु॑दर लेख! भारतीय अभिय॑त्या॑नी तयार केलेल्या जी.एम.आर.टी बद्दल ता॑त्रिक माहिती वाचून आन॑द झाला. आपले मिपाकर साम॑तकाकापण त्या चमूत होते हे वाचून दुप्पट आन॑द झाला. त्या महाकाय दूर्बिणी॑चे छायाचित्रही दिले असते तर बरे झाले असते. माझे एक वास्तूशास्त्रज्ञ मित्र श्री. रवि॑द्र जोग या॑चा त्या दूर्बिणी॑च्या बा॑धकामात मोठा सहभाग आहे. वाचायला सुरूवात करण्यापूर्वी: या लेखातली भाषा बोजड असू शकते आणि विज्ञानाची आवड नसणाय्रांसाठी हा लेखच कंटाळवाणा असेल. तर या प्रमादांबद्दल आधीच क्षमा मागते. यमूताई, क्षमा वगैरे मागायची काही जरूर नाही हो, मिपावर पुष्कळ विज्ञानप्रेमी आहेत (बुद्धिमान अभिय॑तेसुद्धा आहेत). अशी ता॑त्रिक माहिती इतक्या लालित्यपूर्ण मराठीत वाचायला मिळते आहे! तुम्ही खूप छान लिहिता, आणखी लिहा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 07/27/2008 - 18:01 नवीन

अशी

अशी ता॑त्रिक माहिती इतक्या लालित्यपूर्ण मराठीत वाचायला मिळते आहे! तुम्ही खूप छान लिहिता, आणखी लिहा. प्रसादरावांशीदेखील सहमत आहे. अदिती, येऊ दे अजूनही! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
स
सहज Mon, 07/28/2008 - 14:24 नवीन

+१

असेच म्हणतो उत्तम लेख लिहल्याबद्दल लेखीकेला धन्यवाद व अजुन असेच लेख लिहीत जावे अशी विनंती. अवांतर- पुणेकर मिपाकरांनी आवर्जुन ह्या संस्थेला भेट देण्याचा कार्यक्रम आखावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
स्वाती दिनेश Sun, 07/27/2008 - 11:19 नवीन

वा!

सु॑दर लेख! भारतीय अभिय॑त्या॑नी तयार केलेल्या जी.एम.आर.टी बद्दल ता॑त्रिक माहिती वाचून आन॑द झाला. आपले मिपाकर साम॑तकाकापण त्या चमूत होते हे वाचून दुप्पट आन॑द झाला. असेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 07/27/2008 - 11:34 नवीन

चांगली

चांगली माहिती अजुन येवु द्या नाना
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 07/27/2008 - 17:54 नवीन

शास्त्रीय

शास्त्रीय माहिती सोप्या शब्दात... धन्यवाद... दुर्दैवाने, त्यांच्याबद्दल लिहिणारा विसोबा खेचर अजून त्यांना भेटलेला नाही असं दिसतंय. पण आपले मिपाकर सामंतकाका डॉ. स्वरूप यांच्याविषयी व्यक्तिचित्रात्मक लेख लिहितील की... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 07/27/2008 - 20:04 नवीन

वाहावा!

तांत्रिक विषय रंजक करून सांगितलात. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 07/28/2008 - 02:11 नवीन

अभिनंदन!

एका सहसा अपरिचित विषयावर लिहिलेला माहितीपूर्ण लेख!! मी या लेखात खूप इंग्लिश शब्द वापरले आहेत. आणि काही ठिकाणी इंग्रजी वाक्यांचं मराठी भाषांतर झालं आहे. तेव्हा प्रतिशब्द /सूचनांचं स्वागतच आहे. एकच सूचना, जरी इंग्रजी शब्द वा भाषांतर अपरिहार्य असलं तरी असं लिखाण चालूच ठेवा. आशय वाचकांपर्यंत पोचण्याला इथे जास्त महत्व आहे.... अशा प्रकारच्या वैद्यानिक विषयांवरचे लेख मराठीत अधिकाधिक यायला हवेत!!! पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 07/30/2008 - 05:19 नवीन

हेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ध
ध्रुव Mon, 07/28/2008 - 18:04 नवीन

सुरेख

लेख सुरेख झाला आहे. अनेकांनी म्हणल्याप्रमाणे, सोप्या भाषेत सुरेख माहिती. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 07/28/2008 - 18:20 नवीन

शनी मंगळ व

शनी मंगळ व तत्सम युत्या ( म्हणजे कोणता तरी ग्रह कोणत्या ग्रहाच्या/तार्‍याच्या मागे दडणे) ग्रहणे ( छायांकित होणे) हे अवकाशात नेहमीच होत असते. अशा युत्यांचा मानवी मनावर किंवा त्यांच्या मुळे पृथ्वीवर होणारे परिणाम या विषयावर कोणी ही खगोल दुर्बीण वापरुन काही संशोधन केले आहे का? पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 07/28/2008 - 20:07 नवीन

उटीची दुर्बिण

डॉ. स्वरुप यांनी उटीला आधी टेलिस्कोप बांधला (पक्कं माहित नाही, पण बहुतेक त्यांनीच!). तो टेलिस्कोप एका ११ अंश उताराच्या टेकडीवर आहे. उटीचे अक्षांश पण ११ अंशच आहेत. आणि ही टेकडी उत्तरेला उंच आहे, आणि बरोब्बर उत्तर-दक्षिण आहे. हा टेलिस्कोपही तारांचा बनवलेला आहे, पण थोडा वेगळा आहे. हा cylindrical parabola आहे. (नेमकी माझ्याकडची फोटोची प्रत २६ जुलैच्या पावसानी खाल्ली.) म्हणजे असा विचार करा की आपले मोठे पाईप्स असतात ना, ज्यातून पाणी वगैरे वाहून नेतात, तसा पाईप जर का उभा चिरला तर कसा आकार तयार होईल, साधारण त्याच आकाराचा parabola तारा एकमेकांशेजारी ठेऊन बनवला तर जसं दिसेल तसा हा टेलिस्कोप आहे..... या ११ अंशाची आणि उत्तर-दक्षिणेची भानगड अशी आहे की, हा टेलिस्कोप फक्त एकाच दिशेत हलू शकतो. पण त्यामुळे एकदा आकाशात एक वस्तू उगवली की ती मावळेपर्यंत तो तिचा पाठलाग करू शकतो. पण जर ती वस्तू फार उत्तर किंवा दक्षिणेला असेल तर या दुर्बिणीला ती दिसणार नाही, किंवा फार चांगली माहिती गोळा करता येणार नाही. तर हा टेलिस्कोप मुख्यत: चंद्राच्या निरीक्षणाकरता बनवला आहे. चंद्राच्या मागे कधीमधी तारे किंवा ग्रह लपतात, याला पिधान युती (occultation) असं म्हणतात. तर असं पिधान असलं की त्याच्या निरीक्षणासाठी हा उटीचा टेलिस्कोप बनवला. अर्थात पिधान युती ही विजुभौंनी म्हटल्याप्रमाणे फक्त चंद्राचीच होते असं नाही तर ग्रहांची आपसात किंवा एक ग्रह एक तारा अशीही होऊ शकते. अशा युत्यांचा मानवी मनावर किंवा त्यांच्या मुळे पृथ्वीवर होणारे परिणाम या विषयावर कोणी ही खगोल दुर्बीण वापरुन काही संशोधन केले आहे का? विजुभौ, काय गरीबाची टिंगल करता काय? मानवी मनाचा अभ्यास करायला आमच्या दुर्बिणी काय करायच्यात? आमची घरची दुर्बिण (जी.एम.आर.टी.) वापरायची असेल काही टेस्ट्स साठी सुद्धा तरी हजार उचापती करायला लागतात. आम्ही माणवी मणाच्या संशोधनासाठी दुर्बिणी देऊ होय? आता प्रश्न पृथ्वीवर होणय्रा परिणामांचा! पृथ्वीवर एवढ्या अंतरावरून फक्त गुरुत्वाकर्षण या एकमेव बलाचा परीणाम होऊ शकतो. आणि त्यात चंद्रच दादा आहे, त्याच्यामुळेच भरती-ओहोटी येतात. सूर्यामुळे (अमावस्या आणि पौर्णिमेला) फक्त त्यांची तीव्रता वाढते (आणि अष्टमीला कमी होते). एवढा मोठ्ठा सूर्य आपला त्याचं काही नाही चालत तर हे शनी-मंगळ काय घेऊन बसलात हो तुम्ही राव! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
च
चतुरंग Mon, 07/28/2008 - 21:30 नवीन

डॉ. गोविंदस्वरुप यांची एक रंजक आठवण सांगण्यासारखी आहे.

मागे एकदा२००० साली पुण्यात एका संस्थेत मी काम करत असताना एका संध्याकाळी अचानक डॉ.गोविंदस्वरुप तिथे आले. मी पाहताक्षणीच त्यांना ओळखले आणि मला डोळ्यांवर विश्वास बसेना. मी चटकन पुढे होऊन त्यांना बसायला खुर्ची दिली. ते बसले आणि मला हाताला धरुन तिथे शेजारीच बसवले. आम्ही व्ही.एल्.एस्.आय. (व्हेरी लार्ज स्केल इंटीग्रेटेड सर्किट्स) मधे काय स्वरुपाचे काम करतो हे जाणून घेण्याची त्यांना इच्छा होती. फील्ड प्रोग्रामेबल गेट अरेज आणि काँप्लेक्स प्रोग्रामेबल लॉजिक डिवायसेस संदर्भात आमचे काम सुरु होते त्याबद्दल त्यांना मी सांगितले. त्यांनी एखाद्या लहान मुलाच्या उत्सुकतेने मी सांगितलेले ऐकून घेतले आणि अत्यंत सोपे सोपे प्रश्न विचारुन (प्रगत तंत्रज्ञानाविषयी असे सोपे प्रश्न विचारणे फार अवघड असते!) माझ्याकडून बरीच माहिती घेतली. त्यांना हे सर्व नवीन तंत्रज्ञान खगोलशात्रातल्या त्यांच्या कामात कसे वापरता येईल त्याबद्दल उत्सुकता होती. डॉ. गोविंदस्वरुप आलेले आहेत हे समजताच लॅबमधले आठ-दहा जण जमले. सांगायचा मुद्दा असा, की त्यावेळी गप्पांच्या ओघात उटी येथील रेडियो टेलिस्कोप कसा बांधला ह्याची सुरस हकिगत त्यांनी सांगितली होती. टेलिस्कोप बांधायचा हे ठरल्यावर त्यांना उटी येथे जावे लागले त्यांनी जागेची पहाणी केली. रेडियो टे. हे तंत्रज्ञान आपल्याला त्यावेळी फारच नवीन होते. प्रत्यक्ष टेलिस्कोप बांधणे म्हणजे प्रचंड मोठे मेकॅनिकल इंजिनियरिंगचेच काम होते. डॉ. साहेब कामानिमित्त मुंबईला गेले असताना तिथल्या फुटपाथवरुन जुन्याबाजारातले 'अप्लाईड मेकॅनिक्स्'चे एक टेक्स्ट्बुक चार की आठआणे किमतीला विकत घेतले. रेल्वेत बसून उटीला जाताना सलग दोन दिवस आणि रात्र त्यांनी ते पुस्तक वाचून संपवले. 'ट्रसेस', कँटिलिव्हर्स, चे डीझाईन आणि कमित कमी खर्चात वजनाला हलक्या गोष्टी वापरुन आणि टिकाऊ असे ते कसे बनवता येईल ह्यासाठी नवीन विषयाचा पूर्ण अभ्यास डॉ. नी केला! आणि त्या ज्ञानाचा पुरेपूर वापर त्यांनी हा टेलिस्कोप बांधताना केला. त्यातले त्यांचे ज्ञान इतके उच्च दर्जाचे होते की ते खगोलशास्त्रज्ञ आहेत की मेकॅनिकल इंजीनिअर असा प्रश्न पडावा! रॉयल सोसायटी, लंडन ह्या जगन्मान्य संस्थेचे सन्माननीय सभासद असलेल्या ह्या महान खगोलशात्रज्ञाबरोबरची अचानक झालेली ही भेट हा माझ्या आयुष्यातला एक अनमोल ठेवा आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्रकाश घाटपांडे Mon, 07/28/2008 - 18:38 नवीन

फॅसिनेटिंग युनिवर्स

हे खगोल विश्व खरच अद्भुत आहे. इन्ट्रोडक्शन टु द युनिवर्स असा माझा प्रोजेक्ट होता त्याची आठवण आली. (नाममात्र बीएस्सी फिजिक्स) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 07/28/2008 - 23:17 नवीन

हे खगोल

हे खगोल विश्व खरच अद्भुत आहे. सहमत आहे! तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार, विठ्ठला, तू वेडा कुंभार! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
झ
झकासराव Mon, 07/28/2008 - 20:40 नवीन

अप्रतिम

अप्रतिम अशी माहिती देणारा लेख :) मी हा प्रकल्प प्रत्यक्ष पाहुन आलो आहे. ते पेटंटच ज्यावेळी मी ऐकल तेव्हा फार अभिमान वाटला. त्यावेळी जवळच्याच एका नारायणगड नावाच्या छोट्याशा डोंगरावरुन काढलेले हे फोटो. Image removed. Image removed. बहुतेक फोटो दिसत नाहीत. ह्या लिन्क वर पहा. http://picasaweb.google.com/zakasrao/NarayangadKhodad/photo#5187634008081145282 http://picasaweb.google.com/zakasrao/NarayangadKhodad/photo#5187633990901276082 अवांतर : बर्‍याच वेळा पिकासावरील दिलेल्या दुव्यातील फोटो का बर दिसत नाहीत??? ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 07/28/2008 - 20:57 नवीन

बरी आठवण करून दिलीत!

झकासराव,बरी आठवण करून दिलीत! मी पण तिथे नारायणगडावर गेले आहे. जी.एम.आर.टी. च्या मुख्य इमारतीच्या आतले दृश्य: http://picasaweb.google.com/sanhita.joshi/GMRT/photo#5074306425796595842 नारायणगडाच्या पायथ्याजवळून http://picasaweb.google.com/sanhita.joshi/GMRT/photo#5074310969871995090 आणि ही एक अँटेना नारायणगडाच्या अर्ध्या उंचीवरून http://picasaweb.google.com/sanhita.joshi/GMRT/photo#5074306434386530450 अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 07/29/2008 - 11:38 नवीन

जी.एम.आर.टी. ला सहल?

जी.एम.आर.टी. ला अभ्याससहल: मी आत्ताच माझ्या एका बॉसशी बोलले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, आपण जर आपला एक ग्रुप घेऊन गेलो तर चालेल. आपल्याला फक्त वाहतूक आणि जेवण यांची व्यवस्था करावी लागेल. तेव्हा पुण्या-मुंबईच्या मिपाकरांना जर रस असेल तर आपण काहीतरी प्लॅन करू शकतो. माहितीजालावर लिहिलं आहे की फक्त शुक्रवारीच तिथे जाता येईल. पण आपल्या मिपाच्या जनतेला जर इतर शनिवार-रविवार चालणार असतील तर आपण तसा प्लॅन करू शकतो. अदिती
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 07/29/2008 - 13:43 नवीन

तेव्हा

तेव्हा पुण्या-मुंबईच्या मिपाकरांना जर रस असेल तर आपण काहीतरी प्लॅन करू शकतो. मी आहे इच्छुक... शिवाय तिथे तुमच्यासारख्या शास्त्रज्ञांकडून माहिती मिळवण्यासही उत्सुक आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मनिष Tue, 07/29/2008 - 13:59 नवीन

मलाही आवडेल...

मलाही आवडेल ही दुर्बिण बघायला. गोविंदस्वरूप फारच ग्रेट दिसताहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 07/29/2008 - 14:09 नवीन

कार्यरत

वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा नवीन पोस्ट-डॉकबरोबर आता काय काय नवीन करता येईल जी.एम.आर.टी. वापरून याचा विचार-विनीमय करणारा माणूस किती कार्यरतही असेल याचा विचारही मी करू शकत नाही! अदिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
प
पद्मश्री चित्रे Tue, 07/29/2008 - 11:46 नवीन

बरे झाले..

लेखाचे नाव वाचुन पुढे जायचा मोह झाला, पण लेख वाचला आणि खुप (खर तर सर्वच) नविन महिती मिळाली. लेख अजिबात बोजड, किचकट नाही
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 07/29/2008 - 14:24 नवीन

छान

यमी, छान माहितीपूर्ण लेख. अजूनही वाचायला आवडेल. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 07/29/2008 - 16:04 नवीन

माहीतीपूर्ण लेख!

यमे लेख मस्तच उतरलाय. असेच माहीतीपूर्ण लेखन करत राहा. गोविंदस्वरूप ह्यांच्याबद्दलची थोडी माहीती इथे मिळेल. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Tue, 07/29/2008 - 21:23 नवीन

सु॑दर लेख

लेख खुपच छान आहे मला पण समजला. जिथे अडल तिथे गुगल आणि पुस्तक होतच. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
ट
टिउ Wed, 07/30/2008 - 00:50 नवीन

मोबाईल

रेडीओ दुर्बिण असल्यामुळे तिथे मोबाईल फोन वापरायला सक्त बंदी आहे. तिथे म्हणजे नक्की कुठे? मला हा प्रश्न फार कधीचा कुणालातरी विचारायचा होता. मोबाईल फ्रिक्वेन्सी तिथे ब्लॉक केली आहे असं ऐकलं होतं. मी पुण्याहुन दर १५ दिवसांनी नाशिकला घरी जायचो. पण नारायणगाव किंवा नारायणगावच्या जवळपास कधीही माझा मोबाईल बंद झालेला मला आठवत नाही (आधी बि.पी.एल आणि मग आयडिया).
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Wed, 07/30/2008 - 06:06 नवीन

मी जी एम आर

मी जी एम आर टी पाहिली आहे. माझ्य अल्पश्या माहितीनुसार तिथे मुख्यतः सेंटिमीटर लेव्हलची ऑब्सर्व्हेशन्स केली जातात (wavelengths of the magnitude of few centimeters. Typically 21 cms, which is associated with hydrogen. This hydrogen based research is an important part of research at GMRT. Last time I heard they were mapping the sky at 21 cms, which was of course a long time back) माझी माहिती चुकीची असल्यास कृपया सुधारावी. मोबाईल बद्दल सांगायचं, तर आजकालचे बहुतेक सर्व मोफो दोन फ्रीक्वेन्सी वर चालतात (०.९ गिगाहर्ट्झ आणि १.८ गिगाहर्ट्झ). यमीताईंच्या माहितीनुसार जी एम आर टी चे काम मुख्यतः ०.१४५ गिगाहर्ट्झ च्य खाली चालत असल्याने १.८ गिगाहर्ट्झ ची फ्रीक्वेन्सी वापरली असता दुर्बिणीच्या कामात अडथळा येत नाही (जो पूर्वी फक्त ०.९ गिगाहर्ट्झचे फोन असताना येत असे, म्हणून तिकडे मोबाईल कंपन्यांना टॉवर्स उभारायला बंदी केली होती). माझ्या महितीप्रमाणे, त्या भागातील सर्व सेलसाइट्स (मोबाईल टॉवर्स ) १.८ गिगाहर्ट्झ वर चालतात. त्यामुळे फोन चालू राहातात. --आपलेच (आणि घाटावरचे) भट... रितु आयी सावन की, रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 07/30/2008 - 12:08 नवीन

योग्य पण अपूर्ण

भटोबा, आपली माहिती योग्य आहे. पण GMRT मधे फक्त २१ से.मी/१.४ गी.हर्ट्झ याच फ्रीक्वेन्सीवर निरीक्षणं होत नाहित. तिथे ५० से.मी/६१० मेगाहर्ट्झ, २०० से.मी/१५० मेगाहर्ट्झ, इत्यादी फ्रीक्वेन्सीवरही निरीक्षणं होतात. मोबाईल्सचा लफ्रा असा होतो की त्या फ्रीक्वेन्सी वेगळ्या असल्या तरी त्यांचे हार्मॉनिक्स त्रास देतात. तिथले समदे कँपूटर्सबी येका (खरंतर दोन) खोल्यांतच ठेवतात आणि त्या खोल्यांना बाहेरून पूर्णपणे जाळी लावली आहे. त्यामुळे सी.पी.यू.च्या फ्रीक्वेन्सीजचाही काही फरक पडत नाही. तिथले बरेचसे संगणक २.० गीगाहर्ट्झच्या वरचे आहेत तरीही... आकाशातून येणारे सिग्नल्स बाकीच्या या टि.व्ही, मोबाईल, इत्यादींपेक्षा एवढे अशक्त असतात की बाकीच्या गोष्टी बंद असल्या तरच आम्हाला उच्च प्रतीचा डेटा मिळतो. जॉड्रेल बँकमधे आम्हाला लॅपटॉप/संगणक घेताना सी.पी.यू.स्पीड १.८-२.२ गीगाहर्ट्झ या बँडमधलाच घ्यायला लागायचा (अजूनही लागतो), नाहीतर ६१० मेगाहर्ट्झला खूप त्रास व्हायचा. आणि अर्थात ही फक्त एकच फ्रीक्वेन्सी नसते, तिथे साधारण ३२ मेगाहर्ट्झची बँडविड्थ असते त्याचाही विचार करावा लागतो. स्वगतः तिथे मोबाइल्स चालत असतील तर मला केंद्र संचालकांशी बोलायलाच पाहिजे! मला ७ ऑगस्टला ५-६ तास दिले आहेत .... माझा डेटा बेकार व्हायचा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
घ
घाटावरचे भट गुरुवार, 07/31/2008 - 04:00 नवीन

यमूताई,

यमूताई, आपल्या इथे मीटर वेव्ह रेन्ज मधे प्रदूषण किती आहे हो? मी असं कुठेतरी वाचलं की, साधारणतः प्रगत देशांमधे या रेन्ज मधे खूप प्रदूषण आहे, त्यामुळे तिकडे मीटरवेव्ह दुर्बिणी बांधणे शक्य नाही. --आपलेच (आणि घाटावरचे) भट... रितु आयी सावन की, रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
झ
झकासराव गुरुवार, 07/31/2008 - 07:07 नवीन

मोबाइलला

मोबाइलला तिथे व्यवस्थित रेन्ज येते की. हा पण मोबाइल स्वताहुन बन्द करण्याचा उपाय आहे तो काटेकोरपणे अमलात आणला पाहिजे. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
घ
घाटावरचे भट Wed, 07/30/2008 - 06:11 नवीन

एक चूक

एक चूक झालिये...०.१४५ गिगाहर्ट्झ ऐवजी १.४५ गिगाहर्ट्झ असायला हवे... स्वगत : सगळ्या गोष्टी पहिल्या प्रयत्नात जमल्या असत्या, तर आपणही जी एम आर टी मधे काम करत असतो राव :< --आपलेच (आणि घाटावरचे) भट... रितु आयी सावन की, रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Wed, 07/30/2008 - 06:11 नवीन

एक चूक

एक चूक झालिये...०.१४५ गिगाहर्ट्झ ऐवजी १.४५ गिगाहर्ट्झ असायला हवे... स्वगत : सगळ्या गोष्टी पहिल्या प्रयत्नात जमल्या असत्या, तर आपणही जी एम आर टी मधे काम करत असतो राव :< --आपलेच (आणि घाटावरचे) भट... रितु आयी सावन की, रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 07/30/2008 - 09:22 नवीन

भटा एकच

भटा एकच प्रतिसाद दोनदा पोस्ट करुन तू दुसरीही चूक केली आहेस पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 07/30/2008 - 09:39 नवीन

खूप सुरेख,

खूप सुरेख, महितीपूर्ण लेख.
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य गुरुवार, 07/31/2008 - 06:50 नवीन

अतिसुंदर

आताच लेख वाचला (इतक्या प्रतिक्रिया पाहून क्लिक केले :)) यमीताई सुंदर माहिती उतरली आहे. आभार आणि अभिनंदन!! अनेकांच्या प्रतिक्रियाही आवडल्या... (श्रीकृष्ण, चतुरंग यांसारखे दादा लोक (आणि इतरही अनेक छुपे रुस्तुम) येथे वावरताना पाहून सुखद आनंदही झाला.) अवांतर - दुर्बिणींबरोबरोबरच युद्धतंत्रज्ञानाच्या आणि अवकाशाच्या क्षेत्रातही भारतीयांनी स्वतःच्या हिंमतीवर मोठी मजल मारली आहे याचीही जाताजाता नोंद केल्याशिवाय राहवत नाही. यमीताई - त्यावरही लिहा...
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/29/2014 - 22:16 नवीन

सुंदर माहिलीपूर्ण लेख. ही

सुंदर माहिलीपूर्ण लेख. ही लिंक दिल्याबद्दल बहुगुणींना अनेक धन्यवाद ! अशी भारताची नविन शक्तीस्थानं बघण्याची ओढ आहे.
  • Log in or register to post comments
प
परदेश् वासी तर… Wed, 01/29/2014 - 23:05 नवीन

अतिशय सुन्दर

नमस्कार अदिती, तुम्ही मला अगदी भूतकाळात घेऊन गेलात. मी पण एक हौशी खगोल निरीक्षक आहे. लहान पणी नाशिक मधल्या हौशी खगोल मंडळा तर्फे मी GMRT आणि IUCAA ला भेट दिली होति. तेव्हाच मनात निश्चय केला होता कि मला खगोल शास्त्रात career करायचं , पण पुढे इतर अनेक भारतीय मुलांप्रमाणे डॉक्टर किंवा इंजिनिअर बनण्याबद्दल माझे मत परिवर्तन करण्यात आले आणि जीव घेण्या जीवशास्त्राचा प्रचंड तिटकारा असल्याने गर्दीतला एक इंजिनिअर बनलो. असो . अश्याच लिहित राहा . आठवणींना उजाळा दिल्याबद्दल आभारी .
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 01/29/2014 - 23:15 नवीन

बहुगुणींना माझ्यातर्फेही धन्यवाद

मी जसे वाचले होते त्यानुसार जीएमआरटी प्रकल्प हा पृथ्वीच्या परिवलनाचा फायदा घेऊन त्याच्या प्रत्यक्ष पृष्ठभागापेक्षाही जास्त पटींनी तरंगलांबी ग्रहण करतो. याबाबत थोडे सांगावे. तसेच जीएमआरटीच्या उपयुक्ततेसंबंधी प्रा. गोविंदस्वरूप आणि अजून एक नामवंत भारतीय खगोलशास्त्रज्ञ यांच्यात मतभेद होते असेही वाचले आहे. या दोन्ही गोष्टींवर जर तपशीलवार माहिती मिळाली तर बरे होईल अशी अदितीला विनंती. (दुसर्‍या मुद्द्याच्या बाबतीत वाद महत्त्वाचा नसून त्यातील शास्त्रीय मुद्दे माझ्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत.)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 01/30/2014 - 00:31 नवीन

वादाबद्दल मलाही फार माहिती

वादाबद्दल मलाही फार माहिती नाही. कदाचित पुण्याजवळ बनवायची का भोपाळजवळ यावरून वाद झालेला असू शकेल. पुण्यात शिक्षणाची सोय चांगली आहे, या खगोलबाह्य कारणासाठी पुण्याची निवड झाली. भोपाळची जागा खगोल आणि सिग्नल प्रोसेसिंगच्या दृष्टीने जास्त चांगली ठरली असती. अशा काही गोष्टी गोविंदकडून ऐकता यायच्या, पण तेव्हा लिहून नाही ठेवल्या! :-(
पृथ्वीच्या परिवलनाचा फायदा घेऊन त्याच्या प्रत्यक्ष पृष्ठभागापेक्षाही जास्त पटींनी तरंगलांबी ग्रहण करतो.
शब्दांत किंचित गडबड आहे, पण ते सगळं शिकल्याशिवाय लक्षात ठेवण्याची अपेक्षाही नाही. प्रश्न मला समजला. पृथ्वीच्या परिवलनाचा फायदा घेऊन सलग नसलेल्या, एकापेक्षा जास्त अँटेना वापरून, ३० किमी व्यास असणारी एकसंध दुर्बीण आहे असं वापरता येतं. (हे वाक्यही फार बरं दिसत नाहीये, पण) आकृत्या वगैरे शोधून, सविस्तर उत्तर लिहीते. त्याला थोडा वेळ लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा